es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 154
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
-4530 días
Archivo de publicaciones
CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 13 मे 2026 नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण https://mahasamvad.in/201114/ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रति आखाडा ₹5 कोटी, यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/201158/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर, उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय https://mahasamvad.in/201162/ शून्यातून विश्व निर्माण करणारे रामशेठ ठाकूर आधुनिक काळातील 'एकलव्य' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'चे उदघाटन https://mahasamvad.in/201255/ #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Loknete Ramsheth Thakur ji: A Life of Service and Dedication Attended the 'Amrut Mahotsavi Abhishtachintan Sohala' of Loknete Ramsheth Thakur ji and inaugurated and unveiled the stone plaque of the 'Ramsheth Thakur Public School', alongside Hon Union Minister Nitin Gadkari ji. This felicitation of Ramsheth Thakur ji is not merely an honor for an individual, but a tribute to a personality who shows how a common man can achieve extraordinary feats. Having completed his studies through the Karmaveer Bhaurao Patil's Rayat Shikshan Sanstha and Earn and Learn Scheme, he worked as a teacher before dedicating himself entirely to social service. To ensure that others would not face the same educational hardships he endured, he invested his life's savings into establishing educational institutions, providing opportunities to numerous aspiring students. He also led major movements to ensure justice and employment for locals. After a political career that reached the Lok Sabha, he stepped away from active politics to commit himself to social work. His contribution to the development of the Raigad and Navi Mumbai region will be written in golden letters in the future. Minister Ganesh Naik ji, Minister Adv. Ashish Shelar, Minister Adititai Tatkare, Minister Bharat Gogawale, MP Sunil Tatkare ji, MP Shrirang Appa Barne, BJP State President MLA Ravindra Chavan, MLA Prashant Thakur and other dignitaries were present. #Maharashtra #AmritMahotsav https://x.com/Dev_Fadnavis/status/2054623413755629910?s=20

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उलवे, नवी मुंबई येथे 'रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'मधील जनार्दन भगत सभागृहाचे उदघाटन केले तसेच एआय, आयओटी आणि रोबोटिक्स उत्कृष्टता केंद्राचे कोनशिला अनावरण केले आणि उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. #Maharashtra #DevendraFadnavis #AmritMahotsav

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकनेत्याचा गौरव सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उलवे, नवी मुंबई येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा व 'रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'चे उदघाटन व कोनशिला अनावरण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, रामशेठ ठाकूर यांचा हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नसून, सामान्य माणसाने असामान्य कार्य कसे करावे याची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे. ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण केले आणि पुढे शिक्षक म्हणून काम करत समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. स्वतःला शिक्षण घेताना आलेल्या अडचणी इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, यासाठी त्यांनी आयुष्यभराची कमाई खर्च करून शिक्षण संस्था उभारून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. रामशेठ ठाकूर यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. साधी नोकरी करत असतानाही त्यांनी धाडसाने विविध कामे केली. स्थानिकांना न्याय मिळावा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी मोठी आंदोलने उभी केली. स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या भूमिपुत्रांच्या हक्कांसाठीच्या आंदोलनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. लोकसभेपर्यंतचा राजकीय प्रवास केल्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून बाजूला होत समाजकार्यासाठी स्वतःला समर्पित केले. रायगड आणि नवी मुंबई परिसराच्या विकासात त्यांचे योगदान भविष्यात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #AmritMahotsav

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज उलवे, नवी मुंबई येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा येथे 'रामपर्व' या पुस्तकाचे प्रकाशन केले. #Maharashtra #DevendraFadnavis #AmritMahotsav

photo content

photo content

photo content