es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
photo content

टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● कोरोना, महागाईनं याआधीच सर्वसामान्यांचे हाल झालेले असताना आता रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणं देखील महागणार ● पुण्यातील पिसोळीच्या फर्निचर गोदामाला भीषण आग; ३ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश ● पीयूसी नसेल तर होऊ शकतो १० हजारांचा दंड; वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन वाहनांसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी ● १९९३ मुंबई बाँबस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचा मलिकांवर गंभीर आरोप ● मुंबईत हालचाली वाढल्या, शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; तर्क-वितर्कांना उधाण! ● २६६ दिवसांनंतर देशात करोनाच्या सर्वात कमी रुग्णांची नोंद; गेल्या २४ तासांत १०,१२६ नविन बाधित ● ‘अनलॉक’नंतर महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ; दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच! ● उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपाच्या मदतीसाठी आरएसएस मैदानात; संपूर्ण राज्यात काढणार तिरंगा यात्रा ● कोळसा साठ्यात मोठी वाढ; वीज कपातीचे संकट टळले, काही उद्योगांना करावा लागतोय टंचाईचा सामना ● तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांत चार जणांचा मृत्यू ओढवला असून ६० हून अधिक घरांचे नुकसान झाल्याची माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/kIwa89Rr2kb

मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जण जखमी LetsUpp | Mumbai ⚡ मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक मजली घर कोसळल्याचं वृत्त आह
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जण जखमी LetsUpp | Mumbai ⚡ मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक मजली घर कोसळल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 👉 सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत व बचावकार्य सुरू आहे. 🗣️ आतापर्यंत सात जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं आसपासच्या रहिवाशांमध्येही घबराट पसरली आहे. 📍 दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळं घडली हे कळू शकलेलं नाही. अँटॉप हिल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/wfcqTBkj2kb

*जिल्हा रुग्णालय अग्नितांडव; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा निलंबित* *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/nk6dpkql1kb

*टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या* LetsUpp | Bulletin ● बॉम्ब फोडा, आवाज येऊ द्यात; नुसता धूर काढू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोमणा ● देगलूर विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला ● मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी; देशमुखांची दिवाळी तुरुंगात जाणार ● दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी ● मुंबईत NCB ची पुन्हा मोठी कारवाई, मुंबईतील विलेपार्ले या भागातून जप्त केले कोट्यवधींचे हेरॉइन ● राज्यातील 75 टक्के शाळा सौरऊर्जेवर; सोलरच्या दरात वाढ झाल्याने उपक्रमावर होणार परिणाम ● मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक’ करणार; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची घोषणा ● महावितरणाकडून शेतकऱ्यांना मोठा शॉक, आता 10 तासांची लाईट फक्त आठ तास मिळणार! ● हिमाचलमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला झटका, चारही जागांवर काँग्रेस विजयी, तर भाजपचा दणदणीत पराभव ● काबूल पुन्हा एकदा आत्मघातकी स्फोट आणि गोळीबारानं थरारलं, यामध्ये जीवितहानी झाली किंवा नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही. *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/ahhJvZN6Qkb

*दादरा नगर हवेली: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी, भाजपचा दारुण पराभव* *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/Xm6atJf0Qkb

*टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या* LetsUpp | Bulletin ● आर्यन खानची तुरुंगातून सुटका; अखेर २६ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला; क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती ● समीर वानखेडेंना अटकेच्या तीन दिवस आधी नोटीस द्या; राज्य सरकारला न्यायालयाचा आदेश; समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा ● नवाब मलिकांचा मोठा आरोप, पार्टीचा आयोजक वानखेडेंचा मित्र! त्याला अटक का केली नाही? कॉर्डिलियावरची पार्टी एफ टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी आयोजित केली होती ● दौंड, जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मामेभावाच्या घरी ईडीची धाड; साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला ● केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, येत्या आठ दिवसात आक्रमक होणार : राजू शेट्टी ● तब्बल १२ वर्षानंतर कार्तिकीच्या घोडेबाजारात दर्जेदार अश्व दाखल; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष ● संवेदनशील माहिती फडणवीसांनी नाही, तर नवाब मलिक आणि आव्हाडांनी उघड केली; रश्मी शुक्लांचा दावा ● अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; ● 'पुढील अनेक दशकं BJP भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल' प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी ● सेन्सेक्स कोसळला, निफ्टीच्याही गटांगळ्या! मुंबई शेअर बाजारात सहा महिन्यातली सर्वात मोठी घसरण *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/FPfuO7VOIkb

*टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातम्या* LetsUpp | Bulletin ● पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष PMLA कोर्टानं खडसेंना ५० हजारांचा अंतरिम जामीन मंजूर केला ● माझ्यावरील आरोप निराधार, कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार; समीर वानखेडेंकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र; ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते ● मिनी मेट्रोचं 'विदर्भ सर्किट'; प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा; नागपूर, वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर आणि वर्धा शहराचा समावेश ● पुणे शहराचं १०० टक्के लसीकरण होण्यासाठी मार्च २०२२ पर्यंतचा कालावधी लागू शकतो; पुण्यातील १८ ते ४४ वयोगटातील १९ लाख २१ हजार लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ● नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबरला होणार; स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती ● गेले काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली ● भारत-चीन सीमेच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सुरक्षेच्या अनुषंगाने भारत-तिबेट सीमा पोलीसांच्या नवीन बटालियनला मंजुरी देण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात ● पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण; भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर दोन विद्यालयांमध्ये अनेक काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचं समोर आलं ● खूशखबर! जिओ दिवाळीआधी ग्राहकांना देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन; जिओफोन नेक्स्ट असं या स्मार्टफोनचं नाव असून लाँचिंगची तारीख ४ नोव्हेंबर आहे ● ६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार:'मणिकर्णिका' आणि 'पंगा' चित्रपटांसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार; मनोज वाजपेयी-धनुषला बेस्ट अभिनेत्याचा मान; अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/A6JoueDZDkb

*टी20 लीगमध्ये लखनौ आणि अहमदाबाद संघाची इनकमिंग* LetsUpp | Trending 🏏 आगामी टी20 लीगमध्ये आता 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. 🎾 यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची इनकमिंग झाली आहे. दोन संघासाठी अनेक दिग्गज व्यवसायिक आणि बड्या हस्तींनी बोली लावल्या. 🥎 यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाईम्स मीडिया, मँचेस्टर युनायटेड, रणवीर सिंग आणि अरुबिदों अशा काहींनी सर्वात महागड्या बोली लावल्या. त्यानंतर RPSG अर्थात आरपी संजीव गोएन्का ग्रुपस आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने लिलाव जिंकला आहे 🏏 त्यानंतर आता RPSG अर्थात आरपी संजीव गोएन्का ग्रुपस आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने लिलाव जिंकला आहे. 📍 दरम्यान, गोएन्का ग्रुपने अहमदाबाद संघ 7 हजार 90 कोटी रुपये तरसीवीसी कॅपिटल कंपनीने लखनौ संघ 5 हजार 166 कोटींना लिलावात विकत घेतला आहे. *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/FjIhro31Dkb