es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
💁‍♂ भाजपची पहिली यादी अशी LetsUp | Politics 1. नागपूर दक्षिण-पश्चिम : देवेंद्र फडणवीस 2. कोथरूड : चंद्रकांत पाटील 3. नंदूरबार : विजयकुमार गावित 4. नवापूर : भारत गावित 5. रावेर : हरीभाऊ जावळे 6. भुसावळ : संजय सावकारे 7. अकोला (प.) : गोवर्धन शर्मा 8. अकोला (पू.) : रणधीर सावरकर 9. जामनेर : गिरीश महाजन 10. जळगाव जामोद : संजय कुटे 11. शहादा : राजेश पाडवी 12. जळगाव शहर : सुरेश भोळे 13. सिंदखेडा : जयकुमार रावल 14. धुळे ग्रामीण : ज्ञानज्योती बदाणे 15. अमळनेर : शिरीष चौधरी 16. चाळीसगाव : मंगेश चव्हाण 17. माण : जयकुमार गोरे 18. तुळजापूर : राणा जगजितसिंह पाटील 19. अकोले : वैभव पिचड 20. राहुरी : शिवाजीराव कर्डिले 21. औसा : अभिमन्यू पवार 22. वांद्रे पश्चिम : आशिष शेलार 23. नाशिक मध्य : देवयानी फरांदे 24. ऐरोली : संदीप नाईक 25. शिर्डी : राधाकृष्ण विखे-पाटील 26. इंदापूर : हर्षवर्धन पाटील 27. अमरावती : सुनील देशमुख 28. वर्धा : पंकज भोयर 29. मूर्तिजापूर : हरीश पिंपळे 30. पुणे कँटोन्मेंट : सुनील कांबळे 31. वाशिम : लखन मलिक 32. कारंजा : राजेंद्र पटणी 33. दर्यापूर : रमेश बुंदिले 34. मोर्शी : डॉ. अनिल बोंडे 35. आर्वी : दादाराव केंचे 36. हिंगणघाट : समीर कुणावार 37. नाशिक मध्य : देवयानी फरांदे 38. उमरखेड : सुधीर पारवे 39. हिंगणा : समीर मेघे 40. राजुरा : संजय धोत्रे 41. आमगाव : संजय पूरम 42. मलकापूर : चैनसुख संचेती 43. चिखली : श्वेत महाले 44. खामगाव : आकाश फुंडकर 45. अकोट : प्रकाश भारसाकळे 46. सावनेर : राजीव पोतदार 47. नागपूर दक्षिण : मोहन मते 48. नागपूर मध्य : विकास कुंभारे 49. नागपूर पश्चिम : सुधाकर देशमुख 50. नागपूर उत्तर : मिलिंद माने 51. अर्जुनी मोरगाव : राजकुमार बडोले 52. तिरोरा : विजय रहांगदले 53. आरमोरी : कृष्णा गजभे 54. गडचिरोली : देवराव होली 55. चंद्रपूर : नाना शामकुळे 56. बल्लारपूर : सुधीर मुनगंटीवार 57. *चिमूर : किर्तीकुमार भांगडिया 58. वणी : संजीव रेड्डी बोदकुरवार 59. राळेगाव : अशो उइके 60. यवतमाळ : मदन येरावार 61. आर्नी : संदीप धुर्वे 62. भोकर : बापुसाहेब गोर्ठेकर 63. मुखेड : तुशार राठोड 64. हिंगोली : तानाजी मुटकुळे 65. परतूर : बबनराव लोणीकर 66. बदनापूर : नारायण कुचे 67. भोकरदन : संतोष दानवे-पाटील 68. फुलंब्री : हरीभाऊ बागडे 69. औरंगाबाद पूर्व : अतुल सावे 70. परळी : पंकजा मुंडे 71. गंगापूर : प्रशांत बम 72. चांदवड : राहुल आहेर 73. नाशिक पश्चिम : सीमा हिरे 74. डहाणू : पास्कल धानरे 75. विक्रमगड : हेमंत सावरा 76. भिवंडी पश्चिम : महेश चौघुले 77. मुरबाड : किसन कथोरे 78. कल्याण पूर्व : गणपत गायकवाड 79. डोंबिवली : रवींद्र चव्हाण 80. मीरा भाईंदर : नरेंद्र मेहता 81. ठाणे : संजय केळकर 82. दहिसर : मनीषा चौधरी 83. मुलुंड : मिहीर कोटेचा 84. कांदिवली पूर्व : अतुल भातखळकर 85. चारकोप : योगेश सागर 86. घाटकोपर (प.) : राम कदम 87. गोरेगाव : विद्या ठाकूर 88. विलेपार्ले : पराग अळवणी 89. सायन कोळीवाडा : तामीळ सेल्वन 90. वडाळा (मुंबई) : कालिदास कोळंबकर 91. मलबार हिल : मंगलप्रभात लोढा 92. बेलापूर : मंदा म्हात्रे 93. पनवेल : प्रशांत ठाकूर 94. पेन : राजीवशेठ पाटील 95. शिरूर : बाबुराव पाचर्णे 96. चिंचवड : लक्ष्मण जगताप 97. पुणे पर्वती : माधुरी मिसाळ 98. कसबा पेठ : मुक्ता टिळक 99. *भोसरी : महेश लांडगे 100. वडगाव शेरी : जगदीश मुळीक 101. शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे 102. खडकवासला : भीमराव तापकिर 103. हडपसर : योगेश टिळेकर 104. कोपरगाव : स्नेहलता कोल्हे 105. सातारा : शिवेंद्रराजे भोसले 106. कराड दक्षिण : अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष) 107. नेवासा : बाळासाहेब मुरकुटे 108. शेवगाव : मोनिका राजळे 109. श्रीगोंदा : बबनराव पाचपुते 110. कर्जत जामखेड : राम शिंदे 111. गोराई : लक्ष्मण पवार 112. माजलगाव : रमेश अडसकर 113. अष्टी : भीमराव धोंडे 114. अहमदपूर : विनायक किसन जाधव-पाटील 115. निलंगा : संभाजी पाटील-निलंगेकर 116. सोलापूर शहर उत्तर : विजयराव देशमुख 117. सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख 118. वाई : मदन भोसले 119. कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक 120. इचलकरंजी : सुरेश हाळवणकर 121. मिरज : सुरेश खाडे 122. सांगली : सुधीर गाडगीळ 123. शिराळा : शिवाजीराव नाईक 124. जत : विलासराव जगताप 125. नागपूर पूर्व : कृष्णा खोपडे न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🤔 जाणून घ्या आजपासून आर्थिक क्षेत्रात काय बदल होणार? LetsUp | National आर्थिक विषयाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये आजपासून (दि. 