LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
📣 *वन नेशन-वन रेशन कार्ड प्रकल्प महाराष्ट्रात सुरु*
*LetsUp । Update*
⚡ केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते या प्रकल्पाची ऑनलाइन उद्घाटन
👀 *या राज्यांमध्ये योजना सुरु?* : महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून लवकरच संपूर्ण देशभरात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
💁♂ *योजनेचा हेतू* : गरीबांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे, त्यांना सवलती मिळाव्यात आणि रेशन दुकानांमधील भ्रष्टाचाराला आळा बसावा या हेतूने हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
📍 अन्न मंत्रालय देशभरातील सर्व रेशनकार्डांचा एक केंद्रीय डेटा तयार करणार आहे. त्यामुळे बनावट रेशनकार्ड कुणालाही काढता येणार नाहीत.
👍 *फायदे*
▪ या निर्णयामुळे कुणीही एकापेक्षा अधिक रेशनकार्ड ठेवू शकणार नाही.
▪ मोठ्या संख्येने गरीब, मजूरांना या योजनेचा लाभ घेता येईल.
▪ रेशन दुकानांमधील भ्रष्टाचार संपुष्टात येईल
▪ खोटे रेशन कार्ड आढळून आल्यास कारवाई होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🏥 माजी अर्थमंत्री अरुण जेटली रुग्णालयात दाखल
LetsUp । Update
⚡ श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात केले दाखल
👍 प्रकृती स्थिर : सध्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या जेटलींच्या तब्येतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. दरम्यान, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
💁♂ भाजपनेते भेटीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
📍 गेल्या अनेक वर्षांपासून आजारी : अरुण जेटली यांच्या डाव्या पायाला सॉफ्ट टिशू कॅन्सर आहे. यावर उपचारसाठी जानेवारी महिन्यात ते अमेरिकेलाही गेले होते. तसंच गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्रक्रियाही पार पडली होती.
🙏 माजी अर्थमंत्री : मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्रीपद भूषवल्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र त्यांनी आपला मंत्रिमंडळात समावेश न करण्याची विनंती केली.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अभियंता पदांच्या 450 जागा
LetsUp । Job
💁♂ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील बांधकाम अभियंता (पदवी/ पदविका) आणि वितरण अभियंता (पदविका) प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 450 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. ..
🎓 जागा व शैक्षणिक पात्रता
▪ स्थापत्य अभियंता (पदवी) : 28 जागा
👉 शैक्षणिक पात्रता - उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪ स्थापत्य अभियंता (पदविका) : 14 जागा
👉 शैक्षणिक पात्रता - उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪ वितरण अभियंता (पदविका) : 408 जागा
👉 शैक्षणिक पात्रता - उमेदवार विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
📍 वयोमर्यादा : 20 ऑगस्ट 2019 रोजी 35 वर्षे, (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष 3 वर्ष सवलत.)
👀 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
💰 परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ₹500/- (राखीव प्रवर्ग: ₹250/-)
👨💻 परीक्षा - ऑगस्ट 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.
📆 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2019
🖥 जाहिरात पहा : http://bit.ly/MSEDCLadd
📍 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/mahadiscomonline
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🥳 खुशखबर! Flipkart चा National Shopping Sale सुरु
📆 फ्लिपकार्टवर 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान National Shopping Sale चा लाभ घ्या!
🎁 सेल अंतर्गत मिळवा आकर्षक ऑफर्स व भरघोस डिस्काउंट
▪ Smart LED Tv - 7,299/- रुपयांपासून सुरु
▪ बेडशीट, कर्टन, टॉवेल आदी वस्तू केवळ 199/- रुपयांपासून सुरु
▪ RealMe X स्मार्टफोन - 16,999/- (8 GB |128 GB)
▪ Redmi Note 7S - 9,999/-
▪ स्पोर्ट्स शूजवर मिळवा - 40-80% डिस्काउंट
▪ ट्रॅव्हल बॅग खरेदीवर मिळवा 80% पर्यंत आकर्षक डिस्काउंट
▪ साऊंडबार खरेदीवर मिळवा 70% पर्यंत आकर्षक डिस्काउंट
▪ Best Selling Laptops : 12,990/- पासून सुरुवात
🛍 तसेच मोबाईल, टॅबलेट, फॅशन, टीव्ही, Home Appliances, आदींसह अन्य वस्तुंवर मिळवा आकर्षक सूट
💳 जर तुम्ही ICICI Credit Card अथवा Debit Card User असाल तर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध!
🛒 मग विचार कसला करताय? खरेदीची संधी सोडू नका!
🛍 डिस्काउंट ऑफरसाठी क्लिक करा : 👉 https://urlzs.com/Lkv95
(Advt)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚇 देशात लवकरच धावणार पहिली अंडरवॉटर ट्रेन
LetsUp | Update
⚡ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून दिली माहिती.
🤔 कुठे धावणार ट्रेन : लवकरच देशातील नागरिकांना पाण्याखाली धावणाऱ्या ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे.
🗣 काय म्हणाले रेल्वेमंत्री? : रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.
💁♂ विशेष :
▪ ही ट्रेन सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यास जवळपास तयार आहे.
▪ हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
▪ पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.
🚆 ट्रेनची वैशिष्ट्ये :
📍पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावले आहे.
📍नदीमधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब व 30 मीटर खोल आहे.
📍ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.
👀 जाणून घ्या जगातील 5 लांब अंडरवॉटर टनल :
✔ सिकन टनल- 53.9 किमी
✔ चॅनल टनल- 37.9 किमी
✔ टोक्यो बे एक्वा लाईन- 15 किमी
✔ बोमलाफ्योड टनल- 7.8 किमी
✔ इकसुंड टनल- 7.7 किमी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
LetsUp । National
📣 दिल्लीतील शास्त्री भवनात मानाच्या 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची झाली घोषणा
📍 बॉलिवूड पुरस्कार :
● सर्वोत्कृष्ट चित्रपट : अंधाधून
● सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत : घूमर)
● सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर : उरी
● पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- :पॅडमॅन
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंग (पद्मावत : बिंते दिल)
● सर्वोत्कृष्ट अभिनेता : आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले : अंधाधून
📍 मराठी चित्रपट पुरस्कार :
● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : भोंगा
● पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : पाणी
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : स्वानंद किरकिरे (चुंबक)
● सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक : सुधाकर रेड्डी (नाळ)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार : श्रीनिवास पोकळे (नाळ)
📍 इतर पुरस्कार :
● सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तेलुगू चित्रपट ‘महानटी’
● सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट : हेलारो
● सर्वोत्कृष्ट संवाद : बंगाली चित्रपट ‘तारीख’
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : किर्ती सुरेश (महानटी)
● सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
● सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट : कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
● सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट : हरजीता
● सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट : बुलबुल कॅन सिंग
● सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट : बारम
● सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट : मटानटी
● सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट : सुदानी फ्रॉम नायजेरिया
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👕 पावसाळ्यात कसा असावा पेहराव?
LetsUp | Lifestyle
🌧 पावसाळ्यात कोणते कपडे घालायचे? हा प्रश्न अनेकांना पडतो. पावसाची रिपरिप नि रस्त्यावरचा चिखल हैराण करून सोडतो. यामुळे प्रत्येकालाच आपसूकच आपल्या ड्रेसविषयी अतोनात काळजी वाटायला लागते.
💁♂ चला तर आज जाणून घेऊयात पावसाळ्यातील ड्रेसिंग स्टाईल कशी असायला हवी...
1) पावसाळ्यात नेहमी सारखे ट्रेंडी वेअर्स न वापरता पेहेरावात वेगवेगळ्या रंगांचा वापर करावा. हा चेंज सुखावह वाटतो
2) फार फॅशन नाही केली, तरीही काही वेगळे, थोडेसे लाइट किंवा अगदी ब्राइट कलर्सचे पेहेराव वापरणं केव्हाही चांगलंच.
3) सध्या फॅशन आहे ती पेस्टल कलर्सची. फिका निळा, आकाशी, हलका गुलाबी या रंगांची चलती आहे. ब्राइट रंगाची आवड असलेल्यांसाठी मोरपिशी, जांभळा हे रंग आहेतच. हिरव्या रंगाच्याही शेवाळी, पोपटी, फ्लोरोसंट ग्रीन अशा अनेक शेड्स वापरता येतील.
4) पावसाळ्यात वजनाने हलके, पटकन वाळतील असे सुटसुटीत कपडे वापरावेत. लाइटवेड डेनिम्स, नॉन क्रशेबल कॉटन्स, केप्रीज वापराव्यात.
5) चपलांची निवड करताही फ्लॅटफॉर्म हिल्स वापरणं केव्हाही चांगलं. बाजारात ऑल सीझन वेअर्समध्ये फॅन्सी स्लिपर्सपासून शूजपर्यंतच्या भरपूर व्हरायटीज सध्या पाहायला मिळतात. स्कार्व्हही चलतीत आहेत.
6) पावसाळ्यात स्कार्व्ह किंवा स्टोल्स वापरणं चांगलंच. प्रिंट, अॅबस्ट्रॅक्स कट्स, सिल्क किंवा जॉर्जेट अशा अनेक व्हरायटीत स्कार्व्ह उपलब्ध आहेत.
7) पावसाळ्यात लाँग स्कर्ट्स वापरणं टाळावं. त्याऐवजी गुडघ्यापर्यंतच्या लांबीचे स्कर्ट्स वापरावेत. त्यावर शॉर्ट टॉप्स खुलून दिसतील.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ जाणून घ्या वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग
LetsUp | Education
📍 शास्त्रीय नाव (मराठी नाव) व उपयोग :
1) रेडीमीटर (रेडीमीटर) : उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण
2) टॅकोमीटर (विमानगतीमापक) : विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण
3) सॅलिंनोमीटर (क्षारमापक) : क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण
4) डायनॅमो (जनित्र) : विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण
5) अॅमीटर (वीजमापी) : विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
6) कॅलोरीमीटर (उष्मांक मापक) : उष्मांक मोजणारे उपकरण
7) हायड्रोमीटर (जलध्वनी मापक) : पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन
8) फोटोमीटर (प्रकाशतीव्रता मापी) : प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण
9) मायक्रोफोन (मायक्रोफोन) : आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण
10) रडार (रडार) : विमानतळाकडे येणार्या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🇮🇳 क्रांतीची ज्वलंत मशाल 'क्रांती दिन'
LetsUp | Special
आज 9 ऑगस्ट. आजच्या दिवशी 1942साली महात्मा गांधीजींनी 'छोडो भारत' व 'करेंगे या मरेंगे' चा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा 9 ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण तसेच नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा केला जातो.
देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी पुढे आंदोलनांना सुरवात झाली. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला होता. अशात हे आंदोलन देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनके काँग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले.
भारतीय जनमानसात असंतोषाचा विस्फोट झाला त्यामुळे ब्रिटिश शासन भयभीत झाले. एकाच वेळी देशभर कारवाया सुरू झाल्या व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू केले अनेक नेते भूमिगत झाले. देशभर पोलीस ठाण्यावर व मामलेदार कचेरीवर, सरकारी कार्यालयांवर मोर्चे निघू लागले. हातात तिरंगा झेंडा व घोषणा देत लाठीचार्ज व गोळीबार झेलत तिरंगा फडकू लागला.
समाजवाद्यांनी भूमिगत कारवायांवर लक्ष केले. रेल्वे स्थानके मोडतोड, रूळ उखडणे, पोस्ट कार्यालय जाळणे, वीज तोडणे, गनिमी पद्धतीने ही कामे सुरू झाली. पोलिसांकडून अटक सत्र सुरू झाले. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक, स्त्री-पुरुष या आंदोलनात सहभागी झाले. देशभरातील युवकांनी यात भाग घेतला.
देशभर स्वातंत्र्याचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. “चले जाव’मुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना केली. हे आंदोलन उभे राहण्याआधीच ब्रिटिश सरकारने मोडून काढण्याचे ठरवले होते. त्या पद्धतीने देशभर कारवाया केल्या आणि आंदोलन मोडून काढले. पण या आंदोलनाने जगाला वेगळी ओळख दिली. कारण कोणताच सेनापती नसताना स्वातंत्र्याचे युद्ध जनतेने हातात घेतले होते. यामुळेच भारत स्वातंत्र्याचा विचार केला जाऊ लागला हे विशेष.
आज आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करूयात!
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Updates
● कलम 370 : जम्मू-काश्मीरमधील जनजीवन हळू-हळू पूर्वपदावर, शाळा, कार्यालये आजपासून (दि.9) सुरू
● माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख भारतरत्न पुरस्काराने सन्मानित
● खासगी मेडिकल कॉलेजमधील शुल्कावर आता केंद्राचे नियंत्रण, मेडिकल कमिशन विधेयकास राष्ट्रपतींची मंजुरी
● केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, इडुक्की, मलप्पुरम, कोझीकोडे आणि वायनाड जिल्ह्यात रेड अलर्ट
● पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात आत्तापर्यंत 27 जण मृत्युमुखी
● Nissan ने Kicks एसयूव्ही कारची नवीन ‘स्वस्त’ आवृत्ती ‘Kicks XE’ केली लाँच, एक्स शोरुम किंमत 9.89 लाख रुपये
● भारत Vs वेस्ट इंडिज पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द, मालिकेतला दुसरा सामना रविवारी (दि.11) रंगणार
● दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज हाशिम आमलाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
● हिंदी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक 'आरके स्टुडिओ' अखेर संपूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे
● आपल्या आगामी बायोपिकच्या तयारीसाठी विद्या बालनने 'मिशन मंगल' रिलीजनंतर 15 दिवसांचा घेतला ब्रेक
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी
▪ काश्मीर मध्ये कलम 370 हटवल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांची उद्या महत्वपूर्ण बैठक
▪ दिल्लीकरांना मिळणार 'फ्री' इंटरनेट सेवा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
▪ सांगलीतील बोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे 5 लाखांची मदत जाहीर
▪ मुंबईसह देशभरातील 19 विमानतळं 'बीसीएएस'कडून हायअलर्टवर; सुरक्षेत केली दुपटीने वाढ
▪ कलम 370 हटविल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानाने भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा घेतला निर्णय
▪ अमेरिका -चीन वादामुळे शेअर मार्केटमध्ये घसरण, मुकेश अंबानींना 17 हजार कोटींचा फटका
▪ महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
▪ वाहनक्षेत्रातील मंदीमुळे चार महिन्यात साडेतीन लाख लोकांनी गमावला रोजगार
▪ चीनची टेक कंपनी शाओमीने लॉंच केला खिशात बसणारा प्रिंटर
▪ अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षीत 'मिशन मंगल' या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👏 राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन
LetsUp । Special
⚡ सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण
🌊 राज्यात आपत्तीजन्य परिस्थिती : राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत 27 जण मृत्युमुखी पडले आहे.
📍 कोल्हापूर-सांगलीला पुराचा वेढा
👉 कोल्हापूर : जिल्ह्यातील 223 गावं पुरामुळे बाधित झाली आहेत. तर 18 गावांना पाण्याचा वेढा बसला आहे. या पुरामुळे 28 हजार लोक बाधित झाले असून यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे आतापर्यंत 4 हजार घरे पडली आहे, तर 67 हजार हेक्टर जमिनीवरील पीकं नष्ट झाली.
👉 सांगली : मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक गावं पुराखाली आली आहे. तसेच नद्यांना आलेल्या पुरामुळे 30 ते 35 हजार नागरिक पुरात अडकले असण्याची शक्यता आहे.
😰 लाखो नागरिक स्थलांतरित : 2 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 2 लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. यामध्ये सांगली आणि कोल्हापूरमधील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
📍 दैनंदिन वस्तूंचा तुटवडा : पूरग्रस्त जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. गावांना पूराचा वेढा पडला असून रस्तेही पाण्याखाली गेल्याने इतर गावांशी संपर्क तुटला आहे. तसेच त्यामुळे आवश्यक दैनंदिन वस्तू, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे.
💁♂ मदतीसाठी इथे संपर्क साधा : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा: मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई, खाते क्रमांक - 10972433751
📢 माणुसकीच्या नात्याने देत आहोत हाक, पूरग्रस्तांसाठी चला देऊ मदतीचा हात
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात
LetsUp । Update
⚡ राष्ट्रवादीचे सर्व खासदार-आमदार देणार एक महिन्याचा पगार
💰 आर्थिक मदत : राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादीचे सर्व खासदार-आमदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
👍 पूरग्रस्तांसाठी मदत : 9 ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेल्फेअर संघातर्फे पहिला ट्रक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार आहे. त्यामध्ये औषधे, कपडे, बिस्कीटे असणार आहेत.
🗣 काय म्हणाले मलिक? : राजकीय झेंडे बाजूला ठेवून, विरोधकांना सोबत घ्या आणि आपत्ती परिसरातील नागरिकांना कशी मदत केली जाईल याकडे लक्ष द्या, असा सल्ला मलिक यांनी दिला.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🛤 पाकिस्तानने वाघा सीमेवर समझौता एक्स्प्रेस थांबवली
LetsUp । National
💁♂ काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्ताने समझौता एक्स्प्रेस वाघा सीमेवरच रोखली आहे.
📍 प्रवासी अडकले सीमेवर : पाकिस्तानच्या या निर्णयामुळे अनेक प्रवासी सीमेवरच अडकले आहेत. 'आमचे गार्ड आणि ड्रायव्हर भारताच्या सीमेत प्रवेश करणार नाहीत', अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे.
👉 भारतानेच आता त्यांचे गार्ड आणि ड्रायव्हर पाठवावेत, असे पाकिस्तानने सांगितले आहे. भारताने आपले गार्ड आणि ड्रायव्हर पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.
🚆 समझौता एक्स्प्रेस : ही एक्स्प्रेस भारत-पाक दरम्यान झालेल्या शिमला करारानंतर 22 जुलै 1976 या दिवशी सुरू करण्यात आली होती. समझौता एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस दिल्ली आणि अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत धावते.
🚫 व्यापार बंद : पाकिस्तानने भारताबरोबरचा व्यापारही बंद करण्याचा निर्णय घेतला असून राजनैतिक संबंधांमध्येही कपात केली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤔 तुम्हाला माहित आहे का?
LetsUp | Do U Know
1) आशियाई खेळांचे सर्वप्रथम आयोजन 1951 साली केले गेले होते.
2) ओलंपिक ध्वजावरील पाच रिंग पाच खंड चिन्हांचे प्रतीक आहेत.
3) रणजी करंडक स्पर्धा 1933 साली सुरू झाल्या.
4) रग्बी फुटबॉल हा स्कॉटलंडचा राष्ट्रीय खेळ आहे.
5) बुल फाइटिंग हा स्पेनचा राष्ट्रीय खेळ आहे.
6) आईस हॉकी हा कॅनडा देशाचा राष्ट्रीय खेळ आहे.
7) फुटबॉल विश्वकपचा पहिला विजेता देश उरुग्वे आहे.
8) हॉकीची आंतरराष्ट्रीय संघटना IHF(International Hockey Federation) आहे.
9) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनचे मुख्यालय लौसाने येथे आहे.
10) पोलोच्या मैदानाचा आकार 270 मी. x 180 मी.असतो.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🎯 पावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी
LetsUp | Tips & Tricks
पावसाळा हा असा ऋतू आहे ज्या ऋतूमध्ये हिरवळ आणि नैसर्गिक संपन्नता भूल पाडते. मात्र एक गोष्ट कोणालाही आवडत नाही ते म्हणजे सगळीकडे पाण्यामुळे झालेली चिकचिक आणि डबकी!
✔ या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती पायांची. बूट, चप्पल कोणतीही असो पाय आणि पाण्याचा संबंध येतोच. त्यातून अनेकदा पायाची त्वचा हुळहुळी होते आणि ती निघून बाहेर येते.
▪ यासाठी आज आपण काही खास टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे पाय सुरक्षित तर राहतीलच मात्र पावसाळ्यात त्यांना ओलाव्यापासून देखील वाचवता येईल.
📍 पायाला ओल जाणवेल असे सँडल्स कितीही आकर्षक असले तरी खरेदी करू नयेत.
👉 पावसाळी सँडल्स जास्त घट्ट घेऊ नयेत, त्याने बोट आखडून जातात.
🧐 कधीकधी ओल जास्त होते आणि पायाची त्वचा निघून येते अशी त्वचा कात्रीने कापायच्या प्रयत्नात आपल्या पायांना इजा होऊ शकते.
💁♀ संध्याकाळी कोमट पाण्यात पाय बुडवून काही काळ राहिल्याने पायांच्या भेगांमधील धूळ निघून पाय स्वच्छ राहतील.
👀 पावसाळ्यातदेखील पायाला मॉइस्चरायजर ची गरज असते त्यामुळे रोज पायाला मॉइस्चरायजर लावावे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💥 राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे
LetsUp | Breaking
⚡ विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) पुकारलेला संप तूर्त मागे
📣 राज्यातील पूरस्थिती आणि त्यानंतर बळावणारे साथीचे आजार लक्षात घेता मानवतेच्या दृष्टिकोनातून संप तूर्त मागे घेत असल्याचे मार्डने केले जाहीर
🤨 मात्र सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर 31ऑगस्ट रोजी पुन्हा संप पुकारण्यात येईल : मार्ड
✔ बैठकीत 'या' मागण्या मान्य झाल्या :
● निवासी डॉक्टरांचे (नागपूर, लातूर, अकोला आणि अंबाजोगाई) थकलेले विद्यावेतन लवकरात लवकर देणार
● टीबी झालेल्या डॉक्टरांच्या सुट्टी आणि प्रसुती रजा
● आगामी 5 दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये विद्यावेतनवाढीच्या मागणी मांडणार
● 5 हजार रुपयांनी वाढलेले विद्यावेतन पुढच्या महिन्यापासून काऊंटवर क्रेडिट करणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 पाकिस्तानने घेतले मोठे निर्णय
LetsUp | International
⚡ कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत इस्लामाबादमध्ये घेतली बैठक
👍 यामध्ये कलम 370 रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाचे उमटले पडसाद, यावेळी भारताविरोधात मोठे निर्णय घेण्यात आले
✔ बैठकीमधील निर्णय :
● पाकिस्तानने भारतासोबत सर्व राजकीय संबंध तोडण्याचा निर्णय घेतला
● सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णयही घेण्यात आला
● भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रामध्ये जाण्याचा निर्णय
● पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांची केली हकालपट्टी
● भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई हद्दीचा एक कॉरिडोअर केला बंद
😇 संयुक्त राष्ट्रांचे मौन :
🤨 जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा देणाऱ्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या प्रवक्त्याने बाळगले मौन
👀 काश्मीरसंदर्भातील घडामोडींवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बारीक लक्ष ठेवून आहेत, असे मात्र आवर्जून सांगितले
💥 उत्तर कोरिया : पुन्हा क्षेपणास्त्रांची चाचणी :
📍 उत्तर कोरियाने पुन्हा दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली
🤨 कोरिया द्विपकल्पामध्ये दक्षिण कोरियाच्या पूर्व किनाऱ्याच्या दिशेने ही दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली
🗣 उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यने याबाबत सांगितले
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😍 उत्सुकता संपली! अॅमेझॉनचा 'FREEDOM Sale' सुरु
📆 सेल आज 8 ते 11 ऑगस्ट 2019 दरम्यान...
🎁 मनसोक्त डिस्काउंट देणारा सेल :
▪ Mobile Accessories : 40% हुन अधिक डिस्काउंट
▪ Electronics वस्तू : 50% हुन अधिक डिस्काउंट
▪ Home & Kitchen उपकरण : 30 ते 75% डिस्काउंट
▪ Headphones & Speakers : 60% हुन अधिक डिस्काउंट
▪ Tv & Appliances : 60% हुन अधिक डिस्काउंट
▪ Daily Essentials : 70% हुन अधिक डिस्काउंट
🌟 यांसह अनेक आकर्षक ऑफर्स देखील उपलब्ध...
👍 No Cost EMI, Cashback & More
✈ डोमेस्टिक फ्लाईट बुकिंगवर 2000/- मिळवा
💳 जर तुम्ही SBI Credit Card User असाल तर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध!
🛒 तर विचार कसला करताय? खरेदीची संधी सोडू नका
👍 ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा : https://amzn.to/31rj2TV
6 624
LetsUp News Updates
● 'जैश-ए-मोहम्मद' जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांसह मुंबईसारख्या काही शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत : गुप्तचर यंत्रणा
● पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी (दि.8) देशाला संबोधित करण्याची शक्यता, कशाबाबत बोलणार हे गुलदस्त्यात
● संसदेने ग्राहक संरक्षण विधेयकाला दिली मंजुरी, यामुळे जनतेला ग्राहक म्हणून पाच नवीन अधिकार मिळणार आहेत
● जगातील 17 देशांमध्ये मोठ्या जलसंकटाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता, त्यात भारताचाही समावेश
● कलम 370 : पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले, भारतीय उच्चायुक्तांनाही परत पाठवणार
● बिहारमध्ये मागील 15 दिवसांत जमावाकडून झालेल्या मारहाणीच्या 12 घटना उघडकीस, बिहार पोलिसांची माहिती
● शाओमीने चीनमधील एका ग्लोबल इव्हेंटमध्ये जगातील पहिला 64 मेगापिक्सलचा फोन लाँच करणार असल्याची केली घोषणा
● प्रो कबड्डी : हरयाणा स्टीलर्सचा पाटणा पायरेट्सवर विजय तर चेन्नई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातील सामना बरोबरीत सुटला
● महिलांच्या आगामी जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी मेरी कोम व लवलिना बार्गोहेन यांची निवड
● ‘साहो’मध्ये अभिनेता चंकी पांडे खलनाकाच्या (‘देवराज’) भूमिकेत दिसणार, चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
