es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
येत्या 24 तासात राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता LetsUpp | Trending 🌧️ येत्या 24 तासांत राज्यातील मुंबई, नवी मुंब
येत्या 24 तासात राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता LetsUpp | Trending 🌧️ येत्या 24 तासांत राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेलसह राज्याच्या कोकण पट्टी परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 💁🏻‍♂️ रविवारपासूनच मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये पावसानं दमदार बँटिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कोकण किनारपट्टी भाग आणि उर्वरित परिसरातही पावसाने हजेरी लावली होती. ⛈️ बंगालच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. 🏕️ विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस पोहोचला असून, जनजीवनावर याचे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 📍 राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटसह पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/j3e9RFGhHjb

photo content

गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफ यांच्यावर नवा आरोप LetsUpp | Trending ⚡ माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी उतरवलं होतं. तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. 👉 गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा आता बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. 🚆 सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. 🚔 मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. 💰 हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसंच मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सांगितलंय, असंही किरीट सोमय्या म्हणाले. 🗣️ किरीट सोमय्या काय म्हणाले? ● मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले. त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का? ● मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा. ● मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे 2 कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे. ● मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? ● मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, 100 कोटी रुपये घेतले. ● दरम्यान, गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार, असंही सोमय्या यांनी सांगितलं. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/uzGPLTXiHjb

टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची गुप्तचर विभागाची माहिती; मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ! ● पेट्रोल आणि डिझेल GST मध्ये आणण्याला महाराष्ट्राचा विरोध, अजित पवारांनी पत्रातून मांडली भूमिका ● मोठा दिलासा! देशात आठ प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट; केंद्राकडून जारी करण्यात आली माहिती ● आता एटीएममधून औषधे मिळणार; औषधांचे हे ATM मशीन बसवण्यात येणार असल्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास ओषधे उपलब्ध होणार ● राज्याचे ग्रामविकास मंत्री मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल; रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण अद्याप समोर नाही ● पुण्यात मानाच्या गणपतीचं मंडपात विसर्जन होणार, शहरात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त; एखाद्या मंडळानं विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई ● जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्राचा हस्तक्षेप वाढला; याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ● उत्तराखंड उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा आजपासून पुन्हा सुरू ● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आयटीची धाड आजं दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरु ● वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर विराट कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/Gdm9ycN9Djb

टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय लांबणीवर; पेट्रोल डिझेल स्वस्त होईल ही सामान्य नागरिकांची आशा मावळली ● गौरी-गणरायांना निरोपानंतर चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला, यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने २२४ गाड्या सोडल्या ● गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज; विसर्जनस्थळी निर्माल्य कलश, प्रकाशझोत, जीवरक्षक, नियंत्रण कक्ष यांसह विविध सुविधा ● सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गांमध्ये बदल केले; गणेशमूर्ती घेऊन येणारी मंडळे, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांना प्रवेश बंद ● नाशिक प्रकरणी नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, राणेंच्या याचिकेवरील सुनावणी 30 सप्टेंबरपर्यंत तहकूब ● पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी द्यावा; शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करण्याची वेळ आल्यास ती करणार- शिवसेना नेते अब्दुल सत्तार ● पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड : भाजप नेते माधव भांडारी ● साहित्य संमेलन:41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार; ​​​​​​​स्वागताध्यक्ष राजेश करपे यांची माहिती ● औरंगाबादचा उत्कृष्ट धावपटू तेजस शिर्सेने अजिंक्यपद पटकावले , 60 व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत 110 मीटर हर्डल्स गटात सोनेरी यशाचा पल्ला गाठला ● रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवावे, कर्णधार विराट कोहलीची सूचना; एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद के. एल. राहुलकडे आणि ट्वेन्टी-२० संघाचे ऋषभ पंतकडे द्या अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/UZun5QTJDjb

टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● सर्वसामान्यांची निराशा! लखनऊमध्ये GST कौन्सिलची महत्वाची बैठक; पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव फेटाळला ● गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने बंद राहणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती ● मुंबई महापालिकेचा पाचवा सेरो सर्व्हे जाहीर; 86.64 टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये आढळली कोविड – 19 अँटीबॉडीज ● सह्याद्री गेस्ट हाऊस आणि राजभवनाजवळ वाझेकडून देशमुखांच्या सचिवाला पैशाने भरलेल्या 16 बॅगा; आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा ● स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तृतीय पंथियांना लिंग निवडीचे स्वातंत्र्य, राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण आदेश ● कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना एकटे पडू देणार नाही, गरज पडल्यास नव्या योजना आणून सक्षमीकरण करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार ● पुढील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट! ● देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला CRPF जवान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना दिसणार; लवकरच ट्रेनिंग सुरू ● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात दोन कोटी नागरिकांना डोस ● 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण, ग्रंथप्रदर्शन व विक्रीकरिता स्टॉलची नोंदणी सुरू अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/Nrh5nfU0Cjb

टॉप 10 हेडलाईन्स ! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक निर्णय, मुख्यमंत्रीच नाही तर स्पीकर, मंत्री सगळे बदलले, उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनाही जागा नाही ● केंद्राने त्यांचे कर कमी करावेत, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा आणू नये: अजित पवार ● उत्तर-मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज ● मुंबईत उद्या केवळ महिलांचे विशेष लसीकरण, ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार ● नागपूर पोलिसांना सलाम! वेदनेनं तडपडणाऱ्या गर्भवती महिलेची मदत, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळं वाचला दोघांचा जीव ● SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट; सर्व शुल्क रद्द, प्रत्येक महिन्याला अधिक लाभ मिळणार ● देशात दिवसाला रोज 77 बलात्कार तर 80 हत्येच्या घटना, एनसीआरबीचा अहवाल ● “सत्तेत आलो तर 24 तासांत 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणार” ; ‘आप’ची घोषणा! ● कोरोना महामारीच्या भीतीमुळे! भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा रद्द ● राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राचा निखिल दुबे आणि छत्तीसगडचा दिनेश कुमार यांनी आपली विजयी सुरुवात केली अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/6msIbDA7Ajb