es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 150
Suscriptores
-124 horas
-27 días
-3730 días
Archivo de publicaciones
CMO Maharashtra Tweets: नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री यांनी श्री. कर्डिले यांचे निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Dharma Dhwaja Hoisted at Shree Kalaram Mandir: A Divine Commencement of Preparations for Simhastha Kumbh 2027 It was an honour to hoist the historic Dharma Dhwaja at Shree Kalaram Mandir along with former President of India Hon. Ram Nath Kovind ji and Koshadhyaksh of the Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust, Param Pujya Swami Govind Dev Giri ji Maharaj. Following the tradition in Ayodhya, the saffron flag was hoisted on a 21-foot-tall five-metal (Panchadhatu) flagpole. This flagpole carries an 11 by 5-foot saffron flag, featuring an image of Lord Hanuman and the 'Om' symbol. This ceremony marks the formal religious commencement of the preparations for the Simhastha Kumbh Mela 2027. Minister Girishbhau Mahajan, Minister Sanjay Sawkare, Minister Dadaji Bhuse, Minister Narhari Zirwal, Chairperson of the National Commission for Women Vijayatai Rahatkar, Nashik Mayor Himgauritai Aher-Adke, Padma Shri Dr. Milind Kamble ji and other dignitaries were present. #Maharashtra #KalaramMandir https://x.com/Dev_Fadnavis/status/2052076429811261652?s=20

CMO Maharashtra Tweets: श्री काळाराम मंदिरावर ऐतिहासिक धर्मध्वजाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज नाशिक येथे 'श्री काळाराम मंदिरावर ऐतिहासिक धर्मध्वजाची स्थापना' करण्यात आली. अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वज स्तंभावर 11 x 5 फूट आकाराचा भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून फडकविण्यात आला. त्यावर श्री हनुमानाची प्रतिमा तसेच ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #KalaramMandir

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Nashik: Powering Maharashtra’s Trillion-Dollar Goal with Historic Investments for Simhasta Kumbh Mela 2027! Participated in the ‘Kumbh Udyog Sangam and Nashik District Investment Summit 2026’ in Nashik today and addressed the gathering. Expressed confidence that Nashik will emerge as a key growth engine for North Maharashtra, supported by its religious significance in the Simhastha Kumbh Mela and a strong development trajectory. Over 300 MoUs have been signed at the district level, with expected investments of around ₹13,190 crore, creating nearly 32,000 jobs. In the last three years, Nashik has attracted ₹31,945 crore in investments, generating around 66,000 employment opportunities, driven by industry-friendly policies and the ‘MAITRI’ single-window system. In the past two years, major industries have invested nearly ₹57,000 crore, along with ₹12,000 crore facilitated from Davos. With industries expanding across North Maharashtra, Nashik is emerging as a strong industrial magnet. Maharashtra accounts for 24% of the country’s GCCs, and Nashik holds significant potential in this sector. For the Simhastha Kumbh Mela, industry groups are contributing through CSR, while the State Government will undertake development works worth around ₹33,000 crore, supporting further growth and contributing to an economy of nearly ₹3,00,000 crore. The Kumbh Mela reflects India’s inclusive culture and faith. Infrastructure like the Nashik Ring Road will create jobs, while planned facilities will support sustainable development, with a focus on environmental conservation and technology-driven management for a seamless devotee experience. Minister Girishbhau Mahajan, Minister Sanjay Sawkare, Minister Uday Samant, Minister Dadaji Bhuse, Minister Narhari Zirwal, Nashik Mayor Himgauritai Aher-Adke and other dignitaries were present. #Maharashtra #InvestmentSummit #Nashik https://x.com/Dev_Fadnavis/status/2052067140518437207?s=20

CMO Maharashtra Tweets: ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल, नाशिकमध्ये गुंतवणुकीचा विक्रमी ओघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद 2026' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिकच्या अर्थव्यवस्थेतील योगदानात लक्षणीय वाढ झाली आहे. आज 300 हून अधिक सामंजस्य करार जिल्हास्तरावर झाले असून, जवळपास ₹13,190 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि सुमारे 32,000 नवीन रोजगार निर्माण होत आहेत. नाशिकचा 3 वर्षांचा एकत्रित (क्युम्युलेटिव्ह) विचार करता, स्थानिक स्तरावर जवळपास ₹31,945 कोटींची गुंतवणूक झाली असून सुमारे 66,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. विविध क्षेत्रांतील या गुंतवणुकीमागे उद्योगस्नेही धोरण आणि ‘मैत्री’सारखी एक खिडकी योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक मोठ्या उद्योगांकडूनही गेल्या 2 वर्षांत नाशिकमध्ये ₹57,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. दावोस येथून देखील जवळपास ₹12,000 कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये आणण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत उद्योग येत असून, नाशिक हे या भागातील नवे उद्योग ‘मॅग्नेट’ म्हणून उदयास येत आहे. पुढील काळात येथे आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन परिवर्तन दिसून येईल. राज्यात सर्वदूर उद्योग उभे राहत आहेत. देशातील एकूण जीसीसींपैकी 24% जीसीसी महाराष्ट्रात असून, नाशिकमध्येही जीसीसीसाठी मोठी क्षमता असल्याने या क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे. उद्योग समूह सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी सहकार्य करत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाकडून सुमारे ₹33,000 कोटींची विकासकामे हाती घेतली जाणार असून, त्यामुळे उद्योगांसाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल. या गुंतवणुकीमुळे सुमारे 3,00,000 कोटींची अर्थव्यवस्था उभी राहण्यास चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमुद केले. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा अविष्कार आणि समता व श्रद्धेचा मेळा म्हणजे कुंभमेळा आहे. नाशिक रिंग रोडमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या सुविधा शाश्वत विकासाला चालना देतील. पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि डिजिटल व तंत्रज्ञानाचा व्यापक वापर असलेला हा कुंभमेळा ठरेल. प्रत्येक भाविकाला आनंददायी आध्यात्मिक अनुभूती मिळावी, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #InvestmentSummit #Nashik

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरावर विधीवत पूजन करून 21 फूट उंच पंचधातूच्या स्तंभावर धर्मध्वज फडकविण्यात आला. ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारांनी दुमदुमलेल्या वातावरणात धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी वेदघोषांच्या साक्षीने होमहवन विधी संपन्न झाला. हा पवित्र सोहळा श्रद्धा, भक्ती आणि सनातन परंपरेच्या दिव्य तेजाने उजळून निघाला. #Maharashtra #DevendraFadnavis #KalaramMandir

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जय श्रीराम! सनातन संस्कृतीचा देदीप्यमान उत्सव 🚩 माजी राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंदजी व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या समवेत श्री काळाराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज दिमाखात फडकावला. प्रभू श्रीरामाच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारांच्या मंगल ध्वनीत हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. #Maharashtra #KalaramMandir

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नाशिक येथील 'श्री काळाराम मंदिर येथील ऐतिहासिक धर्मध्वज स्थापना समारंभ' येथे उपस्थित राहून विविध आखाड्यांचे संत व महंतांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी माजी राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंदजी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आहेर-आडके, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #KalaramMandir

Devendra Fadnavis - Estadísticas y analítica del canal de Telegram @devendragfadnavis