es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
📣 आयकर परतावा; चुकीची माहिती भरल्यास कारवाई Letsup I Update टॅक्स वाचवण्याच्या नादात चुकीचा आयटी रिटर्न भरल्यास करदात्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. फक्त दंडात्मक कारवाईच नाही, तर तुम्हाला तुरुंगवारीही घडू शकते. पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फाईल न करण्याचा इशारा आयकर विभागाने दिला आहे. अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल, तर त्यांच्या कंपनी मालकांनाही त्याबाबत माहिती दिली जाणार आहे. आयकर विभागाच्या बंगळुरुतील मध्यवर्ती कार्यालयामार्फत करदात्यांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ पाकिस्तानला फोन करून सर्जिकल स्ट्राईक'ची माहिती दिली : नरेंद्र मोदी Letsup I Update कोणी जर दहशतवादाचा कारखाना चालवून आमच्या निरपराध लोकांचा बळी घेत असेल, आमच्या नागरिकांवर हल्ले होत असतील तर अशावेळी त्याच भाषेत कसे उत्तर द्यायचे ते मला चांगले कळते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते ऐतिहासिक वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमधील 'भारत की बात, सब के साथ' या कार्यक्रमात बोलत होते. सर्जिकल स्ट्राईकचे वृत्त सार्वजनिक करण्याआधी आम्ही पाकिस्तान सरकारला याची माहिती देण्यासाठी वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही 11 वाजल्यापासून त्यांना फोन करत होतो पण ते फोन उचलत नव्हते. अखेर 12 वाजता आम्ही त्यांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली. त्यानंतर भारतीय प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले, असेही ते म्हणाले. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - टॅक्स वाचवण्याच्या नादात चुकीचा आयटी रिटर्न भरल्यास करदात्यांविरोधात कारवाई केली जाणार ● नवी दिल्ली - 'यूआयडीएआय'ने आता 'ई-आधार'साठी डिजिटल हस्ताक्षरयुक्त 'क्यूआर कोड' वापरण्यास केली सुरुवात ● नवी दिल्ली - जस्टिस लोया यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज गुरुवारी करणार सुनावणी ● लंडन - नरेंद्र मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील भेटीत इतर आर्थिक मुद्यांसोबत विजय माल्यावरही झाली चर्चा, सूत्रांची माहिती ● मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा आज गुरुवारी होण्याची शक्यता ● मुंबई - रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील रेल्वे तिकिटांवर स्थानकांची नावे मराठीत देण्याचा घेतला निर्णय, त्याची अंमलबजावणी 1 मेपासून होणार ● व्हॉट्सअॅप मॅसेंजरवर आता कोणत्याही अॅडमीनला रिमूव्ह करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली, हे फिचर आता सर्व युजर्ससाठी प्रदान ● नवी दिल्ली - भारतीय कायदे आयोगाने बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारला केली शिफारस ● जयपूर - कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून केले पराभूत, नितीश राणा ठरला सामनावीर ● मुंबई - हिअर मी, लव्ह मी या रिअॅलिटी शोमध्ये आता अभिनेत्री आणि उद्योजिका शिल्पा शेट्टी-कुंद्रा जजच्या भूमिकेत दिसणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💸 सात कोटींच्या बनावट नोटा जप्त Letsup I Update कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच बेळगावमध्ये सात कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बेळगाव शहराच्या विश्वेश्वरय्यानगर परिसरात एका घरावर पोलिसांनी धाड टाकून नोटांचे घबाड जप्त केले. पोलिसांनी धाड टाकलेले घर हे सरकारी कर्मचाऱ्याचे निवासस्थान आहे. इथे 500 आणि 2000 च्या सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अजितकुमार निडोनी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💥 मुंबई बॉम्बस्फोट; आरोपी मर्चंटचा मृत्यू Letsup I Update मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू झाला आहे. ताहिर मर्चंट पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याची तब्येत बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्याचा मृत्यू झाला. ताहिर मर्चंट हा मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनचा सर्वात जवळचा साथीदार होता. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🏧 देशभरात चलन तुटवडा; आरबीआयचे स्पष्टीकरण! Letsup I Update देशातील दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा का झाला, याचे कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे. एटीएममध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचा ट्रे लावण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला, असे आरबीआयने म्हटले आहे. एटीएममध्ये ट्रे लावण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली, मात्र देशातील काही भागांमध्ये यासाठी उशीर झाला. एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी लॉजिस्टिकची समस्या तर आहेच, शिवाय एटीएम नव्या नोटांसाठी अनुकूल नसल्याने चलन तुटवडा निर्माण झाल्याचे आरबीआयने सांगितले. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💰 भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती सरकारजमा होणार? Letsup I Update लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती थेट सरकारजमा करण्याची तरतूद केली जाणार आहे. याबाबतचे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता अाहे. दरम्यान, सध्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये भ्रष्ट मालमत्तेवर टाच आणण्याचे अधिकार आहेत. मात्र त्या अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती आणि मालमत्ता सरकारी जमा करण्याची कोणतीही तरतूद या कायद्यांमध्ये नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - गव्हर्नर उर्जित पटेल यांना संसदीय समितीचे समन्स; बँक घोटाळ्यांबाबत प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार 🔅 नवी दिल्ली - देशभरात चलन तुटवडा, देशात पाचशेच्या नोटांची छपाई पाच पटींनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला 🔅 नवी दिल्ली - रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीक्की यांचा मानाच्या पुलित्झर पुरस्काराने गौरव करण्यात आला 🔅 नवी दिल्ली - केंद्र सरकारचा अरविंद केजरीवाल यांना धक्का, आम आदमी पक्षाच्या नऊ सल्लागारांची नियुक्ती रद्द केली 🔅 नवी दिल्ली - देशातील 48 खासदार आणि 3 आमदारांवर महिलांसंबंधित गुन्हे, एडीआरच्या अहवालातून आकडेवारी समोर 🔅 श्रीनगर - जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळातील भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपच्या मंत्र्यांचा फेरबदल होणार 🔅 मुंबई - जीएसटीमुळे खादी उद्योग डबघाईला, देशातील 27 पैकी फक्त 9 खादी संस्था कार्यरत, सरकारचे मात्र दुर्लक्ष 🔅 पुणे - कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर धाडी, नागपुरात नक्षलवाद्यांचे खटले लढणाऱ्या वकिलाच्या घरावर छापा 🔅 मुंबई - चित्रिकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला 🔅 मुंबई - सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अखेर विजयी सूर गवसला, बेंगळुरूवर 46 धावांनी विजय For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📈 भारताचा विकासदर 7.3 टक्क्यांनी वाढणार! Letsup I Update जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांत (2018-19) भारताचा विकास दर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय 2019 आणि 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगाने वाढेल, असाही अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक बँकेच्या मते, जीएसटी लागू झाल्यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला होता. याचा नकारात्मक परिणाम दिसून आला होता. परंतु, अर्थव्यवस्था यातून बाहेर पडत असून आर्थिक वर्ष 2019 मध्ये विकास दर 7.4 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान, भारताच्या आर्थिक वाढीचा वेग स्थिर असेल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

