LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
🧐 *पत्नीची स्तुती कशी करावी?*
*LetsUp I Special*
कोणत्याही बायकोला असे वाटत नाही की, तिच्या नवऱ्याने तिची रात्रंदिवस फक्त स्तुती करावी. तिची माफक अपेक्षा असते. आपल्या नवऱ्याने आपली योग्य त्या वेळी योग्य ती स्तुती करावी.
थोडक्यात आपल्या बोलायची पद्धत जर बदलली तर आपले नाते आणखी घट्ट होईल. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुमच्या पत्नीची स्तुती कशी करावी? *त्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/2QPeOTv
📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💊 *औषधांची होणार ‘होम डिलिव्हरी'!*
*LetsUp l Update*
⚡ कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन केल्यामुळे नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळवण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही.
👍🏻 *परवानगी* : तोडगा म्हणून कोणाला औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडता येत नसल्यास त्यांना आता घरपोच औषधे पुरविली जाणार आहेत. केंद्र सरकारने औषध कंपन्यांना तशी परवानगी दिली आहे.
📍 अशा प्रकारे औषधांची होम डिलिव्हरीसाठीची अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *कोरोना इफेक्ट : व्हिसावर बंदी!*
*LetsUp l Update*
⚡ भारतात कोरोना विषाणूचे वाढणारे संक्रपण पाहून भारत सरकारने फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनचा तीन देशांच्या नागरिकांवर भारतातील प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे.
🛑 फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधून आतापर्यंत भारतात कधीही न आलेल्या नागरिकांच्या नियमित व्हिसासह ई-व्हिसावरही बंदी घातली आहे.
📄 *अधिसूचना* : इमिग्रेशन ब्युरोने मंगळवारी रात्री उशिरा याची अधिसूचना जारी केली. भारतात प्रवेश न केलेल्या आणि ज्यांना नियमित व्हिसा जारी झालेला आहे अशा फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांचे दोन्ही प्रकारचे व्हिसा तत्काळ निलंबित केल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
🙏 *आवाहन* : आरोग्य मंत्रालयानेदेखील यासंदर्भात सूचना जारी केली आहे. भारतीयांना चीन, ईटली, इराण, रिपब्लिक ऑफ कोरिया, जपान, फ्रान्स, स्पेन व जर्मनीचा प्रवास टाळण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
📌 इटली आणि दक्षिण कोरियाहून आलेल्या प्रवाशांसाठी कोविड-19 निगेटीव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *कोरोना; चिमुकला रुग्णालयात दाखल*
*LetsUp | Satara*
जिल्ह्यातील 14 महिन्याच्या बालकास ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बालरोग तज्ञाच्या सल्ल्यानुसार कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या चिकल्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला असल्याची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🛣 *देशभरात टोलवसुली तात्पुरती स्थगित*
*LetsUp | National*
⚡ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर विविध पातळ्यांवर मोठे निर्णय घेतले जात आहेत.
🗣 कोरोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून सांगितलंय.
🔐 देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात टोल नाक्यांमुळे काही प्रमाणात विलंब होत आहे. याची दखल नितीन गडकरी यांनी घेतलीय.
🚚 अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरींनी जाहीर केलंय.
👍 यामुळे अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात होणार विलंम कमी दूर होईल अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्क केली
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
👍 *Parle G वाटणार 3 कोटी बिस्किट पुडे*
*LetsUp | Trending*
🔐 कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषनेनंतर हातावरती पोट असणारे अनेक मजूर चिंताग्रस्त झाले आहेत.
💁♂ घराबाहेर पडलं नाही तर पोट कसं भरणार? असा प्रश्न अनेक मजूर आणि रस्त्यांवर राहणाऱ्यांना पडत आहे. मात्र या लोकांसाठी पार्ले कंपनी धावून आली आहे.
🍫 *3 कोटी बिस्कीट पुडे* : पार्ले कंपनी पुढच्या 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार असल्याचं समजत आहे.
👌 *कौतुकास्पद* : लॉकडाऊन दरम्यान रस्त्यांवर राहणारे किंवा हातावरती पोट असणारे नागरिक यांच्यापर्यंत अन्न पोहचावं या उद्देशाने पार्ले कंपनीने ही घोषणा केली.
📍 पार्ले कंपनी प्रत्येकी एक आठवड्यात 1 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. देशात पुढचे 3 आठवडे लॉकडाऊन असणार आहे.
