es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
📣 येणार आमदारांसाठीही आचारसंहिता! LetsUp | National 📍 लवकरच सर्व आमदारांसाठी आचारसंहिता तयार केली जाईल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली घोषणा. 🗣 ओम बिर्ला म्हणाले : ● ही आचारसंहिता तयार करण्यासाठी सर्व विधानसभा सभापतींची समिती स्थापन केली जाईल ● ही समिती सर्व विधानसभांच्या आणि विधान परिषदांच्या सभापतींशी चर्चा करेल. ● हि समिती नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. 🤝 बैठकीत एकमुखाने पाठिंबा : ● यासंदर्भात विधानसभा आणि विधान परिषदांचे सभापती मिळून 30 हून अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक झाली. ● यावेळी विधानसभांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करण्यावर सर्व सभापतींचे मतैक्य झाले. ● सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे आणि कमीत कमी वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ यावी, यासाठी आमदारांसाठी आचारसंहिता तयार करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. 💫 यामुळे विधानसभेतील कामकाज सुरळीत चालेल आणि सातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी होतील. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏑 हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती LetsUp | Special आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले. हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू, जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज 114 वी जयंती. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेल्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस दरवर्षी देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. म्हणून आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल विशेष काही... 1) असे पडले नाव : मेजर ध्यानचंद यांचे मुळ नाव ध्यान सिंग होते. परंतु ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करत. नंतर त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. 2) खेळाची सुरुवात : ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त 6 वी पर्यंतच झाले. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा विशेष अनुभव नव्हता. 3) भारतीय संघाचे नेतृत्त्व : हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांचा सामना करत होते. अशा परिस्थितीतही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. 4) न्यूझीलंड दौऱ्यात छाप : ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. 1926 च्या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 21 सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. 5) ऑलिम्पिक हिरो : मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 आणि 1936 या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला. 6) हिटलरची ऑफर नाकारली : 1936 मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या लढतीत ध्यानचंद यांचा खेळ पाहून जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर त्यांचे चाहते झाले. यामुळे हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती. 7) पद्मभूषण देऊन गौरव : ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले. हॉकी विश्वात आपल्या असामान्य कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● चांद्रयान-2 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले, उद्या 30 ऑगस्टला ते चौथ्या कक्षेत जाईल ● देशात उभारले जाणार 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, 15 हजार जागांची भर्ती, केंद्राचा मोठा निर्णय ● जम्मूतील सर्व 10 जिल्ह्यांत आणि काश्मीरच्या कुपवाडा आणि हंदवाडा भागातील मोबाईल सेवा पूर्ववत ● ऊस शेतकऱ्यांना 40 लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर सरकारकडून अनुदान : प्रकाश जावडेकर ● छोट्या किंवा मोठ्या करार उत्पादनांत 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी : पीयूष गोयल ● ICICI बँकेत नोटांची गणती रोबोटद्वारे होणार, असे करणारी ही देशातील पहिली बँक ठरली ● ‘ब्रेग्झिट’ योजनेची योग्य आखणी आणि मांडणी करण्याचे कारण देत ब्रिटनची संसद संस्थगित ● एसटीच्या सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ : परिवहन मंत्री रावते ● प्रो कबड्डी : यू मुम्बावर मात करत दिल्लीचा विजय तर हरयाणाकडून गुजरात फॉर्च्युन जाएंटचा धुव्वा ● अभिनेता ईशान खट्टर आणि अनन्या पांडे प्रथमच मोठ्या पडद्यावर 'खाली पीली'मध्ये सोबत झळकणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता LetsUp | Politics ⚡ 15-20 ऑक्टोबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजण्याची शक्यता! 