1) बदल होणार आहेत. काय-काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊ... 1. SBI ची 'ती' मर्यादा रद्द : स्टेट बँकेने इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग व्यवहारांवरील दरमहा मर्यादा पूर्णपणे रद्द केली आहे. ● दरमहा सरासरी 25,000 रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्यांना बँकेच्या शाखेतून दोनवेळा मोफत रक्कम काढता येणार आहे. ● दरमहा सरासरी 25 ते 50,000 रुपयांची शिल्लक ठेवणाऱ्यांना बँकेच्या शाखेतून 10 वेळा मोफत रक्कम काढता येणार आहे. ● खात्यामध्ये 50,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम शिलकीत ठेवणाऱ्या ग्राहकास अमर्यादवेळा रक्कम काढता येणार आहे. 2. कॅशबॅक बंद : आजपासून पेट्रोलपंपांवर डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा ई-वॉलेटच्या माध्यमातून इंधनखरेदी केल्यावर मिळणारी 0.75 टक्क्यांची सवलत बंद होणार आहे. 3. पेन्शन पॉलिसीत बदल : ज्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू 1 ऑक्टोबर 2019 रोजी 10 वर्षांची सेवा पूर्ण करण्यापूर्वीच झाला असेल आणि त्याांनी सलग 7 वर्षे सेवा केली असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना 1 ऑक्टोबर 2019 पासून उपनियम (3) अंतर्गत वाढलेल्या दराप्रमाणे पेन्शन मिळणार आहे. 4. कॉर्पोरेट कर कपात : आजपासून स्थापन होणाऱ्या कंपन्यांना किमान 15 टक्के कर भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या कंपन्यांना आता उपकरासह एकूण 17.01 टक्के करभरणा करावा लागणार आहे. 5. हॉटेलखोल्या स्वस्त : आजपासून 1,000 रुपये भाडे असणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे. यामुळे आज एक ऑक्टोबरनंतरचे बुकिंग करणाऱ्याना जीएसटी घटविल्याचा फायदा होणार आहे. 6. जीएसटी अर्जात बदल : वार्षिक 5 कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांसाठी आजपासून नवीन जीएसटी रिटर्न भरावा लागणार आहे. या व्यावसायिकांना ‘जीएसटीएएनएक्स-1’ हा अर्ज भरावा लागणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

😇 म्हणून उमेदवारी अर्ज भरतानाच झाला दंड! LetsUp | Politics विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम प्लास्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला दंड भरावा लागल्याची घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. अशाप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करताना दंड होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. सविस्तर असे कि, देवगाव येथील मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी 10 हजाराची चिल्लर घेऊन आले. यावेळी त्यांनी 500 रुपयाचे 20 बंडल प्लास्टिक पॅकेटमध्ये आणले होते. प्लास्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लास्टिकमध्ये आणल्याचे लक्षात आल्याने नेवासा नगरपंचायतीने ही कारवाई केली. त्यांनी मुंगसे यांना 5 हजाराचा दंड ठोठावला. या कारवाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💁‍♂ अ‍ॅक्टर्स फॅक्टरी आयपीए व इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आयोजित* 🎭 अभियंत्यातल्या अभिनेत्यांची स्टँडअप ऍक्टिंग स्पर्धा 🗓 2 ऑक्टोबरला स्टॅंडअपच्या माध्यमातून घेतली जाणार इंजिनिअरिंगची शाळा. 🎙 स्पर्धेचे विषय : ▪ कंपेटीटीव्ह एक्झाम बद्दल ▪ कॉलेजचे किस्से ▪ होस्टेलचे किस्से ▪ इंडस्ट्रियल व्हिजिटचे किस्से ▪ इंटरव्ह्यूचे किस्से 🏆 प्रथम 5 विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे. स्पर्धेचा विजेता बनणार आगामी वेबसिरीजचा भाग* 📍 स्थळ : पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, शिवाजीनगर, पुणे 📝 मग वाट कसली पाहताय *9820961997* या क्रमांकावर व्हाट्सअ‍ॅप मेसेज करून आजच आपली नावनोंदणी करा. (ADVT)

