es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 135
Suscriptores
+124 horas
-87 días
-3930 días
Archivo de publicaciones

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या कोनशिला अनावरण समारंभातील संबोधन… (लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कोनशिला अनावरण | पुणे | 16-4-2026) #Maharashtra #MangeshkarInstitute #HealthcareIndia

CMO Maharashtra Tweets: सेवेचा संकल्प, आरोग्यसेवेचा विस्तार : पुण्यात ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चे कोनशिला अनावरण रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे 'लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'चे कोनशिला अनावरण पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशा भोसले या आपले जीवन नेहमी उत्सवाप्रमाणे जगल्या. आशाताईंनी जीवनातील कटू अनुभवांना सकारात्मकतेत परिवर्तित केले. त्यांच्या व्यक्तिमत्वात जिवंतपणा ठासून भरलेला होता. त्यांनी कधीही नकारात्मकतेला जवळ येऊ दिले नाही. आशाताईंनी वयाच्या नव्वदीत तीन तासांची मैफल केल्याचे आपण पाहिले, हे अलौकिक आहे. आशाताई व संपूर्ण मंगेशकर कुटुंबाने केलेली संगीतसेवा सर्वपरिचित आहे. मंगेशकर कुटुंबाने संगीतसेवेसोबतच देशाभिमान बाळगून देशसेवेचेही कार्य केले. देशासमोरील संकटांमध्ये आपल्याकडून काय करता येईल असा विचार करून त्यांनी अनेकांना मदत केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मंगेशकर कुटुंब दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सेवाभाव जपत हजारो नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देण्याचे कार्य करत आहे. या रुग्णालयात परवडणाऱ्या दरात उपचार केले जातात. अशीच सेवा 'लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या माध्यमातून पुरवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या रुग्णालयापर्यंत येणारा रस्ता अधिक थेट व रुंद कसा करता येईल, पाण्याची योग्य व्यवस्था कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, लता मंगेशकर फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MangeshkarInstitute #HealthcareIndia

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे 'लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' या रुग्णालय प्रकल्पाच्या आराखड्याची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MangeshkarInstitute #HealthcareIndia

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Legacy Beyond Music: Service, Compassion, and Nation Building Attended the stone plaque unveiling of 'LataAsha Mangeshkar Institute of Medical Sciences' at the hands of RSS SarSanghaChalak Param Pujya Dr. Mohanji Bhagwat. The Mangeshkar family has devoted itself wholeheartedly to the service of music, while also reflecting a deep sense of patriotism and commitment to the nation. The Deenanath Mangeshkar Hospital & Research Center in Pune stands as a powerful testament to this spirit of service, delivering quality healthcare to lakhs of patients. Carrying forward the same legacy, the upcoming LataAsha Mangeshkar Institute of Medical Sciences will offer a comprehensive 360° approach to healthcare, featuring advanced facilities, including a cancer institute, rehabilitation centre and even an veterinary hospital. Legendary singer, Padma Vibhushan and Maharashtra Bhushan awardee Late Ashatai Bhosle lived life as a celebration, her presence defined by warmth, positivity and a lively spirit. Our support for the Mangeshkar family’s philanthropic endeavours will be the most meaningful tribute to her remarkable life and legacy. Just like the eternal melody of Lataji and Asha Tai, the Mangeshkar family’s legacy will continue to echo in the hearts of millions. DCM Eknath Shinde ji, Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelamtai Gorhe, Minister Chandrakant Dada Patil, MLA Bhimrao (Anna) Tapkir, MLA Siddharth Shirole, MLA Hemant Rasane, Pune Mayor Manjushatai Nagpure, President of the Lata Mangeshkar Foundation Pandit Hridaynath Mangeshkar ji, Ushatai Mangeshkar and other dignitaries were present. #Maharashtra #MangeshkarInstitute #HealthcareIndia https://x.com/Dev_Fadnavis/status/2044817436491534338?s=20

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🇮🇳 Maharashtra’s Daughter Strikes Gold at EGMO 2026 🥇 Congratulations to Team India on its best-ever finish at the 15th European Girls’ Mathematical Olympiad EGMO 2026 in France, ranking 6th among 67 countries. Special applause to Mumbai’s Shreya Mundhada for winning India’s first-ever Gold. May this milestone inspire many more young minds in mathematics. 🇮🇳 महाराष्ट्राच्या कन्येची EGMO 2026 मध्ये सुवर्णकामगिरी 🥇 फ्रान्समध्ये पार पडलेल्या 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (EGMO) स्पर्धेत 67 देशांमध्ये 6वे स्थान पटकावत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे मनःपूर्वक अभिनंदन. मुंबईच्या श्रेया मुंदडा हिने भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे विशेष कौतुक. ही ऐतिहासिक कामगिरी गणित क्षेत्रातील अनेक तरुणांना प्रेरणा देणारी ठरेल. #Maths #Olympiad #Congratulations

photo content

CMO Maharashtra Tweets: रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशा भोसले आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता मंगेशकर फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MangeshkarInstitute #HealthcareIndia

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Devendra Fadnavis - Estadísticas y analítica del canal de Telegram @devendragfadnavis