💁‍♂ विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार, याबद्दल अनेक अंदाज व्यक्‍त होत असले, तरी 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. 📆 साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूका होऊ शकतात तसेच 2 टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे. 📍 या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते. 📢 राज्यात प्रचार यात्रा सक्रिय : येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या जाणार आहे. दरम्यान; राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा, काँग्रेसची पर्दाफाश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

😇 ‘ट्रिपल सीट’; ‘त्या’ दोघींपैकी एकीचा खुलासा! Letsup I Entertainment 🎬 यंदाच्या दिवाळीत अंकुश चौधरी बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी चक्क “ट्रिपल सीट’ घेऊन येणार आहे. 👉 अगोदरच जन्माष्टमीच्या मुहूर्तावर चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले होते. 🧐 मोशन पोस्टरमध्ये असलेल्या त्या दोघी नक्की कोण आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. 👍 त्याच प्रश्नाचे उत्तर देणारे आगामी पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 👀 पोस्टरमध्ये खुलासा : ● या पोस्टरमध्ये अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसत आहे. ● दोघांच्याही कानाला फोन असून ते कुणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. ● विशेष म्हणजे अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या वाढदिवशी हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ● शिवानी सुर्वेसोबत दुसरी अभिनेत्री कोण असेल? याची उत्सुकता मात्र अद्याप कायम आहे. 💫 तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

👩‍✈ देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर बनली 'एस धामी' Letsup I Update 📍 भारताच्या इतिहासात प्रथमच हवाई सेनेच्या फ्लाईंग युनिटमध्ये महिला फ्लाईट कमांडर असणार ✈ हवाई दलातील विंग कमांडर 'एस. धामी'ने देशातील पहिली महिला फ्लाईट कमांडर होण्याचा मिळवला मान 👍 हिंडन या हवाई तळावरील 'चेतक हेलिकॉप्टर' युनिटचे फ्लाईट कमांडरपद धामी सांभाळणार 💫 वायुसेनेच्या कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎬 'वॉर'चा ट्रेलर रिलीज Letsup I Entertainment ⚡ अभिनेता हृतिक रोशन व टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'वॉर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. 🤔 ट्रेलर कसा आहे? : ● जबरदस्त अ‍ॅक्‍शन आणि अफलातून डान्स यांचे उत्तम समीकरण आहे. ● गुरू-शिष्याचे नाते अधोरेखित करत हृतिक-टायगमधील टक्कर दाखवण्यात आलीय. ● या दोघांसोबत अभिनेत्री वाणी कपूरसुद्धा झळकते. मात्र, तिची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. 👍 सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे. 🗓 येत्या 2 ऑक्‍टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 👀 ट्रेलर पहा : https://bit.ly/340q1Fv -------------------------------------------- 🎥 'साहो' चं आणखी एक गाणं प्रदर्शित 📍 बहुचर्चित 'साहो' चित्रपटातील आणखी एक गाणं 'बेबी वॉन्ट यू टेल मी' प्रदर्शित झाले आहे. 👌 या गाण्यामध्ये अभिनेता प्रभास आणि श्रध्दा कपूर या दोघांमधील प्रेमाची सुरूवात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 👀 गाणं पहा : http://bit.ly/2NCEEcG -------------------------------------------- 🎞 'ढगाला लागली..' भेटीला! 👍 आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचे प्रमोशनल गाणे 'ढगाला लागली..' प्रदर्शित झाले आहे. 😍 पहिल्यांदाच एका मराठी गाण्याचा रिमेक चित्रपटाच्या प्रमोशन गाण्यासाठी करण्यात आलाय. 💃 या रिमेक साँगमध्ये रितेश देशमुख, आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा थिरकताना दिसली आहे. 👀 गाणं पहा : http://bit.ly/344WMBo न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💁‍♂ पूरग्रस्त भागातील सर्वच पिकांवरील कर्ज माफ होणार! Letsup I Update 📝 पूरग्रस्त भागातील पिकांच्या कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने केली सुधारणा 👉 त्यानुसार केवळ खरीप 2019 च्या पिकांनाच नव्हे तर सर्वच पिकांवरील कर्ज माफ करण्याचा निर्णय 🗣 महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले : ● सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ● प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार 👍 शेतकऱ्यांना दिलासा : ● यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस आदी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ● पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू, यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य सरकार बँकांना देणार ● ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही, मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झाले आहे अशांना सर्वसाधारण नुकसानभरपाईच्या तीन पट भरपाई देण्यात येत आहे ● गाळाने भरलेली शेते, माती खरडलेली, गाळाने भरलेली शेती पेरणी योग्य करणे, पडलेली घरे, अर्धवट पडलेली घरे बांधणे आदी कामे करण्यात येणार ● पूरग्रस्त भागात आणखी 4 महिने मोफत धान्यपुरवठा करण्यात येणार आहे न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● पीएफसंबंधित कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार, त्यानुसार लाभ आता ड्रायव्हर, घरगड्यांनाही मिळणार ● छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा येथून 5 नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश ● तिहेरी तलाकविरोधी कायदा केल्यानंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक तक्रारी (216) दाखल झाल्याचे समोर ● पूरग्रस्त भागातील पिकांच्या कर्जमाफीच्या निर्णयात सुधारणा, सर्वच पिकांवरील कर्जमाफीचा निर्णय ● राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याचा (25 हजार कोटी) तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन ● डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके समूहाच्या अनेक मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने आणली टाच ● Hero Electric ने लाँच केली Dash ई-स्कूटर, या स्कूटरची (एक्स-शोरुम) किंमत 62 हजार रुपये ● भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या 1 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती ● अभिनेते प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी यांच्या कारला अपघात, सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही ● हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या बहुचर्चित 'वाॅर' चित्रपटाचा फोर के क्वालिटीचा ट्रेलर प्रदर्शित न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👀 मुलं खोटं का बोलतात? LetsUp | Parenting "नेहमी खरे बोलावे!" हे अगदी पुस्तकी वाक्य वाटलं तरी हेच तर आपण लहान मुलांवर संस्कार करत असतो. आपल्याला हवं तेव्हा आपण मुलांशी खोटं बोलतो. अगदी साधी गोष्ट, जेव्हा मुलं एखादी गोष्ट आणि त्यामागची कारणं विचारतात तेव्हा आपण आपल्या सोयीने हवे ते सांगत बसतो. असं करून आपण त्यांना खोटं बोलणं योग्य आहे किंवा कधीतरी ते चालू शकतं हेच सुचवत असतो. 👉 मुलं आपलं वागणं बोलणं पाहूनच शिकत असतात. आपलं वागणं आणि इतरांशी बोलणं हेच त्यांच्यासाठी एक प्रमाण असतं. त्यामुळे आपल्या वागण्याकडे आपलं लक्ष असणं खूप महत्वाचं असतं. 📍 खोटं बोलण्यामागील कारणे काय? 1. एकतर घरात अगदी कडक वातावरण असतं. ज्यामुळे मुलं आपल्या चुका मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. 2. एखादी चूक जेव्हा मुलांना कळते कि, माफ होऊ शकत नाही किंवा त्या चुकीसाठी त्यांना मोठी शिक्षा मिळू शकते तेव्हा मुलं चूक लपवायला आणि खोटं बोलायला सुरवात करतात. 3. मोठ्यांकडून जेव्हा चुका होतात तेव्हा त्यांना शिक्षा नसते आणि जेव्हा आपण चुका करतो तेव्हा मात्र आपल्याला मार बसतो हे त्यांना कळते तेव्हा त्यांना मोठ्यांची घृणा वाटते. 4. खरं बोलून जर मार पडणार असेल तर मी गोष्टी लपवून किंवा खोटं बोलून वेळ साधून नेईल अशी त्यांची धारणा होऊ शकते. 