cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Combine Exam 2024

🔰आजपासुन आपण Combine Exam Focus पूर्व व मुख्य परीक्षा संपूर्ण तयारी करुन घेणार आहे. 🔸Daily Quiz असेल 🔹Topic नुसार Notes मिळतील. 🔸सर्व विषयांचा समावेश असेल. 🔹सर्वासाठी Free असेल. ✅संकलन : निलेश वाघमारे सर व टीम

Mostrar más
Publicaciones publicitarias
7 385
Suscriptores
-524 horas
-407 días
-19230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🔰चालू घडामोडी :- 15 JUNE 2024 1) दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस जगभरात साजरा केला जातो. 2) सिरिल रामाफोसा यांची पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 3) युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत जर्मनीने स्कॉटलंडचा 5-1 असा पराभव केला आहे. 4) बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकारने 'निजूत मोइना योजना' सुरू केली आहे. 5) "नीजूत मोईना" योजने अंतर्गत आसाम सरकार 11-12 तील मुलींना 1000 रुपये तर पदव्युत्तर मुलींना 2500 विद्यावेतन देणार आहे. 6) इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) ने संसद टीव्हीसोबत करार केला आहे. 7) जागतिक पर्यटन शाश्वत विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने 'काठमांडू' येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा आयोजित करण्यात आला आहे. 8) नायट्रस ऑक्साईड (N2O) उत्सर्जित करणारा भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. 9) वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज 'गुणकेश मोती' याची मे 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. 10) भारतीय उच्चायुक्तालय आणि श्रीलंकेच्या पूर्व प्रांत पर्यटन ब्युरोने त्रिकोमाली येथे एक मेगा योग कार्यक्रम आयोजित केला आहे. 11) कझान, रशिया येथे होत असलेल्या 'ब्रिक्स' क्रीडा स्पर्धांसाठी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांची भारतीय बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. 12) केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाद्वारे ट्रेड कनेक्ट हा नवीन ई प्लॅटफॉर्म सूरू करण्यात येणार आहे. 13) भारताचे नागास्त्र-1 पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन लष्करात दाखल झाले आहे. 14) भारतीय लष्करात दाखल झालेले नागास्त्र-1 हे स्वदेशी ड्रोन नागपूर या ठिकाणच्या EEL Ltd कंपनीने विकसित केले आहे. 15) मुख्यमंत्री मन्त्रूचिर काथू मन्त्रूचिर कप्पोम ही योजना तामिळनाडू राज्य सरकारने सूरू केली आहे. 16) जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक भारत हा देश ठरला आहे. 17) International chamber of commerce च्या उपाध्यक्ष पदी "हर्ष पति सिंघानिया" यांची नियुक्ती झाली आहे. 18) मे महिन्यातील ICC palyer of Month Women's "चमारी अथापथु" ठरली आहे. 19) नवी दिल्ली येथे 22 जून रोजी वस्तू व सेवा कर परिषदेची 53वी बैठक आयोजित करण्यात आली आहे. 20) वर्ल्ड कंटेनर परफॉर्मन्स इंडेक्स नुसार भारताचे विशाखापट्टणम पोर्ट 18व्या क्रमांकावर आहे. 21) Globel Peace Index 2024 नुसार भारत देश 116 व्या स्थानावर आहे.
Mostrar todo...
👍 6
Photo unavailable
स्वप्न जर तुमचं असेल तर अभ्यास ही तुम्हालाच करावा लागेल शुभ सकाळ 😊
Mostrar todo...
👍 2
Photo unavailable
_*संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो...!!*_ शुभ रात्री 😊
Mostrar todo...
👍 2
🔰चालू घडामोडी :- 14 JUNE 2024 1) जागतिक रक्तदाता दिन 14 जून रोजी साजरा करण्यात येतो. 2) 2004 सालापासून दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. 3) भारताची श्रुती व्होरा घोडेस्वारीमध्ये थ्री-स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय रायडर ठरली आहे. 4) भारताच्या लिकिथ एसपी आणि धनिधी देसिंधू यांनी 'सिंगापूर राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप 2024' मध्ये दोन कांस्यपदके जिंकली आहेत. 5) मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी 'पीएम श्री पर्यटन हवाई सेवा' सुरू केली आहे. 6) जम्मू-काश्मीरमध्ये 'माता खीर भवानी मेळा' आयोजित करण्यात आला आहे. 7) वरिष्ठ IPS अधिकारी अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 8) VI चे अभिजीत किशोर यांची टेलिकॉम उद्योग संस्था सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 9) आसाम सरकारने 'बालविवाह' रोखण्यासाठी मासिक मानधन जाहीर केले आहे. 10) पंतप्रधानाच्या प्रधान सचिव पदी निवड झालेले पी. के. मिश्रा हे 1972 या बॅच चे IAS अधिकारी आहेत. 11) इटली मध्ये 13 ते 15 जून दरम्यान 50वी G-7 परिषद आयोजित करण्यात आली आहे. 12) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील इटली देशात पहिल्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 13) आंद्रे रसेल हा टी 20 क्रिकेट मध्ये 500 सामने खेळणारा पाचवा क्रिकेट पटू ठरला आहे. 14) मुलींच्या विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दिव्या देशमुख यांनी पटकावले आहे. 15) मुलींची विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धा-2024 गुजरात या राज्यात पार पडली आहे. 16 ) विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी दिव्या देशमुख ही चौथी भारतीय महिला ठरली आहे. 17) FAO ने प्रसिध्द केलेल्या द स्टेटस फिशरिज अँड एक्का कल्चर 2024 अहवालानुसार एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारत देशाचा वाटा सर्वाधिक 16.7% वाटा आहे. 18) जम्मू अँड काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्व शाळांमध्ये सकाळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले. 19) संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे वर्ष "International year of Quantum siScience and tiTechnology" म्हणून घोषित केले आहे. 20) ज्योती विज यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर अँड कॉमर्स इंडस्ट्रीज फिक्की च्या जनरल डायरेक्टर पदी नियुक्ती झाली आहे.
Mostrar todo...
👍 5
🔰चालू घडामोडी :- 13 JUNE 2024 1) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स' मध्ये भारत 129 व्या स्थानावर पोहोचला आहे. 2) दरवर्षी 13 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अल्विनिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो. 3) कारगिल युद्धातील विजयाच्या 25 वर्षांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने 'पॅन-इंडिया मोटरसायकल मोहीम' सुरू केली आहे. 4) भारत 2025 मध्ये पुरुषांच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. 5) ज्योती विज यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 6) 'संग्राम सिंग' मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये सामील होणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. 7) स्वित्झर्लंडमध्ये युक्रेन शांतता परिषद होणार आहे. 8) जगप्रसिद्ध सरोद वादक 'राजीव तारानाथ' यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. 9) साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम स्थानी असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. 10) Globel Gender gap index 2024 यादीमध्ये भारत देश 129व्या स्थानावर आहे. 11) Globel Gender gap index 2024 मध्ये भरताची दोन स्थानानी खाली घसरण झाली आहे. 12) Globel Gender Gap index 2024 मध्ये आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे. 13) Globel Gender Gap index 2024 मध्ये सर्वात शेवटी 146 व्या स्थानावर सुदान हा देश आहे. 14) Globel Gender Gap index 2024 अहवाल World Economic Forum या संस्थेने जाहीर केला आहे. 15)चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची चौथ्यांदा शपथ घेतली आहे. 16) आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी पवन कल्याण यांची निवड झाली आहे. 18) भारत आणि जपान देशात Jimex-24 या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. 17) टी. के. चथूत्री यांचे निधन झाले. ते फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. 19) जगप्रसिद्ध सरोद वादक पंडित राजीव तारानाथ यांना 2019 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 20) आंतरराष्ट्रीय सरोद वादक पंडित राजीव तारानाथ यांना 2000 साली केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 21) भारताचा किरकोळ महागाई दर मे महिन्यात 4.75 टक्क्यावर आला आहे. 22) आर्थिक वर्षे 2024 च्या शेवटच्या तिमाहीत देशाच्या कृषी आणि सलग्न क्षेत्राची वाढ 1.1 टक्के झाली आहे. 23) पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सलग तिस-यांदा निवड झाली आहे.
Mostrar todo...
👍 2🔥 2
Photo unavailable
🔰चांगल्या व वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य, जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो..! शुभ सकाळ 😊
Mostrar todo...