29-9-2019 7_40_49WhatsApp Image 2019-09-28 at 10.56.55 PM.jpeg3.81 KB

💁‍♂ 'ईडी कार्यालयात जाणार नाही' LetsUp I Update माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. 🗣 शरद पवार म्हणाले : ● आयुष्यात मी कधी शिखर बॅंकेचा संचालक नव्हतो, सभासद नव्हतो. ● विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न. ● चौकशीसाठी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार. ● माझ्यावर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत. पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शिवसनेचे आभार मानले आहेत. तसेच आता पुण्यात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 🗣 रोहित पवार म्हणले : ● राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलली नाही. ● सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये ही इच्छा आहे. ● कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शरद पवार यांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ● या ठिकाणी कोणत्याही सहानुभूतीचे राजकारण करण्यात आले नाही. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🖼 नासाने प्रसिद्ध केली 'विक्रम' ची छायाचित्रे LetsUp I Science अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'चांद्रयान-2' मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. एलआरओने काढलेले फोटो हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 600 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पृष्ठभागाचे आहेत. यात 'विक्रम' लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे स्पष्ट होत आहे. 👉 फोटो पाहण्यासाठी : https://go.nasa.gov/2lBzAto 🗣 नासाने काय म्हटले? : ● एलआरओने भारताचे चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर जिथे उतरले त्या पृष्ठभागाचे फोटो काढले आहेत. ● हे फोटो संध्याकाळच्या वेळी काढण्यात आल्याने या फोटोंमध्ये लँडर नक्की कुठे आहे? हे स्पष्ट होऊ शकले नाही. ● ऑक्टोबरमध्ये (दि. 14) एलआरओ पुन्हा या भागावरुन जाणार आहे. तेव्हा आणखीन फोटो काढले जातील. एलआरओच्या मदतीने 'विक्रम' लँडरशी संपर्क करता येणार नसला तरी लँडरचे नक्की काय झाले? नेमकी काय चूक झाली? याबद्दलची माहिती मिळण्याची शक्यता होती. आता त्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎯 इन्कम टॅक्स भरण्यास मुदतवाढ LetsUp I National केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर परतावा भरण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आयकर परतावा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने आता येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत आयकर परतावा भरता येणार आहे. ही मुदतवाढ केवळ ज्यांच्या आयकर खात्यांसाठी लेखापरीक्षणाची आवश्यकता आहे त्यांनाच देण्यात येणार असल्याचे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे. तर केवळ आयकर परतावाच नाही तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. अगोदर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती. ती देखील वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎯 विधानसभेची आज अधिसूचना LetsUp I Update राज्य विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया आज (दि. 27) पासून सुरू होत आहे. निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल मग उमेदवारी दाखल करता येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी घटस्थापनेपासूनच म्हणजे 29 तारखेपासून राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहेत. मतदार : 8 कोटी 95 लाख I मतदान केंद्रे : 95,473 एकूण 288 जागांपैकी 29 मतदारसंघ हे अनुसूचित जाती तर 25 मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● विधानसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारपासून (दि. 27) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार ● हवाईदलाच्या सर्व विमानातील रेडिओ सिस्टिम बदलणार, बालाकोटचा धडा घेत जॅमिंग टाळण्यासाठी निर्णय ● इंटरनेटचा वापर करणात चीन पहिल्या क्रमांकावर असून भारताने (45.10 कोटी) दुसरे स्थान मिळवले ● राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुन्हा जम्मू आणि काश्‍मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल ● हरयाणामध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार; अकाली दलाचे नेते दलजीत सिंग यांची घोषणा ● राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या वर्षीच्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता ● सातारा पोटनिवडणुक : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ● अ‍ॅमेझॉनने 'अलेक्झा'ला आता स्मार्ट रिंग व गॉगलमध्येही सादर करण्याची केली घोषणा ● कोरिया ओपन : भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश ● संजय दत्तच्या डॉगहाऊस या आगामी चित्रपटातून 'महेंद्र सिंह धोनी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎞 उत्सुकता संपली! 'ट्रिपल सीट'चं पहिलं गाणं रिलीज LetsUp I Entertainment अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत असलेल्या बहुप्रतिक्षित 'ट्रिपल सीट' या चित्रपटातील पहिले गाणे 'नाते हे कोणते' हे अखेर रिलीज झाले आहे. या रोमँटिक गाण्याचे बोल 'नाते हे कोणते' असे असून यामध्ये अंकुश चौधरी व शिवानी सुर्वेची अफलातून केमिस्ट्री दिसतेय. ते दोघेही एकमेकांसोबत मोबाईलवरून बोलताना दिसत आहेत. या गाण्याचे गीतकार व संगीतकार अविनाश विश्वजित असून हरगुन कौर आणि रोहित राऊत यांनी हे गाणं गायले आहे. संकेत पावसे दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 👀 गाणं पहा : 👉 http://bit.ly/2lhP2e3 विशेष म्हणजे हे गाणं अल्पावधीतच सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💁‍♂ आधार-पॅन लिंक करा; अन्यथा होईल नुकसान! LetsUp | Update येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी न जोडल्यास तुमचे पॅनकार्ड 1 ऑक्टोबरपासून 'इन-ऑपरेटिव्ह' (निष्क्रिय) ठरणार आहे. इन-ऑपरेटिव्ह होणार म्हणजे जोपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक करीत नाही तोपर्यंत ते वापरता येणार नाही. 🤔 कसं करायचं लिंक? : ● प्रथम http://bit.ly/2lct4Jd या आयकर विभागाच्या लिंकवर जा. ● तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या आधार लिंकवर क्लिक करा. ● तुमचे अकाऊंट बनले नसेल तर रजिस्ट्रर करा. ● लाॅगईन नंतर पेज ओपन होईल. ● निळ्या रंगाच्या स्ट्रिपमध्ये प्रोफाईल सेटिंग निवडा. ● या सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करायचं सेटिंग दिसेल. याला सिलेक्ट करा. ● सेक्शनमध्ये आपला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. 💬 SMS ने लिंक करा : आयकर विभागाने सांगितले आहे कि, 567678 किंवा 56161वर SMS पाठवून तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक करू शकता. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● येत्या 1 ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्डद्वारे इंधन खरेदी केल्यास सवलत मिळणार नाही ● नवीन लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू; 31 डिसेंबरला बिपिन रावत यांचा कार्यकाळ संपणार ● एअरसेल मॅक्सिस प्रकरण : कार्ति चिंदबरम यांचा अटक पूर्व जामिन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला ● 'रिलायन्स' चे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग 8 व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वलस्थानी ● स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला राइट लाईव्हलीहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ● अमेरिकेतील कंपन्यांनी वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी ● युतीबाबत भाजपची आज (दि.26) महत्त्वपूर्ण बैठक, मुख्यमंत्री फडणवीस शहांशी चर्चा करणार ● ट्रिपल कॅमेरा असलेला Vivo U10 भारतात लाँच, सुरुवातीची किंमत 8,990 रुपये ● भारत-श्रीलंका यांच्यामध्ये जानेवारीमध्ये टी-20 क्रिकेटची स्पर्धा रंगणार, बीसीसीआयने केले स्पष्ट ● ‘हिरकणी’चं मुख्य पोस्टर प्रदर्शित, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार हिरकणीची भूमिका न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

*UPSC & MPSC : Residential Batch* Scholarship Entrance Exam. 200 विद्यार्थ्यांची UPSC व MPSC पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखत : इंटिग्रेटेड बॅचसाठी निवड. *गुणानुक्रमे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 60% आणि अन्य 100 विद्यार्थ्यांना 40% शिष्यवृत्ती (FEE सवलतीसह) @ बुटीबोरी MIDC (जि.नागपूर) येथे निवासी/अनिवासी मार्गदर्शन वर्ग* बॅच कालावधी : 6 महिने (दररोज 5 तास लेक्चर + वर्कशीट) *पूर्व नाव नोंदणीसाठी, क्लिक करा* : https://forms.gle/BJhMGMZyPtnrhtZz6 *नोंदणी सुरू : Online Final Registration on* www.aakarfoundation.org/scholarship *संपर्क* : 7447382623, 9370229878, 8208659303, 9096017704, 9021921602 *Whatsapp link* : https://wa.me/919403361792?text=aakarscholarship *आकार फाउंडेशन बुटीबोरी MIDC (Residential Center)* कृतज्ञता, P-4, IRA इंटरनॅशनल स्कुल जवळ, बुटीबोरी MIDC(जि. नागपूर) Ph. 9860671910 *आकार फाउंडेशन,पुणे (H.O.)* 242/11, "नंदादीप", शिवाजीनगर, डेक्कन, पुणे. Ph. 9307088946 *आकार फाउंडेशन, नागपूर (H.O.)* केशव द्वार समोर, रेशीमबाग मैदान, नागपूर. Join Telegram : T.me//aakar_upsc_mpsc (Advt)

LetsUp News Update ● संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी सोलर पार्कचे उद्घाटन ● आयएनक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी पी.चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी ● पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध; लाखो खातेदारांचे 11 हजार कोटी अडकले ● महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल ● राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून 3 दिवसात केलेल्या कारवाईत 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ● अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा; काँग्रेस, राष्ट्रवादीचा आरोप ● अमेरिका लवकरच भारतासोबत व्यापार करार करणार; अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन ● सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल अमिताभ बच्चन यांना केंद्र सरकारचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर ● सुरक्षेच्या भीतीनंतरही श्रीलंकेचा संघ वनडे, टी20 सामन्यांसाठी पाकिस्तानला रवाना ● अभिनेता सैफ अली खानचा आगामी 'लाल कप्तान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 आजच्याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप LetsUp | Special आज 24 सप्टेंबर. बरोबर 12 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पहिला वहिला टी-20 वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला होता. वर्ल्डकप 2007 च्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी होती. या चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला होता. 1983 नंतर एखाद्या वर्ल्डकपचा खिताब पटकावण्याचा मान भारताला मिळाला होता. 🧐 शेवटच्या षटकाचा थरार : अखेरच्या षटकांत विजयासाठी पाकिस्तानला 13 धावा हव्या होता आणि त्यांच्याकडे एक विकेट शिल्लक होती. ● अष्टपैलू जोगिंदर शर्माकडे बॉलिंग देण्यात आली होती. ● पहिला बॉल वाईड झाला. ● दुसरा बॉल डॉट गेला. ● तिसऱ्या बॉलमध्ये मिसबाहने षटकार ठोकला. ● चौथ्या चेंडूतही मिसबाह फटका मारण्याच्या तयारीत होता मात्र त्याचवेळी त्याने टोलवलेला चेंडू श्रीसंतच्या हातात विसावला. ● यासह भारताने पाकिस्तानला नमवत पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले होते. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🌞 गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक तापमानाची नोंद : अहवाल LetsUp I Update वर्ष 2015 ते 2019 या पाच वर्षांत पृथ्वीवर सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या 'युनायटेड इन सायन्स' अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. 📝 अहवालात काय? : ● 2011 ते 15 च्या तुलनेत पुढील पाच वर्षात तापमानात 0.2 डिग्री सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. ● सध्या जागतिक तापमान वर्ष 1850 ते 1900 च्या तुलनेत 1.1 डिग्री सेल्सिअस इतके वाढले आहे. ● गेल्या 40 वर्षात अंटार्कटिक खंडावरील बर्फ विरघळण्याचे प्रमाण 12 टक्के होते. ● 2015-19 दरम्यान या प्रमाणात आणखी वाढ झाली आहे. 🗣 पृथ्वीवरील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही कमी होण्याऐवजी 2018 मध्ये 2 टक्क्यांनी वाढल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांनी स्पष्ट केले. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

⚽ मेस्सी सहाव्यांदा बनला फिफा फुटबॉलर ऑफ द इयर LetsUp | Sports स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फिफा पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलर ऑफ द इयरचा पुरस्कार रेकॉर्ड सहाव्यांदा जिंकला. मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012 आणि 2015 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. तर, मागील वर्षी क्रोएशियाच्या लुका मोडेरिचने हा पुरस्कार जिंकला होता. 🏆 सर्व विजेत्यांची यादी अशी : ● सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू : लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/ बार्सिलोना) ● सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : मेघन रॅपिनो (यूएसए/ रिजन एफसी) ● सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक : अ‍ॅलिसन बेकर (ब्राझील/ लिवरपूल) ● सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर : साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/ एटलेटिको मैड्रिड) 📍 पुरुषांचा वर्ल्ड 11 वर्षाचा संघ : अ‍ॅलिसन बेकर, सर्जिओ रामोस, व्हर्जिन व्हॅन डिजक, मॅथिज डी लिग्ट, मार्सेलो, लुका मॉड्रिक, फ्रेन्की डी जोंग, इडन हजार्ड, लिओनेल मेस्सी, कीलियन एम्बाप्पे, आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. 📍 महिला वर्ल्ड 11 संघ : साड़ी वान वेनेंदल, लुसी ब्रॉन्ज, वेंडी रेनार्ड, निला फिशर, केली ओ'हारा, अमैंडा हेनरी, जूली एर्त्ज़, रोज लावेले, मार्ता, एलेक्स मॉर्गन आणि मेगन रेपिनो. ● पुरुष प्रशिक्षक : जर्गन क्लोप (लिव्हरपूल) ● महिला प्रशिक्षक : जिल एलिस (यूएसए) ● पुस्कास अवॉर्ड सर्वोत्कृष्ट गोल : डॅनियल झेझोरी ● फेअर-प्ले पुरस्कार : मार्सेलो बिल्सा आणि लीड्स युनायटेड न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार वर्ष 2015 ते 2019 या पाच वर्षांत पृथ्वीवर सर्वाधिक तापमानाची नोंद ● स्टेट बँक ऑफ इंडियाची तरल व्याजदर (फ्लोटिंग रेट) असणारी कर्जे एक ऑक्टोबरपासून स्वस्त होणार ● जीएसटी संकलन वित्त वर्ष 2019-20 मधील अंदाजापेक्षा 40 हजार कोटींनी कमी राहण्याचा केंद्र सरकारचा व्यक्त अंदाज ● जम्मू काश्‍मीरमधील किश्‍तवाड जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांकडून हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना अटक ● येत्या दोन वर्षांत देशातील सर्व बसेस इलेक्ट्रिक होतील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ● कॉर्पोरेट टॅक्सच्या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार; गुंतवणूक येण्यास मदत होईल : मुख्यमंत्री फडणवीस ● काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम, संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा ● लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच, 30 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार ● लोभावर उपाय नसल्यामुळे मॅच-फिक्सिंगला पूर्णपणे आळा घालणे कठीण : सुनील गावसकर ● नेटफ्लिक्सचा ‘द व्हाइट टायगर’मध्ये प्रियांका चोप्रा-राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र दिसणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup