LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
💁♂ अखेर दिलासा! इन्कम टॅक्स रीटर्नसाठी मुदत वाढवली
LetsUp | Update
📍 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ने आयकर विवरणपत्र (ITR) फाईल करण्यासाठी मुदत वाढवली
👉 अगोदर निर्धारित केलेली 31 जुलै ही तारीख वाढवून आता 31 ऑगस्ट करण्यात आली आहे
🗣 इन्कम टॅक्स विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे
💫 31 ऑगस्टनंतर आयकर परतावा भरल्यास कलम 139(1) मधल्या तरतुदी नुसार 10 हजार रूपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Updates
● कर्नाटक पेच सुटला! मुख्यमंत्री कुमारस्वामींचे सरकार कोसळले, भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा
● इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत वाढली, 31 जुलै ऐवजी आता 31 ऑगस्ट असणार अंतिम तारीख
● भारताचा आर्थिक विकासदराचा 2019 व 2020 या वर्षांतील अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 0.3 टक्क्य़ांनी केला कमी
● देशभरातील एकूण 23 विद्यापीठांची नावे बोगस विद्यापीठांच्या यादीमध्ये, महाराष्ट्रातील एकाचा समावेश
● लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार, ते थेरेसा मे यांची जागा घेतील
● माहिती अधिकार कायद्यात केंद्र सरकार करू इच्छित असलेला बदल म्हणजे जनतेला दिलेला धोका : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
● रेल्वे पोलिसांना अखेर दिलासा, येत्या 1 ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांना आठ तास ड्युटी लागू होणार
● TVS Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी पहिली बाइक ठरली
● आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी, फलंदाजीत विराट नंबर वन तर अष्टपैलूंच्या यादीत जडेजा तिसऱ्या स्थानी
● कबीर सिंगच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचा भाव वधारला, पुढच्या सिनेमासाठी 40 कोटींची मागणी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😍 खुशखबर! नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
LetsUp | Update
⚡ आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गिफ्ट
👀 जाणून घ्या निर्णय : महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
📆 मंगळवारी (23 जुलै) मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
💰 पगारात होणार वाढ : येत्या 2 सप्टेंबरपासून या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
💁♂ 7 लाख कर्मचाऱ्यांना लाभ : 1 जानेवारी 2019 पासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीची रक्कम मिळेल. सुमारे 7 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
📍अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होती.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👨👩👧👦 पावसाळ्यात मुलांची अशी घ्या काळजी
LetsUp I Parenting
🌧 पावसाळा हा सर्वांनाच आवडणारा आणि आल्हाददायक ऋतू आहे. लहान मुलांसाठी हा ऋतू आनंददायी असला तरी पावसाळ्यात पालक म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया काही खास टिप्स.
💁♂ या गोष्टी करा
▪ पावसापासून संरक्षण करण्यासाठी मुलांना रेनकोट, छत्री, पावसाळी बूट इत्यादी साहित्य उपलब्ध करून द्या.
▪ पावसाळ्यात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा हे मुलांना शिकवा.
▪ पाऊस पडत असताना मुलं घराबाहेर असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबायला सांगा.
▪ पावसाळी वातावरणात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याने पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
▪ मुलांना पिण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी द्यावे.
▪ वातावरणाचा अंदाज घेऊन शक्य असल्यास मुलांसाठी छोटीशी पावसाळी सहल आयोजित करा.
🚫 या गोष्टी टाळा
▪ पाऊस चालू असताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
▪ जास्त पाऊस होत असल्यास मुलांना घेऊन बाहेर पडणे टाळा किंवा त्यांना एकटे बाहेर जाऊ देऊ नका.
▪ पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याने बाहेरचे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यापासून मुलांना प्रतिबंध करा.
▪ पावसाळ्यात मुले उपद्रवी कीटक किंवा प्राण्यांच्या संपर्कात येतील अश्या गोष्टी टाळा.