👍 10
🔰चालू घडामोडी :- 12 JUNE 2024 1) दरवर्षी 12 जून रोजी जगभरात जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस' साजरा केला जातो. 2 ) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 3 ) '18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' 15 जून ते 21 जून 2024 या कालावधीत मुंबईत होणार आहे. 4) 'मोहन चरण माझी' हे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असतील. 5) भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त नौदल सराव 'GIMAX-24' जपानमधील योकोसुका येथे सुरू झाला आहे. 6) नॉर्वेच्या मॅग्रस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ 2024 स्पर्धा जिंकली आहे. 7)मलावीचे उपाध्यक्ष सॉलोस चिलिमा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. 8) 'आशिष कुमार दाश' यांची NITI आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 9) 'चंद्रबाबू नायडू' आंध्र प्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. 10) NHAI ने नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट' या नवीन कॉर्पोरेट ओळखीचे अनावरण केले आहे. 11) मोहन चरण माझी यांची ओडिशा राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. 12) उपेंद्र द्विवेदी हे भारताचे 30वे लष्कर प्रमुख होणार आहेत. 13) इस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असून 14 पैकी किती देशांनी पाठिंबा दिला आहे. 14) इस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी अमेरिका या देशाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मांडला आहे. 15) इस्राईल युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असून मतदान प्रक्रियेत रशिया हा सदस्य देश तटस्थ राहिला. 16) जैन आचार्य लोकेश मुनी यांनी अमेरिका या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 17) अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात नोटा ला 0.73 टक्के मतदान झाले आहे. 18) 18 व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक रायगड या मतदारसंघात NOTA ला मतदान झाले आहे. 20) भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोळा ने सज्ज LSAM-1 1-13 हे जहाज विशाखापट्टणम या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रॉजेक्ट pvt LTD ने तयार केले आहे. 19) आइसलँड या देशातील प्रिंडविक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. 21) आशियाई कराटे स्पर्धेत भारताने एकूण 28 पदके जिंकले आहेत. 23) FIH हॉकी मेन्स ज्युनिअर वर्ल्ड कप 2024 चे आयोजन भारत या देशात करण्यात येणार आहे.
Mostrar todo...
👍 11
Photo unavailable
🔰कर्तव्याचे खांदे मजबूत करता आले की, आपल्याचं माणसाच्या जबाबदारीचं कधीचं ओझं वाटत नाही..!! शुभ सकाळ 😊
Mostrar todo...
👍 6🥰 1
🔰चालू घडामोडी :- 11 JUNE 2024 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'किसान सन्मान निधी'चा 17 वा हप्ता जारी केला आहे. 2) मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 3) 'प्रेम सिंग तमांग' दुसऱ्यांदा सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. 4) भारताच्या गुलवीर सिंगने पोर्टलँड ट्रॅक फेस्टिव्हल हाय परफॉर्मन्स मीटमध्ये 5000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. 5) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील 'कोस्टल रोड'च्या दुसऱ्या टप्प्याचे उ‌द्घाटन करण्यात आले. 6) लष्करातील तिरंगी सेवेतील अधिकाऱ्यांसाठी संरक्षण सेवा तांत्रिक कर्मचारी अभ्यासक्रम 'मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', पुणे येथे सुरू झाला आहे. 7) भारतीय वेगवान गोलंदाज 'जसप्रीत बुमराह' टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. 8) 'राज प्रिया सिंह' यांची ग्रामीण विकास मंत्रालयाने ग्रामीण विकास विभागाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. 9) टाईम साप्ताहिकाने 2024 या वर्षासाठी बेस्ट युनिव्हर्सिटी फॉर मेडिसिन ची यादी जाहीर केली असुन त्यामध्ये पहिल्या 10) टाईम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 यादीमध्ये हावर्ड विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे. दहा मध्ये अमेरिकेतील पाच विद्यापीठांचा समावेश आहे. 11) भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी शिवराज सिंह चौहान यांनी निवड झाली आहे. 12) केंद्रीय मंत्री के आर नायडू यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे खाते सोपविण्यात आले आहे. 13) देशाच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय पदी जे. पी. नड्डा यांची निवड झाली आहे. 14) केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालय सोपविण्यात आले आहे. 15) भारताच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रीपदी अन्नपूर्णा देवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16 ) केंद्रिय जलशक्ती मंत्री पदी सी. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17) प्रतापराव जाधव यांची आयुष मंत्रालयाच्या राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 18) केंद्रीय क्रीडा मंत्री पदी चिराग पासवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 19) नितीन गडकरी यांची तिसऱ्यांदा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालय पदी नियुक्ती झाली आहे. 20) जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीत यानिक सिनर याने प्रथम स्थान पटकावले आहे. 21) देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सुरू होणार आहे. 22) स्विझरलैंड देशाने आयोजित केलेल्या युक्रेन शांतता परिषदेत 90 देश सहभागी होणार आहेत.
Mostrar todo...
👍 4🥰 3
Photo unavailable
🔰डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची जागा कधीच मिळवू शकत नाही... शुभ सकाळ 😊
Mostrar todo...