es
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; निर्बंधांबाबत मोठा निर्णय घेणार LetsUpp l Trending 🦠 राज्यात 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी अद्यापही निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 📍 त्यावेळी राज्यात काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबतचे परिणाम आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 💁‍♂️ यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 💁‍♀️ राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन-आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. 👉 टास्क फोर्सचे डॉ. जोशी यांनी हॉटेल व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, वातानुकूलन प्रणाली बंद करून हवेशीर व्यवस्था करणे, स्वच्छतागृहांची रचना याबाबतही सूचना केल्या. To know more click here https://letsup.app.link/rvUIwMOkvib

आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी LetsUpp l Bulletin ● कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी दोन दिवसात निर्णय होऊ शकतो; राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची महत्वपूर्ण माहिती ● केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता यापुढे या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असणार आहे ● राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे ● राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे अपघात, सुदैवाने राज्यपाल कोश्यारी सुरक्षित ● मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली होती. मात्र, काही वेळानंतर धोनीच्या अकाऊंटची टिक पुन्हा देण्यात आली ● केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी घेतली सीरमचे सीईओ अदार पूनावालांची भेट; कोविशील्ड लसीच्या पुरवठ्याबद्दल करण्यात आली चर्चा ● कोरोना लस घेतल्यानंतर, डेल्टा व्हायरसच्या संसर्गाचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो; ब्रिटीश रिसर्चर्सचा दावा ● संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षामुळे स्थगित होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा येत असल्याची खंत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली ● तुम्ही राजीनामा द्या, अशीही जनतेची मागणी”; ‘खेलरत्न’च्या नामांतरावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र ● विविध मागण्यांसाठी होमगार्डचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर करणार ठिय्या आंदोलन To know more click here https://letsup.app.link/Eo0uiMQevib

विमलबाई ठरल्‍या बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराच्‍या पहिल्‍या मानकरी LetsUpp l Trending 🥇 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ वर्डी (ता.चोपडा) येथील विमलबाई हिरामण भिल यांना जाहीर झाला आहे. 💁‍♂️ वर्डी शिवारात झालेल्या विमान अपघातात जखमी तरूणीसाठी अंगावरची साडी सोडून त्याची झोळी बनवून रूग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा विद्यापीठाच्यावतीने त्यांचा ११ ऑगस्टला सन्मान करण्यात येणार आहे. विमलबाईंची अशी होती कामगिरी 🥇 विद्यापीठाच्यावतीने यावर्षीपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. १६ जुलैला एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते. ✈️ या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुर्जर ही जखमी झाली. ५० फुट खोल दरीत हे विमान कोसळले. डोंगराळ भाग असल्यामुळे रूग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नव्हती. 🤕 आदिवसाी बांधवांनी विमानाची काच फोडून या तरूणीला बाहेर काढले. यावेळी ३ किमी लांबवर असलेल्या रूग्णवाहिकेजवळ तिला तात्काळ नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे विमलबाई भिल यांनी तात्काळ अंगावरची साडी काढून त्याची झोळी तयार करण्यासाठी दिली. त्यामुळे तात्काळ रूग्णवाहिकेजवळ आणून इस्पितळात दाखल करता आले व या तरूणीचा प्राण वाचला. To know more click here https://letsup.app.link/iynqORH4uib

आता व्हॉट्सअ‍ॅपवर एकदा पाहिलेला मेसेज ऑटो होणार डिलिट, नवं फिचर लाँच LetsUpp | Trending 🌐 इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी View Once हे नवं फिचर लाँच केलं आहे. ⚡ या फीचर अंतर्गत, कोणताही व्हिडिओ किंवा फोटो युजर्स View Once मोड अंतर्गत पाठवू शकतात. 👉 या मोडद्वारे पाठवलेले कोणतेही फोटो आणि व्हिडिओ फक्त एकदाच शेअर केले जाऊ शकतात. 📍 एकदा फोटो ओपन केल्यानंतर, युजर्स तो पुन्हा पाहू शकणार नाहीत आणि ते इतरांना शेअर करू शकणार नाहीत. 👉 यासंदर्भात कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. ⚡ तुम्हाला हे फिचर वापरायचे असेल तर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे. 📍 यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ते अपडेट करू शकतात. या नवीन फीचरसह, इन-अ‍ॅप मेसेज नोटिफीकेशनची स्टाईलदेखील बदलली आहे. 📌 जेव्हा तुम्ही हा फोटो किंवा व्हिडिओ पाहताच तुम्हाला त्या फोटोऐवजी Opened असा मॅसेज दिसेल आणि तो फोटो किंवा व्हिडिओ गायब होईल. To know more click here https://letsup.app.link/smEpAQIRuib

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना किती घातक?; नवीन संशोधनातून आली 'ही' माहिती समोर! LetsUpp | Trending केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठेल असाही अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोललेत जात आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा अहवाल एका मासिकात प्रसिद्ध झाला आहे. 'या' संशोधनात काय आढळले? : ● ज्या मुलांना कोरोना होतो ती सहा दिवसांत बरी होतात. ● चार आठवड्यांहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे राहिलेल्या मुलांचे प्रमाण अवघे ४ टक्के होते. ● लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अल्पकाळ टिकत असल्याचे अहवालात नमूद आहे. ● १७३४ मुलांचा डेटा या अभ्यासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आला होता. हे संशोधन कोणी केले? ● लंडन येथील किंग्ज कॉलेज येथील संशोधकांनी ‘झो कोविड’ स्टडी स्मार्टफोन ॲपचा वापर करून लहान मुलांवर कोरोनाच्या लक्षणांचा अभ्यास केला. ● या ॲपवर १७ वर्षांपर्यंतच्या अडीच लाख मुलांचा डेटा उपलब्ध होता. संशोधकांच्या चमूने १ सप्टेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संकलित करण्यात आलेल्या अहवालांवर लक्ष केंद्रित केले. 'या' संशोधनाचा निष्कर्ष काय? ● लहान मुलांमध्ये कोरोना फार काळ न टिकता सरासरी सहा दिवसांत बरा होतो. ● कोरोनाची तीव्र बाधा होत नाही. सौम्य लक्षणे लहान मुलांमध्ये आढळतात. ते लवकर बरे होऊ शकतात. ● कोरोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले चार आठवड्यांपर्यंत बरे झाले. To know more click here https://letsup.app.link/vXnHxTNJuib

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतर, पंतप्रधानांची घोषणा LetsUpp | Trending ▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. ▪️ यासंदर्भात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. ▪️ काही खेळाडूंनी टोकियोमध्ये शानदार कामगिरी करत पदक देखील जिंकून दिले आहेत. ▪️ दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा निवड समितीमार्फत भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येत होता. ▪️ आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने देण्यात येणार आहे. To know more click here https://letsup.app.link/UQYw3UDLuib

आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी LetsUpp l Bulletin ● मुंबईत लवकरच म्हाडाच्या 8 हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची महत्वपूर्ण घोषणा ● गेल्या 7 वर्षांत 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगाराबद्दल एक शब्दही बोलत नाहीत- काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र ● कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी मंजूर; केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती ● लसीकरण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासासाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला ● राज्यात जुलै महिन्यात तब्बल 15 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती ● केंद्राकडे संपूर्ण देशासाठी लस उत्पादन करण्याची क्षमता नाही”, नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जींनी सरकारला सुनावले! ● राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तपासासाठी सरकार कागदपत्र देत नाही, सीबीआयचा मुंबई हायकोर्टात दावा ● कुस्तीपटू रविकुमार दहियाने जिंकलेल्या ऑलम्पिक रौप्य पदकालाही सुवर्ण झळाळी; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार ● कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी निधी उपलब्ध; प्रस्ताव तात्काळ सादर करा, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन ● उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला To know more click here https://letsup.app.link/UdZlZ1Kztib

photo content

नरेंद्र फिरोदिया आणि स्वप्निल जोशी घेऊन येत आहेत भारताचा आपला ओटीटी प्लॅटफॉर्म LetsUpp l Trending 🤝 भारतीय मनोरंजनाच्या इतिहासातील संपूर्णपणे खास भारतीय पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच लॉन्च होत असून नरेंद्र फिरोदिया आणि अभिनेता स्वप्निल जोशी हा नवीन प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत. 📣 नरेंद्र फिरोदिया आणि स्वप्नील जोशी यांनी आज या महत्त्वाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. 💁‍♂️ नरेंद्र फिरोदिया यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये लेट्स फ्लिक्स या प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली होती. तर त्याच वेळी अभिनेता स्वप्नील जोशी हे टामोरा डीजीवर्ल्ड या त्याच्या कंपनीच्या मार्फत नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मला लॉन्च करण्यासाठी सज्ज झालेला होता. आता नरेंद्र फिरोदिया आणि स्वप्नील जोशी एकत्र मिळून एकच प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहेत. 👍 लेट्स फ्लिक्स आता टामोरा डीजीवर्ल्ड या प्लॅटफॉर्ममध्ये विलीन करण्यात आला असून, टामोरा जीवन हा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म आता लवकरच लॉन्च होईल. 💫 भारतातील समृद्ध टॅलेंट, आपली संस्कृती, आपले भावनाप्रधान विश्व या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगासमोर मांडले जाणार आहे. To know more click here https://letsup.app.link/GUfTpKgatib

photo content

बीड जिल्हाधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी; न्यायालायने दिले आदेश LetsUpp | Beed ⚡ बीड जिल्ह्यात नरेगामध्ये गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले होते. 🏛️ मात्र, त्यानंतरही चौकशीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानी दिले आहेत. 💁🏻‍♂️ या प्रकरणी नवीन जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने सूचना देण्यात येतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 📍 न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना बदलण्याच्या संदर्भाने आदेश होण्याची घटना क्वचितच मानली जात आहे. 🤔 नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर 👉 बीड जिल्ह्यात 2011 ते 2019 या कालावधीमध्ये नरेगा मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचे सांगत चौकशीसाठी राजकुमार देशमुख यांनी मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. 👉 यावर न्यायालयाने 21 जानेवारी 2019 रोजी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिले होते. मात्र, अनेक दिवस यावर कारवाई झाली नाही. 👉 तसेच जिल्हाधिकारी जगताप यांच्या कार्यकाळात चौकशी होईल असे वाटत नाही, असे स्पष्ट करत त्यांची तातडीने बदली करावी, तसेच न्यायालयीन आदेशाची अवमानना केल्याप्रकरणी नोटीस बजावावी,असे आदेश दिले. To know more click here https://letsup.app.link/2qxbQlP1sib

photo content

अकरावीच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी! LetsUpp | Trending ⚡ अकरावी प्रवेश परीक्षेचे स्वरूप शिक्षण विभागाने उच्च न्यायालयासमोर मांडले असून या परीक्षेसाठी १७५ पैकी १०० प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. 👉 इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही सामावून घेण्यासाठी प्रश्नसंख्या वाढवण्याचा पर्याय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. प्रत्येक मंडळाने दोनशे प्रश्न राज्यमंडळाकडे सादर करावेत, अशी सूचना न्यायालयाने दिली आहे. 📝 अकरावी प्रवेश परीक्षेसाठी सगळ्या मंडळांच्या अभ्यासक्रमांवर आधारित एकच प्रश्नपत्रिका तयार करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारला केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे बुधवारी भूमिका स्पष्ट करण्यात आली. 🤔 अकरावी प्रवेश परीक्षेचे स्वरूप कसे असणार? : ● प्रवेश परीक्षेसाठी प्रत्येकी २५ गुणांचे सात गट असतील. त्यातील चार गट राज्य मंडळाच्या गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर आधारित असतील, तर उर्वरित तीन गटांमध्ये अन्य मंडळांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न असतील. ● या सात गटांपैकी कोणत्याही चारमधून प्रश्न विचारण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. तसेच विद्यार्थ्यांना १७५ पैकी १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट केले. ● दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य मंडळाच्या दहा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अन्य मंडळांच्या केवळ ३५ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केल्याची माहिती सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली. To know more click here https://letsup.app.link/qqtArp6Vsib

एमएचटी सीईटीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी! LetsUpp | Trending ⚡ इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक
एमएचटी सीईटीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी! LetsUpp | Trending ⚡ इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीची परीक्षा २६ ऑगस्टपासून होणार आहेत. 📝 बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी ४ ते १० सप्टेंबर आणि १४ ते २० सप्टेंबर अशा दोन संत्रात होणार आहे. 👉 यंदा एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून तब्बल ४ लाख ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. 📍 दरम्यान, यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. गतवर्षी ५ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा हा आकडा चार लाख सहा हजार इतकाच आहे. To know more click here https://letsup.app.link/GzWnbCiTsib

🇮🇳 टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरने रचला इतिहास; कांस्यपदक जिंकलं LetsUpp | Trending 💫 महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. 🇮🇳 लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं. 🥇 आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळालं नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आसामच्या छोट्या खेड्यातून सुरु झाला प्रवास 🏆 आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. 🏠 भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. लवलीनाच्या दोन बहिणीही बॉक्सिंगमध्ये 👩🏻 लवलीना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. 👉 लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किकबॉक्सिंगमध्ये आली. To know more click here https://letsup.app.link/W8NA5LRnrib

VID-20210804-WA0000.mp42.72 MB

पुण्यातील टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा LetsUpp | Trending ⚡ पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरात एका मद्यधुंद तरुणीने मंगळवारी रात्री भररस्त्यात अनेक वाहनांना अटकाव करत धिंगाणा घातला. 👉 काही नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत कळविल्यानंतर तरुणीला पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला हटवले आणि पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं? : ● पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरातील प्रकार सर्वांनाच धक्का देणारा होता. दारूच्या नशेत असलेली एक तरुणी रस्त्याच्या मधोमध येऊन धिंगाणा घालत होती. ● रस्त्यावर बसत तिने गाड्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगावरून गाडी न्या असेही ती ओरडत होती. काहींनी तिला रस्त्यावरून बाजूला जाण्यासाठी विनंती केली मात्र ती ऐकायला तयार नव्हती. ● त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पोलीस आले आणि मग या तरुणीला गपगुमान त्यांच्यासोबत जावं लागलं. ही तरुणी कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. To know more click here https://letsup.app.link/1w7Anf84qib