▪ पाऊस चालू असताना झाडाखाली किंवा धातूच्या खांबाखाली उभा राहणे टाळण्याविषयी मुलांना सूचना द्याव्यात.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🎾 नो बॉलसाठी आता आधुनिक नो बॉल तंत्रज्ञान
LetsUp | Sports
🏏 बीसीसीआयने आयसीसीला केलेल्या मागणीमुळे नो बॉल ओळखण्यासाठीचे नवीन तंत्रज्ञान आयसीसीने प्रायोगिक तत्वावर राबवायचे ठरवले आहे.
🤔 काय आहे नो बॉल तंत्रज्ञान: या तंत्रज्ञानामध्ये गोलंदाजाच्या पायावर कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिसरा पंच लक्ष ठेवणार आहे. गोलंदाजाचा पाय जर क्रिसच्या पुढे पडत असेल तर त्याविषयी हा तिसरा पंच ताबडतोब मैदानावरील पंचाला माहिती देईल.
👉🏻 आधीची पद्धत: आत्तापर्यंत गोलंदाज तसेच मैदानातील खेळावरही मैदानावरील पंचाचेच लक्ष असे. यातून बऱ्याच वेळा नो बॉल पडला तरी दरवेळी पंचाच्या ते लक्षात येईलच असे नव्हते. यामुळे पंच आणि खेळाडूंमध्ये वाद उद्भवत असतं. पंचाची मदत फक्त डीआरएसची मागणी झाल्यावरच मिळायची.
👍🏻 नो बॉल तंत्रज्ञानाचा फायदा: सामन्यात मैदानावरील पंचाची नजर चुकवून नो बॉल टाकण्याच्या प्रकाराला या तंत्रज्ञानामुळे आळा बसेल. तसेच सामना पारदर्शक व्हायला या नव्या तंत्रज्ञानामुळे मदत होणार आहे.
📆 अंमलबजावणी कधीपासून:
▪ हे तंत्रज्ञान प्रचंड खर्चिक असून एका सामन्यासाठी हजारो डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो.
▪ आयसीसीने सध्या प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरवले आहे.
▪ भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये लवकरच हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😱 एटीएम घोटाळय़ात महाराष्ट्र अव्वल
LetsUp | Update
⚡ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली माहिती
👀 जाणून घ्या घटनांची संख्या : 2018-19 मध्ये देशभरात एटीएम घोटाळ्याच्या 980 घटना घडल्या आहे. यामध्ये 21.4 कोटी रुपयांची लूट झाली आहे. 2017-18 मध्ये एटीएम घोटाळ्याच्या देशात 911 घटना घडल्या होत्या. त्यात 65.3 कोटी रुपये लुटले.
🔝 महाराष्ट्र अव्वल : आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 233 गुन्हे घडले असून यामध्ये 4.8 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 2017-18 लाही महाराष्ट्रात सर्वाधिक 242 गुन्हे घडले. त्यामध्ये 5.2 कोटी रुपये लुटले.
💁♂ असे घडले प्रकार : एटीएम फोडणे, चोरून नेणे, बनावट एटीएम कार्ड वापरणे, स्किमरवरून डाटाचोरी आदी प्रकारे हे गुन्हे घडत आहेत.
📍 या राज्यांमध्ये झाले घोटाळे :
▪ दिल्ली – 179 (2.9 कोटी)
▪ तामिळनाडू – 147 (3.6 कोटी)
▪ कर्नाटक – 65 (1.3 कोटी)
▪ हरियाणा – 58 (1.1 कोटी)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 मोठ्या व्यवहारांसाठी 'आधार' केवायसी बंधनकारक होणार
LetsUp | Update
⚡ व्यवहारातील नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला आळा घालावा या उद्देशाने सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
🤨 त्यानुसार बँक खात्यात दरवर्षी एका निश्चित रकमेपेक्षा अधिक पैसे जमा केल्यास किंवा काढायचे असल्यास त्यासाठी केवळ पॅन कार्ड चालणार नाही
📍 एका निश्चित रकमेपेक्षा अधिकच्या रोखीच्या व्यवहारांसाठी 'आधार' प्रमाणित करणे बंधनकारक करण्याची योजना आणण्याचा सरकारचा विचार सुरु
👉 तसेच मालमत्तेचे रजिस्ट्रेशन करताना आधार प्रमाणित करणे अनिवार्य केले जाणार
💫 आधार केवायसी अनिवार्य केल्यामुळे 10 ते 25 लाखांपर्यंची रक्कम बॅंकेत जमा केल्याचे किंवा काढल्याचे समजून येईल
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤨 जाणून घ्या देशातील प्रदूषित आणि औद्योगिक शहरांची यादी
LetsUp | Update
📣 देशातील सर्वात प्रदूषित आणि औद्योगिक शहरांची यादी राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) प्रदूषण नियमन मंडळाने केली जाहीर
💁♂ देशात सर्वाधिक प्रदूषित शहरे : तारापूर, दिल्ली, मथुरा, कानपूर, वडोदरा, मुरादाबाद, वाराणसी, बुलंद गुडगाँव, मनाली.
🔝 राज्यातील 'टॉप 5' : चंद्रपूर (75 सीपी) I तारापूर (72 सीपी) I डोंबिवली (62 सीपी) I नाशिक (56.50 सीपी) I नवी मुंबई (56 सीपी)
🤔 प्रदूषण निर्देशांक कसा ठरतो? : केंद्रीय व राज्य स्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय परीक्षण समिती यांच्या माध्यमातून औद्योगिक परिसरांमध्ये असलेल्या प्रदूषणकारी घटकांचे गुणधर्म, प्रदूषणामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांची संख्या तसेच उच्च धोका घटकांचा समावेश यांच्या धर्तीवर प्रदूषण निर्देशांक ठरवण्यात येतो.
🧐 निकष काय? :
▪ प्रदूषित : 70 सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांकांच्या आतील
▪ अत्यंत प्रदूषित : 60-70 सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांक
▪ घातक प्रदूषित : 70 च्या वर सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांक असल्यास
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🧐 पावसाळा आणि आरोग्याची काळजी
LetsUp | Health
वरूणराजाचे आगमन सर्वांनाच हवेहवेसे आणि सुखावणारे असते. मात्र पावसाळ्यात आरोग्यरक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. अन्यथा अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
1) पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढीला लागते.
2) विशेषतः पावसाळ्याच्या काळात हलके जेवण घ्यावे. हलके जेवण पचण्यास सोपे असते.
3) पावसाळ्याच्या दिवसात तिखट, कांदा भजी, बटाटावडा असे तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतोच. मात्र तेल तसेच मसाल्याच्या पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे.
4) बराच काळ उघड्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात. त्यामुळे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
5) पावसाळ्यात पाणी उकळवून पिण्याचा सल्ला दिला जातो. तो अगदी अवश्य पाळावा. पावसाळ्याच्या दिवसात जेवताना गरम पाणी पिणेही हितकाराक आहे.
6) पावसाळ्यात शरीराचे तापमान तुलनेने कमी असते. अशावेळी जीवजंतू शरीरावर चटकन हल्ला करतात. म्हणून स्वतःला जास्तीत-जास्त उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.
7) तुमचे बूट, मोजे आणि रेनकोट जास्तवेळ ओले अंगावर राहू देऊ नका. यामुळे इन्फेक्शन होण्याची दात शक्यता असते.
8) घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. छतावर, टायरमध्ये पाणी साचू देऊ नये. तसेच औषध फवारणी करून घ्यावी.
9) पावसाळ्यात थंड वातावरणामुळे शरीरातील वातदोष वाढलेला दिसतो. त्यामुळे गरम पाण्यानेच आंघोळ करावी.
10) पावसाळ्यात आंघोळीसाठी कडूनिंबाची पाणे घालून गरम केलेले पाणी वापरावे. यामुळे जीवजंतूंचा प्रादुर्भाव टाळता येतो.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
LetsUp News Updates
● चांद्रयान-2चे आज (दि. 22) जीएसएलव्ही-एमके3-एम1 या शक्तिशाली रॉकेटद्वारे प्रक्षेपण
● केंद्र सरकारने एअर इंडियामधील सर्व नियुक्त्या व पदाेन्नत्यांना स्थगितीचे दिले निर्देश
● रेल्वेतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या मोफत अॅपमुळे रेकॉर्ड केलेले मनोरंजन तसेच वृत्तविषयक कार्यक्रम मोफत पाहता येणार
● लवकरच विद्यार्थी एकाचवेळी अनेक किंवा एकाच विद्यापीठात विविध विषयांत पदवी प्राप्त करू शकणार
● देशात 6 महिन्यांत केवळ 39,840 परवडणाऱ्या घरांची निर्मिती, अॅनारॉक मालमत्ता सल्लागार कंपनीचा अहवाल
● खासगी विमा कंपन्यांनी 2 वर्षांत रेल्वे प्रवाशांकडून विमा हप्त्यापोटी 46 काेटी रुपये केले वसूल
● पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान अमेरिकेत दाखल, द्विपक्षीय संबंधांना ऊर्जितावस्था देण्याचे आव्हान
● सुझुकीने जिक्सर एसएफ मोटो जीपी नावाने लाँच केली नवी बाईक, किंमत फक्त 1.1 लाख रुपये
● प्रो कबड्डी : गुजरातच्या संघाची बंगळुरूच्या संघावर आपल्या पहिल्याच सामन्यात एकतर्फी मात
● अभिनेता हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ची 100 कोटींच्या दिशेने घोडदौड, 9 दिवसात कमावले 88.90 कोटी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🏏 वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर
LetsUp । Sports
💁♂ पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताच्या टी-20, एकदिवसीय व कसोटी क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली.
🧢 धोनी ऐवजी पंतला संधी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा दौरा होणार असून टी-20 व एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची जागा ऋषभ पंत घेणार आहे. कसोटीसाठी पंत सोबत रिद्धिमान साहा याला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आलं आहे.
📣 एम.एस.के.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाच सदस्यीय निवड समितीच्या बैठकीनंतर नव्या संघांची घोषणा करण्यात आली.
🤔 कोण इन कोण आऊट? :
▪ जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय व टी-20 संघातून वगळण्यात आलं आहे.
▪ बुमराहला केवळ कसोटी संघात स्थान देण्यात आले.
▪ शिखर धवनला कसोटी संघात संधी नाही. त्याच्याऐवजी चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारीला संधी मिळाली आहे.
▪ आर.अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.
👉 वन-डे संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
🎾 टी-20 संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुनाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
1
[1:19:31 PM] LetsUp - Digital Magazine:
🧐 महिलांसाठी सुरक्षित देशांच्या यादीत कोण कितव्या स्थानी?
LetsUp । Update
⚡ वर्ल्ड इंडेक्स ट्विटरने जाहीर केली आकडेवारी
💁♂ टॉप 3 सुरक्षित देश? : महिलांसाठी सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत आइसलँडने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नॉर्वे दुसऱ्या तर स्वीडन देश तिसऱ्या स्थानी आहेत.
📍 भारत 108 व्या स्थानी : महिलांसाठी सुरक्षित असलेल्या यादीत भारत 108 व्या स्थानी असताना भारताचे शेजारी देश बांगलादेश 48 व्या स्थानी, तर फिलिपीन्स हा देश 8 व्या स्थानी आहे. तर, या यादीत पाकिस्तान 148 व्या स्थानी आहे.
💁♀ या देशात सर्वाधिक महिला नजरकैदेत : हाँगकाँगमध्ये एकूण कैद्यांच्या 20.5 टक्के महिला कैदी असल्याचे स्पष्ट होत आहे. यानुसार सर्वाधिक महिला कैदी असलेल्या देशांच्या यादीत हाँगकाँग प्रथम स्थानी आहे. या यादीत भारत 12 व्या स्थानी आहे. भारतात हे प्रमाण 4.3 टक्के इतके आहे. पाकिस्तान मात्र 14 स्थानी असून तेथील महिला कैद्यांचे प्रमाण आहे 1.7 टक्के.
🔝 या देशात महिलांचे वर्चस्व : आफ्रिका खंडातील रवांडा या देशात संसदेत सर्वाधिक महिला प्रतिनिधी आहे. रवांडात संसदेतील महिला प्रतिनिधींचे प्रमाण आहे 61 टक्के. यात बोलिव्हिया दुसऱ्या, तर क्युबा तिसऱ्या स्थानी आहे.
👉 भारताचा क्रमांक 14 वा असून भारतात 11 टक्के महिला संसदेत आहेत. पाकिस्तानात 20 टक्के महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUp - Digital Magazine

🥇 हिमा दास ने पटकाविले पाचवे ‘सुवर्ण’पदक
LetsUp | Sports
💁♂ भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णवेध कायम असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.
🏃♀ मेटूजी ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.
👀 भारताच्याच वी. के. विस्मया, सरिता गायकवाड यांनी अनुक्रमे दुसरा (52.48 सेकंद) व तिसरा (53.28 सेकंद) क्रमांक मिळविला.
📍 गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
💫 हिमाने महिनाभरात विविध स्पर्धांमध्ये मिळून पाच सुवर्णपदक पटकाविले आहेत.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💥 ब्रेकिंग! दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन
LetsUp । Breaking
💁♂ माजी मुख्यमंत्री : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं शनिवार (दि.20) रोजी निधन झालं आहे.
📍 वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
🏥 शनिवार (दि.20) सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांचं निधन झालं. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती.
💫 कारकीर्द :
▪ शीला दीक्षित यांनी 15 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.
▪ केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
▪ माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातही त्या मंत्री होत्या.
▪ सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ महेंद्रसिंग धोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार
LetsUp । Sports
⚡ भारतीय संघ 3 ऑगस्टला वेस्ट इंडिज दौ-यावर जाणार आहे.
🤐 निवृत्तीच्या चर्चांना विराम : गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहेत. मात्र, आता दोन महिने आपण क्रिकेट खेळणार नसल्याचे धोनीने बीसीसीआयला कळवले आहे. धोनीच्या या भूमिकेमुळे त्याची निवृत्ती आणि वेस्टइंडिज दौऱ्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
👀 धोनी करणार हे काम? : महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेट खेळणार नसून पॅरासैन्य रेजिमेंटमध्ये दाखल होणार आहे.
🏅 धोनीला त्याच्या क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आले होते.
🧢 संघातील स्थान? : भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.
🗣 धोनीचा क्रिकेटमधून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे त्याचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ Letsup I General Knowledge
1) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेला भारतीय खेळाडूचे नाव काय?
उत्तर : सचिन तेंडुलकर (6 वा)
2) कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने पेटीएम मॉल या कंपनीमधील 5.5 टक्के हिस्सा खरेदी केला आहे?
उत्तर : ईबे (eBay)
3) जुलै 2019 मध्ये निधन झालेल्या जेष्ठ बंगाली अभिनेत्याचे नाव काय?
उत्तर : स्वरुप दत्ता
4) भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना पूर्व बंगालचा कोणता सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे?
उत्तर : ‘भारत गौरव’
5) छत्तीसगडच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : अनुसूइया उईके
6) सन 2019 मधील “इंडियाज 100 लिडिंग ब्रॅंड्स 2019” या यादीत कोणती कंपनी अग्रस्थानी आहे?
उत्तर : टाटा ग्रुप (19.55 अब्ज डॉलर)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤼♀ आजपासून रंगणार प्रो-कबड्डीचा थरार
LetsUp | Sports
⚡ प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची आजपासून (दि.20) दणक्यात सुरुवात होणार
👉 गच्चीबौली स्टेडियमवर रंगणाऱ्या सलामीच्या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि यू मुम्बा आमने-सामने
⚔ आजच्या लढती : तेलुगू टायटन्स वि. यू मुम्बा (सायं.8.30) I पाटणा पायरेट्स वि. बेंगळुरू बुल्स (रात्री 8.30)
----------------------
🧐 कबड्डीची आवड आहे? मग निवडा तुमची ड्रीम टीम आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11 ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------
📍 विशेष बाबी :
● सलामीचा सामना 20 जुलैला तर अंतिम 19 ऑक्टोबरला
● या सीझनमध्ये एकूण 12 संघ सहभागी होणार
● दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने लढती होणार
● 'प्ले-ऑफ'सह यंदाच्या स्पर्धेत एकूण 72 सामने होणार
● हैदराबाद, मुंबई, पाटणा, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, पुणे, जयपूर, पंचकुला, ग्रेटर नॉएडा अशा 12 शहरांमध्ये हे सामने रंगणार
● सर्व सामने 8 ऐवजी 7.30 (Pm) पासून
● प्रत्येक संघाला दुसऱ्या संघाशी दोनवेळा खेळण्याची संधी मिळणार
● प्रत्येक टप्पा शनिवारी सुरू होणार
● राहुल चौधरी आणि अजय ठाकूर प्रथमच एकाच संघातून खेळणार
● यंदा अनुप कुमार (पुणेरी पलटण) आणि राकेश कुमार (हरयाणा स्टीलर्स) प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. मध्ये 335 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :
● ड्यूटी ऑफिसर-टर्मिनल : 08
● ड्यूटी ऑफिसर : 15
● ऑफिसर (IR/HR) : 02
● ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/अॅडमिन) : 04
● ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (Pax) : 65
● ऑफिसर-अकाउंट्स : 01
● डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Pax Handling) : 02
● ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) : 02
● ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल : 04
● कस्टमर एजेंट : 56
● रॅम्प सर्व्हिस एजेंट : 15
● यूटिलिटी एजेंट-कम-रॅम्प ड्राइव्हर : 40
● हँडिमन / हँडिवूमन : 121
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💸 फी : General/ OBC: ₹500/- (SC/ ST/ ExSM : फी नाही)
🗞 जाहिरात व अर्ज पहा : http://bit.ly/2xXGUCg
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💁♂ जगातील टॉप 20 प्रभावशाली पुरूष आणि महिलांची यादी जाहीर
LetsUp | Update
📣 ब्रिटनची इंटरनेट मार्केट रिसर्च आणि डाटा एनालिटिक्स कंपनी 'युगोव्ह'ने या वर्षातील जगातील टॉप 20 प्रभावशाली पुरूष आणि महिलांची यादी केली जाहीर
🔎 41 देशातील 42 हजार पेक्षा अधिक लोकांच्या ऑनलाईन मुलाखतीद्वारे जमा करण्यात आलेल्या डाटाच्या आधारावर ही रँकिंग करण्यात आली
👍 यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रमवारी दोन अंकानी वाढली, मागील वर्षी ते 8व्या स्थानावर होते
👉 अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा यांचा क्रमांक घसरला तर सुष्मिता सेन, शाहरूख आणि सलमान खान यांनी प्रथमच यादीत स्थान मिळवले
📝 प्रभावशाली पुरूष I महिलांची यादी :
1) बिल गेट्स (9.6) I मिशेल ओबामा (8.8)
2) बराक ओबामा (9.2) I ओपेरा विनफ्रे (6.9)
3) जॅकी चॅन (5.7) I अँजोलिना जोली (6.8)
4) शी जिनपिंग (5.1) I क्विन एलिजाबेथ (5.9)
5) जॅक मा (4.9) I एम्मा वॉटसन (4.0)
6) नरेंद्र मोदी (4.8) I मलाला यूसफजई (3.9)
7) क्रिस्टिआनो रिनाल्डो (4.3) I पेंग लियुआन (3.9)
8) दलाई लामा (4.2) I हिलेरी क्लिंटन (3.6)
9) लियोनेल मेसी (3.8) I तू यूयू (3.5)
10) ब्लादिमीर पुतिन (3.7) I टेलर स्विफ्ट (3.3)
11) वॉरेन बफे (3.3) I मॅडोना (3)
11) अमिताभ बच्चन (2.9) I एंजेला मर्केल (2.8)
12) एलन मस्क (2.9) I दीपिका पादुकोण (2.8)
13) डोनाल्ड ट्रम्प (2.6) I प्रियंका चोप्रा (2.8)
14) पोप फ्रांसिस (2.4) I एलेन डिजेनर्स् (2.7)
15) शाहरुख खान (2.2) I ऐश्वर्या राय (2.7)
16) इमरान खान (1.9) I सुष्मिता सेन (2.2)
18) सलमान खान (1.7) I थेरेसा मे (2)
19) रेसेप तैयप एर्डोगन (1.5) I मिलेनिया ट्रम्प (1.6)
20) एंडी लॉ (1.5) I यांग मी (1.3)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup