MPSC Interview
Ir al canal en Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
Mostrar más7 289
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
7 289
ओंकार कदम, Pune.
मा. सतीश देशपांडे सर
03/01/2024
वेळ - 11:02 - 11:23 (21 min.)
Greetings. Token number
Deshpande sir,
1. Foto tumchach ka? Kdhicha आहे?
2. Mechanical engineering degree, Mg plan B pn mechanical ch ahe ka dusr काय?
3. SAP काय आहे? Post graduation ka course? Kuthe available ahe, mahiti kadhlie ka?
4. नक्की काय असत? तुमचा रोल काय असणार?
5. Manufacturing cha उल्लेख केला तुम्ही तर, Lathe machine Kay असते?
6. आता काय replacement alie त्याला?
7. CNC cha full form? Advantages?
8. Lathe vs CNC काय precise आहे?
9. CNC mule बर्यापैकी जॉब loss zalay, अस वाटत का तुम्हाला?
10. Tumche preferences सांगा.
11. CO ch का?
12. Urbanisation chya समस्या.
13. Pollution mhtla tumhi, water pollution का होते?
14. नदी प्रत्येक शहरात असते का?
15. Water pollution mdhle pollutant chi nawe sanga.
16. Source pollutant mhtla काय आहे ते?
17. Industry ani hou hold mdhun कोणते pollutant water mdhe mix होतात?
18. Air pollution mdhe कोणते pollutant असतात?
19. Gadi tun कोणते pollutant contribute hotat? Diesel mdhun कोणते? Petrol mdhun कोणते?
20. Ewde pollutant sangitle tr te कसे मोजतात? Kshat mojtat?
21. SAFAR mdhe नक्की कोणते device असते?
Member 1
22. Tumhi SAP cha उल्लेख केला tr त्याचे 5 modules आहेत ते माहित आहे का? 4 सांगितले good म्हणाले.
23. तुम्ही Masters का नाही केल? याच्या answer wr पन very good mhnale.
24. DC chya wr CO का?
25. Case study - तुम्ही CO ahat, एक अतिक्रमण clear करायचे आहे मात्र तिथला नगराध्यक्ष त्याला विरोध करतोय, tr तुम्ही काय कराल.
26. Bolun waigere काय होतच नाही. अस समजा गोष्ट हाताबाहेर gelie SC ne देखील padayla sangitly मात्र तो तुम्हाला विरोध krtoy तेव्हा काय करणार.?
27. Urbanisation inevitable आहे, सोबतच त्याच्या समस्या देखील, tr एका वाक्यात समस्येचे मूळ सांगा.
28. Unplanned development kshi dur krnar?
29. Basic amenities effectively ksha deta yetil.
30. Hobby kay.
31. याव्यतिरिक्त extra curricular activities kontya करता. - Marathon and Dhol Tasha Pathak sangitle
32. Dnyanprabodhini, are waah, dhol वाजवता का ताशा? Experience सांगा.
33. ढोल मधे ताडा नावाच एक संकल्पना आहे. ती माहिती आहे का.
34. वाचा त्याबद्दल.
35. पुस्तके वाचता का. कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात. Fictional, self help and मराठ्यांचा इतिहास.
36. Recent kuthle wachle.
Member 2
37. CO Che function सांगा.
38. Independently काम करता येत का त्याला.
39. Je tumhi sangitle, ते कोणत्या कायद्यात आहे? त्याचे कलम सांगा. - मी नाही माहित म्हणालो, tr म्हणाले आम्हाला वाटल कायदा वाचून आला असाल, मी म्हटले overview घेतलाय ट्रेनिंग mdhe shikel.
40. Unplanned development tumchya pratyek उत्तरात होते, CO खरच दूर करू shkto का?
41. इतरांची मदत म्हणजे कोणा कोणाची? Stakeholder सांगा.
42. Urbanisation ka होते?
43. Urbanisation whayla pahije ka?
44. Urbanisation mule ग्रामीण विकास मागे पडत आहे ka?
45. Migration chi karne सांगा.
Deshpande sir
46. शेवटचा प्रश्न, तुम्ही surplus labour in agriculture म्हणाला, पन शेतमजुरांचा already तुटवडा आहे, हा विरोधाभास कसा?
47. Disguised unemployment hi kshi मोजतात?
48. Ajun ek, tumhi म्हणाला industrialisation मुळे urbanisation and migration होत आहे, मला वाटल तुम्ही शिक्षण देखील सांगाल. तुम्हाला नाही वाटत का.
Thike. Yeu shakta. Chhan वाटल बोलून.
All the Best.
7 289
26 Dec. 2024
Panel -Shinde Sir + 2 official
Time 10.50 am to 11.05 am
Place- Nagpur
Snehal Mate
(RFO trainee)
कसे आहात?
खाऊन आले का काही?
हा फोटो तुमचाच आहे का? ( Change करा)😅
Lead किती?
आवड निवड छंद सांगा.
Song कोणता आवडता त्यांचा?
सध्या काय करता?
Training किती झाला?
काय काय झाला आतापर्यंत training मद्ये?
सत्यमंगलम tiger reserve चे वैशिष्टे काय?
वीरप्पन कोण होता?
वाघ बघितला का एवढे फिरलेत तर?
जर वाघ समोर आला तर काय करणार?
Post preference काय?
आतापर्यंत किती interview दिलेत?
बॅच कोणती RFO ची?
Interview कधी झालेत?
Training कुठे सुरू?
DySP का नाही?
मग RFO कसा? ( Height criteria वेग वेगळा आहे)
मग जर DySP allow केला शासनाने तर करणार का? ( मी खुश होऊन हो बोलली)😜
अमरावती मधले 5 वैशिष्टे सांगा.
पापळकरबाबा यांच्या संस्थेचे नाव सांगा. ( सरांनी confused केला शिवाजीराव पटवर्धन ह्यांच्या बरोबर पण मी clear केला दोघ वेगवेगळे आहेत)
महाराष्ट्रात coffee कुठे होते? ( हे त्यांना वैशिष्ट्य मद्ये expected होता)
Panel Member 1-
Graduation कोणत्या University मधून झाला?
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य सांगा.
महिलांच्या महाराष्ट्र शासनाने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या सांगा.
तुम्ही ग्रामीण भागातून की शहरी? ( शहरातून)
मग शहराच्या समस्या सांगा. (मी जिथे जिथे राहिली तिथल्या 3 सांगितल्या)
अमरावतीचे SP कोण?
सगळ्यात जास्त वाघ कुठे सापडतात? (Tiger reserve)
States?
महाराष्ट्राचा rank?
वनांचे प्रकार ( I guess त्यांना त्रिवर्था किंवा Champion and Seth expected होते मी functional types सांगितलेत)
Panel Member 2-
Man animal conflict कसा कमी करणार?
वाघाची संख्या वाढत आहे असा तुमचा department म्हणत पण तसा खर होता का?
कसा खर आहे?
COP 28?
COP म्हणजे काय?
भारताने COP 28 मद्ये काय decide केला ?
कुठे झाला?
पॅरिस करार काय?
पॅरिस करार चे उद्दिष्टे काय?
COP ची पहिली परिषद कुठे?
महाराष्ट्राचे फॉरेस्ट cover किती?
भारताचे फॉरेस्ट cover किती?
सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
ठीक आहे येऊ शकता.
मी have a nice day Sir बोलून बाहेर आली
(Graduation वरती प्रश्न नाही)
7 289
अक्षय मौंदेकर
BE - Electrical engg
Panel: मा. देशपांडे सर
ता: २७ dec २०२३
वेळ: ११:४५- १२ (१५m)
नागपूर
मा. अध्यक्ष - देशपांडे सर
मी - गुड मॉर्निंग सर
या बसा
टोकन नं. सांगा
हा फोटो तुमचाच आहे का?
सध्या काय करता?
प्रेफरन्स काय तुमचा?( यावर मात्र उपप्रश्न विचारले नाही)
तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, तर ई बाईक बद्दल सांगा,
कुठली बॅटरी युज होते बाईक मध्ये
त्यामध्ये अलीकडे आग लागणाच्या घटना का बर होत आहे?
कुठला मेटल युज होतो?
तो सेमी कण्डक्टर असतो का?
(लिथियम) त्याची भारतात काय स्थिती?
भारतात सापडतो का?
मग आपण कुठून आयात करतो?
त्याला आपण मिनरल म्हणू शकतो का?
Mem:१:IAS सर
तुमची हॉबी काय आहे?
तर कुठल्या मूवी बघितला तुम्ही?
वाळवी मूवी चे डायरेक्टर कोण?
काय बोध घेतला त्या मूवी मधून? ( यावर बरिच चर्चा झाली)
(सरांनी टेक्निकलशी निगडित आणखी एक प्रश्न विचारला पण तो मला कळला नाही, मग त्यांनीच स्वतःहून तो सविस्तर सांगितला)
Mem २:IPS सर
तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, तर नागपूर मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची काही घटना चर्चित होत्या का?
( मी यात कोराडी पावर प्लांट बद्दल सांगितलं)
काय होता मुद्दा?
कोराडी पावर प्लांट ची कॅपॅसिटी किती?
आता किती करणार आहे?
थर्मल पावर प्लांट मध्ये fly ash प्रॉब्लेम काय?
याबद्दल सरकार ची काय पॉलिसी?
(Note: विचारलेल्या प्रश्नावर मी जास्त बोललो त्यामुळे प्रश्नांची संख्या कमी झाली असावी कदाचित,
काही प्रश्न आठवत नाही)
7 289
Rajyseva interview 2022
mechanical engineer,
Gov. Labour officer
Pannel wagh sir
...Wagh sir
1. 2017 पास आऊट आहात तर सध्या काही नोकरी आहे का? --GLO
2. training मध्ये काय काय झाले .
3. Mechanical engineering cha प्रशासनातील उपयोग सांगा.
4.AI काय आहे. कोणत्या algorithm वरती work होत ते.
5.chat GPT हे Google search पेक्षा different ahe ka? How?
6. Thermodynamics चे किती नियम आहेत.
7.Newton's च्या नियमान पैकी सर्वात basic नियम कोणता आहे.
8. transducer चे प्रकार सांगा.
9.माझ blood pressure मोजायचं आहे कस मोजाल.
IAS sir
10. अगोदर service मध्ये आहात तर आता कोणती पोस्ट हवी आहे.
(Dysp सांगितल्या नंतर IPS sirana घ्यायला लावला interview)
IPS sir
11.SDPO म्हणजे काय?
12.Dysp and ACP काय फरक आहे?तुमच्या भागाचे Dysp and SP कोण आहेत, भेटला का त्यांना.
13. judicial and magistrate power मध्ये काय फरक आहे.
14.Dysp म्हणून तुम्हाला काय काय innovative करायला आवडेल.**
IAS sir
15.Criminal tribes म्हणजे काय.
16. पारधी जमात काय आहे.
17.अश्या लोकांना गुन्हा पासून कसे प्रवृत्त कराल.(policing and non policing measure)
18. नक्षलवाद काय आहे.
19.UAPA ACT काय आहे.
20.याचा गैरवापर होतोय का नक्षलवादाच्या अनुषंगाने.
Wagh sir
येवू शकता....
7 289
Sangharatna Govindrao Sarode
Dy. Education officer 2021
District -Nanded
Graduation - B.A (History, political science and Hindi literature )
Panel- Deshpande Sir
Time- 20 ते 22 min.
Date -19 December (chh. Sambhaji nagar)
( कुठून आलात,कशे आहेत, अस काहीपण विचारलं नाही 🤣
सरळ questions विचारायला सुरू केलं)
1.नांदेड शहराच्या कोणत्या दिशेने गोदावरी नदी वाहते?
2.नांदेड च्या दक्षिण दिशेला कोणता area येतो.( Deshpande sir नांदेड मध्ये राहीलेले आहेत.)
3.Graduation ला विषय कोणते होते??
4.पानिपत च्या 3 ऱ्या युद्धाचे काय महत्त्व आहे.
5.पेशवाई ची वंशावळ क्रमाने सांगा.
6.post preferences काय आहेत??( इथे मी deputy education officer आहे अस सांगितलं आणि first preference education officer आहे अस सांगितलं.)
National education policy काय आहे??
त्याची काय वैशिष्टय आहेत??
7.Dy. education officer चे काय कामे आहेत??
8. आता education officer का पाहिजे??
Ips member -
1.Mobile cha वापर करून आर्थिक गुन्हे फार वाढत आहेत. विद्यार्थ्यां मध्ये त्या बदल जागरूक कशे कराल ??
2.दहशत वाद रोखण्यासाठी कोणती संस्था काम करते??
3.Intelligence संदर्भातील कोणती संघटना आहे??
4.MH मध्ये अशी कोणती संघटना काम करते??
5.गोदावरी नदी वर कोणकोणते धरणे आहेत??
6.नांदेड मधील कोणत धरण famous आहे??
7.कशा साठी famous आहे??
8.उपसा जल सिंचन काय असते??
9.जायवाडी प्रकल्प कुठे आहे??
10.जायकवाडी आणि विष्णुपुरी जलाशय या मध्ये काय फरक आहे??
11.उपसा जल सिंचन चे काय फायदे आहेत??
12.Electricity लागते तरी पण का बांधतात अशे धरणं??
IAS member -
1.Dy. Education officer चे काय कामे आहेत??
2.Education officer होवून काय करणार??
3.Quality education कसं करणार??
4.सगळे काम तर शिक्षक चं करतात तर तुमची काय गरज आहे??(या questions ला खूप cross questions झाले. हा questions जवळपास 5-6 min. चालला. शेवटी देशपांडे sir हसत होते...ते tya ias member ला बोलले...जावू द्या sir bas zal... जावू द्या त्यांना...)
Note- काही questions आठवत नाहीयेत
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Ishwar Ghunawat(RFO)
Graduation: Bsc(Mathematics)
Panel: Deshpande sir
Date 20 dec 2023
1)Deshpande Sir
Patnadevi mahit aahe ka(maths sandarbhat)?
Zero cha shodh koni lavla, kuthe lagla?
Maths madhe zero chi Kay value aahe?
Deputy collector pahila prefarance ka ?
Deputy collector marfat kontya yojana rabavalya jatat? 10-12 yajana sanga?
Drive ani cut madhe Kay farak aahe?(Hobby cricket)
2) M-1
Maths madhil Golden rule mahit aahe ka?
Discrete mathematics baddal mahiti Aahe ka?
Fdcm Kay aahe?
Timber depo baghitalay ka?
Reserved forest ani protected forest madhil farak?
Maharashtra madhe tiger chi population kiti aahe?
Tiger lokanvar yevadha attack karto tari tyala ka vachavata?
Mahua chi phule kashasathi collect karatat, tyachi kharedi kon karta fakt govt ki private pan?
Godawarman case Kay aahe?
3) M-2
Dysp chi kame sanga?
PI chi kame sanga?
PI pasun khalachi hierarchy sanga?
7 289
Interview date 19 Dec
Panel: Deshpande sir
Graduation civil engineering
Despande sir
1)औरंगाबाद मधील प्रसिद्ध civil engineering structure
2)Geology subject hota ka
3)Kay shiklat geology madhe
4) basalt te composition sanga
5) basalt che type sanga
6) civil engineering madhe rock ch kay kam?
7) hobby kay?
8 ) pay scale kay...sarvat jast konachi?
9) post preference?
10) concrete vr kontya test karta?
11) soil chi bearing capacity kashi Find karta?
M1
1)RCC, PCC , IS CODE( CEMENT,STEEL)
Lintel madhe steel bar kuth vaprta
2) CID ch kam
3) police Commissioner and SP madhil farak
4) Commissioner la konti power
M2
Family background
Post preference
DC ka , CO ka?
Point load kasa apply hoto? Angle kiti?
Placement ka nahi?
Kiti varsh denar exam?
Graduation vr jast questions....karan graduation 2021 la complete
7 289
*नवनाथ रुख्मनबाई गोविंदराव डापके*
प्राथमिक शिक्षक
छत्रपती संभाजीनगर
पॅनल - श्री दिलीप पांढरपट्टे सर
दि. ५ डिसेंबर २०२३
वेळ - १७-१८ मिनिटे
*श्री पांढरपट्टे सर,अध्यक्ष*
सध्या काय करता ?
किती वर्षापासून सेवेत आहे ?
गाव कोणते ?
वडिलांचा व्यवसाय कोणता ?शेतात कोणकोणती पिके घेता ?
ग्रॅज्युएशन कोणत्या विषयातून केले ?
तुमच्याकडे सर्व जण मुक्त विद्यापीठातून पदवि का घेतात ?
महाराष्ट्र विधानसभेची संख्या सांगा.
लोकसभेची सदस्य संख्या सांगा.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर किती प्रतिनिधी निवडून दिले जातात ?
(मी विधानसभेतून निवडले जाणारे सदस्य सांगितल्याने त्यांनी परत मूळ प्रश्न विचारला. मी सॉरी म्हणत मूळ प्रश्नाचे उत्तर दिले )
त्याचे मतदार कोण असतात ?
शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ काय आहे ?
त्यात तुम्ही कधी मतदान केले आहे का ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
बुलडोजर बाबा संकल्पना काय आहे ?
यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी माहिती सांगा.
आणखी कोणते शिक्षण घेतले आहे ?
हो का , बीएड पण केले का ?
(सर स्वतः बीएड आहेत ☺️)
*श्री भुजबळ पाटील सर, आयपीएस*
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष सांगा.
( मी राष्ट्रीय पक्ष सांगायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी परत राजकीय पक्ष विचारले )
सॉरी सर , मी राष्ट्रीय ऐकले, मात्र पुढे उत्तर पूर्ण केले.
विधान परिषदेचे सभापती कोण आहेत ?
विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?
( मी विधानसभेचे सभापती बोलल्यानंतर त्यांनी क्रॉस केले.
विधानसभेचे सभापती असतात की अध्यक्ष ?
मी सॉरी म्हटले ..
राजकीय पक्षांचे कोणते गट पडले आहेत ?
तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत ? मी माझे प्राधान्यक्रम ( शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी ) सांगायला लागलो तर त्यांनी मला क्रॉस केले.. शिक्षणाधिकारी तर सहाव्या क्रमांकावर दिले आहे तुम्ही , आता शिक्षणाधिकारी पहिला का सांगितला ?
येथे सरांचा थोडासा गोंधळ झाला म्हणावा किंवा मुद्दामून क्रॉस केले म्हणावे !
( मात्र पांढरपट्टे सरांनी त्यांना सांगितले की प्राधान्यक्रम निकाल लागल्यानंतर द्यावा लागतो )
तरीसुद्धा सरांनी प्रोफाइल मधील प्राधान्यक्रम विचारला.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० काय आहे?
त्यात नवीन काय आहे?
सध्या शिक्षण क्षेत्रात कोणती आव्हाने आहेत ?
महाराष्ट्रात एक शिक्षक यापूर्वी प्रसिद्धीस पावले होते ते कोण ?त्यांनी काय काम केले ?
त्यांचे तंत्रज्ञान किंवा शिफारसी सध्या चालू आहेत का ?
जी- 20 काय आहे ?
भारताला त्याचा काय फायदा झाला ?
माझ्या उत्तरात लिंग समानता शब्द आल्यानंतर लिंग समानता म्हणजे काय असे विचारले.
*श्री साळवे सर, आयएएस*
सध्या कुठे राहता ?
गावापासून सध्याची शाळा किती किलोमीटर अंतर आहे ? यापूर्वीची शाळा किती किलोमीटर अंतर होती ?
शिक्षणाधिकाऱ्याची काय कामे असतात ?
तुम्ही शिक्षणाधिकारी झाल्यानंतर सर्वप्रथम काय कराल ?
यु-डायस काय आहे ?
यु-डायस वरील माहिती अद्यावत केली का?
मुलांचे रक्तगट तपासून त्याच्या नोंदी घेतल्या का ?
त्यासाठी शासनाने काही खर्चाची तरतूद केली होती का ?
नसेल तर तुम्ही रक्तगट कसे तपासून घेतले ?
त्याचा खर्च मुलांनी दिला का ?
ओके येऊ शकता तुम्ही. मी थँक्यू सर व हॅव अ नाईस डे म्हणत मुलाखत कक्षातून बाहेर पडलो.
*निरीक्षण*
पॅनल खूप सहकारी वाटले. मला जास्त खोलात प्रश्न विचारले नाहीत, आयपीएस सर वगळता. आयपीएस सरांनी थोडे ग्रील करण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटी जाताना स्माईल सुद्धा दिली. मित्रांनो, जसे आहात तसेच रहा व प्रामाणिकपणे उत्तरे द्या. ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला निश्चित माहित असेल तर त्यावर ठाम राहा. उत्तर बदलू नका. आत्मविश्वास बाळगा, ते तुम्हाला तेथे निवडायलाच बसले आहेत.
*धन्यवाद व शुभेच्छा*....
7 289
15/12/2023
13-14 मिनिटे
नाशिक
BE electrical (पण यावर काही विचारले नाही)
Panel - पांढरपट्टे सर
Chairman-
कुठून आलात?
शेती किती?
काय पेरले आहे?
वडील काय करतात?
कुठल्या विभागात काम करतात?
त्यांनी कुठला course केला होता?
वडील सोडून घरात सरकारी सेवेत कोण आहे?
भाऊ काय करतो?
पदवी नंतर इतकी वर्षे झाली तुम्ही काय करतात?
वेळ का लागला?
UPSC try नाही केले का?
दिल्ली ला होतात का?
मनोज जरांगे पाटलांच काय म्हणणे आहे?
ओबीसी ना किती टक्के आरक्षण आहे?
SC ना किती आहे?
अनुसूचित जाती आणि जमाती फरक काय?
महाराष्ट्र मधील तीन जमाती सांगा
आवड कसली आहे?(पत्र लिखाण)
किती पत्र लिहतात?
कोणाला लिहतात?
आता तंत्रज्ञानाच्या युगात पत्र का बरं लिहतात?
पत्र सोडून काय आवडत?(सध्या पत्र लिखाण आवड जोपासते पण शाळेत असताना नाट्य छटा करायची)
नाट्य छटा म्हणजे काय?
नाट्य छटा हा प्रकार मराठीत कोणी आणला?
मग आता सोडून दिलं का नाट्य छटा करायचं?😁
वाचन करतात का तुम्ही?
आवडते लेखक?
G.A. Kulkarni माहिती का?
चि. त्र्य.खानोलकर यांचं टोपण नाव काय आहे?
काय व्हायचंय तुम्हाला?
का व्हायचंय उपजिल्हाधिकारी?
DYSP टाकलं नाहीय का?(उंची बसत नाही का तुझी?😁🙈)
M1
तुमचा साहित्याचा अभ्यास चांगला दिसतो
कविता आणि गझल मधला फरक सांगा
Equity and equality मधला फरक सांगा
पायाभूत सुविधांचा विकास म्हणजे काय?
M2
नक्षत्र एकूण किती?
Preamble मध्ये काय काय उल्लेखित आहे?
धर्मनिरपेक्षता कधी समाविष्ट केलंय?
राज्यघटनेच्या कोणत्या कलमात ते उल्लेखित आहे?
Representation आणि reservation मध्ये काय फरक आहे?
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण फरक काय?
ऋतू किती?
कोणते?(ते तर ऋतुमान झालेत)
मराठी ऋतू सांगा?
वसंत कुठल्या इंग्रजी महिन्यात येतो?
ग्रीष्म कधी येतो?
7 289
Name- Hemant Kokate(RFO).
Qualification- B.E(Computer)
Panel - Deshpande sir.
Deshpande sir-
1.How Tiger marks its territory.
2. ५० कोटी वृक्ष लागवड आणि संवर्धन कसे कराल.
3. चंद्रपूर बद्दल 5 वैशिष्ट सांगा (सध्या training चालू असल्यामुळे).
4.artifical intelligence che 10 field ॲप्लिकेशन sanga.
5.Geotagging अँड QR code मधील फरक (वृक्ष लागवडी संबंधी).
6.Final year che subjects sanga.
Member २-
१.vidhansabha अँड विधानपरिषद आमदार संख्या.
२. कोपरगाव चे amdar,khasdar कोण.
३. महाराष्ट्र आणि भारतात Tiger किती?
४. कोपरगाव बद्दल ५ प्रमुख वैशष्ट्ये.
५. महाराष्ट्र मधील एकूण वन क्षेत्र किती?
6. पानिपत चे ३ युद्ध तारीख आणि ते कोणा मध्ये झाले?
Member ३-
१.GPU ani CPU मधला difference काय?
२.Embeded system म्हणजे काय??
३.Mother बोर्ड वर काय काय components असतात??
४. पक्षांतर बंदी कायदा बद्दल काय सांगता येईल ....
५. मराठा आरक्षण बद्दल तुमचं काय मत आहे???
६.OBC आरक्षण मिळवण्याची प्रक्रिया काय आहे....ओबीसी ayog.... कलम ३४०.
७. कलम ३७० बद्दल तुमचं मत काय आहे?
८. तोडफोडीचं राजकारण योग्य की अयोग्य?
९.tadoba मध्ये tiger sighting चे किती टक्के chances??
१०. गोदावरी नदी मध्ये वाळू तस्कर होते का ??ते रोखण्यासाठी काय उपाय??
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Transcript
Harshal Patil
Deshpande sir,
13/12/20230
Chairman sir
1) Electronics and telecommunication ka? (I said nahi fakt electronics)Fakt Electronics अशी branch आहे का?
2)एवढ्या दिवस काय केले?
3) UPSC MAINS, CAPF(AC) interview दिले, राज्यसेवा चे दिले तर तुमचं व्हायला पाहिजे होत? का नाही झाले?
4) प्रशासनात का यायचं आहे? सगळे असेच बोलतात..
5)DYSP का व्हायचं आहे?
6) POLICE बद्दल समाजात खूप NEGATIVE VIEWS आहेत, असे का?
7) (मी सांगितले काही प्रमाणात आहे) तर सर बोलले की नाही नाही पूर्ण समाजात असेच आहे.(बरेच grill केले)
8) LLM काय आहे?
9) त्याचा USE काय आहे?
10) AI चा सर्वात जास्त use कुठे होतो?
11) AI चा USE होतो असे 5 SECTOR सांगा?
12) तुम्ही कोणत्या POLICE अधिकाऱ्याचे बुक वाचले आहे?
13) कोणते तरी police officer आहेत , नाव आठवत नाही मला, त्यांनी लिहिलेले बुक तुम्ही वाचले का?
14) madam commissioner कुणी लिहिले आहे?
Member 1
1) JAMES BOND बघितला का?
2) कोणासाठी काम करतो?
3) UK ची EXTERNAL agency कोणती आहे?
4) USA ची EXTERNAL AGENCY कोणती?
5)1962 war मद्ये china ने आपला कोणता part घेतला होता?
6) त्या वेळेस defence minister कोण होते?
7) राज्याचे DGP कोण आहेत?
8) तुमचा पेन ची INK कोणती आहे... GERMAN FLUID INK काय आहे?
MEMBER 2
1) paithan कश्यासाठी famous आहे?
2) पैठण मध्ये women बद्दल काय famous ahe?
3) शेवगाव ची RECENT SOCIAL TENSION वाढवणारी घटना कोणती? तुमचे काय मत आहे यावर..
4) ISRO व नासा मद्ये कोण भारी आहे?
5) DYSP ची कामे सांगा..
