es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
🏃‍♀ भारतीय धावपटू हिमा दासचा जागितक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम 👌 फिनलंडमध्ये सुरु असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन घडवला नवा इतिहास... 👀 महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत (51.46 सेकंद) सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिलीच भारतीय महिला अॅथलीट ठरली... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📣 खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार ⚡ यामुळे देशातील खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखता येणार... 🔖 देशातील बाल हक्कांबाबतची सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स यांनी नियमावली केली तयार... 👉 ही नियमावली ऑक्टोबर महिन्यांपर्यंत लागू करण्याची सरकारकडे केली शिफरस... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👶 देशात 15 ते 18 वयोगटातील तब्बल 2 कोटी 30 लाख मुले 'कामगार' 🎯 चाईल्ड राईटस अ‍ॅण्ड यू (क्राय) या प्रख्यात एनजीओने केला अहवाल प्रसिद्ध... 👀 1 कोटी 90 लाख मुलांनी शाळा आणि काम याचे नियोजन होत नसल्यामुळे शाळेला ठोकला रामराम... 📣 शाळाबाह्य मुलांची समस्या सोडविण्यासाठी सरकारने मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यासाठी बालहक्क कायद्यात दुरुस्ती करण्याची अहवालात सूचना... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📈 युवक बेरोजगारीचा दर LetsUp I Statistics ▫ दक्षिण आफ्रिका : 52.4% ▪ ग्रीस : 43.2% ▫ स्पेन : 33.8% ▪ इटली : 33.1% ▫ नायजेरिया : 33.1% ▪ इराण : 28.4% ▫ अल्जेरिया : 28.3% ▪ फ्रान्स : 20.4% ▫ तुर्की : 1 9% ▪ श्रीलंका : 17.4% ▫ बेल्जियम : 17% ▪ भारत : 12.9% ▫ कॅनडा : 11.7% ▪ ऑस्ट्रेलिया : 11.6% ▫ यूके : 11.5% ▪ यूएस : 8.7% ▫ जर्मनी : 6.1% ▪ जपान : 3.4% For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💫 LetsUp : संमिश्र ▪ पंचांग : गुरुवार दि. 12 जुलै 2018 मिती ज्येष्ठ कृ.14 I चंद्र नक्षत्र : आर्द्रा I चंद्रराशी : मिथुन I सूर्य नक्षत्र : उत्तर भाद्रपदा ▪ दिनविशेष : 1660 : बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन. 1965 : क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म. 1982 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली. 1998 : 16 व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा 3-0 असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला. 1999 : हिंदी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन. 2012 : मुष्टीयोद्धा आणि अभिनेते दारासिंग यांचे निधन. ▪ सोने भाव : 30,298 (प्रतितोळा), चांदी : 39,253 (प्रतिकिलो) ▪ मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 36,424.23, निफ्टी : 11,006.95 For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🌐 देशात पहिली इंटरनेट टेलीफोन सेवा सुरु 📱 अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकणार 📅 बीएसएनएलची ही सेवा 25 जुलैपासून सुरु For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ जीएसटी कायद्यात महत्त्वाचे बदल होणार 📣 या बदलांमध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचे (आरसीएम) नवे स्वरूप, करासाठी वहन पत न मिळणे, कॉम्पोझिशन स्कीमसाठीच्या सेवांची व्याख्या आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आदींचा समावेश... 👉 सध्याच्या कायद्यात 38 बदल प्रस्तावित आहेत... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💫 LetsUp : संमिश्र ▪ पंचांग : बुधवार दि. 11 जुलै 2018 मिती ज्येष्ठ कृ.13 I चंद्र नक्षत्र : मृग I चंद्रराशी : मिथुन I सूर्य नक्षत्र : पूर्व भाद्रपदा ▪ दिनविशेष : आज : जागतिक लोकसंख्या दिन 1801 : फ्रेंच खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला. 1889 : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म. 1908 : लोकमान्य टिळकांना मंडालेची 6 वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली. 1953 : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म. 2009 : गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. ▪ सोने भाव : 30,528 (प्रतितोळा), चांदी : 39,793 (प्रतिकिलो) ▪ मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 36,299.26, निफ्टी : 10,956.40 For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

