LetsUpp Marathi
Ir al canal en Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Mostrar más6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
6 624
माझ्यासोबतच असं का होतं?
Let's Up Think Katta : 9 January 2017
आपण जिवापाड मेहनत करूनही आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही आणि त्याचवेळी एखाद्याला थोड्याशा मेहनतीत जर ती गोष्ट मिळाली की, मग तर आपली गाडी एवढी बिघडते की, विचारूच नका...’यार मेरे साथही ऐसा क्युँ होता है?’, ’माझं काय चुकलं राव’, ’नेहमी माझ्यासोबतच असं का होतं?’
अशा निरनिराळ्या प्रश्नांच काहूर आपल्या मनात सुरू होतं. आपण एवढं हर्ट होतो की, सगळं संपलंय असं वाटायला लागतं... तसं पाहायला गेलं तर अशावेळी विविध प्रश्न उपस्थित होणे हे साहजिक आहे. पण यामुळे आपणं डिस्टर्ब होणं कितपत चांगलंय…
जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/JIfsvG
कदाचित जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्यासाठी योग्य नसेल, आपल्याला अजून चांगल मिळणार असेल किंवा आपले प्रयत्न थोडे कमी पडले असतील... हा विचार आपल्या मनात येतच नाही... जे मिळालं नाही त्याचं एवढं चिंतन केलं जातं की बस्स! एवढा खचतो माणूस की, त्याला जगणं नको-नको होतं...
मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, म्हणजे सगळं संपतो का हो? निश्चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं संयम ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्नांच उत्तर हे ’वेळ’ असतं. त्याच्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असला पाहिजे.
मला जे मिळालं नाही तर मला काय-काय मिळालंय... याचं चिंतन केले पाहिजे. म्हणजे आपल्यात सकारात्मकता येईल व आपल्याला हवंय ते मिळण्यासाठी ऊर्जा, उत्साह मिळेल...!
(जॉईन लेट्स अप: https://goo.gl/JIfsvG । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
कोल इंडिया लिमिटेड मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1319 जागा
Let’s Up Job Update : 9 January 2017
पोस्ट : मिनिंग इंजिनिअरिंग - जागा : 191
पोस्ट : मेकॅनिकल इंजिनिअरिंग - जागा : 196
पोस्ट : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - जागा : 198
पोस्ट : सिव्हिल इंजिनिअरिंग - जागा : 100
पोस्ट : केमिकल/मिनरल इंजिनिअरिंग - जागा : 04
पोस्ट : इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग - जागा : 12
पोस्ट : इन्व्हरनमेंट इंजिनिअरिंग - जागा : 25
पोस्ट : जिऑलॉजी - जागा : 76
पोस्ट : इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन - जागा : 08
पोस्ट : सिस्टिम्स/IT - जागा : 20
जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/JIfsvG
पोस्ट : लीगल - जागा : 20
पोस्ट : मटेरिअल्स मॅनेजमेंट - जागा : 44
पोस्ट : सेल्स & मार्केटिंग - जागा : 21
पोस्ट : HR / पर्सनल - जागा : 134
पोस्ट : फायनान्स & अकौंटंट - जागा : 25
पोस्ट : कॅम्युनिटी डेव्हलपमेंट - जागा : 03
पोस्ट : पब्लिक रेलेशन्स - जागा : 03
पोस्ट : राजभाषा - जागा : 07
वय : दि. 01 डिसेंबर 2016 रोजी 18 ते 30 वर्षांपर्यंत (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट)
फी : 1000 रुपये (SC/ST/PWD: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 03 फेब्रुवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/dyhyfL
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/TPWUgm
(जॉईन लेट्स अप : https://goo.gl/JIfsvG । Let’s Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
_*Let’s Up Morning News Updates: 9 January 2017*_
1. नवी दिल्ली - सरकारच्या हस्तक्षेपानंतर बॅँकांकडून क्रेडिट/ डेबिट कार्डवर कर आकारण्याचा निर्णय मागे, पेट्रोलपंपांवर कॅशलेस पेमेंट होणार
2. नवी दिल्ली - सर्व बँकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत खातेधारकांना पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 ची माहिती जमा करण्यास सांगावी - अरुण जेटली
3. आंध्र प्रदेश - विजयावाडामध्ये हैदराबाद डीआरआयने 1335 किलो ग्रॅम गांजा केला जप्त, गांज्याची किंमत जवळपास 1.34 कोटींच्या घरात
4. मुंबई - जून 2017 पासून 7वी आणि 9वीची सर्व पुस्तके बदलणार, तर जून 2018 पासून 8वी आणि दहावीची ही सर्व पुस्तके बदलणार
5. मुंबई - सकल मराठा समाजाच्या वतीने 31 जानेवारी रोजी मुंबईत काढण्यात येणारा राज्यव्यापी ‘मराठा क्रांती मोर्चा’ होणार - आयोजक
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/JIfsvG
6. नागपूर - विदर्भ जनआंदोलन समितीतर्फे 11 जानेवारीला स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भात 80 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार
7. पुणे - राज्यभरात 11 जानेवारीपासून दूध महागणार, दूधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयाने वाढ करण्याचा राज्य सहकारी दूध संघाच्या बैठकीत निर्णय
8. मुंबई - निवडणूक आयोगाने True Voter हे अॅप केले लाँच, उमेदवारांना व मतदारांना सर्व माहिती एका क्लिकवर देण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार
9. मुंबई - शाहरुख खान बिग बॉसच्या घरात हजेरी लावणार, सलमान खानने ट्विटरवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती
10. ब्रिस्बेन - टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड्स हिच्या साथीने ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले
( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/JIfsvG । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let’s Up Morning News Updates: 14 December 2016
1. नवी दिल्ली - टॉप गन, एमपीजंक, बीडीजुंकी आणि टॉकिंग फ्रॉग हे अॅप मोबाइल फोनमधून हटविण्यासाठी गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी
2. नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील शेवटचे तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उपस्थित राहणार - संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू
3. नवी दिल्ली - सीबीआयने आत्तापर्यंत मारलेल्या छाप्यात 19 कोटी रुपये जप्त, तर 10 जणांवर गुन्हे आणि 16 जणांना अटक
4. तामिळनाडू - वरदा चक्रीवादळात 16 लोकांचा मृत्यू, तामिळनाडू सरकार करणार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत
5. हैद्राबाद - 2013 च्या हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादी यासिन भटकळसह इंडियन मुजाहिदीनचे 5 अतिरेकी दोषी, 19 डिसेंबरला शिक्षा सुनावणार
( _*Lets Up*_ 📣 जॉईन करण्यासाठी 1⃣ आपल्या शहराचा _*STD*_ कोड _*SMS*_ करा _*7030-700-700*_ क्रमांकावर 2⃣ त्यानंतर येणाऱ्या _*SMS*_ मधील नंबर _*Lets Up*_ नावाने सेव्ह करा 3⃣ त्या क्रमांकाला _*WhatsApp*_ वरून _*Hi*_ करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन)
6. मुंबई - टीसीएसच्या 93.11 टक्के शेअर होल्डर्सनी सायरस मिस्त्रींना टीसीएस ईजीएमच्या संचालक पदावरुन हटविण्यासाठी केले मतदान
7. मुंबई - पश्चिम रेल्वेच्या 12 डब्यांच्या 12 गाड्या 15 डब्यांच्या करण्याचा निर्णय, 16 डिसेंबर पासून वेस्टर्न लाइनवर 15 डब्यांच्या एकूण 42 फेऱ्या होणार
8. नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी बीसीसीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
9. मुंबई - अभिनेता अक्षय कुमारच्या अंगरक्षकाचा ट्रेनमधून पडून मृत्यू, मथुरा जंक्शनवरील प्लॅटफॉर्म नंबर 2 वर घटना घडल्याची माहिती
10. दुबई - भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत सर्वोत्तम दुसऱ्या स्थानी दाखल
(Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedbackletsup@gmail.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up Morning News Updates : 13 December 2016
1. चेन्नई - ‘वरदा’ चक्रीवादळ ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने चेन्नईच्या किनार्यावर धडकले, वरदा चक्रीवादळाने घेतले 7 बळी
2. नवी दिल्ली - पुढच्या पाच वर्षात 2 हजारच्या नोटा बंद होणार, भविष्यात 500 रुपये ही सर्वात मोठी नोट असेल : सीए एस. गुरुमूर्ती
3. नवी दिल्ली - यापुढे विविध उद्योग आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धनादेशाद्वारे अथवा थेट बँक खात्यात वेतन देणे बंधनकारक करण्यात येणार
4. नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून गरीबांसाठी 25000 रुपयांपर्यंत मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड देणार
( _*Lets Up*_ 📣 जॉईन करण्यासाठी 1⃣आपल्या शहराचा _*STD*_ कोड _*SMS*_ करा _*7030-700-700*_ क्रमांकावर 2⃣ त्यानंतर येणाऱ्या _*SMS*_ मधील नंबर _*Lets Up*_ नावाने सेव्ह करा 3⃣त्या क्रमांकाला _*WhatsApp*_ वरून _*Hi*_ करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन)
5. नवी दिल्ली - बेबी डायपरमधून 16 किलो सोनं लपवून घेऊन जाणाऱ्या दोन दाम्पत्यांना दिल्ली विमानतळावर अटक, पोलिसांकडून चौकशी सुरु
6. गुवाहटी - आसाम पोलिसांनी एका स्थानिक व्यापाऱ्याच्या घरातून 1.55 कोटी रुपये केले जप्त, यात 2000 च्या नव्या नोटांचाही समावेश
7. मुंबई - आजपासून कॅशलेस व्यवहारांवर मिळणार सवलत, ई वॉलेट, डेबिट-क्रेडिट कार्डवर पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास 0.75 टक्क्यांची सूट, 3 दिवसात खात्यात जमा होणार रक्कम
8. अहमदनगर - शिर्डीमध्ये आजपासून टाईम दर्शन सुविधा, दर्शनासाठी नोंदणी सक्तीची, नोंदणीसाठी संस्थानाच्या परिसरात 10 काउंटर्स
9. जोहान्सबर्ग - एबी डेव्हिलियर्सचा टेस्ट कर्णधारपदाचा राजीनामा, फॅप डुप्लेसीसची दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी नियुक्ती
10. मुंबई - अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटाचे शूटींग संपवले
(Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
*Let's Up Evening News Updates : 12 December 2016*
👉 _*'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार*_
दि. 8 नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर जनधन खात्यामध्ये तब्बल 21 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. काळा पैसा धारकांनी त्यांचाकडचे पैसे जनधन खात्याच्या माध्यमातून पांढरे केल्याचा केंद्र सरकारला संशय आहे. यामुळे मोदी सरकार हे पाऊल उचलू शकते.
👉 _*मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन*_
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या भूमिपूजनाला अखेर मुहूर्त मिळाला असून स्मारकाचे भूमिपूजन येत्या 24 डिसेंबरला करण्यात येणार आहे. प्रस्तावित जागेवर हा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते लवकर शिवस्मारकाचे भूमिपूजन होईल अशी माहिती दिली होती.
👉 _*मुंबई शेअर बाजार*_ : _*सेन्सेक्स*_ : 26515.24, _*निफ्टी*_ : 8170.80, _*सोने भाव*_ : 27,438 (प्रतितोळा), _*चांदी*_ : 41,181 (प्रतिकिलो)
( _*Lets Up*_ 📣 जॉईन करण्यासाठी 1⃣आपल्या शहराचा _*STD*_ कोड _*SMS*_ करा _*7030-700-700*_ क्रमांकावर 2⃣ त्यानंतर येणाऱ्या _*SMS*_ मधील नंबर _*Lets Up*_ नावाने सेव्ह करा 3⃣त्या क्रमांकाला _*WhatsApp*_ वरून _*Hi*_ करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन)
👉 _*निती आयोगाची योजना*_ ; _*1 कोटी जिंकण्याची संधी*_
कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी निती आयोग एक योजना आणण्याच्या तयारीत आहे. कॅशलेस व्यवहार करत असल्यास तुम्हाला आता एक कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेसाठी दर 3 महिन्याला ट्रान्झॅक्शन आयडीचा ड्रॉ काढला जाईल. यातील विजेत्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ट्रान्झॅक्शन आयडीचा ड्रॉ दर आठवड्यालाही काढण्यात येणार आहे. यातील विजेत्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दर आठवड्याला 10 ग्राहक आणि 10 व्यापाऱ्यांना हे बक्षीस देण्यात येणार आहे.
👉 _*रेल्वे तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता*_
लांब पल्ल्याच्या गाड्यांतील स्लीपर, दुसरा वर्ग आणि एसी थ्री टायरच्या तिकिटांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर रुळव्यवस्था आणि सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी सुरक्षा कर लावण्यात येणार आहे. यातील रक्कम मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंग पूर्णतः बंद करणे आणि अपघात रोखण्याच्या अन्य उपाययोजनांसाठी वापरली जाणार आहे.
👉 _*आता MRP नुसारच शीतपेयं*_
शीतपेयं विक्रेते कूलिंग चार्जेसच्या नावाखाली विक्रेत्यांकडून एक किंवा दोन रुपये वाढीव आकारतात. मात्र असे करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश वैधमापन शास्त्र विभागाच्या संचालकांनी देशातील सर्व राज्यांतील आपल्या विभागाला देण्यात आले आहेत. शीतपेयांबरोबरच पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे.
👉 _*पाकिस्तानच्या सुरक्षायंत्रणेत मोठे फेरबदल*_
भारताने केलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर पाकिस्तानने आपल्या सुरक्षायंत्रणेत मोठे फेरबदल केले आहेत. पाकिस्तानचे नवनियुक्त सैन्यदलप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISIच्या प्रमुखपदी असलेल्या रिजवान अख्तर यांची तडकाफडकी उचलबांगडी करुन, त्या जागी लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार यांची नियुक्ती केली आहे.
👉 _*व्हेनेझुएलातही नोटाबंदी*_
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशानेही भारताच्या पावलावर पाऊल टाकत देशातील सर्वोच्च मूल्याची चलनी नोट नाण्यात बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 72 तासांच्या आत देशातील सर्व उच्च मुल्याच्या नोटा नाण्यांमध्ये बदलण्याची घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी ही घोषणा केली.
👉 _*नोकिया अँड्रॉईड स्मार्टफोन*_ ; _*फीचर आणि किंमत लीक*_
नोकिया लवकरच आपला नवा अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया D1C लाँच करु शकते. लीक रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनचे दोन व्हर्जन लाँच करण्यात येणार आहेत. अँड्रॉईडवर आधारित नोकियाचा D1C चे दोन मॉडेल असतील. या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स वेगवेगळे असतील. रिपोर्टसनुसार, फोनच्या 2जीबी व्हेरिएंटची किंमत 10 हजार आणि 3 जीबी व्हेरिएंटची किंमत 13 हजार असण्याची शक्यता आहे.
👉 _*'ओके जानू'चा ट्रेलर लाँच*_
अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पुन्हा एकदा 'ओके जानू' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. मणी रत्नम यांच्या ओके कनमनी या तामिळ सुपरहिट सिनेमाचा हा रिमेक आहे.
(Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
