es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
7 698
Suscriptores
-324 horas
-367 días
-16630 días
Archivo de publicaciones
महाराष्ट्राने आतापर्यंत अपघातात 1.स्व.गोपीनाथ मुंडे 2.आर.आर.पाटील 3.विलासराव देशमुख 4.अजितदादा पवार हे तडफदार नेतृत्व गमावले.

दादा... या जगात काहीच खरं नाही... अजून पण वाटत नाही की दादा गेले असणार... रोज सकाळी उठून ४ वाजता पासून आपला नित्यक्रम सुरू करून सहा वाजता आपल्या फिल्डवर हजर राहणारा नेता महाराष्ट्राला यानंतर क्वचितच मिळणार.. प्रशासनावर असलेली पकड... अर्थसंकल्पामधल्या आकडेवारी अचूक आणि लोकांसमोर सादर करणे ही असलेली कला.. भाषणामध्ये मध्येच एक मुद्दा बोलणे व नंतर म्हणणे गमतीचा भाग आहे असा नेता आता आपल्यातून निघून गेला.. भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏💐

Breaking दुर्दैवी🙏🙏
Breaking दुर्दैवी🙏🙏

MCGM महानगरपालिका कंत्राटी पद्धतीने 145 पदांची भरती.

इतर पोस्ट साठी बघून घ्या वेबसाइट वरून.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) 👉 गुणवत्ता यादी लागली आहे. 👉 लिंक: https://kdmc.gov.in/kdmc//SectionInformation.html?editForm&rowId=787&page=

CML_STAFF_NURSE.pdf1.36 MB

CML_CLERK_TYPIST.pdf3.53 MB

✅ कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) गुणवत्ता यादी लागली आहे

🔹 Computer MCQ in Marathi | Nyayalay Bharti | Police Bharti Specia न्याय... https://youtube.com/watch?v=dmV1m_xxUiE&si=gpS6osKHkCYsCpmp

♦️#PSI 1379 रिक्त आहेत..
♦️#PSI 1379 रिक्त आहेत..

भूगोल MPSC | महाराष्ट्रातील नद्या Tricks | विद्यार्थ्यांसाठी Must Watch ... https://youtube.com/watch?v=YuVnDJ0kTY8&si=MGuE2lVO8uoyv3x6

+1
♦️#SSC GD भरती 2025 👉 अंतिम निवड यादी..

● महाराष्ट्र – महत्त्वाचे जलाशय व धरणे ◆ कोयना – शिवाजी सागर (कोयना), हेळवाक, सातारा ◆ जायकवाडी – नाथसागर (गोदावरी), औरंगाबाद ◆ बाभळी प्रकल्प – (गोदावरी), नांदेड ◆ भंडारदरा – (प्रवरा), अहमदनगर ◆ गंगापूर – (गोदावरी), नाशिक ◆ राधानगरी – (भोगावती), कोल्हापूर ◆ मोडकसागर – (वैतरणा), ठाणे ◆ उजनी – (भीमा), सोलापूर ◆ तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच), नागपूर ◆ यशवंत धरण – (बोर), वर्धा ◆ खडकवासला – (मुठा), पुणे ◆ येलदरी – (पूर्णा), परभणी

🔹 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ – १०० वे साहित्य संमेलन 🔸 संमेलन क्रमांक: १०० वे (शताब्दी संमेलन) 🔸 ठिकाण: पुणे 🔸 महामंडळ अध्यक्ष: प्रा. मिलिंद जोशी 🔸 ऐतिहासिक संदर्भ:  ▪ पहिले मराठी साहित्य संमेलन १८७८ मध्ये पुण्यातच झाले  ▪ त्यामुळे १०० वे संमेलन पुण्यात होण्याला विशेष महत्त्व आहे 🔸 यजमान संस्था: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 🔸 मुख्य आकर्षणे:  ▪ भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शन  ▪ नामवंत साहित्यिकांची चर्चासत्रे आणि परिसंवाद  ▪ राज्यभरातील कवींचे कवी संमेलन  ▪ मराठी भाषेच्या गौरवार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम 🔸 उद्देश:  ▪ मराठी साहित्याचा १०० वर्षांचा प्रवास साजरा करणे  ▪ नवीन पिढीला साहित्याशी जोडणे

🔆 सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळी (Socio-Religious Movements) 1. 🔆 यंग बंगाल चळवळ (Young Bengal Movement) ➤ नेतृत्व : हेन्री व्हिवियन डेऱोझिओ (1809–1831) — हिंदू कॉलेज, कलकत्ता. ➤ उद्दिष्टे : ➤ हिंदू रूढी, अंधश्रद्धा व परंपरावादाला आव्हान देणे. ➤ स्त्रीशिक्षण, स्त्रीहक्क व बौद्धिक स्वातंत्र्याचा पुरस्कार. ➤ संस्था : ➤ अकॅडमिक असोसिएशन (1828). ➤ सोसायटी फॉर अ‍ॅक्विझिशन ऑफ जनरल नॉलेज (1838). ➤ कार्यपद्धती : ➤ नियतकालिके व जर्नल्स प्रकाशित करणे. ➤ पाश्चात्त्य उदारमतवादी विचारांचा प्रसार. ➤ मर्यादा : ➤ जनसामान्यांपर्यंत पोहोच मर्यादित. ➤ चळवळ प्रामुख्याने इंग्रजी शिक्षित तरुणांपुरती सीमित. 2. 🔆 बेथून शाळा (The Bethune School) ➤ संस्थापक : जे.ई.डी. बेथून (1849), ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सहकार्य. ➤ स्थापना : ➤ प्रारंभी ‘हिंदू फीमेल स्कूल’. ➤ 7 मे 1849 रोजी ‘बेथून स्कूल’ नावाने पुनर्नामकरण. ➤ महत्त्व : ➤ भारतातील स्त्रीशिक्षणासाठीची पहिली अधिकृत शाळा. ➤ 1840–50 च्या स्त्रीशिक्षण चळवळीचा आधारस्तंभ. ➤ परिणाम : ➤ स्त्रियांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा. ➤ पुढील स्त्री-सुधारणा चळवळींसाठी प्रेरणा. 3. 🔆 ब्राह्मो समाज ऑफ इंडिया व आदि ब्राह्मो समाज ➤ प्रमुख व्यक्ती : केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर. ➤ वादाचे कारण : ➤ सर्वधर्मसमभाव व जातिव्यवस्थेच्या विरोधावर मतभेद. ➤ विभाजन (1866) : ➤ केशवचंद्र सेन — ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. ➤ देवेंद्रनाथ टागोर — आदि ब्राह्मो समाज. ➤ महत्त्व : ➤ धार्मिक उदारमतवादाचा विस्तार. ➤ सामाजिक सुधारणांना वैचारिक आधार. 4. 🔆 आत्मीय सभा (Atmiya Sabha) ➤ स्थापना : राजा राममोहन रॉय — 1814, कलकत्ता. ➤ उद्दिष्टे : ➤ एकेश्वरवादाचा प्रसार. ➤ मूर्तिपूजा, जातीय बंधने व अंधश्रद्धांचा विरोध. ➤ तत्त्वे : ➤ विवेक व तर्काला धर्मग्रंथांपेक्षा प्राधान्य. ➤ सती व बहुपत्नीत्वास विरोध. ➤ महत्त्व : ➤ पुढील ब्राह्मो समाजाचा वैचारिक पाया. 5. 🔆 ब्राह्मो समाज (Brahmo Samaj) ➤ स्थापना : राजा राममोहन रॉय — 1828. ➤ उद्देश : ➤ धार्मिक ढोंग व रूढीवादाला विरोध. ➤ ख्रिश्चन धर्मप्रचाराला वैचारिक प्रत्युत्तर. ➤ तत्त्वज्ञान : ➤ एकेश्वरवाद. ➤ वेद व उपनिषदांवर आधारित, पण तर्कप्रधान दृष्टिकोन. ➤ सामाजिक कार्य : ➤ विधवाविवाह समर्थन. ➤ सतीप्रथेच्या निर्मूलनात महत्त्वाची भूमिका (1829). ➤ प्रमुख व्यक्ती : ➤ केशवचंद्र सेन, रवींद्रनाथ टागोर. 6. 🔆 विधवाविवाह संघटना (Widow Remarriage Association) ➤ संस्थापक : विष्णुशास्त्री पंडित — 1853, मुंबई. ➤ उद्दिष्टे : ➤ विधवाविवाहाचा प्रचार. ➤ बालविवाहास विरोध. ➤ कार्य : ➤ खर्चिक विवाहप्रथांचा निषेध. ➤ विधवांचे केशवपन व सामाजिक अपमानाविरुद्ध लढा. ➤ महत्त्व : ➤ महाराष्ट्रातील समाजसुधारणेला गती. 7. 🔆 प्रार्थना समाज (Prarthana Samaj) ➤ स्थापना : डॉ. आत्माराम पांडुरंग — 1867, मुंबई. ➤ उत्पत्ती : ➤ ब्राह्मो समाजाच्या प्रभावातून, स्वतंत्र सुधारणा चळवळ. ➤ तत्त्वे : ➤ मूर्तिपूजा व जातीय बंधनांना विरोध. ➤ पुरोहितशाहीचा निषेध. ➤ एकेश्वरवाद व स्त्री-उत्थानाचा पुरस्कार. ➤ प्रमुख नेते : ➤ न्यायमूर्ती एम.जी. रानडे, आर.जी. भांडारकर. ➤ वैचारिक प्रेरणा : ➤ हिंदू, ख्रिश्चन व बौद्ध विचारसरणी. ➤ मराठी भक्ती परंपरेचा प्रभाव.