Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 154
Suscriptores
-224 horas
-47 días
-4530 días
Archivo de publicaciones
4 154
CMO Maharashtra Tweets:
🔸Honoured to welcome Former President of India Hon Ramnath Kovind ji and his family at Varsha Bungalow in Mumbai today.
🔸भारताचे माजी राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंदजी यांनी आज सहकुटुंब मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
🔸भारत के पूर्व राष्ट्रपति मा. रामनाथ कोविंद जी इन्होंने आज सपरिवार मुंबई स्थित वर्षा आवास पर भेंट की। इस दौरान उनका हार्दिक स्वागत किया।
🕗 7.55pm | 19-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | संध्या. ७.५५ वा. | १९-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #Mumbai
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'नवभारत नवराष्ट्र : महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव्ह 2026’च्या चौथ्या पर्वात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित कॉफी टेबल बुक 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' चे अनावरण व नवभारत नवराष्ट्रने तयार केलेल्या महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांवर केंद्रित 'Urban Governance @ 2030' या विशेष आवृत्तीचे प्रकाशन केले.
यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री संजय सावकारे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर, नगराध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MagneticMaharashtra #MaharashtraConclave
4 154
CMO Maharashtra Tweets:
ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त (2025-26) आलेल्या इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ओबीसी समाजाच्या शैक्षणिक सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राज्य शासन प्रभावीपणे राबवत आहे. राज्य शासनाने'इतर मागास बहुजन कल्याण' विभागाची स्वतंत्र स्थापना करून ओबीसी, विजाभज, एसबीसी आणि इतर मागास घटकांसाठी विविध कल्याणकारी योजनांना गती दिली आहे. ओबीसींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारकरित्या करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना 100 टक्के फी सवलत देण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ओबीसी विभागामार्फत आश्रमशाळा चालविण्यात येत असून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये मुला-मुलींसाठी एकूण 72 वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. तसेच ‘स्वयंम’ योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना राहणीमान आणि शिक्षणासाठी ₹60 हजारपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. महाज्योती संस्थेमार्फत यूपीएससी आणि एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून यूपीएससीमध्ये 29 तर एमपीएससीमध्ये 118 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच, स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ओबीसी महामंडळामार्फत युवकांना ₹15 लाखपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात असून या कर्जाची हमी शासन घेते. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ न मिळालेल्या घटकांसाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरू करण्यात आली असून घरकुलासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. शिवाय, सौरऊर्जेसाठी स्वतंत्र अनुदान दिले जात असून ओबीसी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. समितीकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंह व इतर सदस्य उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #OBCWelfare
4 154
CMO Maharashtra Tweets:
अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप; 25,400 मेगावॅट निर्मितीसाठी सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य शासनासोबत एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीतून राज्य ऊर्जा निर्मितीमध्ये अधिक वेगाने प्रगती करणार आहे. ही गुंतवणूक केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच लाभाची नसून त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र नेहमी देशात अग्रेसर असणार आहे. कंपन्यांनी सामंजस्य करार प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. संबंधित कंपन्यांनी प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करावे. या कामी राज्य शासनाचा संबंधित विभाग त्यांना सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.
करारांमुळे निर्माण होणारी अणुऊर्जा व रोजगार निर्मिती
अदानी पॉवर लिमिटेड कंपनी राज्यात ₹1,50,000 कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून 6000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल. तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या 12,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज ₹2,00,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामधून 7200 मेगावॅट ऊर्जा निर्मिती व 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे.
एनटीपीसी लिमिटेड ₹1,00,000 कोटींची गुंतवणूक करणार असून 7200 मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. यामधून 5000 रोजगार निर्मिती होईल.
ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) राज्यात ₹2,00,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामधून 5000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि 3000 रोजगार निर्मिती होणार आहे.
अशाप्रकारे राज्यात एकूण ₹6,50,000 कोटींची गुंतवणूक होणार असून 25,400 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे
यावेळी मंत्री अतुल सावे, अदानी समूहाच्या न्यूक्लिअर एनर्जीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या न्यूक्लिअर एनर्जी बिझनेसचे अध्यक्ष, रंजय शरण, एनटीपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णदा प्रसाद सामल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #NuclearEnergyAgreement
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुरेंद्र सिंह आणि विशाल सिंह यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,001 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
