es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
💵 *येरवड्यात सात कोटीं रुपयांच्या बनावट नोटा जप्त* *LetsUp | Update* ⚡ पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येरवडा परिसरात संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदल्यात बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 💁‍♂️ मिळलेल्या माहितीनुसार सध्या याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वजण मुंबई येथील रहिवासी आहेत. 💰 दरम्यान आरोपीकडून 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. 👮 पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *मुंबईत दर दिवस 'एवढे' मृत्युमुखी* *LetsUp | Corona Live* 💫 मुंबईत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक असून कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचे प्रमाणही अधिक वाढत चालले आहे. ✨ मुंबईत जुनमधील पहिल्या ९ दिवसांत गत दिवशी सरासरी ५३ मृत्यू झाल्याचे समोर आले असून या तुलनेत मे महिन्यांतील पहिल्या ९ दिवसांत हे प्रमाण ४१ इतकं होत. ⚡ जूनमध्ये मुंबईत ४८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर १ जून रोजी ४० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच त्यानंतरच्या ३ दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला आहे 📍 या आठवड्यात मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृत्यूने उच्चांक गाठला असून सोमवारी तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. 📌 दरम्यान, मुंबईमधील गत दिवसाची रूग्णवाढ आणि मृत्यूदर खाली येऊ लागला असून सोमवारी रूग्णदर ३.५. टक्के होता, तर मृत्यूदर तीन टक्क्यांपर्यंत आला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*धक्कादायक; गेवराईत मयत डॉक्टरवर गुन्हा दाखल* *LetsUp | Beed* गेवराई : गेवराईत मेडिकलमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मयत झालेल्या डाक्टरनेच हा स्फोट घडवून आणल्याचा जवाब जखमी कंम्पाऊंडरने दिल्याने पोलीसांनी मयत डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय 35 रा. बाग पिंपळगाव ता.गेवराई ) व कम्पाऊंडर सुनील माळी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, अशी माहिती गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली. रात्री साडेदहापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मयत डॉक्टरचा व मेडिकल चालकांचा देवाण-घेवाणीवरुन जुना वाद होता. त्या रागातून मयत डॉक्टरने कम्पाऊंडरला रात्री एकच्या सुमारास बोलावून घेतले. या मयत डॉक्टरने आधीच मेडिकलची एक बनावट चावी बनवून घेतली होती. त्या चावीने शटर उघडून डॉक्टर आत गेले. आणि काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर 15 फुट लांब फेकले गेले. तर बाहेर उभा कंम्पाऊंडर जखमी झाला आहे. घटनेची माहिती रात्रीच अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जागेचा पंचनामा केला असता त्यांना अनेक गोष्टी संशयास्पद आढळून आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.राजाराम तडवी करत आहेत. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

✍🏻 *नोक-यांचा आलेख* *LetsUp l Editorial* गेल्या दोन वर्षांपासून देशात बेरोजगारी वाढते आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने गेल्या वर्षी जाहीर केलेला आकडा हा गेल्या 45 वर्षांतील उच्चांकी होता. त्यातच कोरोनामुळे जाहीर कराव्या लागलेल्या टाळेबंदीने तर बेरोजगारीत अधिकच भर पडली. काही संस्था हा आकडा 35 टक्क्यांवर गेल्याचे सांगत असल्या, तरी सरकारनेच स्वतः बेरोजगारीचा आकडा 27 टक्के असल्याचे मान्य केले आहे. स्थलांतरित मजुरांचे लोंढेच्या लोंढे जेव्हा त्यांच्या त्यांच्या राज्यात जायला लागले, तेव्हा संबंधित राज्यांनी आम्ही आमच्या लोकांना रोजगार देऊ, अशा फुशारक्या मारल्या. त्यासाठी काय काय केले, किती तरतुदी केल्या, उद्योग कसे सुरू होतील असे सांगितले. मनरेगाच्या तरतुदीत वाढ करून सेल्फवर किती कामे आहेत, याची आकडेवारी दिली; परंतु आता एक महिन्यानंतर त्यातील फोलपणा लक्षात यायला लागला आहे. स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ राज्यात परत आल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत भारतातील बेरोजगारीवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. या कालावधीत, परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने आपल्या मायदेशी परतले आहेत. अशा परिस्थितीत देशातील काही राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, तर काही राज्यात ते कमी झाले आहे. मोठ्या संख्येने उद्योग असलेल्या राज्यांतून स्थलांतरित त्यांच्या मूळ राज्यात गेल्याने उद्योग, सेवा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यात ही समस्या वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) डेटाच्या माध्यमातून देशातील कोणती राज्ये बेरोजगारीची परिस्थिती आहे, याचे नेमके चित्र पुढे आणले आहे. झारखंडमधील रोजगाराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. इथल्या दहापैकी सहा लोक बेरोजगार आहेत. त्याचबरोबर बिहार आणि दिल्लीची परिस्थितीही अत्यंत वाईट आहे. येथे बेरोजगारीचा दर 40 टक्क्यांहून अधिक आहे. सर्व प्रमुख राज्यांमध्ये बेरोजगारी चिंताजनकरीत्या वाढली आहे. हा दर गेल्या वर्षाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. काही बड्या राज्यांमध्ये मे दरम्यान बेरोजगारीचे प्रमाण 20 ते 30 टक्के राहिले आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी 2020 आणि मे 2019 च्या तुलनेत जास्त आहे. टाळेबंदीच्या काळानंतर देशातील मोठ्या औद्योगिक राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात राज्यांना हा अनुभव येत आहे. या राज्यांतून स्थलांतरित मोठ्या संख्येने त्यांच्या राज्यातून बाहेर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलपासून तामीळनाडूमध्ये बेरोजगारीत लक्षणीय घट झाली आहे. त्यानंतर ओडिशामध्ये 14.2 टक्के, कर्नाटकात 9.4 टक्के आणि हरयाणामध्ये बेरोजागारीत साडेसात टक्के घट झाली आहे. काही राज्यांमध्ये बेरोजगारीचे दर स्थिर राहिले आहेत किंवा वाढले आहेत. एप्रिल ते मे 2020 दरम्यान आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि राजस्थान यांसारख्या काही राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण स्थिर राहिले किंवा वाढले आहेत. बंगालमध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत तो तीनपट वाढला. ओडिशामध्ये एप्रिलपासून बेरोजगारीत 1.2 टक्क्यांनी घट झाली आहे. आता टाळेबंदी हळूहळू शिथिल होत असल्याने कामगारांना रोजगार मिळायला लागला आहे. असे असले, तरी मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, पुणे आदी ठिकाणी अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने परराज्यात गेलेले कामगार अजून परतायला तयार नाहीत. काही ठिकाणी अकुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. दुकानांत कामगार मिळत नाहीत. एप्रिलमधील 35.4 टक्क्यांच्या तुलनेत मेच्या अखेरीस बेरोजगारी 38.7 टक्क्यांवर पोहोचली. एप्रिलमध्ये सुमारे 12 कोटी लोकांच्या नोक-या गेल्या. असे असले, तरी एवढे लोक सध्या नोकरीच्या शोधात नाही. हे एकदा लक्षात घेतले, तर काही लोक शेती किंवा अन्य व्यवसायाकडे वळले असण्याची शक्यता आहे. केवळ पाच कोटी तीस लाख बेरोजगार नोक-यांच्या शोधत आहेत. याचा अर्थ उर्वरित लोकांना नोकरी करायची नाही, असाही होतो किंवा त्यांना अन्यत्र रोजगार मिळाला असावा, असे मानण्यास जागा आहे. मोठ्या प्रमाणात नोक-या गमावल्यामुळे कामगारांत नैराश्य आले आहे. अशा लोकांची संख्या 7.7 कोटी आहे, जी एप्रिलमध्ये 8.9 कोटी होती, तर गेल्या वर्षी ती 1.2 कोटी होती. 👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *देशाच्या चिंतेत भर; 24 तासांत 'एवढे' मृत्यू* *LetsUp l Update* ⚡ दिवसेंदिवस देशातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशामध्ये 9 हजार 987 कोरोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल 332 जणांचा मृत्यू झाला आहे. 💁🏻‍♂️ *रुग्णांची संख्या* : देश अनलॉक होतानाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख 66 हजार 598 झाली आहे. त्यापैकी 1 लाख 29 हजार 215 रुग्ण बरे झाले आहेत. 📌 *मृतांची संख्या* : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.49 टक्के आहे. सध्या एक लाख 29 हजार 917 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 331 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 7 हजार 466 वर पोहोचली आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*धक्कादायक; घाटी रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला* *LetsUp l Aurangabad* औरंगाबाद : शहरातील गणेशनगर भागातील 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घाटी रुग्णालयातून पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. तो रुग्ण घाटी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होता. आज सकाळी साडे सहा वाजता सुरक्षा रक्षकांना चकमा देऊन बाधीत रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ उडाली. त्या रुग्णाविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *जिल्ह्याचा आपत्ती निवारण कृती आराखडा तयार* *LetsUp l Nashik* गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाला मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागलं होतं मात्र यंदा मागील वर्षासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. त्यासाठीचा निवारण कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. गंगापूर धरणात मागील वर्षी पेक्षा अधिक पटीने पाणीसाठा तसाच आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या परीक्षेत्रामध्ये जास्त पाऊस झाल्यास नाशिक शहर तसेच सायखेडा चांदोरी या गावांना पुराचा फटका बसू शकतो. दरम्यान नाशिक शहरापेक्षा चांदोरी सायखेडा या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका अधिक तीव्रतेने बसतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती निवारण खरं कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच या संबंधीच्या सर्व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहे. एकूणच पावसाळा सुरू होताच कुठलीही ही आपत्ती या पावसाच्या पाण्यामुळे होऊ नये यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*पतीकडून पत्नीला स्टूलने मारहाण* *LetsUp | Pune* आज काल भांडणाला कोणतेही कारण लागत नाही. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. मोबाईल रिचार्ज करण्यावरुन झालेल्या वादात पतीने पत्नीला लाकडी स्टुलने मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठे मध्ये घडली आहे. याप्रकरणी पतीविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज फयाज खान(47) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पती-पत्नीमध्ये मोबाईल रिचार्ज करण्यावरुन वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात रियाजने लाकडी स्टुल उचलून पत्नीला मारला. पत्नीने स्टुल वाचविण्याकरीता दोन्ही हात आडवे धरले होते. यावेळी रियाजने दोन ते तीन वेळा तीच्या हातावर स्टुलने मारहाण केली. यामध्ये तीच्या दोन्ही हाताला इजा झाली असून एक हात फ्रॅक्‍चर झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करत आहेत. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *जिल्ह्याचा आपत्ती निवारण कृती आराखडा तयार* *LetsUp l Nashik* गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाला मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागलं होतं मात्र यंदा मागील वर्षासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. त्यासाठीचा निवारण कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. गंगापूर धरणात मागील वर्षी पेक्षा अधिक पटीने पाणीसाठा तसाच आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या परीक्षेत्रामध्ये जास्त पाऊस झाल्यास नाशिक शहर तसेच सायखेडा चांदोरी या गावांना पुराचा फटका बसू शकतो. दरम्यान नाशिक शहरापेक्षा चांदोरी सायखेडा या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका अधिक तीव्रतेने बसतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती निवारण खरं कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच या संबंधीच्या सर्व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहे. एकूणच पावसाळा सुरू होताच कुठलीही ही आपत्ती या पावसाच्या पाण्यामुळे होऊ नये यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🐍 'या' सापाची किंमत ऐकून व्हाल थक्क! LetsUp l Trending ⚡ आपल्याकडे सापाची कुणी खरेदी करण्याचा विचार करू शकत नाही. मात्र औषधी उपयोग, अंधश्रद्धा या व अश्या अनेक कारणांनी साप खरेदी करतात, किंवा सर्पप्रेमी साप खरेदी करतात. 💁🏻‍♂️ अजगर : अंधश्रद्धेपोटी नाही तरी फक्त आकर्षक रंगामुळे बक्कळ पैसे मोजून खरेदी केला जाणारा एक साप आहे. जगात हा सर्वात महाग साप असून त्याचे नाव आहे 'ग्रीन ट्री पायथन', म्हणजे प्रत्यक्षात हा अजगर म्हणता येईल. 🧐 दुर्मिळ : या सापाचा रंग नावाप्रमाणे हिरवा असतो, मात्र त्यात खूप शेड असतात, याच जातीचा एक निळा सापही आहे मात्र तो दुर्मिळ आणि म्हणून अधिक महाग आहे. 💸 किंमत : या सापाच्या किंमतीत एक मोठे घर, छोटे जहाज सहज खरेदी करता येऊ शकते, कारण ग्रीन ट्री पायथनची किंमत लाखात नाही तर करोडोमध्ये आहे. चार लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक किंमत या सापाला मिळते. 👉🏻 येथे आढळतात : ग्रीन ट्री पायथन हे त्यांच्या आयुष्यातील 90 टक्के आयुष्य झाडावर घालवितात. इंडोनेशियन बेटे, न्यू गिनिया, न्यू गिनी व ऑस्ट्रेलियामध्ये ते आढळतात. 📌 या सापाची लांबी साधारण 2 मीटर तर वजन दीड किलोच्या आसपास असते. मादी लांबीला थोडी अधिक व वजनाला थोडी जास्त असते. हे साप साधारण 20 वर्ष जगतात. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💥 जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह LetsUp l Ahmednagar मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे, आणि वाशी, मुंबईहून आलेल्या मिरी रोड शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संगमनेर येथील खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 3 रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश केला आहे. नव्या दोन रुग्णामुळे एकूण रुग्णसंख्या 217 झाली आहे. 🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🤰 गर्भवतींना संसर्ग होऊ नये म्हणून... LetsUp I Health कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. विशेषतः