es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी Letsupp | Trending ⚡ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 🌊 मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. 🏚️ दरम्यान सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. 🗣️ नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पूरग्रस्तांची भेट घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 💁🏻‍♂️ असा असणार आहे मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा ▪️ सकाळी 9.50 वा. मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. ▪️ सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. ▪️ सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. ▪️ सकाळी 11.55 वा. कसबे डिग्रज येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. ▪️ दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. ▪️ दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. ▪️ दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. ▪️ दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. ▪️ दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण. To know more click here https://letsup.app.link/zFTNYkCInib

या घडीच्या 10 महत्वाच्या घडामोडी Letsupp | Bulletin ▪️ जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे ▪️ लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली पुण्यातील चुमुकली वेदीकाची प्राण ज्योत अखेर मालवली ▪️ कोरोनाच्या 'आर व्हॅल्यू'ने टेन्शन वाढले, पॉझिटिव्हीटी दर 10 टक्केपेक्षा जास्त तिथे निर्बंध कठोर करा! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राज्यांना सूचना ---------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६ ---------------------- ▪️ पूरग्रस्त भागांच्या मदतीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ▪️ दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये 9 ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार ▪️ काश्मीरमध्ये सरकारचे कठोर निर्बंध जाहीर, दगडफेक करताना पकडल्यास 'नो पासपोर्ट, नो गवर्नमेंट जॉब' ▪️ आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे सुमारे 8 कोटी रुपयांचे स्वतंत्र आदिवासी वसतिगृह उभारण्याचा निर्णय राधाकृष्ण विखे यांनी घेतला ▪️ घाटकोपर-मानखुर्दला जोडणारा छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल खुला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण ▪️ भारतीय हॉकी संघ 49 वर्षांनंतर उपांत्य फेरीत, ग्रेट ब्रिटनवर 1-3 असा दमदार विजय मिळवला ▪️ बारावीचा निकाल आज सोमवार (दि.2 ऑगस्ट) जाहीर होण्याची शक्यता, निकालाकडे लागले विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष! To know more click here https://letsup.app.link/ildeK1eInib

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी; 'लालबागचा राजा' मंडळाने घेतला मोठा निर्णय LetsUpp | Trending 🛕 गेल्या वर्षी कोव्हीड-19 संसर्गमुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. 🔔 यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे मंडळाच्या बैठकीत ठरले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे. 👉 गणेश मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध शासनाने घालून दिली आहे. त्याचे काटेकोर पालन मंडळाकडून केले जाईल. भाविकांना लालबाग राजाचे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी मंडळाकडून तयारी केली जाणार आहे. To know more click here https://letsup.app.link/Veymsroqmib

या घडीच्या 10 महत्वाच्या घडामोडी Letsupp | Bulletin ▪️ शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख अनंतात विलीन; काल दुपारी सांगोल्यात शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ▪️ महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला, पुण्यात 50 वर्षीय महिलेला लागण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती ▪️ राज्यात काल दिवसभरात 225 रूग्णांचा मृत्यू; तर 6 हजार 959 नवीन कोरोनाबाधित रुग्ण ---------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६ ---------------------- ▪️ पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स, बॉली फेम अ‍ॅपमधून 51 अश्लील चित्रपट जप्त; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती ▪️ गडचिरोलीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याचा पोलिसांकडून पर्दाफाश; 10 जणांना अटक, राज्यस्तरीय रॅकेटची शक्यत ▪️ आजपासून एटीएममधून पैसे काढणं होणार महाग; आरबीआयचे नवीन नियम लागू, सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता ▪️ जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांत चकमक; दोन दहशतवादी ठार ▪️ पंतप्रधानांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही एक हजार कोटी द्यावेत, खासदार संजय राऊत यांची मागणी ▪️ देशातील 10 राज्यांत कोरोना विषाणूचा महास्फोट; केंद्र सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना ▪️ कॅनडामध्ये नव्या डेल्टामुळे कोरोनाची चौथी लाट येऊ शकते; कॅनडाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा To know more click here https://letsup.app.link/gdmbj5N2lib

डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, पदकाची प्रबळ दावेदार LetsUpp | Trending 💁‍♂️ टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात निराशाजनक झाली. डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरची कामगिरी वगळता भारताला पदकाची अपेक्षा असलेल्या खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. 💫 डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. डिस्कस थ्रोमध्ये भारताची सीमा पुनियाचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे. तर तिरंदाजीमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कमलप्रीत कौरनं इतिहास रचला 🥇 डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोर केला आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे. सोबतच ती पदकाची दावेदार देखील झाली आहे. 🇮🇳 दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत कौर आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता ती फायनलमध्ये पोहोचली असून तिथं चांगली कामगिरी केल्यास भारताला अजून एक पदक मिळणं निश्चित आहे. To know more click here https://letsup.app.link/qe5XZTeDkib

'या' खेळाडूने घेतला अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक LetsUpp | Cricket 🏏 भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता केवळ 4 दिवस राहिले आहेत. मात्र त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. 🏆 इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली. येत्या 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. बेन स्टोक्सने अचानक क्रिकेट मालिकेतून नाव माघार तर घेतलं, पण अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. 💁‍♂️ बेन स्टोक्सची कारकीर्द ● स्टोक्सने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेटमध्ये कसोटी पदार्पण केलं. ● स्टोक्सने आतापर्यंत 71 कसोटी सामन्यात 10 शतकं ठोकली आहेत. ● त्याच्या नावावर कसोटीत 4631 धावा आहेत ● कसोटीत स्टोक्सने 163 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये 4 वेळा 5 विकेट्सचा समावेश आहे. 👉 वन डे आणि T20 कारकीर्द ● स्टोक्सने 2011 मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे पदार्पण केलं होतं, तर त्याच वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध तो टी 20 च्या मैदानात उतरला. ● वन डेमध्ये त्याने 101 सामन्यात 2871 धावा ठोकल्या. यामध्ये 3 शतकं आणि 74 विकेट्सही घेतल्या आहेत. ● 2019 मध्ये इंग्लंडने जिंकलेल्या वन डे विश्वचषकात स्टोक्सने जबरदस्त खेळी केली होती. ● बेन स्टोक्स 34 टी 20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 19 विकेट घेतल्या आहेत. तर बॅटिंग करताना 442 धावा ठोकल्या. T20 क्रिकेट स्पर्धेचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर https://letsup.app.link/VuOHymKzkib

'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन; सोलापुरात घेतला अखेरचा श्वास, विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम ● राज्यातील ६४४ अपूर्ण गृहनिर्माण प्रकल्प टाकले काळ्या यादीत, शिरजाेर बांधकाम व्यावसायिकांना दणका; मालमत्तेची विक्री, जाहिरात किंवा मार्केटिंग करण्यावर ‘महारेरा’ने बंदी घातली ● मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात, लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन --------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५ ---------------------- ● मुंबईत म्युकरमायकोसिसचा धोका झाला कमी, 904 रुग्णांपैकी 571 रुग्णांना डिस्चार्ज ● पन्नासहून कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना करोना नियमांचे पालन करीत सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास सहकार विभागाची परवानगी ● कोरोना काळात नियम पायदळी तुडवत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वरखेड येथे भरली मोठी यात्रा; जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष ● लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सायरस पूनावाला यांना जाहीर; लोकमान्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो ● शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी सुरेंद्र गडलिंग यांना हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर; कठोर अटीशर्तींसह आईच्या वर्षश्राद्धासाठी नागपूरला जाण्यासाठी परवानगी ● केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 ऑगस्ट 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; बाहेरील देशात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढतोय ● चीनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये अचानक वाढ! बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द To know more click here https://letsup.app.link/LD3UhpJokib

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर LetsUpp | Trending 👉 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर असणार आहे. 🧑‍🏫 ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत आहे. २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 🧑‍💻 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे वेळापत्रक ● ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी - ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत) ● प्रवेशपत्राचे ऑनलाइन प्रिंट घेणे - २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१ ● शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १ ● शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ - १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३० To know more click here https://letsup.app.link/Dov8Qzo1iib