👍 दरम्यान, देशातील नागरिक या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसादही देत आहेत. त्यानंतर अनेक कंपन्यांही परिस्थितीचं गांभीर्य जाणून मदतीचा हात पुढे करत आहेत.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
📣 *दहावीचा २३ मार्च रोजी होणारा शेवटचा पेपर पुढे ढकलला*
*LetsUp | Update*
⚡ दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे, अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
📍 खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते 31 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
💁♂ करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे.
🗣 *वर्षा गायकवाड म्हणाल्या...* :
राज्यातील प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भातल्या निर्णयाची घोषणा ही 31 मार्चनंतर केली जाईल.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🗞 *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी*
▪ भारतातील करोनाग्रस्तांची संख्या 258 वरुन 298 झाली ; केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली माहिती
▪ अभिनेत्री कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या राजकीय दिग्गजांचे कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह
▪ टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाहीये ! राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
▪ परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट'
▪ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाबाधित सापडल्याने उडाली खळबळ
▪ युद्धजन्य परिस्थिती कोरोनाशी लढण्यासाठी इटलीने लष्कराला उतरवलं रस्त्यावर
▪ दहावीचा 23 मार्च रोजी होणारा शेवटचा पेपर पुढे ढकलला; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
▪ महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 63 एका दिवसात वाढले 11 रूग्ण
▪ क्रिकेटविश्वात घुसला व्हायरस, भारताविरुद्ध खेळलेल्या फिरकीपटू माजिद हकला 'या' गोलंदाजाला कोरोना
▪ गायक नंदेश उमप यांनी Coronavirus वर रचला पोवाडा; सोशल मीडियावर तुफान व्हायरल
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
⚖ *'त्या' चौघा नराधमांना मृत घोषित*
*LetsUp l Update*
⚡ निर्भयातील बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी दिल्यानंतर अर्धा तासांनी त्यांना दोरखंडावरून उतरविण्यात आले. या चौघांनी तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
👉 दिल्ली येथील निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चौघांना आज पहाटे फाशी देण्यात आली. मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चौघांनी ही फाशी देण्यात आली.
💫 निर्भयातील आरोपींना फाशीचे वृत्त समाज माध्यमांवर पहाटेपासून व्हायरल झाले होते. देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे वृत्त प्रसारणासाठी नवी दिल्ली येथील तिहार तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
⚖ *असा आहे, निर्भया प्रकरणाचा घटनाक्रम*
*LetsUp l Update*
⚡ साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज शुक्रवारी पहाटे फासावर चढवण्यात आले. पहाटे साडे 5 वाजता तिहार तुरुंगात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली.
▪ 17 डिसेंबर 2012 : सहा आरोपींपैकी बसचालक राम सिंह आणि अन्य दोन जणांना अटक करण्यात आली.
▪ 18 डिसेंबर 2012 : या दिवशी या प्रकरणातील चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात आली.
▪ 19 डिसेंबर 2012 : दोन आरोपींना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यापैकी एक आरोपी विनय याने आपल्याला फाशी देण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केली.
▪ 21 डिसेंबर 2012 : अल्पवयीन आरोपीला पूर्व दिल्लीतील आनंदविहार परिसरातून तर सहावा आरोपी अक्षय कुमार सिंह याला बिहारमधून अटक करण्यात आली.
▪ 22 डिसेंबर 2012 : पीडिता निर्भयाचा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्यात आला.
▪ 23 डिसेंबर 2012 : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
▪ 27 डिसेंबर 2012 : पीडिता निर्भयाला पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आले.
▪ 29 डिसेंबर 2012 : गंभीर जखमी झालेल्या निर्भयानं सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात अखेराचा श्वास घेतला.
▪ 30 डिसेंबर 2012 : दिल्लीत निर्भयावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
▪ 03 जानेवारी 2013 : पोलिसांकडून सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी निर्भयाच्या आईवडिलांनी सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी केली.
▪ 17 जानेवारी 2013 : पाचही आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयाने आरोप निश्चित केले.
▪ 23 जानेवारी 2013 : या प्रकरणातील एक आरोपी बाल न्यायालयाने अल्पवयीन ठरवला.
▪ 02 फेब्रुवारी 2013 : पाचही आरोपींवर निर्भयाच्या हत्येचे आणि इतर आरोप निश्चित करण्यात आले.
▪ 03 फेब्रुवारी 2013 : 19 मार्च रोजी लोकसभेत तर 21 मार्च रोजी राज्यसभेत कठोर कायद्यासाठी प्रासंगिक विधेयक मंजूर करण्यात आले.
▪ 05 फेब्रुवारी 2013: या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात आली आणि सर्व आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
▪ 11 मार्च 2013: सहा आरोपींपैकी राम सिंह या आरोपीने तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.
▪ 14 जून: 2013 : वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं.
▪ 11 जुलै 2013: अल्पवयीन आरोपीसंदर्भातील निकालाची तारीख निश्चित करण्यात आली.
▪ 31 ऑगस्ट 2013: अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा निकाल न्यायालयाने दिला.
▪ 10 सप्टेंबर 2013 : मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या चारही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले.
▪ 13 सप्टेंबर 2013 : दिल्लीच्या साकेत न्यायालयाने या प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली.
▪ 13 मार्च 2014 : आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.
▪ 03 एप्रिल 2016 : 19 महिन्यांनतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली.
▪ 11 जुलै 2016 : गुन्हेगांरांनी सर्वोच्च न्यायलयात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं.
▪ 05 मे 2017 : या प्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
▪ 18 डिसेंबर 2019 : निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.
▪ 7 जानेवारी 2020 : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
▪ 17 जानेवारी 2020 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशची दया याचिका फेटाळली.
▪ 25 जानेवारी 2020 : मुकेशने याविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
▪ 5 फेब्रुवारी 2020 : न्यायालयाने सर्व आरोपींना फाशी एकत्र फाशी देण्याचा निर्णय दिला.
▪ 14 फेब्रुवारी 2020 : विनय या आरोपीनं दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायलयानं ती फेटाळून लावली.
▪ 5 मार्च 2020 : न्यायालयाने आरोपींच्या फाशीसाठी 20 मार्च ही तारीख निश्चित केली.
▪ 16 मार्च 2020 : तीन आरोपींनी याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.
▪ 20 मार्च 2020 : सकाळी 5.30 वाजता या प्रकरणातील सर्व दोषींना फाशी देण्यात आली.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
कोरोनाबद्दल सर्व काही थोडक्यात: https://www.letsupmarathi.com/2020/03/18/coronavirus-facts-myths-and-information/
6 624
🧐 'एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच'
LetsUp l Update
⚡ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही नियोजित वेळापत्रकारनुसारच घेतली जाणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.
💁♂ आयोगाची माहिती : राज्य सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून 16 ते 31 मार्च दरम्यान कुठल्याही परीक्षा न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र एमपीएससीची या कालावधीत कुठलीही परीक्षा नसल्याने 5 एप्रिलला होणारी पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकारनुसारच होणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
🙏 आवाहन : परीक्षेसाठीची सर्व पूर्वतयारी झाली असून, ही परीक्षा योग्य ती दक्षता घेऊन होणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी उमेदवारांनी सुरु ठेवावी असे आवाहनही आयोगाने केले आहे.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
🥳 Fully Automatic वॉशिंग मशिन फक्त 10,999 रुपयांमध्ये
LetsUp | Tech - Auto
😍 फ्लिपकार्टवर fully automatic वॉशिंग मशिनवर भरघोस डिस्काउंटची ऑफर आहे.
🎁 केवळ 10 हजारांहून कमी किंमतीत फ्लिपकार्टवर fully automatic वॉशिंग मशिन खरेदी करण्याची संधी आहे. तसेच, एक्सचेंज ऑफरअंतर्गतही आकर्षक डिस्काउंट मिळेल.
🛍 ऑफर्ससाठी क्लिक करा : http://fkrt.it/8qjS8fuuuN
🎊 जाणून घ्या ऑफर्स@Flipkart
● Onida 6.2 किलो Fully Automatic Top Load Grey :
💰 किंमत : 19, 900₹ नव्हे तर मिळवा केवळ 10,999₹ रुपयांमध्ये आहे.
● Whirlpool 6 किलो वॉशिंग मशिन :
💰 किंमत : 16, 200₹ नव्हे तर मिळवा केवळ 12,499₹ रुपयांमध्ये आहे.
● MarQ by Flipkart 7.2 किलो वॉशिंग मशिन :
💰 किंमत : 16, 999₹ नव्हे तर मिळवा केवळ 12,499₹ रुपयांमध्ये आहे.
● Avoir 7 किलो वॉशिंग मशिन :
💰 किंमत : 17, 999₹ नव्हे तर मिळवा केवळ 10,999₹ रुपयांमध्ये आहे.
✔ ऑटोमोबाईलपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
😱 दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांचे चोरांनी तोडले पाय
LetsUp | Raigad
⚡ दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
🦶 पोलिस अधिकाऱ्यांवर दरोडेखोरांनी हल्ला करून फावड्याने त्यांचे पाय तोडले आहेत.
⏰ माणगाव तालुक्यातील इंदापूर-पाणसई येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
👮🏻♂ पोलिसांची नावे : सहायक पोलिस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
🏥 दरम्यान दोघांनाही माणगाव उपजिल्हारुग्णालयात दाखल केले आहे.
🚷 पोलीस प्रशासनाकडून या चोरांचा शोध सुरू असून जिल्ह्यात सगळीकडे नाका बंदी करण्यात आली आहे.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
🏦 'येस बँक' निर्बंधमुक्त; 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा!
LetsUp | National
⚡ 'येस बँके'च्या खातेधारकांवरील निर्बंध आजपासून हटवण्यात येणार आहेत.
💁♂ संध्याकाळी सहा वाजल्यापासून 'येस बँक' संपूर्ण बँकिंग सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे खातेधारकांना 50 हजार रुपयांवरील रक्कमही काढता येणार आहे.
💰 5 मार्च रोजी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने येस बँकेवर निर्बंध आणत 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मज्जाव केला होता.
🗣 आतापर्यंत केवळ एक तृतीयांश ग्राहकांनी 50 हजार रुपये काढले आहेत. 'येस बँके'च्या सर्व सेवा बुधवारी सुरु होतील, अशी माहिती बँकेने पत्रकार परिषद घेऊन दिली
🏧 सर्व एटीएममध्ये पुरेशी रोकड असून ग्राहकांना घाबरुन जाण्याची गरज नाही, अशा शब्दात 'येस बँके'ने आश्वस्त केलं.
💵 आपण देशभरातील आमच्या 1,132 शाखांमध्ये कुठेही जाऊन 19 मार्चपासून बँकिंग व्यवहार करु शकता, असंही बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂ हॅप्पी बर्थडे "Twitter "
LetsUp | Special
😍 जगातील सगळ्यात प्रसिद्ध मेसेजिंग वेबसाईट 'Twitter' चा आज वाढदिवस आहे.
👍 लाँचिंगपासून ते आजवर या दशकभरात ट्विटरमध्ये बरेच बदल झाले. आज ट्विटरचा एवढा बोलबाला आहे की, जगभरातील अनेक सेलिब्रेटी याचा वापर करतात.
👀 आज प्रत्येक इंटरनेट यूजर आपली मतं ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर मांडतो आहे. ट्विटरला आज 14 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त जाणून घेऊयात ट्विटरबाबत काही खास गोष्टी.
🤔 ट्विटरचा इतिहास:
👉 ट्विटर 21 मार्च 2006ला सुरु करण्यात आलं. ट्विटरवर सर्वात पहिलं ट्विट सहसंस्थापक जैक डॉर्सीनं केलं होतं. 'जस्ट सिटिंग अप माय ट्विटर' असं ते ट्विट होतं.
👉 ही कंपनी बिज स्टोन, ईवेन विलियम्स आणि जैक डॉर्सीनी अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात सुरु केली.
💫 विशेष : आज ट्विटरवर दिवसभरात 50 कोटी ट्विट केले जातात. तर दरवर्षी 20 अब्ज ट्विट केले जातात.
👩👩👧 ट्विटरचा यूजर बेस:
▪ अमेरिकेबाहेर ट्विटरचे 25 कोटी ऍक्टिव्ह यूजर्स आहेत.
▪ ट्विटरवर जगभरातील महत्त्वच्या व्यक्ती:
▪ ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारी व्यक्ती म्हणजे बराक ओबामा आहे.
▪ बराक ओबामा यांचे तब्बल 113 मिलियन फॉलोवर्स आहेत.
▪ ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जस्टिन बीबर आहे.
▪ ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केटी पेरी आहे.
⚔ ट्विटरचे प्रतिस्पर्धी:
👉 मागील दशकभरापासून ऍक्टिव्ह असलेलं ट्विटर दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे. मात्र, याचे प्रतिस्पर्धीही वाढत आहे.
👉 फेसबूक हे ट्विटरचं सर्वात मोठं प्रतिस्पर्धी आहे. तसंच इंस्टाग्राम, गुगल, यूट्यूब, व्हॉट्सअॅप यासारख्या अनेक सोशल साइट आहेत.
💰 ट्विटरची कमाई:
ट्विटर जाहिरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतं. 2014 साली 1.4 अब्ज एवढी घसघशीत कमाई ट्विटरनं केली होती. 2015 साली 2.2 अब्ज एवढी कमाई झाली.
🌎 आज जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती ट्विटरच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करत असतात...
📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
