es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. संपूर्ण देशात, देशभक्तीचे चैतन्यमयी वातावरण ● राष्ट्रपतींचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन; कोरोना लस, कृषी, जम्मू काश्मीरसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य ---------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५ ---------------------- ● स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द, ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ● आजपासून दोन डोस घेतलेल्यांचा मुंबई लोकलप्रवास, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त ● महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लसच्या रुग्णांची वाढ, डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असून आतापर्यंत 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू; आरोग्य मंत्री राजेश टोपे ● भंडारदरा व कळसुबाई, हरिश्चंद्रगड परिसर पर्यटकांसाठी खुले; महसूल, पोलीस वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीत घेतला निर्णय ● गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांना मोठा दिलासा, व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास परवानगी ● वेतनापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण संस्थाचालकाविरुद्ध कारवाई योग्यच; यवतमाळच्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्वाळा ● राज्यभर अनलॉक असताना पंढरपूरमध्ये संचारबंदी, व्यापाऱ्यांमध्ये संताप; सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात संचारबंदी लागू ● टीम इंडियाच्या दमदार कामगिरीला इंग्लंडकडून सडेतोड उत्तर; इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात, कर्णधार जो रूट १८० धावांवर नाबाद राहिला To know more click here https://letsup.app.link/g7BCtW4hJib

*देशात १४ ऑगस्टबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा* LetsUpp | Trending ⚡ भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. फाळणीचे दुःख आणि वेदना आपण कधीच विसरू शकत नाही. 🗣️ या दुःखद गोष्टींची आठवण मनात राहिली तरच स्वातंत्र्याचे मोल समजेल असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले. 👉 'ब्रिटिश इंडिया'ची १४ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणी झाली आणि पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली. यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी पारतंत्र्य संपले आणि भारत स्वतंत्र झाला. पण फाळणीच्या काही दिवस आधी आणि नंतरही भारत-पाकिस्तान सीमेवर नागरिकांची पळापळ सुरू होती. 👀 फाळणीनंतर झालेल्या दंगलींमध्ये अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, कित्येकजण बेघर झाले. फाळणीचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना बसला. 🧐 फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली. या सर्व घटना विसरायच्या म्हटल्या तरी विसरता येणार नाहीत. 📍 आता १४ हा दिवस फाळणी दिन अर्थात 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' म्हणून पाळताना स्वातंत्र्याचे आणि मानवता जपण्याचे महत्त्व लक्षात येईल. यातूनच तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. To know more click here https://letsup.app.link/yw6mCQTeIib

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन LetsUpp | Trending ● अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज शनिवारी करण्यात आले. ● अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. ● बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत. ● पहिल्या फेरीची सुरूवात शनिवारपासून होणार असून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. ● दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान जागांची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. २३ ते २५ ऑगस्टदरम्यान मेरिट लिस्ट लागेल. ● दि. २७ ते ३० ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. ● विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे. To know more click here https://letsup.app.link/wdQ6KyskIib