💁‍♂ यापैकी काहीही घरात घडत असेल तर ते तात्काळ थांबवणे तुमचे काम आहे. "खरं बोललं तरी चालेल मी तुला मारणार नाही!" हे वाक्य त्यांना खरं बोलायला मदत करणारं ठरतं. मारणं हा काही मुलांना सुधारण्याचा पर्याय नाही याउलट त्याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो हे पालकांनी समजून घ्यायला हवे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 Letsup I General Knowledge 1) 45 व्या जी-7 शिखर परिषद 2019 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? उत्तर : बिआरिट्झ, फ्रान्स 2) महिलांच्या सुरक्षेसंबंधीचा 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? उत्तर : दिल्ली 3) "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? उत्तर : तामिळनाडू 4) नुकतीच नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” ची चाचणी कोणत्या देशाने घेतली? उत्तर : उत्तर कोरिया 5) अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली? उत्तर : 1,159 6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ऑर्डर ऑफ जाईद” हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाने बहाल केला? उत्तर : संयुक्त अरब अमिरात (UAE) न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 जयंती विशेष : 'सर डॉन ब्रॅडमन' Letsup I Special क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून सर डॉन ब्रॅडमन यांना आजही आठवले जाते. त्यांना 'द डॉन' या नावानेही ओळखले जाते. आज त्यांची 111 वी जयंती. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ त्यांच्याविषयी खास काही... 1. एकूण 52 कसोटी सामन्यांमध्ये ब्रॅडमन यांनी 99.94 च्या सरासरीने एकूण 6 हजार 996 धावा (29 शतके) फटकावल्या. 2. 1931 च्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी 974 धावा फटकावल्या होत्या. हा विक्रम अद्याप अबाधित आहे. 3. एका दिवसात त्रिशतक फटकावणारे ब्रॅडमन हे एकमेव फलंदाज आहेत. 4. कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 च्या सरासरीने धावा फटकावण्याच्या त्यांच्या विक्रमाच्या आजही कुणी जवळपासही नाही. 5. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 12 द्विशतके झळकाविली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके फटकावणारे ते पहिले फलंदाज होते. 6. आपल्या कसोटी कारकिर्दीत ते कधीही 90 ते 100 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झालेले नाहीत. 7. ब्रॅडमन यांनी केवळ इंग्लंडविरुद्ध 5 हजार धावा करण्याचा विक्रम केला. इंग्लंडविरुद्ध खेळताना त्यांनी 5,028 धावा केल्या होत्या. 8. ब्रॅडमन यांनी 1931 साली एका सामन्यात 18 मिनिटात शतक ठोकले होते. त्यावेळी 8 बॉलची ओव्हर असायची. अवघ्या 22 बॉलमध्ये ब्रॅडमन यांनी शंभरी गाठली होती. 🤔 माहित नसलेल्या गोष्टी : ● ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 ला झाला. त्यांचे पूर्ण नाव डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन असे आहे. ● आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी ते गोल्फच्या चेंडूचा वापर करत असत. ● आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात 100 ची सरासरी कायम ठेवण्यासाठी त्यांना केवळ 4 धावांची आवश्यकता होती. मात्र, अखेरच्या सामन्यात ते एकही धाव न काढता बाद झाले. ● ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांच्या राजधान्या आणि परिसरातील टपाल क्रमांक PO BOX 9994 असा ठेवण्यात आला आहे. कारण डॉन ब्रॅडमन यांची सरासरी 99.94 आहे. ● क्रिकेट खेळत असतानाच त्यांनी 'डाॅन ब्रॅडमन्स बुक', 'माय क्रिकेटिंग लाईफ' आणि 'हाऊ टू प्ले क्रिकेट' या पुस्तकांचे लेखन केले. 📍 स्वभाव व आवडी : ● ते अत्यंत कुटुंबवत्सल व्यक्ती होते. ● ते आणि त्यांची पत्नी दोघे स्वत: जातीने मुलांकडे लक्ष द्यायचे. ● त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी काही संगीत रचनाही केल्या होत्या. ● ते पियानो वाजवायचे. ● ते एक उत्तम ड्राइव्हर होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार खूप आवडायच्या. ● त्यांना प्रसिद्धीची अजिबात हाव नव्हती. मीडियापासून ते लांबच राहायचे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👌 सॅनिटरी नॅपकिन 1 रुपयामध्ये LetsUp | National 💁‍♂ आजपासून (दि.27) सरकारी 'जन औषधी केंद्रां'मध्ये सॅनिटरी नॅपकिन 1 रुपयात उपलब्ध होणार आहे. 👍 रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबत माहिती दिली. 👉 अगोदर अडीच रुपयांना मिळणारे हे नॅपकिन आता 1 रुपये दराने मिळणार आहे. 🗣 मनसुख मांडवीय म्हणाले : ● जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्स आता 1 रुपयांत उपलब्ध करत आहोत. ● देशभरातील 5,500 जन औषधी केंद्रांमध्ये 'सुविधा' या नावाने हे नॅपकिन्स उपलब्ध असतील. ● हा निर्णय घेऊन मोदी सरकारने 2019 च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण केले. 💫 गेल्या वर्षभरात वर्षात सुमारे 2.2 कोटी नॅपकिनची विक्री करण्यात आली. आता किंमत आणखी कमी केल्याने ही विक्री दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💥 ब्रेकिंग! गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात LetsUp | Breaking ⚡ प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरमधील बळपुडी गावाजवळ अपघात 👉 या अपघातात आनंद शिंदे सुखरुप बचावले, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे 🤔 नेमकं काय घडलं? : शिंदे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. इंदापूरजवळील वरकुटे फाटा येथे आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही. अशात त्याने डंपरला पाठीमागून धडक दिली. त्यात आनंद शिंदे यांच्या पायाला मुका मार लागला. यानंतर उपचारासाठी त्यांना इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 💫 प्राथमिक उपचारानंतर शिंदे आता पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते आहे न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

📣 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती LetsUp । Job 📍 पदाचे नाव : तंत्रज्ञ-3 I जागा : 746 💁‍♂ श्रेणी व पद संख्या अशी : ● सामान्य : 373 ● प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी : 336 ● B.T.R.I साठीचे आरक्षण : 37 👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 💸 फी : खुला प्रवर्ग: ₹500/- (मागासवर्गीय: ₹300/-) 🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 08 सप्टेंबर 2019 (11:59 PM) 🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/2NrSyOC न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👍 जीएसटी रिटर्नला मुदतवाढ! LetsUp | Update ⚡ जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 3 महिन्यांनी वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे 🗣 केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने याबाबत सांगितले 🗓 अगोदर 31 ऑगस्ट ही वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती 👉 मुदतवाढीमागे कर भरणाऱ्यांना परतावा भरण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगितले जात आहे 💫 दुसरीकडे, सेवा कर आणि उत्पादन शुल्क माफी योजनेंतर्गत करदात्यास देण्यात आलेल्या सवलतीबाबत अधिकृत समिती 60 दिवसांत निर्णय घेण्यात येणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Updates ● RBI केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार 51 कोटी रुपये देणार, सरकारला दिलासा ● सरकारी 'जन औषधी केंद्रां'मध्ये आजपासून (दि.27) सॅनिटरी नॅपकिन 1 रुपयात मिळणार ● आता चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागाचे 4375 कि.मी. उंचीवरून टिपलेले छायाचित्र पृथ्वीवर पाठवले ● कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री असणार ● इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ ● आम्ही काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा ● रासपा प्रवेशाचे वृत्त अभिनेता संजय दत्तने फेटाळले, कोणत्याही पक्षात प्रवेश करत नसल्याचे केले स्पष्ट ● फोटो शोधणं आणखी सोपं होणार, गुगल फोटोजमध्ये आता फोटोंमधील टेक्स्टद्वारेसुद्धा सर्च करता येणार ● टेस्ट चॅम्पियनशीप : पहिल्या विजयामुळे भारत 60 पॉईंट्ससह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर ● अभिनेता आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'बाला'चा दमदार टीझर प्रदर्शित न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 *मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढली!* *LetsUp | Update* 📍 देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 'SPG' सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय. 👉 सगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर यापुढे मनमोहन सिंग 'झेड प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 📝 *गृहमंत्रालयाने परिपत्रकात म्हटले* : ● सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आधारावर घेतला आहे. ● ठराविक काळानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जातो. ● ही सामान्य प्रक्रिया आहे. याअंतर्गत सुरक्षा कमी करणे किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. 🤔 *SPG सुरक्षा म्हणजे काय?* : ● SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ही सुरक्षा देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते. ● देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारे हे उच्च दर्जाचे पथक आहे. ● आता देशातील केवळ 4 जणांच्या सुरक्षेसाठी हे पथक असेल. ● यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे. 💫 सरकारच्या या निर्णयावरून वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup