es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
💥 मोहम्मद शमीने केले धक्कादायक खुलासे! Letsup I Update पत्नी हसीन जहाँच्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शमीला हसीन जहाँच्या पहिल्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, हसीन जहाँचे आधीच लग्न झालेले असून पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुली आहेत याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. त्यानंतर लग्नानंतरही याची माहिती आपल्याला देण्यात आली नाही. नंतर ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न होऊ लागला. आपल्या दोन्ही मुलींची माहितीही लपवण्याचा प्रयत्न हसीन जहाँने केला. दोन्ही मुली आपल्या बहिणीच्या आहेत जिचा मृत्यू झाला आहे असे मला सांगण्यात आले. आपण दोन्ही मुलींची खूप मदत केल्याचे शमीने यावेळी सांगितले. आपण त्यांना फिरायला घेऊन जायचो, कपडे खरेदी करुन द्यायचो अशी माहिती शमीने दिली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

😊 फिनलंड ठरला सर्वात आनंदी देश! Letsup I Update संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 156 देशांच्या यादीत फिनलंड देश अग्रेसर ठरला आहे. फिनलंडनंतर नॉर्व, डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलंड, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया या देशांचा टॉप 10 मध्ये समावेश होतो. अमेरिका या यादीत अठराव्या, तर इंग्लंड एकोणीसाव्या स्थानावर आहे. आफ्रिकेतील बुरुंडी हा देश समाधानी देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. भारत या यादीमध्ये 133 व्या क्रमांकावर तर पाकिस्तान 75 व्या स्थानावर आहे. चीन (86), भूतान (97), नेपाळ (101), बांगलादेश (115), श्रीलंका (116) भारतापेक्षा सरस ठरले आहेत. आनंदी देशाची व्याख्या ठरवताना काही महत्वाचे निकष लावले जातात. प्रत्येक देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य, सामाजिक समर्थन, विश्वास, आरोग्य आणि उत्पन्न या गोष्टी पाहिल्या जातात. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी Letsup I Update कोरेगाव-भीमा हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली होती. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

📍 गुगल मॅप्सवर पत्ता शोधणे झाले सोपे! Letsup I Techno Update अनेकदा गल्लीबोळातील रस्ते शोधताना गुगल मॅपवर तारांबळ उडते. याचाच विचार करुन गुगलने भारतीयांसाठी गुगल मॅपच्या सुविधेत बदल करत ‘प्लस कोड’ नावाचे एक नवीन फिचर लाँच केले आहे. पहिल्या टप्प्यात अँड्रॉईड युजर्सला याचा वापर करता येईल. तर लवकरच आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात येणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. खरं तर गुगल मॅप्सवर कोणतेही ठिकाण हे अगदी अचूकपणे शोधता येते. मात्र प्लस कोडसमुळे याची कार्यक्षमता अजून वाढणार आहे. यात संबंधीत ठिकाणाच्या पत्त्याला लोकल प्लस कोडची जोड देण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही भागाचा प्लस कोड जाणून घेण्याची पध्दत देखील सोपी आहे. यासाठी कुण्याही युजरला त्याला हव्या असणाऱ्या ठिकाणाला गुगल मॅप्सवर शोधावे लागेल. या ठिकाणी पीन ठेवल्यानंतर तो त्या ठिकाणाचा प्लस कोड पाहू शकतो. हा कोड अपरिवर्तनीय आहे. म्हणजे कोणत्याही ठिकाणाचा प्लस कोड हा न बदलणारा आहे. याच्या मदतीने अगदी गुंतागुंतीचा पत्ता असणारे ठिकाणसुध्दा अतिशय सुलभपणे शोधता येणार आहे. हा कोड मोफत असून तो ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येईल. कोणत्याही ठिकाणाचा प्लस कोड हा सोशल मीडियात शेअर करता येईल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - केंद्र सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर व्हीव्हीपॅट यंत्रणा असलेली मतदानयंत्रे वापरण्याची तयारी केली सुरु ● नवी दिल्ली - या वर्षीचे अर्थसंकल्पीय विधेयक लोकसभेत चर्चेविनाच झाले मंजूर ● नवी दिल्ली - घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईच्या दरात सातत्याने घट, खाद्यपदार्थ झाले स्वस्त ● बर्लिन - जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची चान्सलरपदी सलग चौथ्यांदा केली निवड ● लखनौ - यूपीत भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, काँग्रेसचे डिपॉझिट जप्त ● मुंबई - घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या विरोधात लवकरच राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार ● मुंबई - ‘शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला दावा ● मुंबई - शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीयोजना लागू, 59 हजार कर्मचाऱ्यांना 1258.33 कोटी रुपयांचा निधी वितरीत, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती ● मुंबई - हीरो मोटोकॉर्पने पॅशन प्रो (53,189 रुपये) आणि पॅशन एक्स प्रोची (54,189) नवी व्हर्जन केली लॉन्च ● कोलंबो - टीम इंडियाने बांगलादेशचा 17 धावांनी पराभव करून तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये मारली धडक ● मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत'चे पहिले पोस्टर रिलीज, हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन ब्रेकिंग ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे आज सकाळी निधन झाले. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हॉकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर वर्णन केले होते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचा सर्वसामान्यांना दिलासा, आधार लिंक करण्याची अंतिम मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली 🔅 नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व बँकांना LoU आणि LoCs जारी करण्यास बंदी घातली 🔅 नवी दिल्ली - ट्विटरने फेक फॉलोअर असलेल्यांची यादी प्रसिद्ध केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगात सर्वाधिक फेक फॉलोअर 🔅 नवी दिल्ली - गाय आणि म्‍हशींसाठीही 12 अंकी नंबर असलेले आधार कार्ड तयार करण्याच्या हालचाली केंद्रात सुरु 🔅 नवी दिल्ली - WhatsApp चाइल्ड पॉर्नोग्राफी ग्रुपमध्ये सर्वाधिक भारतीय, अमेरिका-चीनपर्यंत कनेक्शन, सीबीआयची माहिती 🔅 रायपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला, आठ जवान शहीद, चार गंभीर 🔅 मुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे मागे घेणार, 9 कोटी 45 लाखांची भरपाई राज्य सरकार देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती 🔅 मुंबई - विश्वास पाटील यांची एसआरए घोटाळा प्रकरणी सीआयडीतर्फे चौकशी, 137 फाईल्‍सपैकी 33 फाईल्‍समध्ये भ्रष्टाचार 🔅 मुंबई - दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा, तीन वर्ष शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणणार - गिरीश बापट 🔅 नवी दिल्ली - सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या सरदार सिंगलाच डच्चू देण्यात आला For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🚆 रेल्वेचे तिकीट दुसऱ्याला देता येणार Letsup I Update जर काही कारणास्तव प्रवास करणे रद्द झाले तर आता रेल्वे तिकीट फुकट जाणार नाही. कारण ते तिकीट आपल्या नातेवाईकाला देणे शक्य होणार आहे. रेल्वेने यासंबंधी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यानुसार, रेल्वेच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांना हा अधिकार देण्यात आला आहे. पर्यवेक्षक एखाद्या विशिष्ट प्रवाशाचा प्रवास रद्द झाला तर ते तिकीट त्याच्या नातेवाईकाच्या नावे बदलू शकतात. मात्र, हा तिकीटबदल फक्त आई-वडील, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी किंवा पती-पत्नी असाच होऊ शकणार आहे. तिकीटावरील नाव बदलण्यासाठी प्रवास सुरू होण्याच्या 48 तास आधी तिकीट आरक्षण केंद्रात जाऊन नावात बदल करता येऊ शकेल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाच्या वेळेच्या 24 तास आधी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र, तिकीट फक्त एकदाच बदलून दिले जाऊ शकते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

📣 रॉयल एन्फिल्डची नवी ऑफर रॉयल एनफिल्ड कंपनीने जुन्या दुचाकी विक्री व्यवसायात पाऊल ठेवले आहे. कंपनीने जुन्या बुलेट विकण्यासाठी सुरु केलेल्या स्टोअरला ‘विंटेज स्टोअर’ असे नाव दिले आहे. कंपनीने आपले पहिले स्टोअर चेन्नईत सुरु केले असून लवकरच देशभरात त्याचा विस्तार केला जाणार आहे. या विंटेज स्टोअरमध्ये केवळ रॉयल एन्फिल्डचीच विक्री होईल. शिवाय जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इतकंच नाही तर गाडीचा विमा आणि विक्रीनंतर ज्या सुविधा नव्या गाड्यांना दिल्या जातात, त्या सुविधा दिल्या जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांची क्वालिटी टेस्ट अर्थात गुणवत्ता चाचणी होईल. प्रत्येक बाईक 92 पातळ्यांवर तपासली जाईल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

📌 सुरेश प्रभूंकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार टीडीपी मंत्री अशोक गजपती राजू यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूंकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तेलुगू देसम पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनीही राजीनामे दिले होते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ व्हॉट्सअॅपवर व्हॉईस रेकॉर्ड करणे होणार सोपे Letsup I Update लवकरच व्हॉट्सअॅप लॉक्ड रिकॉर्डिंग (Locked Recording) हे फिचर घेऊन येणार आहे. याच्या मदतीने युजर्स व्हॉईस रेकॉर्ड करु शकतात. नव्या अपडेटमध्ये युजरला व्हॉईस मेसेज पाठवताना पूर्ण रेकॉर्डींग होईपर्यंत बटन होल्ड करण्याची गरज लागणार नाही. फक्त एकदाच बटण प्रेस करुन रेकॉर्डींग सुरु करा आणि संपल्यावर रेकॉर्ड आयकॉनवर क्लिक करा. सध्या अ‍ॅन्ड्राईडच्या बीटा व्हर्जनवर 2.18.70 आणि 2.18.71 वर या फिचरचे टेस्टिंग सुरु आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 सातवा वेतन आयोग दिवाळीपासून लागू होणार? LetsUp I Updates अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात वाढीव वेतनाकरिता 10 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

💐 लोकनेते डॉ. पतंगराव कदम काळाच्या पडद्याआड LetsUp I Updates काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज संध्याकाळी 4 वाजता सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. पतंगराव कदम यांचा जीवनप्रवास 👉 पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. 👉 गावात शाळा नसल्या कारणाने त्यांनी रोज 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घेतले. 👉 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. 👉 1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. 👉 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. 👉 सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 👉 पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - 2019 मध्ये मोदींना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, सोनिया गांधींचे भाजपला खुले आव्हान 🔅 नवी दिल्ली - अमेरिकेकडून 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास 32.55 कोटींचे बक्षीस जाहीर 👌 नोव्हा कॉर्डलेस ट्रीमरने 'शेव्ह' ट्रिम करा आणि दिसा इम्प्रेसिव्ह, फ्लिपकार्ट वर खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉 http://fkrt.it/Ml!iJ2NNNN 🔅 राजस्थान - बारा वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा; राजस्थानमध्ये विधेयक मंजूर 🔅 बंगळुरु - कर्नाटक सरकार मुलींना प्राथमिक ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण मोफत देणार, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी 🔅 इस्लामाबाद - पाकिस्तानचा माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश, देशद्रोहाचा खटला 🔅 मुंबई - माझ्या भाषणाच्या वेळी वीज घालवणाऱ्यांना तुडवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिथावणीखोर वक्तव्य 🔅 भाऊराव कऱ्हाडे यांचा बहुप्रतीक्षित 'बबन' चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा - https://youtu.be/XXbl0S0k8hA 🔅 इपोह - सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचा आयर्लंडकडून पराभव; अंतिम फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💰 महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 2) Letsup I Budget Special 👉 शेतकऱ्यांसाठी काय? ▫ जलसंपदा विभागाकरता 8233 कोटी - अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पापैकी 50 प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ▫ कोकणातील पाटबंधारे प्रकल्पासाठी 60 कोटी तरतूद ▫ जलयुक्त शिवार - 1500 कोटी ▫ 82,000 सिंचन विहिरी पूर्ण - 132 कोटी विहीरींसाठी ▫ मागेल त्याला शेततळे या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण (160 कोटीची तरतूद) ▫ सूक्ष्म सिंचन - 432 कोटी ▫ कृषी विभागातर्फे वनशेतीस प्राधान्य - 15 कोटीची तरतूद ▫ सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटीची तरतूद ▫ फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड योजना - 100 कोटी ▫ मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेकरीता 50 कोटी ▫ कर्जमाफी - 45.33 लाख कर्जखातेदारांना लाभ देण्याची बँकांना मान्यता (35.68 लाख खातेदारांना रकमेचा लाभ) ▫ 93,322 कृषी पंपाना विद्युत जोडणीसाठी 750 कोटींची तरतूद ▫ गोदामाची योजना, तसेच मालवाहतूक जलद वेगाने व्हावी यासाठी एसटीची नवी मालवाहतूक सेवा सुरु करण्यात येईल, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल ▫ राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार (ई नाम) ▫ 142 कोटी निधी - एसटी बसस्थानकांच्या डागडुजीसाठी उपलब्ध 👉 उद्योग/व्यवसायासाठी काय? ▫ वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक नवा कार्यक्रम सुरु ▫ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सूत गिरण्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल ▫ फिन्टेक धोरणांतर्गत सामायिक सोयीसुविधांसाठी भांडवली सहाय्य देण्यात येईल ▫ विजेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांना सूट आणि निर्मिती करणाऱ्याला विशेष सहाय्य देण्यात येईल ▫ सूक्ष्म व लघु उद्योगांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष योजना ▫ राज्यातील काथ्या उदयोग वाढीसाठी - 10 कोटीचा निधी ▫ हस्तकला उद्योगासाठी - 4 कोटी 28 लाख ▫ वर्धा इथे मातीकलेचे मंडळ - 10 कोटी ▫ सामूहिक उद्योग प्रोत्साहनासाठी 2620 कोटी 👉 पाणी, कचरा व्यवस्थापन व स्मार्ट सिटीसाठी तरतूद ▫ ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन - राज्यातील 15,000 लोकसंखा असलेल्या गावासाठी नवीन योजना - 335 कोटी ▫ नागरी पाणीपुरवठा, मलनिसारण यासाठी 7,750 कोटी केंद्राची मदत आहे, राज्याकडून 2,310 कोटींची तरतूद ▫ मोर्णा नदी अकोल्यातील नदी स्वच्छता मोहीत नागरिकांनी हाती घेतली, त्यांना मदत करण्यासाठी - 27 कोटी ▫ सागरी किनारा संवर्धनासाठी 9 कोटी 40 लाख ▫ घनकचरा व्यस्थापनासाठी - 1,526 कोटी ▫ ओलव्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मितीसाठी अनुदान देण्याचा मानस - 5 कोटी ▫ स्मार्ट सिटी अभियानासाठी 1,316 कोटींची प्रस्तावित ▫ नागरी पायाभूत सुविधांसाठी - 900 कोटी तरतूद ▫ स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. 1 हजार 526 कोटी निधीची तरतूद 👉 रस्ते व ऊर्जा प्रकल्पासाठी तरतूद ▫ समृद्धी महामार्ग - ग्रिनफिल्ड रेखेला मान्यता. 701 किमी लांबी - 99 टक्के संयुक्त मोजणी पूर्ण, भूसंपादनाची 64 टक्के प्रक्रिया पूर्ण, डिझाईन प्रगतीपथावर, एप्रिलपासून काम अपेक्षित ▫ रस्ते विकासासाठी - 10,828 कोटींची तरतूद ▫ नाबार्डअंतर्गत रस्ते पूल बांधणीसाठी - 300 कोटी ▫ मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची क्षमता वाढण्याचे काम हाती ▫ दुपदरीकरणासाठी - 26,000 कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर ▫ मुख्यमंत्री ग्रामसडक योजना - 2,255 कोटी 40 लाख निधी ▫ भाऊचा धक्का ते अलिबाग दरम्यान जलवाहतूक एप्रिलपासून सुरु होणार ▫ मिहान प्रकल्पासाठी - 4,066 कोटींचे सामंजस्य करार ▫ महावितरण कंपनीकरता शासनाच्या भागभांडवलापोटी रक्कम दिली ▫ महानिर्मिती कंपनीचे नवीन औष्णिक प्रकल्प प्रस्तावित आहेत - त्यासाठी 404 कोटींची तरतूद ▫ घारापुरी लेण्याला प्रथमच वीज पोहोचवली - 22 कोटींचा खर्च ▫ बस स्थानकांची पुनर्बांधणी करण्याकरिता 40 कोटींची तरतूद ▫ सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दिवसा शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा - त्यासाठी प्रकल्प सुरु होतोय - ग्रीन सेस फंडातून 375 कोटींचा निधी ▫ डी आणि डी + उद्योगांसाठी वीजबिलात सवलतीसाठी - 926 कोटी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💰 महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 1) Letsup I Budget Special महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज 2018-19 चा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यंदाचा त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. यात शेतकरी वर्गाची वाढती नाराजी लक्षात घेता, शेती, सिंचन आणि शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र सातव्या वेतन आयोग आत्ताच लागू होणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पावर एक नजर टाकुयात... ▫ राज्यात 5 लाख 32 हजार नवे करदाते ▫ जीएसटी अंतर्गत 45 हजार कोटी रक्कम प्राप्त झाली ▫ मुंबई महापालिकेसह इतर पालिकांना 11 हजार कोटी रक्कम दिली गेली For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👉 स्मारकासाठी तरतूद खालीलप्रमाणे : ▫ अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद ▫ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद ▫ लहुजी वस्ताद यांचे पुणे येथे स्मारक उभे करणार ▫ अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ- सामाजिक सभागृह बांधली जातील - 30 कोटींची तरतूद 👉 शिक्षणासाठी तरतूद खालीलप्रमाणे : ▫ स्कील इंडिया - कुशल महाराष्ट्र योजना : राज्यातील 15 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम राबवला जातोय ▫ स्टार्टअप उदोयगांना प्रोत्साहन देण्यासाठी नविन कार्यक्रम ▫ परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी - परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र सुरु होतंय ▫ महाराष्ट्रात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना होणार ▫ जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - 50 कोटी ▫ मानव विकास मिशनसाठी 350 कोटी ▫ आकांक्षित जिल्ह्यांना 121 कोटी ▫ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा उभारणार, त्यासाठी नवीन मंडळ स्थापन होणार - 36 लाख रुपयांची तरतूद ▫ विद्यार्थ्यांचे विद्यावेतन 4000 रुपयांपर्यंत वाढवले ▫ राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना - मर्यादा 6 लाखावरुन 8 लाखापर्यंत वाढवले (605 कोटी रू. निधी) ▫ अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद ▫ महापुरुषांचे साहित्य सलग उपलब्ध व्हावे यासाठी वेबसाईटची निर्मिती - 4 कोटींची तरतूद ▫ महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन केंद्र ▫ अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या व वसतीगृहाच्या बांधकामाकरिता रू. 13 कोटी निधी ▫ हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी 3 कोटी 50 लक्ष रू. निधीची तरतूद 👉 विविध योजनांसाठी तरतूद खालीलप्रमाणे : ▫ शामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजना - 100 कोटी ▫ रमाई घरकूल योजना - 700 कोटी ▫ सरकारी वसतीगृहासाठी - 618 कोटी ▫ अल्पसंख्याक योजनांसाठी - 350 कोटींची तरतूद ▫ घर/गृह योजनांसाठी - 1075 कोटी ▫ ग्रामीण भागांच्या संगणकीकरणासाठी योजना ▫ रिक्षाचालकांसाठी एक महामंडळ स्थापन होणार - 5 कोटी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ बिल्पब देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री Letsup I Update त्रिपुरामध्ये आज तब्बल 25 वर्षानंतर भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. भाजपचे बिल्पब देव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून जिष्णू देव शर्मा यांच्यासह भाजपच्या अन्य नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल तथागत रॉय यांनी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 इच्छामरणाला सशर्त परवानगी! ब्रेकिंग सुप्रीम कोर्टाने इच्छा मरणाला सशर्त परवानगी दिली आहे. सन्मानाने जगणे जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी कोर्टाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

🛰 चीनचे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळणार Aerospace Corporationने दिलेल्या माहितीनुसार चीनचे पहिले अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) Tiangong-1 पृथ्वीवर कोसळणार आहे. 24 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान ते पृथ्वीच्या नेमक्या कोणत्या भागात कोसळणार याबद्दल अंदाज आता वर्तवता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. या अंतराळ स्थानकात धोकादायक अशी रसायने देखील आहे. ही रसायने पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी धोकादायक आहेत. एका अंदाजानुसार हे स्थानक चीन, मध्यपूर्व आशिया, इटली, स्पेनचा उत्तरेकडील भाग, अमेरिकेच्या उत्तरेकडील राज्ये, न्यूझीलंड, टास्मानिया किंवा दक्षिण आफ्रिका येथे कोसळू शकते. आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप अणि मिळवा संधी iPhone जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/SMVh61 ⚡

🎯 Letsup I General Knowledge 1) कोणता देश 2017 साली अमेरिकेच्या सरकारी रोख्यांचा 12 वा सर्वात मोठा परकीय धारक आहे? उत्तर : भारत 2) कोणता देश 2019 साली लोंगमार्च 5B अग्निबाण अंतराळात पाठविणार आहे? उत्तर : चीन 3) कोणत्या ठिकाणच्या कॉफीला लवकरच भौगिलिक संकेतांक (GI) टॅग मिळणार आहे? उत्तर : अराकू व्हॅली 4) कोणता युद्धसराव अलीकडेच भारतीय नौदलाकडून आयोजित करण्यात आला? उत्तर : एनकोअर आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप अणि मिळवा संधी iPhone जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/25Fp22 ⚡