✈ इंडिगोची मेगा ऑफर; 1,212 रुपयांमध्ये विमानप्रवासाची संधी ⚡ 12 व्या वर्षपूर्तीनिमित्त इंडिगो एअरलाईन्स तब्बल 12 लाख तिकीटांची स्वस्तात विक्री करणार... 👀 10 ते 13 जुलैदरम्यान ही ऑफर असून यादरम्यान बूक केलेल्या तिकीटाद्वारे 25 जुलै 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंत प्रवास करता येईल... 💫 याद्वारे 57 शहरांपैकी कोणत्याही शहरात प्रवास करता येईल ⚡ विशेष म्हणजे या ऑफरअंतर्गत डोमेस्टिक तसेच इंटरनॅशनल प्रवासाचे तिकीटही बूक करता येईल For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚖ सुप्रीम कोर्टातील महत्त्वपूर्ण सुनावणीचे कामकाज आता टीव्हीवर! 📺 प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी केंद्राने वेगळे चॅनल आणण्याची दाखवली तयारी... 💫 सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सर्व पक्षकारांना दिशानिर्देश तयार करण्यास सांगितले... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📣 दोन महिन्यांत शिक्षकांच्या 18 हजार रिक्त जागा भरणार ⚡ शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली मोठी घोषणा... 💫 या जागा ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार असून या भरतीसाठी आरक्षणाचे निकष लागू असतील... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚖ ताजमहालमध्ये नमाज पढता येणार नाही : SC ⚡ ताजमहाल परिसरातील मशिदीमध्ये परप्रांतीयांना नमाज पढण्यास सर्वोच्च न्यायालयाने नाकारली परवानगी... 💫 एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, ही वास्तू सात आश्चर्यापैकी एक आहे. त्यामुळे येथे नमाज पढता येणार नाही... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 अंगावर रोमांच आणणारा 'मुल्क'चा ट्रेलर नक्की पहा! ⚡ अनेक धगधगत्या प्रश्नांसह एका असहाय्य कुटुंबाची कथा यात पहायला मिळणार... 💫 ऋषी कपूर, तापसी पन्नू, आशुतोष राणा, प्रतीक बब्बर आणि रजत कपूरसाठी तगडी स्टारकास्ट सिनेमात दिसणार... 👀 ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/mdHPLq For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚖ निर्भया हत्याकांड: आरोपींना माफी नाहीच; फाशी कायम! 💫 सुप्रीम कोर्टाने दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरील पुनर्विचार लावली फेटाळून... ⚡ निर्भयाप्रकरणी फाशी सुनावण्यात आलेल्या चारपैकी तीन दोषींनी दाखल केली होती पुनर्विचार याचिका... 💫 या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नाही... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 खळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचे आकस्मित निधन ⚡ 'तारक मेहता का उलटा चष्मा' या हिंदी मालिकेतून सगळ्यांना हसवणारे लाडके डॉ. हंसराज हाथी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन... 💫 हंसराज गेल्या तीन दिवसांपासून कोमामध्ये होते. त्यांच्यावर मीरारोडच्या वोकार्ड रुग्णालयात उपचार सुरू होते... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏥 आता सरसकट सर्वच केमिस्ट्ना जेनेरिक औषधे विकणे बंधनकारक 💫 सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन यांनी काढले परिपत्रक... ⚡ परिपत्रकानुसार, ग्राहकांच्याही निदर्शनास येईल, अशा पद्धतीने सर्व केमिस्ट्सने दर्शनी भागात जेनेरिक औषधे ठेवण्याची वेगळी व्यवस्था करण्याचे सुचविले आहे... For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 रोहित शर्माचे वादळी शतक; भारताने टी-20 मालिका जिंकली ▫ टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी उडवला धुव्वा ▪ या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी केली मात ⚡ विशेष असं : ▫ राेहित शर्मा ठरला सामनावीर अाणि मालिकावीरचा मानकरी ▪ टी-20 च्या एका सामन्यात यष्टींमागे 5 झेल घेणारा महेंद्रसिंह धोनी ठरला पहिला यष्टीरक्षक ▫ राेहित शर्माने सर्वाधिक शतकांच्या (3 शतके) कार्लीन मुन्रोच्या विश्वविक्रमाशी साधली बराेबरी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌🏻 नीट आणि जेईईच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार ✒ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा ✍ ही परीक्षा सीबीएसईऐवजी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे घेण्यात येणार ⌛ १२ वीच्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, सगळ्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई तसेच नीटच्या पेपरचा स्तर एकसमान असावा यासाठी हा निर्णय # न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Mx27A2

💥 जपानमध्ये पावसाचा कहर; 2 लाख नागरिकांना स्थलांतराचे आदेश ⛈ जपानला पावसाने झोडपले असून रविवारपर्यंत इतिहासातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली 📣 या पार्श्वभूमीवर पश्चिम जपानमधील 2 लाख नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना 🤝 अनेक लोक जखमी तर काही बेपत्ता झाले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु # न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Gm8Dqg

💥 जपानमध्ये पावसाचा कहर; 2 लाख नागरिकांना स्थलांतराचे आदेश ⛈ जपानला पावसाने झोडपले असून रविवारपर्यंत इतिहासातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली 📣 या पार्श्वभूमीवर पश्चिम जपानमधील 2 लाख नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना 🤝 अनेक लोक जखमी तर काही बेपत्ता झाले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु 💥 जपानमध्ये पावसाचा कहर; 2 लाख नागरिकांना स्थलांतराचे आदेश ⛈ जपानला पावसाने झोडपले असून रविवारपर्यंत इतिहासातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली 📣 या पार्श्वभूमीवर पश्चिम जपानमधील 2 लाख नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना 🤝 अनेक लोक जखमी तर काही बेपत्ता झाले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु # न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Gm8Dqg