या काळात गर्भवती स्त्रीला याचा संसर्ग होऊ नये म्हणून जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील. ● बाहेरून आल्यावर, जेवणाच्या आधी आणि शिंका आल्यानंतर आणि नाक शिंकारल्यानंतर हात स्वच्छ धुवा. ● अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर जवळ ठेवा. जशी गरज पडेल तसा वापर करा. ● विशेषतः जे लोक आजारी आहेत त्यांच्याशी शक्य असेल तेवढा संपर्क टाळा. ● डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे शक्यतोवर टाळा. ● सोशल डिस्टंसिंग नियमितपणे पाळा. ● कुठलेही लक्षण सौम्य प्रमाणात जरी जाणवले तरी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी लेट्सअप घेत नाही. 📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🧐 'या' तारखेनंतर देशात शाळा, महाविद्यालये सुरू होतील LetsUp | National ⚡ येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असून त्यानंतर म्हणजे 15 ऑगस्टनंतर देशातील शाळा, महाविद्यालये सुरू होतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केले आहे. 💁‍♂️ देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. 🏣 दरम्यान, आता जून महिन्याला सुरुवात झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 📣 या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. 📍 रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, देशातील शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू करण्यात येतील. 👌 माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💥 *केजमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी* *LetsUp l Beed* केज : कोयता, तलवारीचा वापर करत केजमध्ये पारधी समाजाच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले असून केज पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, दि. 4 जून रोजी केज येथील मुख्य रस्त्यालगत सायंकाळी 5 सुमारास पूर्वीचे जुने भांडण आपआपसात मिटविण्याच्या कारणावरून पारधी समाजाची बैठक बोलावली होती. त्यात हेव्यादाव्यावरून त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात चार दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. भांडणात दगड, काठी, कोयता व तलवारीने मारहाण झाल्याच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. बापू बाबू काळे रा. केज यांच्या फिर्यादी नुसार राजाराम अच्युत काळे, बबलू अच्युत काळे, सुरेश बंकट काळे, लालू अच्युत काळे, रा बजरंग नगर केज आणि गंगाराम बापू पवार, गणेश पोपट चव्हाण, रवींद्र शामराव काळे व पापा बंकट पवार अशा दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे तपास करीत आहेत. तर पापा बंकट पवार रा.शिवाजी चौक, दूध डेअरी जवळ कळंब यांच्या फिर्यादी खंडू बापू काळे, बापू बाबू काळे, सुरेश बाबू काळे, दीपक खंडू काळे, आकाश बापू काळे, बालाजी खंडू काळे, राजू छमु पवार, राहुल उत्तम शिंदे, शिवा बाबू शिंदे या दहा जणांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि महादेव गुजर हे तपास करीत आहेत. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारत इटलीच्याही पुढे* *LetsUp | Corona Live* 👉 भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात सर्वात जास्त नवीन प्रकरणं आणि सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 👉 आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 9887 नवीन प्रकरणं समोर आली असून एकूण 294 रुग्णांचा मृत्यू झाला. 👉 भारतात आता 2 लाख 36 हजार 657 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 6642 लोकांचा मृत्यू झाला आहे. 👉 भारतानं कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आता इटलीला मागे टाकलं आहे. 👉 भारतानं इटलीला मागे टाकत जगभरातील कोरोनाबाधितांमध्ये भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे. 👉 भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि ब्रिटन यांचा क्रमांक लागतो. 👉 इटलीमध्ये 2 लाख 34 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 33 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण* *LetsUp | International* ⚡ कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना
💁‍♂️ *अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण* *LetsUp | International* ⚡ कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना झाला आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 🏥 दाऊदची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्याला आणि त्याच्या पत्नीला कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 😷 पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. 📍 सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे सत्य आहे आणि दाऊद आणि त्याची पत्नी यांना मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 देशात 24 तासात 9851 नवे 'कोरोना' पॉझिटिव्ह LetsUp | Corona Live ⚡ देशातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून दिवसेंदिवस अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत़ 😷 गेल्या 24 तासात देशभरात सर्वाधिक उच्चांकी 9 हजार 851 नवीन रुग्ण आढळून आले आहेत़, तर सर्वाधिक 273 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 💁‍♂️ देशभरातील आतापर्यंत एकूण 2 लाख 26 हजार 770 कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 960 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 😰 गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक 273 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत देशात 6 हजार 348 जणांचा मृत्यु झाला आहे. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

💥 चीनच्या दिशेने वळवली बोफोर्सची तोंडं... LetsUp | Update 💫 भारताने आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही चीनच्या दिशेने वळवली असून लडाखजवळील लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामास अधिक गती दिली आहे. ⚡ ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमाने ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडणार आहेत. ✨ अनंतनागजवळ NH-४४ वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू असून सदरील ठिकाणी लढाऊ आणि इतर विमाने उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी धावपट्टी तयार करण्यात येत आहे. 📌 भारत-चीन तणावा दरम्यान दोन्ही देशांच्या लष्करांची 6 जून रोजी ही बैठक आयोजित केली असून या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे अधिकारी भाग घेतील. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp\

🧐 'कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला' LetsUp l Ahmednagar ⚡ काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारतातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहे. दरम्यान, गुरूवारी त्यांनी देशातील उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. 💁🏻‍♂️ या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात लागू केलेल्या लॉकडाउनवरही टीका केली. “तुम्ही कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणला,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 🗣️ बजाज म्हणाले : “भारताने शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी पाश्चिमात्यांचे अनुकरण केले. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी वेगळ्या आहेत. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे करता आले नाही. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. कोरोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला,” असे म्हणत बजाज यांनी केंद्र सरकारवरच निशाणा साधला. 📌 “भारताला जपान किंवा स्वीडनप्रमाणे पाऊल उचलणे अपेक्षित होते. ते हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर पुढे गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ज्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक होता त्यांना मरण्यासाठी सोडून दिले. याचा अर्थ असा आहे की सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे असा होता. आपल्याकडे दुर्देवाने पूर्ण लॉकडाउन राबवलाच गेला नाही,” असाही टोला त्यांनी लगावला. 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🎯 पावसाळ्यात चेहरा चिकट होतोय? 'हे' उपाय करा! Letsup I Tips & Tricks पावसाळ्यात सतत वातावरण बदल होत असल्याने अनेकदा चेहऱ्यावर चिकटपणा तयार होतो. त्यामुळे या काळात विशेषतः त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. अशात तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणि चिकटपणापासून मुक्ती हवी असल्यास घरगुती फेसपॅकचा प्रयोग करा. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत. कोणत्याही खर्चाशिवाय घरी 'खालील' फेसपॅक बनवू शकता. 1) बेसन, मध आणि ग्रीन टी : यासाठी 1 चमचा बेसनासोबत 1 मोठा चमचा मध आणि थोडीशी ग्रीन टी मिसळा. हे एकत्रित मिसळून चेहऱ्यावर 20 ते 30 मिनिटांपर्यंत लावून नंतर धुवून टाका. 2) काकडी, गुलाब पाणी आणि ग्रीन टी : यासाठी गुलाब पाणी, काकडीचा रस आणि ग्री टी मिसळा. हा पॅक लावल्याने चेहऱ्याला आराम मिळतो. 3) बटाटा, लिंबू आणि गुलाब पाणी : यासाठी बटाटाच्या रसात 2 छोटे चमचे लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळा. हा पॅक 30 मिनिटांपर्यंत लावून धुवून टाका. याने मुरुमांच्या समस्या दूर होतील. 4) डाळींबाचे दाणे, मध आणि ताक : यासाठी 2 चमचे डाळींबाचे दाणे, 2 चमचे मध आणि थोडे ताक मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून थंड पाण्याने धुवा. याने पावसाळ्यात त्वचा ड्राय होणार नाही. 📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp