LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
दोन दिवसांचेच अधिवेशन का?; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या पत्राला उत्तर
LetsUpp l Trending
● राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्ष निवड आदी विषयांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.
● यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २४ जून रोजी पत्र पाठविले होते.
● यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांना दोन दिवसांचेच अधिवेशन का बोलावले याचे स्पष्टीकरण करणारे पत्र पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय म्हंटले? :
● विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक २२ जून, २०२१ रोजी झाली.
● कोविड-19 मधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने दिलेला सावधगिरीचा इशारा यावर या बैठकीमध्ये सखोल विचारविनिमय करण्यात आला.
● त्यानुसार, केवळ ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरविण्याचा अधिकार आहे, त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून, सन २०२१ च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाचा कालावधी दि.५ जुलै ते ६ जुलै, २०२१ असा दोन दिवसांकरीता निश्चित करण्यात आल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.
● राज्यामध्ये सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी, केवळ आपल्या राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केलेली आहे.
● संभाव्य लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटल आहे.
● तसेच भारतीय संविधानाच्या कलम १७८ तसेच महाराष्ट्र विधानसमा नियम, ६ अन्वये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येते. तथापि, याकरीता विवक्षित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
● कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणे शक्य झाले नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आलेली आहेत.
● त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. या परिस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.
● अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडले आहे. यामुळे निवडणुकीअभावी कोणत्याही सांविधानिक तरतूदीचा भंग झालेला नाही अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/7oBExGhFyhb
6 624
https://www.youtube.com/watch?v=ZPE2xZkAAis गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...! गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...!
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाजाला जागृत करतो आहे आणि हीच बाब राष्ट्रवादीला खटकत असल्याने माझ्या गाडीवर दगड टाकले जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांच्या कडून करण्यात आलाय.
6 624
देशात आजपासून 'हे' मोठे बदल होणार
LetsUpp l Trending
1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून देशात बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे. या बदलांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत ते पाहुयात...
स्टेट बँक ऑफ इंडिया
बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत करता येणार आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला 15 रुपये व जीएसटी द्यावा लागणार आहे. चेकबुकसाठीही अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.
आयडीबीआय बँक
आयडीबीआय बँकेने 1 जुलैपासून आपल्या चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील खातेधारक आता बँकेत फक्त 5 वेळाच पैसे जमा करू शकणार आहेत. .
LPG गॅसच्या किंमतीत वाढ
सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत.
कार आणि दुचाकी महागणार
मारुती आणि हिरोच्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. हिरोच्या दुचाकींच्या एक्स-शो रूम किंमतीत 3 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
50 लाख रुपयांच्यावरील खरेदीवर टीडीएस कापला जाणार
50 लाखांवरील खरेदीवर 0.10 टक्के टीडीएस कापला जाणार आहे. मागील वर्षी एखाद्याचा 10 कोटींचा टर्नओव्हर असेल, तर तो यावर्षी 50 लाखांपेक्षा अधिकचा माल खरेदी करू शकेल. यावर जी विक्री होईल त्यावर टीडीएस कापला जाईल.
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज
लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी दिली जाऊ शकणार आहे. चाचणीत पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स घरी पाठवून दिले जाणार आहे.
सोन्याच्या दागिन्याला यूनिक ओळख
सोन्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून सोन्याच्या प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख तयार केली जाणार आहे. दागिने हरवल्यास किंवा चोरी झाल्यास या यूनिक ओळखीमुळे ओळख पटवण्यात मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख (यूआईडी) देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
सिंडिकेट बँक ग्राहकांना नवा IFSC कोड
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे आता सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड वापरावा लागणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/FxdvnVHaxhb
6 624
https://www.youtube.com/watch?v=KJMCM-GiYtA सेंद्रिय शेतीसह संशोधनाची वाट धरलेल्या २८ वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा! धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील अंतुर्ली या गावातील समाधान बागुल हा २८ वर्षीय तरुण चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने आपल्या वडिलोपार्जीत केवळ तीन एकर शेतीतून स्वतःची कंपनी सुरु केली त्यातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीसह संशोधनही सुरु केले आहे.
6 624
विदर्भाच्या ध्येयवेड्या तरुणाने मिळवली लंडनची स्कॉलरशिप
LetsUpp | Trending
● बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी या छोट्याशा गावातील एका ध्येयवेड्या तरुणाने ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठित असलेली चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली आहे. या ध्येयवेड्या तरुणाचं नाव राजू आत्माराम केंद्रे असं आहे.
● युकेमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात अशा जगभरातील 160 देशातील युवा नेतृत्व करणाऱ्या तरुणांसाठी चेव्हेनिंग स्कॉलरशीप दिली जाते. फॉरेन कॉमनवेल्थ डिपार्टमेंटकडून ही स्कॉलरशीप दिली जाते.
● या स्कॉलरशिप अंतर्गत राजुला जवळपास 45 लाखांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी जगभरातील 19 नामांकित विद्यापीठांमध्ये त्याची निवड झाली आहे. चेव्हेनिंग स्कॉलरशिपमुळे त्याला हव्या त्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकणार आहे.
● जिल्हा परिषद, मुक्त विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायंस, मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय आणि आयपॅक असा प्रवास करत राजू चेव्हेनिंग स्कॉलरशिपपर्यंत येऊन पोहचला आहे. ज्या विद्यापीठात प्रवेश घेईल त्याची पूर्ण फी व राहणे, तसेच खाण्याचा खर्च या स्कॉलरशिपमधून भागविला जाणार आहे.
● गेल्या चार वर्षांपासून राजू केंद्रे सहकार्यांच्या मदतीने एकलव्य चळवळ लीड करत आहे. ज्या फर्स्ट जनरेशन लर्नर्सला भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी एकलव्य चळवळ काम करते.
● या चळवळीतील 125 विद्यार्थी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत शिकत आहेत. तळागाळातील तरूणांचं एक भक्कम नेतृत्व तयार करण्याचा राजू केंद्रेंचा मानस आहे.
To know more click here
https://letsup.app.link/zlAnloSSvhb
6 624
https://www.youtube.com/watch?v=zHCo2P3JzrE&ab_channel=LetsUppMarathi
आज दिवसभरातील १० महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
▪️ १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न, यासंदर्भात लवकर निर्णय जाहीर करणार; उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
▪️ देशभरात 12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरच Zydus Cadila ची लस मिळणार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
▪️ अहमदनगर जिल्ह्यात नवे निर्बंध; अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानं सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सुरु राहणार, तर शनिवार-रविवारी पूर्णपणे बंद असणार
▪️ अमरावतीत शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या; जिल्ह्यात एकच खळबळ, ४ आरोपींना पोलिसांकडून अटक
▪️ राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण; तर एकाचा मृत्यू, 21 रुग्णांपैकी एकाच रुग्णाने घेतला होता डोस, राज्य आरोग्य विभागाने केली माहिती उघड
▪️ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास, बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र
▪️ नांदेड जिल्ह्यात उद्यापासून नवीन निर्बंध; सर्व दुकानं सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सुरु राहणार, तर शनिवार-रविवारी पूर्णपणे बंद राहणार
▪️ राज्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागेबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा! 3 हजार 64 रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच होणार
▪️ अतिप्रदूषित भागातील रहिवाशांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक; संशोधनातून माहिती समोर, मुंबई आणि पुणे देशातील संवेदनशील ठिकांणांपैकी एक
▪️ महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार याबाबत कोणतीही शंका नाही, तिन्ही पक्षात मतभेद नाहीत; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ठाम मत
To know more click here
https://letsup.app.link/uz7vsS4Sqhb
6 624
ब्रेकिंग! इगतपुरीत रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, 22 जणांवर गुन्हा
LetsUpp | Breaking
▪️ नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीजवळ दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
▪️ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे.
▪️ पथकाने बंगल्यावर छापा मारला असता मादक द्रव्यासह बिभत्स अवस्थेत महिला आणि पुरुष आढळून आले आहेत.
▪️ तसेच घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य जप्त करण्यात आले आहेत.
▪️ या रेव्ह पार्टी प्रकरणी एकूण १० पुरुष आणि १२ महिलांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▪️ यातील 4 महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व 1 महिला बिग बॉसच्या शोमध्ये काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.
To know more click here
https://letsup.app.link/XDI78C8rqhb
6 624
भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अत्यंत कमी
LetsUpp l Positive News
● लसीकरण कोरोना विरुद्धच्या लढ्यातलं सर्वात प्रभावी हत्यार असल्यानं सगळेच देश लसीकरण मोहिमेला गती देत आहेत. देशातील २० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झाल्यास तिथे कोरोनाची लाट येत नसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे.
● अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्ससारख्या देशांमध्ये २० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिथे कोरोनाची लाट आली नाही. या देशांशी तुलना केल्यास भारतानं नुकताच एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. देशातील २५.९८ कोटी (२०.९५ टक्के) नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
● यातील ५.५२ कोटी (४.४५ टक्के) नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. ७० टक्के लोकसंख्येला किमान एक डोस दिला गेल्यास तिसऱ्या लाटेचा झोका टाळता येऊ शकेल. मात्र डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव पाहता अनेक तज्ज्ञ ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवत आहेत.
● देशात आतापर्यंत ३१ कोटींहून अधिक डोसचा वापर झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ६५ कोटी डोस तयार होतील. म्हणजेच ऑक्टोबरच्या आधी ९६ कोटी डोस वापरले जातील. देशातील १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ८५ कोटी आहे.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/HwDpTN7Gqhb
6 624
प्राध्यापकांच्या रिक्त जागेबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
LetsUpp | Trending
● नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने 21 जून 2021 पासून विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते.
● उच्चस्तरीय समितीच्यावतीने एकून 4 हजार 74 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 674 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित रिक्त जागांची लवकर भरती करावी अशी मागणी करण्यात येत होती.
● यावर कोरोनाच्या काळात थांबलेली 3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
● या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/PK9Znyjyqhb
6 624
https://www.youtube.com/watch?v=SFJntQGAXK4
जाणून घेऊया आठवड्याभरातील पॉझिटिव्ह न्यूज
LetsUpp | Positive Bulletin
● 3 कोटी नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य
● दूध दरासंदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा ; दूध उत्पादकांना दिलासा
● अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा
● भिकारी, बेघर व्यक्तींसाठी नवी मुंबईची खास लसीकरण मोहीम!
● कोरोना उपचारावर झालेल्या खर्चाला आयकरातून सुट
● देशभरात 18 वर्षांवरील मोफत लसीकरणाला सुरुवात
● खुशखबर! लवकरच सुई नसलेली लस बाजारात होणार दाखल
● राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला
● स्मार्ट सिटी अवॉर्ड स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीचा देशात डंका
● आमदार लंके यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/kFNWXmwiqhb
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
● राज्यात शेतीवर संकट; पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या; महागाईची भीती
● राज्यात २४ तासात ९ हजार ८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; १५६ रुग्णांचा मृत्यू;
८ हजार ७५२ रुग्णांना डिस्चार्ज
● ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे; अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● पुण्यामध्ये चक्का जाम आंदोलनात कोरोना नियमांचा भंग; भाजपा नेत्यांसह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल
● राज्यात विक्रमी लसीकरण; दिवसभरात ७ लाखाहून अधिक नागरिकांनी घेतली लस; राज्यात आत्तापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या
● १२ ते १८ वयोगटातील मुलांसांठी Zydus-Cadila ची लस लवकरच उपलब्ध होणार : केंद्र सरकार
● कोविड लसीकरणाचा वेग कायम ठेवा; लसीकरणाच्या प्रचार, प्रसारासाठी NGO ची मदत घ्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
● जम्मू-काश्मीरमध्ये अविश्वासाचे वातावरण : डॉ. फारूक अब्दुल्ला; निवडणुकीपूर्वी राज्याचा दर्जा देण्याची ओमर अब्दुल्लांची मागणी
● भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशची ऐतिहासिक कामगिरी; रोम येथील सेटे कॉली करंडक जलतरण स्पर्धेत साजन ऑलिम्पिक पात्रतेचे ‘अ’ निकष गाठणारा भारताचा पहिला जलतरणपटू ठरला
● 'काळ' या मराठी चित्रपटाचा परदेशात डंका; रशियातील ५० थिएटरमध्ये प्रदर्शित; रशियात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला
To know more click here
https://letsup.app.link/O3DVxbcYphb
6 624
महत्वपूर्ण बातमी ! राज्यातील निर्बंधांमध्ये पुन्हा बदल
LetsUpp | Trending
● महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध जाहीर केले आहे.
अशी असेल जमावबंदी
कोरोना असेपर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल.
बांधकाम होत असलेल्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही.
खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही.
कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही.
एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त कार्यक्रम असतील तर कार्यक्रमांमध्ये पुरेसा कालावधी असावा.
धार्मिक स्थळे
लेव्हल 3,4,5 मध्ये सर्व धार्मिक स्थळे अभ्यागतांसाठी बंद
लेव्हल 1 मधील अभ्यागतांना धार्मिक स्थळे खुले असतील
लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील, अशा धार्मिक स्थळी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.
कोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.
खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे
शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खासगी प्रशिक्षण वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असेल.
पर्यटन स्थळे
प्रशासन कोणत्याही प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करू शकतात. यासाठी पॉझिटिव्हिटी रेट किंवा भरलेले ऑक्सिजन बेड हे निकष नसतील.
या पर्यटन स्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. जर हे पर्यटनस्थळ स्तर पाचमध्ये असेल तर ई-पासशिवाय कोणत्याही अभ्यागतांना तेथे येण्याची परवानगी नसेल.
To know more click here
https://letsup.app.link/lNMYLTFhqhb
6 624
'डेल्टा प्लस व्हेरिएंट'बाबत WHO चा इशारा!
LetsUpp l Trending
● कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची जगभरात चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे प्रतिकारशक्ती वेगाने घटत असल्याचे समोर आले आहे.
● दरम्यान त्यामुळे जगभरातील देशांनी याची धास्ती घेतली असताना देशातील १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.
● महाराष्ट्रात सर्वाधिक २० पेक्षा अधिक रुग्ण आत्तापर्यंत आढळल्यामुळे चिंता वाढली असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे.
● त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातील नागरिकांनीदेखील मास्क घालून ठेवणे आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
● जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
● “प्रथम भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातील जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत.
● आजपर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/v2kMjFyZohb
6 624
टोलनाक्यावरील गर्दीला आळा बसणार, आता घरबसल्या पास मिळणार
LetsUpp | Trending
मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता ऑनलाइन पद्धतीने मासिक टोल पास खरेदीची सुविधा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
वाहनधारकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या माध्यमातून पैसे जमा करून एका टोलनाक्याचा अथवा सर्व टोलनाक्यांचा फास्टॅगमध्ये खरेदी व त्याचवेळी ऑनलाइन कार्यान्वित करण्याची सुविधा आहे.
शहरांतील कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर, रस्त्यांवरील वाहनांच्या वर्दळीत मोठी वाढ झाली आहे.
सर्वसामान्यांना अद्याप लोकलप्रवासाची मुभा नसल्याने त्यांचा भारही रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत अधिकच भर पडली आहे.
दरम्यान, वाशी, ऐरोली, मुलुंड, मुलुंड व दहीसर या पथकर नाक्यावरून मासिक टोल पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सोयीसाठी फास्टॅगमध्येच मासिक पासची सुविधा यापूर्वीच महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/MRMqUCiJohb
6 624
ठाण्यात भाजपचं आंदोलन, प्रविण दरेकर यांना अटक
LetsUpp | Trending
● ठाण्यात भाजपचं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले या वेळी कार्यकर्त्यासह प्रविण दरेकर यांना अटक करण्यात आली आहे.
● आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत आमचा लढा सुरूचं राहणार
प्रविण दरेकर यांचा राज्य सरकारला इशारा
● महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आणि ओबीसी राजकीय आरक्षण संरक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात भाजपच्यावतीने १ हजार ठिकाणी एकत्र आंदोलन करण्यात आले.
● मविआ सरकारने आम्हाला अटक केली किंवा आंदोलन करण्यापासून रोखले तरी देखील आमचा हा लढा सुरूचं राहील.
● जोपर्यंत ओबीसी समाजाचं सन्मानाचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
To know more click here
https://letsup.app.link/NX8uZX1Hohb
6 624
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
▪️ राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय; कोरोनाचा वाढता आकडा आणि डेल्टा व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये मोठे बदल
https://www.youtube.com/watch?v=h_TuI0lOgcw
▪️ महाराष्ट्रात धोका वाढला; डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले असून रत्नागिरीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
▪️ राज्यात 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांचे लसीकरण पूर्ण; सर्वाधिक नागरिकांना लस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर
▪️ अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोवावॅक्सने विकसित केलेल्या कोवोवॅक्स कोरोना लसीचं उत्पादन पुण्यात सुरु, पहिल्या बॅचच्या निर्मितीला सुरुवात, सीरम इन्स्टिट्यूटकडून ट्वीट
▪️ मुंबईत बोगस लसीकरण करणारी टोळी उद्ध्वस्त, लस पुरवणाऱ्या शिवम हॉस्पिटलच्या डॉ पटारिया पती-पत्नींसह एकूण दहा जणांना अटक, तपासासाठी एसआयटीची स्थापना
▪️ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे, तब्बल सव्वातीन तासानंतर तपासणी पूर्ण
▪️ बिगर भाजपा आघाडीचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याची चर्चा सुरू असताना खुद्द शरद पवार यांनी शक्यता फेटाळून लावली; पर्यायी आघाडी काँग्रेससोबतच!
▪️ ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांची माहिती; शेतकरी संघटनांसोबत बैठक
▪️ माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक, कॉपीराईटचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई केल्याचं ट्वीटरचं स्पष्टीकरण
▪️ शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये; येत्या पाच दिवसात तुरळक पावसाची शक्यता; पेरण्यांची घाई करू नये; परभणी हवामान विभागाची माहिती
To know more click here
https://letsup.app.link/ugWq5ZSBnhb
6 624
डेल्टा प्लस मुळे राज्यात पहिला मृत्यू
LetsUpp | Trending
● रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण आहेत की नाहीत याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असताना आज या व्हेरिएन्टने संक्रमित एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
● राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे, ही दिलाशाची बाब असली तरीही आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे.
● महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित २१ रुग्ण आहेत. यापैकी या नव्या व्हेरियंटने संक्रमित ८० वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.
● या रुग्णाला इतरही अनेक सहव्याधी होत्या, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.
● संगमेश्वरमधील ८० वर्षाच्या महिलेचा या नव्या स्ट्रेनने मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णलयात या डेल्टा प्लस विषाणूने संक्रमित झालेल्या महिलेवर उपचार सुरू होते.
● उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून याला आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/N5cFkr2snhb