💳 ATM मध्ये खडखडाट, दहा राज्यांत नोटांचा तुटवडा देशभरात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील कही जिल्ह्यात नोटांचा तुटवडा जाणवत आहे. वारंवार एटीएमच्या चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. 📌 राहुल गांधींची टीका दरम्यान नोटबंदी करून पंतप्रधान मोदींनी बँकींग सिस्टीमला नष्ट केलंय. नीरव मोदी व चौक्सी 20 हजार कोटी घेऊन पळून गेलेत. आणि आम्ही हजार पाचशे रूपये काढण्यासाठी लाईन मध्ये थांबतोय, मी जर 15 मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उठूही शकणार नाहीत अशी टीका राहुल गांधी यांनी केली For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

💥 पेट्रोल नव्वदी पार करणार? LetsUp I Updates पेट्रोलचे दर सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेले असताना यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सीरियामध्ये आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 10 डॉलर पर्यंत वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे भारतात पेट्रोल आता तब्बल 90 रुपये प्रति लिटर पर्यंत जाऊ शकते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महाराणी एलिझाबेथ पद सोडणार 🔅 नवी दिल्ली - केम्ब्रिज अॅनालिटीकाने 2019 निवडणुकीसाठी काँग्रेसला दिला होता ‘हात’, प्रमुखाने घेतली होती राहुल गांधींची भेट 🔅 नवी दिल्ली - सीरियातील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाचे भाव वाढणार, पेट्रोल प्रति लीटर 90 रुपये होण्याची शक्यता 🔅 नवी दिल्ली - देशातील आकाशाचे प्रभुत्व विदेशी कंपनीकडे देणे योग्य नाही; एअर इंडियाच्या खाजगीकरणावर मोहन भागवतांची टीका 🔅 हैदराबाद - असीमानंद यांना निर्दोष मुक्त करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी निकालानंतर तात्काळ राजीनामा दिला 🔅 मुंबई - बळीराजासाठी खुशखबर, देशात यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज 🔅 मुंबई - साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले 🔅 मुंबई - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात 30 हजार कि.मी.लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट 🔅 मुंबई - राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राडा, मुंबईतल्या ताडदेव परिसरातले नाणार प्रकल्पाचे कार्यालय फोडले 🔅 नवी दिल्ली - कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला 71 धावांनी धूळ चारली, कोलकाताचा स्पर्धेतील दुसरा विजय For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या वेटलिफ्टर पूनम यादववर प्राणघातक हल्ला, जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती 🔅 नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची 218 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 🔅 नवी दिल्ली - नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर दोन महिन्यांत तब्बल 68 हजार 280 तक्रारींचा पाऊस पडला 🔅 नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे सत्र सुरूच, अधिकाऱ्यांना भाविकांना भेटण्यापासून रोखले 🔅 उत्तर प्रदेश - बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो, उन्नाव प्रकरणातील आरोपी आ. कुलदीप सिंह सेंगरचा दावा 🔅 नागपूर - नागभीडच्या जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा आढळल्या तर 48 एकाश्म स्मारके सापडली 🔅 मुंबई - विदर्भासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी, यवतमाळमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू 🔅 मुंबई - सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतात घुसलेले बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमान हुसकवून दाखवावेत - राज ठाकरे 🔅 मुंबई - वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू असताना एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली 🔅 राजस्थान - IPL 2018 ; पंजाबचा चेन्नईवर 4 धावांनी विजय तर दुसरीकडे राजस्थानचा बंगळुरवर 19 धावांनी विजय For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु सदाशिव कोकजे Letsup I Update विश्व हिंदू परिषदेच्या (व्हिएचपी) आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विष्णु सदाशिव कोकजे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपद निवडीबाबत आज शनिवारी (14 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर लगेचच निकाल जाहिर करण्यात आला. या निवडणुकीत विष्णु सदाशिव कोकजे यांना 192 पैकी 131 तर तोगडिया समर्थक राघव रेड्डी यांना 60 मते मिळाली. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

⚡ विनोदी अभिनेता राजपाल यादव दोषी Letsup I Update पाच कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी प्रख्यात विनोदी अभिनेता राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादवला दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सन 2010 मध्ये दिग्दर्शकीय पदार्पण करण्यासाठी राजपाल यादवने 5 कोटींचे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याची कंपनी आणि पत्नीला सात प्रकरणांत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. शिक्षेची सुनावणी दि. 23 रोजी होणार असल्याची माहिती तक्रारकर्त्याचे वकील एस. के. शर्मा यांनी दिली. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

🛵 भारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी! Letsup I Update ब्रिटेनमधील प्रसिद्ध कंपनी स्कोमादी भारतामध्ये आपली टू-व्हीलर स्कूटी लाँच करणार आहे. या कंपनीने पुण्यामधील AJ डिस्टीब्यूटर्ससोबत करार केला असून त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. भारतात सध्या TT125 स्कूटीची विक्री केली जाणार आहे. कंपनीने ही जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचे म्हटले आहे. या स्कूटीची किंमत 2 लाख रुपये आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆

👌 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अलौकिक विचार! LetsUp I Updates भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अजोड आहे. त्यांच्या अनमोल विचारांवर एक नजर टाकूया... ▪ आपण सर्वात आधी आणि शेवटी एक भारतीय आहोत. ▪ शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा! ▪ आयुष्य दीर्घ असण्यापेक्षा मोठं असलं पाहिजे. ▪ मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल. ▪ बौद्धिक विकास हाच मानवाच्या अस्तित्वाचे मुख्य लक्ष्य असले पाहिजे. ▪ सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे. ▪ काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. ▪ माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. ▪ जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल. 🙏 अशा या महामानवास 127 व्या जयंतीनिमित्त 'लेट्सअप - डिजिटल मॅगझीन'तर्फे विनम्र अभिवादन...! For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

🏅 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा सिलसिला कायम ब्रेकिंग ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आजच्या दहाव्या दिवशी बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. बॉक्सिंगच्या 48 किलो वजनी गटात आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दरम्यान गौरव सोलंकीने देखील बॉक्सिंगच्या 52 किलो वजनी गटात तर नेमबाज संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. भारताच्या खात्यात आता 46 पदके जमा झाली असून, यामध्ये 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup ⚡

LetsUp I News Updates 🔅 नवी दिल्ली - महिलांविरोधात जे गुन्हे करणार त्यांना सोडणार नाही, आमच्या मुलींना न्याय मिळणारच - पंतप्रधान मोदी 🔅 नवी दिल्ली - 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्‍या मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार कायद्यात बदल करणार 🔅 नवी दिल्ली - कठुआ सामूहिक बलात्कार व हत्येप्रकरणी जम्मू व काश्मीरच्या दोन मंत्र्यांना आपले राजीनामे द्यावे लागले 🔅 नवी दिल्ली - भीम अॅपवर आजपासून मिळणार कॅशबॅक ऑफर, 750 ते 1 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो कॅशबॅक 🔅 ढाका - बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवण्याची घोषणा पंतप्रधान शेख हसीना यांनी केली 🔅 मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही 🔅 मुंबई - एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात वॉरंट 🔅 मुंबई - वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानाच्या पत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवास 🔅 बंगळुरु - डीव्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ कठुआ बलात्कार; फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मनेका गांधी Letsup I Update 12 वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे. कठुआमधील आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोस्को अॅक्टमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले. सध्या पोस्को अॅक्टमध्ये जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होते. यात बदल करुन मृत्यूदंडाच्या शिक्षेचाही समावेश केला जाईल, असे सांगितले जाते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup 👆