es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Ir al canal en Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Mostrar más
6 624
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
Lets Up News Updates 1. उत्तर प्रदेश - उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात, मृतांची संख्या वाढली, 23 प्रवासी मृत्युमुखी तर 80 पेक्षा जास्त जखमी 2. लडाख - घुसखोरीचा दावा फेटाळणाऱ्या चीनचा खोटारडेपणा पडला उघडा, भारत आणि चीनच्या सैनिकात धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ व्हायरल 3. उत्तर प्रदेश - रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून 3.5 लाख रुपये, तर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर --------------------------------------------- आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horoaug20 --------------------------------------------- 4. पाटणा - बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील गट सुमारे चार वर्षांनंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी 5. मुंबई - गुन्हे सिद्ध होऊन दोषींना शिक्षा होण्यास विलंब होत असल्यामुळे या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात 24 जलदगती न्यायालये स्थापन होणार 6. मुंबई - राज्याच्या काही भागात मान्सून पुन्हा सक्र‌िय, कोकणातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस --------------------------------------------- आजचे दिनविशेष... http://bit.ly/dinvishesh20 --------------------------------------------- 7. कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला भूकंपाचा सौम्य धक्का, भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल, रात्री 10.25 मिनिटांनी कोल्हापूर, सातारा, सांगली भूकंपाने हादरले 8. बारामती - आपण एखादा विषय हातात घेतल्यास त्याला कोणी विरोध करत नाही - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 9. मुंबई - डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तींचे मारेकरी कधी पकडले जाणार, ‘#JawabDo’ सोशल मीडियात ट्रेडिंगमध्ये 10. मुंबई - मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 95 वॉर्डसाठी निवडणूक आज, एका वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने 94 वॉर्डसाठीच मतदान होणार 11. मुंबई - युवराज सिंगने नुकतीच शाहरूख खानची भेट घेतली, या भेटीवरून युवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते 12. श्रीलंका - तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ आजपासून होणार्‍या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👉 ऑनलाईन की ऑफलाईन एमबीए? Lets Up Career Katta जर आपण नोकरीत असाल सोबत कौटुंबिक जबाबदारीही असेल तर वेळ कमी असतो आणि त्यातही आपल्याला एमबीए करण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन पर्याय निवडता येऊ शकतो. दुसरीकडे आपल्याकडे वेळ आहे आणि वयही कमीच असेल तसेच एका करिअर क्षेत्रातून दुसर्‍या करिअरच्या क्षेत्रात जायचे असेल तर नियमित एमबीए करण्याचा निर्णय चांगला ठरू शकतो. हे दोन्ही अभ्यासक्रम हे गरज, अनिवार्यता आणि परिस्थितीच्या आधारावर निवडता येऊ शकतात. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup वरील बाबी पाहता आपल्याला कोणते एमबीए करायचे आहे. हे आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार ठरविणे गरजेचे आहे. बहुतांशी मंडळी नियमित एमबीए करण्यावर भर देतात, परंतु काही गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात. अलीकडच्या काळात ऑनलाईन एमबीएची लोकप्रियता वाढत चालली आहे. त्यामुळे आपण थोडा विचार करा आणि आपल्याला ऑनलाईन की ऑफलाईन एमबीए करायचे हे, निश्‍चित करा. काही प्रश्‍न स्वतःलाच विचारून त्याची उकल करा आणि ठरवा. 👉 ऑनलाईन एमबीए करण्यापुर्वी विचार करा : 1) जर आपण एखाद्या करियरमध्ये अडकला असाल, नोकरी सोडण्याच्या तयारीत असाल आणि त्याबरोबर कोणतीच तडजोड करायची नसेल तसेच कौटुंबिक जबाबदारीही असेल तर अशावेळी सध्या कोणत्या क्षेत्राला आणि एमबीएला मागणी आहे, त्यानुसार आपण त्याची निवड करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. 2) काही ऑनलाईन एमबीए अभ्यासक्रम राज्याबाहेर असतात तर काही देशाबाहेरील. त्यांची विश्‍वासार्हता, इतिहास आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर असणारं भविष्य हे तपासले पाहिजे. या बाबी लक्षात घेऊन एमबीएच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा विचार केला पाहिजे. 👉 नियमित एमबीए करण्यापूर्वी विचार करा : 1) जर आपल्याला बदल हवा असेल किंवा अन्य क्षेत्रात आपल्याला करिअर घडवायचे असेल आणि आपल्यासोबत वय आणि वेळ असेल तर आपण नियमित एमबीए करू शकतो. 2) आपण चांगल्या मार्काने एमबीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो का? 3) नियमित एमबीए करताना विषय निवड हा खूप महत्वाचा भाग असतो. आपल्याला असणारी आवड आणि भविष्यात असणारी मागणी याचा सारासार विचार करून विषयांची निवड करायला हवी. वरील सर्व प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे आपल्याकडे असतील तर आपण एमबीए करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकता. 👉 ऑनलाईन एमबीएचे फायदे : 1) कोणतीही नोकरी न सोडता, जबाबदारी न झटकता आपण घरातच ऑनलाईन एमबीएचा अभ्यास करू शकतो आणि पदवी घेऊ शकतो. 2) नियमित एमबीए अभ्यासक्रमाप्रमाणेच प्रतिष्ठित ऑनलाईन एमबीए अभ्यासक्रमात करिअर काऊन्सिलिंग, मँटोरशिप आणि नेटवर्किंग सारख्या अनेक पर्यायांचा समावेश होतो. 3) प्रत्येक वेळी ऑनलाईन एमबीए अभ्यासक्रम हा कोणत्याही नियमित एमबीए अभ्यासक्रमाच्या तुलनेत परवडणारा अभ्यासक्रम राहिलेला आहे. 👉 नियमित एमबीएचे फायदे : 1) करिअरमध्ये एक चांगली पार्श्‍वभूमी तयार करण्यासाठी नियमित एमबीए हातभार लावते. करिअर स्वीच ओव्हर केले तर एमबीएमुळे अन्य क्षेत्रात स्थिर होण्यास फारशा अडचणी येत नाहीत. नामांकित संस्था असेल तर रोजगाराची अधिक संधी मिळते. 2) नियमित एमबीए करताना अ‍ॅकेडमिक सत्रात आपण ज्या पद्धतीने सोशल नेटवर्किंग करतो, ते नेटवर्किंग आपल्याला दिर्घकाळासाठी करिअरला उपयोगी ठरते. त्याचा वेळोवेळी फायदा जाणवतो. प्राध्यापक, सहकारी मित्र-मैत्रिणी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहिल्याने करिअरला पूरक दिशा मिळू शकते. 3) जर आपल्याला स्वतःचा उद्योग करायचा असेल तर आणि तसा विचार करत असाल तर आपल्याला आवश्यक असणारे कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञान नियमित एमबीएद्वारे मिळते. तसेच व्यवसाय सुरू करताना कमी अडचणी येऊ शकतात. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👉 व्हॉटस्अॅप वेबवरही स्टेटस अपडेट Lets Up Techno Katta लवकरच व्हॉटस्अॅप वेब वापरणार्‍यांना स्टेटस अपडेट करण्याची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. आधी हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले होते. आता मात्र संगणकावरून व्हॉटस्अॅप वापरतांनाही याचा उपयोग करता येईल. या संदर्भात @WABetaInfo या ट्विटर खात्यावरून माहिती देण्यात आली आहे. सर्व युजर्सला हे फिचर येत्या काही दिवसांत मिळणार आहे. मात्र याचे स्थान नेमके कुठे असेल याचा उल्लेख मात्र यात करण्यात आलेला नाही. व्हॉटस्अॅप वेबच्या 0.2.4430 या अपडेटमध्ये ही सुविधा मिळणार आहे. 👉 असुस झेनफोन मालिकेतील 6 स्मार्टफोन 1) असुस झेनफोन 4 व झेनफोन 4 प्रो हे दोन्ही स्मार्टफोन अतिशय दर्जेदार फिचर्सनी सज्ज आहेत. यात मेटल बॉडी प्रदान करण्यात आली आहे. यात कॅमेरा वगळता अन्य फिचर्स सारखे आहेत. डिस्प्ले : 5.5 इंच आकारमानाचा फुल एचडी क्षमतेचा 2.5 डी रॅम : 6 जीबी स्टोअरेज : झेनफोन 4 मध्ये 64 व 128 जीबी, प्रो मॉडेल : 128 जीबी बॅटरी : अनुक्रमे 3,000 आणि 3,600 मिलीअँपिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल्स, प्रो मॉडेलमध्ये याला 2 एक्स झूमची सोबत असेल. 2) असुस झेनफोन 4 सेल्फी व झेनफोन 4 प्रो कॅमेरा : झेनफोन 4 मध्ये 20 मेगापिक्सल्स तर झेनफोन 4 सेल्फी प्रोमध्ये 24 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा डिस्प्ले : 5.5 इंच आकारमान आणि प्रो मॉडेलमध्ये फुल एचडी डिस्प्ले रॅम : दोघांची रॅम 4 जीबी बॅटरी : 3,000 मिलीअँपिअर 3) असुस झेनफोन 4 मॅक्स व झेनफोन 4 मॅक्स प्रो बॅटरी : या दोन्ही मॉडेलमध्ये 5,000 मिलीअँपिअर कॅमेरा : झेनफोन 4 मॅक्समध्ये 13 मेगापिक्सल्स, प्रो मॉडेलमध्ये 16 मेगापिक्सल्स ड्युअल कॅमेरा डिस्प्ले : दोन्हींमध्ये 5.5 इंच आकारमान आणि फुल एचडी रॅम : दोघांची रॅम 4 जीबी स्टोअरेज : 16/ 32/ 64/ 128 जीबीचे पर्याय 👉 पॅनासोनिक एल्युगा आय 2 अ‍ॅक्टीव्ह 1 जीबी रॅम : व्हेरियंट मूल्य 7,190 रूपये 2 जीबी रॅम : व्हेरियंट मूल्य 7,990 रूपये डिस्प्ले : 5 इंच आकारमान आणि 1280 बाय 720 पिक्सल्स प्रोसेसर : क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी 6737 स्टोअरेज : इनबिल्ट 16 जीबी, मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढवू शकता बॅटरी : 2200 मिलीअँपिअर O.S : अँड्रॉइड नोगट आवृत्ती रंग : गोल्ड, रोझ गोल्ड आणि ग्रे फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सल्स मुख्य कॅमेरा : 8 मेगापिक्सल्स इतर फिचर : फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्कसह फोर-जी, ब्ल्यू-टुथ, जीपीएस, मायक्रो-युएसबी 2.0, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील. 👉 मायक्रोमॅक्स इव्होक ड्युअल नोट हे मॉडेल 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोअरेज तसेच 4 जीबी रॅम व 32 जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध किंमत : 9,999 रूपये खरेदी : 21 ऑगस्टपासून खरेदी करता येणार डिस्प्ले : 5.5 इंच आकारमान आणि 1920 बाय 1280 पिक्सल्स प्रोसेसर : ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटी 6750 कॅमेरा : 258 सेन्सरने सज्ज असणारे 13 व 5 मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे O.S. : अँड्रॉइड 7.0 नोगट आवृत्ती बॅटरी : 3,000 मिलीअँपिअर (Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

_*Lets Up News Updates*_ 1. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक जवान (मुद्दसर अहमद) शहीद, 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू 2. नवी दिल्ली - जिऑलजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी भारतीय द्विपकल्पीय समुद्रात लाखो टनाचे किंमती धातू आणि खनिज असल्याचा लावला शोध 3. नवी दिल्ली - उपराष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून व्यंकय्या नायडू यांचे नाव निश्चित : सूत्र 4. नवी दिल्ली - याकूब मेमनच्या फाशीस विरोध करणाऱ्या गोपालकृष्ण गांधी यांना सोनियांनी उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिलीय : शिवसेना खासदार संजय राऊत 5. भारताकडून 7 महिन्यांत 542 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकिस्तानचा कांगावा, भारतामुळे शांतता धोक्यात आल्याचा दावा 6. मुंबई - लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला (सलीम खान) मुंबई विमानतळावर अटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने केली कारवाई 7. आमदार, खासदार बनण्यासाठी शिक्षणाची अट बंधनकारक करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 8. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 32074.78, निफ्टी : 9915.95, सोने भाव : 28,113 (प्रतितोळा), चांदी : 37,365 (प्रतिकिलो) 9. मुंबई - साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय? हायकोर्टाचा सवाल, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश 10. महागडे फोन बनवणारी Vertu कंपनी बंद होण्याची शक्यता, मीडिया रिपोर्टमध्ये दावा 11. बीजिंग - चीनमधील लष्कर जवानांनी तिबेटमध्ये फायरिंगचा सराव अभ्यास केला 12. नवी दिल्ली - टीम इंडियाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी क्षेत्ररक्षण सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉण्टी ऱ्होड्सचे नाव चर्चेत 13. श्रीलंका दौरा, दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी टीम इंडियामध्ये शिखर धवनचा समावेश 14. चेन्नई - मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तृप्ती भोईर अडकली लग्नाच्या बेडीत, दाक्षिणात्य संगीतकार टी सतीश चक्रवर्तीसोबत बांधली लगीनगाठ _*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/NVfksk

👉 30 जूनपर्यंत पॅनकार्ड क्रमांक देणे अनिवार्य Let's Up Current Affair बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत पॅन नंबर जमा करण्याची सूचना बँकाकडून जारी करण्यात आली आहे. अन्यथा तुम्ही तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. ज्या खातेदारांकडे पॅनकार्ड नाही त्यांना फॉर्म-60 जमा करावा लागणार आहे. दरम्यान, बँक खाती पॅनकार्ड क्रमांकाशी जोडून घेण्यास बँकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र यामध्ये मुदतवाढ करून 30 जूनपर्यंत तुम्ही पॅन क्रमांक बँकेत जमा करू शकता. यासंदर्भात बँकांनी आपल्या ग्राहकांना पत्र पाठवून पॅनकार्ड क्रमांक किंवा फॉर्म 60 अ जवळच्या शाखेत जमा करण्यास सांगितले आहे. या पत्रांमध्ये प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात बँक खातेदारांसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 जगातील मुस्लीम सर्वात मोठा धर्म होणार? हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये 2055 ते 2060 यादरम्यान अचानक घसरण होणार असून, 2075 पर्यंत जगभरात मुस्लीम सर्वात जास्त होणार असल्याचा दावा प्यू रिसर्च सेंटरच्या अहवाल करण्यात आला आहे. पुढील 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये मुस्लीम महिला मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत ख्रिश्चन महिलांना मागे टाकतील. त्यामुळे 2075 मध्ये इस्लाम हा जगातील सर्वात मोठा धर्म होणार आहे. 2055 ते 2060 या कालावधीत मुस्लीम मुलांची संख्या ख्रिस्ती मुलांच्या तुलनेत 60 टक्क्यांनी अधिक असणार आहे. 2015 च्या लोकसंख्येनुसार जगातील सर्वाधिक 94 टक्के हिंदू राहणाऱ्या भारतामध्ये प्रजननाच्या घटत्या दरामुळे 2055 ते 2060 मध्ये जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या 2010 ते 2015 या दरम्यान जन्म घेतलेल्या मुलांपेक्षा 3.3 कोटींनी कमी असेल, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. 👉 पेट्रोल, डिझलचे दर दररोज बदलणार? जागतिक घडामोडी आणि त्याचे खनिज तेलाच्या दरावर होणारे परिणाम याचा अभ्यास करुन इंधनाचे दर दररोज बदलता येण्याबद्दल सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कंपन्यांकडून विचार सुरु आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांकडून आता प्रत्येक दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जाऊ शकतात. देशभरातील 90 टक्के इंधन बाजारावर केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कंपन्यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे याचे मोठे आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलल्यास त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - मध्य प्रदेश येथील भिंड येथे चाचणी घेण्यात आलेल्या मतदान यंत्रात कोणत्याही प्रकारचा फेरफार अथवा बिघाड आढळला नाही - निवडणूक आयोग 👉 नवी दिल्ली - भारतात पेट्रोल, डिझेलचे दर रोज बदलणार?, आंतरराष्ट्रीय दर्जा अंगीकारण्यासाठी तेल कंपन्या घेऊ इच्छितात रोज आढावा बैठक 👉 नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने बँक खाती पॅन किंवा फॉर्म 60 शी जोडण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली 👉 नवी दिल्ली - दुसऱ्याची शेती कसणाऱ्या आणि संबंधित शेती मालकाशी करार केलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांनाही पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळणार 👉 नवी दिल्ली - गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राजस्थान सरकारला बजावली नोटीस 👉 तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापा, 4.5 कोटी रुपयांची रोकड, 85 कोटी रुपयांचे सोने आणि इतर वस्तू जप्त (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 स्टॉकहोम - स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे भारतीय दूतावासापासून केवळ 100 मीटर अंतरावर ट्रक दुकानात घुसला, या घटनेत 3 जणांचा मृत्यू 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी ‘युपी’ मॉडेलचा अभ्यास करण्याची नौटंकी करणाऱ्या ‘युती’चे मॉडेल मोडीत काढण्याची ‘योग्य वेळ’ - राधाकृष्ण विखे पाटील 👉 मुंबई - निलंबनाची कारवाई ही आमच्यातल्या काही कानफुक्या लोकांनी केली, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी मिळून ही करवाई केली - सुरेश धस 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - यंदा शेतक-यांच्या उत्पन्नात 40 हजार कोंटीची वाढ, हमीभावाचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतात - मुख्यमंत्री 👉 मुंबई - राष्ट्रगीताविना पाकिस्तानमध्ये दंगलचे प्रदर्शन करण्यास नकार देणाऱ्या आमिर खानसाठी महाराष्ट्र सरकारने पारित केला धन्यवाद प्रस्ताव 👉 नागपूर - पोलिसांकडून पोलिसांसाठी चालविण्यात येणा-या जुगार अड्डयावर गिट्टीखदान पोलिसांनी धाड घालून दोन पोलिसांसह चौघांना अटक 👉 मुंबई - एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष करण्यात आला 👉 ठाणे - बोरिवली बसमध्ये मद्यपीकडून गोळीबार, एक महिला जखमी, महिलेस वेदांत हॉस्पिटलमध्ये केले दाखल तर आरोपी ताब्यात 🎯 खेळ घडामोडी : 👉 कोलकाता नाइट रायडर्सकडून गुजराय लायन्सचा धुव्वा, 10 विकेट्सनी मिळवला विजय, ख्रिस लेन, गौतम गंभीरची तुफानी फटकेबाजी 🎯 राशीभविष्य : आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/2nMZ027 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी'मध्‍ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी एकत्र दिसणार असून या चित्रपटाची कथा दिल्‍ली, लंडन आणि काश्‍मीरच्‍या सभोवताली फिरते (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 कशी कराल मुलाखतीची तयारी? Let's Up Comp. Exam सध्याला सर्वत्र परीक्षांचा कालावधी चालू आहे. त्यात नुकताच राज्यसेवेचा पेपर झाला असून अनेक जण पुढच्या टप्प्याची तयारी करत असतील. यातील मुलाखत हा एक महत्वाचा टप्पा असतो पण प्रत्येकाची मुलाखत वेळेनुसार, प्रसंगानुसार वेगवेगळी असते. मात्र मुलाखतीची तयारी करताना खालील काही गोष्टी लक्षात घेतल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 👉 आपले नाव, नावाचा अर्थ, जन्मतारीख, जन्मतारखेचा ऐतिहासिक संदर्भ, गावाची माहिती, शाळा, महाविद्यालयाची माहिती, शिकत असलेल्या संस्थेची माहिती, वडिलांच्या व्यवसायाची माहिती अशा गोष्टींची तयारी केल्यास फायदा होतो. 👉 ज्या ठिकाणहून आला आहात त्या ठिकाणच्या समस्या त्यावर उपायोजना तसेच त्या ठिकाणचा इतिहास इ. विषयांची तयारी करावी. 👉 जे विद्यार्थी व्यावसायिक महाविद्यालयांत शिक्षण घेतात, त्यांनी ते क्षेत्र सोडून राज्यसेवेत का येऊ इच्छितात, याचे सकारात्मक उत्तर तयार करावे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 तुम्ही ज्या विषयात पदवी घेतली आहे त्यासंबंधी नक्कीच प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर कुठे नोकरीला असाल किंवा प्रशासनात काम करत असाल तर त्या संबंधित विभागाची माहिती मिळवा कारण त्या संदर्भात देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. 👉 बऱ्याच वेळा मुलाखती दरम्यान, एखादी परिस्थिती देऊन त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रश्नांची यादी तयार करून सकारात्मक उत्तरे तयार ठेवावीत. 👉 पसंतीक्रमावर असलेल्या कमीत कमी पहिल्या पाच सेवांची माहिती, त्या खात्याची रचना, ती सेवा नेमकी काय आहे? इ. घटकांची तयारी करावी. 👉 महिला उमेदवारांना महिलांच्या समस्या त्यावर उपाय या संदर्भात काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रश्नांची तयारी करावी. 👉 तुमचा छंद, तुमची आवड यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादा छंद तुम्ही अर्जमध्ये दिलेला असेल तर त्यासंबंधित तयारी करा. 👉 मुलाखतीच्या दिवशी वृत्तपत्रांतील महत्त्वाच्या बातम्या किमान ठळक बातम्या वाचाव्यात. याबरोबरच मुलाखतीला जाताना अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांची माहिती ठेवावी. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 जिओकडून समर सरप्राईज ऑफर मागे! Let's Up Techno Katta गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम सेक्टरमध्ये धुमाकूळ घालणा-या रिलायन्स जिओला ट्रायने एक जोरदार धक्का दिला आहे. ट्रायने दिलेल्या आदेशानुसार रिलायन्स जिओला समर सरप्राईज ऑफर मागे घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जिओच्या प्राईम मेंबर्सना मिळणारी तीन महिन्यांची वाढीव सेवा घेता येणार नाही. जिओने समर सरप्राईज ऑफर लॉन्च करत पुन्हा ग्राहकांना 3 महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा देण्यात येईल असे जाहीर केले होते. पण ट्रायने जिओला ही ऑफर मागे घेण्याची सूचना केल्यानंतर रिलायन्सकडून ही योजना मागे घेण्यात आली आहे. मात्र कंपनीनं यापूर्वीच समर सरप्राईज ऑफर घेतलेल्या ग्राहकांना पुढील 3 महिने जिओकडून मोफत सेवा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 रिलायन्स जिओ 4G लॅपटॉप बनवणार? रिलायन्स जिओ सध्या लॅपटॉप लॉन्च करण्याच्या तयारीत असून या लॅपटॉपमध्ये 4G सिमसाठी खास जागा असेल. तसेच याच डिझाईन अॅपलच्या मॅकबुकसारखं असेल अशी माहिती समोर येत आहे. जिओ लॅपटॉपचा स्क्रीन 13.3 इंचाचा संपूर्ण एचडी असेल. एचडी व्हिडीओ कॉलिंग कॅमेऱ्यासोबतच, चिकलेट कीबोर्ड आणि मॅग्निशयम एलॉय बॉडी दिली जाईल. लॅपटॉप थंड राहावा, यासाठी लॅपटॉपमध्ये कूलिंग फॅनही लावला जाईल. क्वार्ड कोअर इंटेल प्रिमियम प्रोसेसर आणि 4 जीबी रॅमसोबतच कनेक्टिव्हिटीमध्ये चांगले फीचर्स पाहायला मिळणार आहेत. 4G, LTE, ब्लूटूथ, यूएसबी पोर्टही दिले जाईल. टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने आधीच प्रस्थापित कंपन्यांना दणका दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जिओ लॅपटॉप आल्यास सध्याच्या लॅपटॉप कंपन्यांमध्ये नक्कीच मोठी स्पर्धा निर्माण होईल. 🎯 ट्विटर लाइट मुळे वाचणार 70 टक्के डेटा जगभरात लोकप्रिय असलेल्या ट्विटर या माइक्रो ब्लॉगिंग साईटने युजर्ससाठी ‘ट्विटर लाईट’ ही सेवा लाँच केली आहे. यामुळे 30 टक्के अधिक वेगाने कंटेंट अपलोड होणार असून युजर्सचा 70 टक्के डेटा वाचणार आहे. ही सेवा ट्विटरने गुगलच्या मदतीने डेव्हलप केली आहे. ट्विटरने भारतात सर्वप्रथम ही सेवा सुरू केली असून त्यानंतर इंडोनेशिया आणि फिलिपाइन्समध्ये लवकरच ही सेवा सुरू केली जाणार आहे. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, गुजराती या सहा भारतीय भाषांसह 42 भाषांमध्ये ट्विटर लाइट उपलब्ध असणार आहे. 🎯 सॅमसंगचा गॅलक्सी J3 स्मार्टफोन लाँच सॅमसंगने भारतात बजेट स्मार्टफोन गॅलक्सी J 3 प्रो लाँच केला आहे. हा स्मार्टफोन फक्त पेटीएमवर उपलब्ध असून याची किंमत 8,490 रुपये आहे. हा स्मार्टफोन गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे. गॅलक्सी J 3 प्रो स्मार्टफोनचे फीचर्स : 👉 5 इंच एचडी 720×1280 पिक्सल डिस्प्ले 👉 क्वॉड-कोर प्रोसेसर व 2 जीबी रॅम 👉 इंटरनल मेमरी 16 जीबी असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. 👉 अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टीम 👉 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा 👉 यामध्ये 2600 mAh बॅटरी देण्यात आली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू-काश्मीर - बटालिक सेक्टरमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे येथील लष्कराची एक चौकी बर्फाखाली दबली, दोन जवान बेपत्ता 👉 नवी दिल्ली - करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) राज्यसभेत मंजूरी, आता 1 जुलैपासून जीएसटी होणार लागू 👉 नवी दिल्ली - देशभरात काळ्या पैशाविरोधात आयकर विभागाकडून छापासत्र, 31 मार्चपर्यंत काळा पैसा जाहीर करण्याची दिली होती मुदत 👉 नवी दिल्ली - 'सर्जिकल स्ट्राइक' कामगिरीसाठी 3 अधिकारी आणि एका सैनिकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्र प्रदान करून गौरव 👉 नवी दिल्ली - खा. रविंद्र गायकवाड यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितल्यास बंदी मागे घेण्यात येईल - एअर इंडिया 👉 नवी दिल्ली - प्राइम मेंबरशिप घेण्यासाठी रिलायन्स जिओने दिलेली 15 दिवसांसाची वाढीव मुदत मागे घेण्याचे ट्रायने दिले आदेश 👉 उत्तर प्रदेश - पोलिसांना 2 महिन्यांपूर्वी जंगलात आठ वर्षाची एक मुलगी सापडली असून माकडांच्या टोळीत राहत असल्याने तिचं वर्तनही माकडांसारखचं आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 चीन - दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशातील दौऱ्यामुळे चीनमधील सरकारी मुखपत्रांतून भारतावर आगपखड, भारताला जशास तसे उत्तर द्यावे, अशा प्रकारची भूमिका मांडली 🎯 राजकीय घडामोडी : 👉 पणजी - माजी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश 👉 मुंबई - उद्धव ठाकरेंसोबत आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली, योग्यवेळी खांदेपालटाचा निर्णय घेऊ असा शब्द उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला 👉 मुंबई - निधीवाटपाबाबत शिवसेनेने स्थापन केलेली 6 सदस्यांची समिती मुख्यमंत्र्यांची घेणार भेट - रामदास कदम यांची माहिती 👉 मुंबई - विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून सुरु होणार 👉 मुंबई - मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी 'मला नेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा' अशा आशयाचं पत्र राज ठाकरेंना पाठवले 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला पत्रकार संरक्षण कायदा विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 👉 अहमदनगर - महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणार्‍या मजुरीत 1 एप्रिलपासून वाढ करण्यात आली असून आता 201 रुपये मजुरी मिळणार 👉 उस्मानाबाद - आगामी काळात होणाऱ्या पंढरपूर, शिंगणापुर, तुळजापुर व येरमाळा येथील चैत्री यात्रेसाठी महामंडळाच्या वतीने 250 बसेसचे नियोजन 👉 लातूर - उदगीर तालुक्यातील तोंडचीर येथील ग्रामसेवकाला तीन हजाराची लाच घेताना अटक, राजेंद्र मुंडे असे ग्रामसेवकाचे नाव 🎯 खेळ घडामोडी : 👉 पुणे - इंडियन प्रीमिअर लीगच्या सलामीच्या लढतीत रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने मुंबई इंडियन्सचा 7 गडी व एक चेंडू राखून पराभव केला 👉 मुंबई - ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटाकावणा-या भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन असोशिएशनच्या रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले 🎯 राशीभविष्य : आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horoapril7 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 नवी दिल्ली - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे 64 व्या नॅशनल फिल्म पुरस्कारांसाठी ज्युरी आपला अहवाल सोपविणार (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 श्रीनगर - दगड फेकणारे तरुण पर्यटनासाठी नव्हे, तर स्थानिक जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर प्रश्न सुटावा, यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होत आहेत - फारुख अब्दुल्ला 👉 नवी दिल्ली - इनकम टॅक्स रिटर्न आणि पॅनकार्डसाठी 1 जुलै 2017 पासून आधार कार्ड बंधनकारक होणार 👉 नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी ‘बराक’ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने दिली मंजुरी 👉 नवी दिल्ली - राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) भांडवल सहा पटींनी वाढवून 30,000 कोटी रुपये करण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत मांडण्यात आले 👉 छत्तीसगड - दोन माओवाद्यांना कोंटा परिसरातून अटक, सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात या माओवाद्यांचा होता सहभाग (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसचे प्रमुख रणनीतीतज्ज्ञ स्टीफन बॅननला राष्ट्रीय सुरक्षा समितीवरून हटवले 👉 बगदाद - इराकमधील टिक्रिट या शहरात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 34 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर 40 च्यावर नागरिक जखमी 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - काँग्रेस पक्षात आपण समाधानी असून भाजपमध्ये जाणार नसल्याचे नारायण राणे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले 👉 मुंबई - यूपी पॅटर्ननुसार एक लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं तर आम्ही स्वीकारणार नाही, शेतक-यांचं पूर्ण कर्ज माफ केलंच पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण 👉 मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला सपा, एमआयएमसह इतर पक्षांचे आमदार उपस्थित, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मात्र आमंत्रणच नाही 👉 मुंबई - शिवसेनेचं विधानपरिषद गटनेतेपद अनिल परब यांच्याकडे, आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, मंत्र्यांचाही खांदेपालट होणार 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रजतमहोत्सवी जयंती साेहळ्याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 14 एप्रिलला नागपुरात होणार 👉 मुंबई - सत्ताधारी पक्षांच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्र्याचा दर्जा, लाल दिव्याच्या गाडीसह सरकारी बंगलाही मिळणार, विधानसभेत विधेयक मंजूर 👉 मुंबई - ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणार्‍या टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या 👉 पुणे - राज्यात स्वाइन फ्लूचे आतापर्यंत 87 रुग्णांचे बळी त्यापैकी पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका मिळून एकूण 31 जणांचा समावेश 👉 सांगोला - चिमणीचा अचानक भडका उडल्याने झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीत संसारोपयोगी साहित्यासह लहान मोठ्या 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू 👉 बीड - पाटोदा तालुक्यात पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विवाहितेचा बुडून मृत्यू, पाणीटंचाईचा जिल्ह्यातील पहिला बळी 👉 नाशिक - बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील डॉ. वर्षा लहाडे यांना आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) नोटीस बजावून स्पष्टीकरण मागणार 🎯 खेळ घडामोडी : 👉 हैदराबाद - आयपीएल 10 च्या सलामी लढतीत सनरायझर्स हैदराबादची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 35 धावांनी मात, युवराज सिंगचे धडाकेबाज अर्धशतक 👉 लंडन - ‘विस्डेन’ क्रिकेटर्स अलमनॅक पुस्तिकेने विराट कोहलीला 2016 या वर्षातील जगातील अव्वल क्रिकेटपटू म्हणून घोषित केले 🎯 राशीभविष्य : आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horoapril6 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 पत्रकार खालिद मोहम्मद यांनी आशा पारेख यांच्यावर लिहिलेल्या 'आशा पारेख, द हिट गर्ल' या आत्मचरित्राचं येत्या 10 तारखेला प्रकाशन (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 Lets Up General Knowledge 1) जी कृषीउत्पादने व्यापार व्यवसायाला, औद्योगिक व्यवसायाला उपयुक्त असतात अशा पिकांना काय म्हणतात? 2) गॅम्बीट, स्टेलमेट, चेकमेट या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 3) हॉकीच्या खेळाच्या मैदानाचं माप काय असतं? 4) 1950 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धाचं यजमानपद कोणत्या देशाने भुषवलं होतं? (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 5) बेल या शास्त्रज्ञाने ध्वनिक्षेपकाचा शोध कधी लावला? 6) सीआयएलचे विस्तारित रूप काय? 7) 50 सेमी. पेक्षा कमी पाऊसात केल्या जाणार्‍या कृषिव्यवसायाला काय म्हणतात? 8) नील आर्मस्ट्राँग याने चंद्रपृष्ठभागावर कधी पाऊल ठेवलं? 9) विद्युतविच्छेदन पात्रात पदार्थाचे पृथक्करण करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? 10) ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती? 👉 प्रश्‍न 1 : उत्तर - व्यापारी पिके. 👉 प्रश्‍न 2 : उत्तर - बुद्धिबळ. 👉 प्रश्‍न 3 : उत्तर - 100 यार्डस् बाय 55 ते 60 यार्डस्. 👉 प्रश्‍न 4 : उत्तर - न्यूझीलंड. 👉 प्रश्‍न 5 : उत्तर - 1876 👉 प्रश्‍न 6 : उत्तर - कोल इंडिया लिमिटेड. 👉 प्रश्‍न 7 : उत्तर - कोरडवाहू शेती. 👉 प्रश्‍न 8 : उत्तर - 21 जुलै 1969. 👉 प्रश्‍न 9 : उत्तर - विद्युविच्छेदन. 👉 प्रश्‍न 10 : उत्तर - कॅनबेरा. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

ती (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - घरभाड्याच्या खोट्या पावत्या दाखवणाऱ्यांवर सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आयकर विभाग, करदात्यांकडून संबंधित संपत्तीचे वैध भाडेकरु असल्याचा पुरावा मागू शकते 👉 नवी दिल्ली - विमान प्रवासाचे तिकीट बुक करण्यासाठी लवकरच आधार कार्ड आवश्यक केले जाण्याची शक्यता, विप्रो कंपनीकडे याची ब्ल्युप्रिंट विकसित करण्याची जबाबदारी दिल्याची सरकारची माहिती 👉 नवी दिल्ली - काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेले सीआरपीएफचे कमांडंट चेतन चिता सुखरुप बचावले, त्यांच्या शरीरात 9 गोळ्या घुसल्या होत्या 👉 नवी दिल्ली - स्वयंसेवी संस्थांचा निधी प्रकरण, केंद्र सरकारने आज आणखी एक प्रतिज्ञापत्र केले सादर, पुढील सुनावणी 2 आठवड्यानंतर 👉 पश्चिम बंगाल - पश्चिम मेदीनीपूर येथील झेटला भागात ऑपेरा कलाकारांना घेऊन जाणारी एक बस पुलावरून कोसळली, 35 जखमी 👉 अमृतसरच्या खालरा सेक्टरमधून बीएसएफने 15 किलो हेरॉईन जप्त, बाजारात हेरॉईनची किंमत 50 ते 75 कोटी 👉 अलवर - राजस्थानमध्ये गाय तस्करीच्या संशयात जमावाने केली एकाची हत्या, अलवर जिल्ह्यातील बहरोडमध्ये दिल्ली-जयपूर हायवेवर घडला प्रकार 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 चीनमधील बळजबरी गर्भपात करण्याच्या धोरणामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीला योगदान देने बंद करण्याची अमेरिकेने केली घोषणा ----------------------------------------------------------- 'व्हीआयपी' झाड ; सुरक्षेसाठी सशस्त्र जवान तैनात... जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/VIPTREEE ----------------------------------------------------------- (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - विधीमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार, त्यांना आता लाल दिव्याची गाडी आणि सरकारी बंगलाही मिळेल 👉 मुंबई - उत्तर प्रदेशात भाजपप्रणित योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार आहे. मग एकाच पक्षाची दोन राज्यात वेगवेगळी विचारधारा कशी असू शकते? महाराष्ट्रातल्या भाजपला काय झालंय?, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल 👉 मुंबई - पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन, भाजप आमदार अनिल गोटे यांचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापटांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीशीला दिले उत्तर 👉 उल्हासनगर - महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी साई पक्षाचे जीवन इदनानी यांची निवड 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - केंद्र सरकारने 5 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला दिली परवानगी, या निर्णयामुळे साखरेचे दर कमी होण्याची शक्यता 👉 मुंबई - उत्तर प्रदेशच्या कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास सुरु आहे. तसेच कर्जमाफी हा राज्याचा विषय आहे, यावर हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👉 कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणीसाठी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, 8 दिवसांत हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 👉 नाशिक - बाजार समिती 57 लाखांचा अपहार प्रकरण, माजी खासदार देवीदास पिंगळेंना कोर्टाकडून जामीन मंजूर 👉 लोणावळा - लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी एक नवी माहिती समोर, मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे उघड, हत्येचं गूढ अद्याप कायम 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 29974.24, निफ्टी : 9265.15, सोने भाव : 28,760 (प्रतितोळा), चांदी : 42,430 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 नॉर्टन कंपनीने आता वाय-फाय नेटवर्कच्या सुरक्षित वापरासाठी टुल सादर करण्याची केली घोषणा, एका उपकरणासाठी वार्षिक 2499 रूपये तर 5 उपकरणांसाठी 3499 रूपये इतके पैसे भरून कुणीही ही सेवा घेऊ शकतो 🎯 खेळ घडामोडी : 👉 सायना नेहवाल मलेशिया ओपनमधून बाहेर, पहिल्या फेरीतील सामन्यात पराभव झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर 👉 मुंबई - अष्टपैलू रवींद्र जडेजा हा खऱ्या अर्थाने बहुगुणी क्रिकेटर असून, त्याचा पर्याय शोधणे हे कोणत्याही संघाच्या दृष्टीने आव्हानात्मक : ब्रॅड हॉज, गुजरात लायन्स, मुख्य प्रशिक्षक 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच होणार सुरुवात, ‘तुफान आलंया….!’ मध्ये विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे अशा 3 संघाचा असेल समावेश 👉 लखनौ - भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ दुसऱ्यांदा बनला बाबा, कैफच्या घरी छोट्या परीचा जन्म, मोहम्मद कैफने स्वत: ट्विटरवरुन दिली माहि

🎯 Let's Up Status Katta 👉 पास आपके दुनिया का हर सितारा हो, दूर आपसे गम का हर किनारा हो, जब भी आपकी पलके खुले सामने वही हो, जो आपको दुनिया में सबसे प्यारा हो...! 👉 दिल तोडना हमारी आदत नहीं, दिल हम किसी का दुखाते नहीं, भरोसा रखना मेरी वफाओ पे, दिल में बसा के हम किसी को भूलाते नहीं। 👉 इश्क सभी को जीना सिखा देता है, वफा के नाम पे मरना सिखा देता है, इश्क नहीं किया तो करके देखो, जालिम हर दर्द को पीना सिखा देता हैं। 👉 वक़्त कहता है फिर ना आऊंगा, आप की आँखों को न अब रुलाऊंगा, जीना है तो इस पल को जी लो, शायद मैं कल तक ना रूक पाऊंगा । (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 वादे पे वो ऐतबार नहीं करते, हम जिक्र मौहब्बत सरे बाजार नहीं करते, डरता है दिल उनकी रुसवाई से, और वो सोचते हैं हम उनसे प्यार नहीं करते। 👉 मोहब्बत का मतलब इंतज़ार नही होता, हर किसी को देखना प्यार नहीं होता, यू तो मिलता है रोज़ मोहब्बत-ए-पैगाम, प्यार है ज़िंदगी जो हर बार नहीं होता! 👉 छू ले आसमान ज़मीन की तलाश ना कर, जी ले ज़िंदगी खुशी की तलाश ना कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश ना कर। 👉 मंज़िल इन्सान के हौसले आजमाती है, सपनों के परदे आँखों से हटाती है, किसी भी बात से हिम्मत मत हारना, ठोकर ही इन्सान को चलना सिखाती हैं। (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 फायदेशीर जोडधंदा 'ससेपालन' Lets Up Agri Katta ससा हा अत्यंत उपयुक्त प्राणी असून त्याच्या मांसाला एक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण चव असून हे मांस रुचकर असल्यामुळे मांसभक्षक वर्गात याला भरपूर मागणी आहे. त्यामुळे ससेपालन हा फायदेशीर जोडधंदा ठरतो. देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे मांसाची आवश्यकता व मागणी वाढली आहे यामुळे मांस उत्पादन चार ते पाच पटीने वाढण्याची आवश्यकता आहे. कमी पडत असलेल्या मांसाची गरज भागविण्याकरिता कमीत-कमी वेळेत जास्त मांस देणाऱ्या प्राण्यामध्ये सस्याची गणती होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 ससेपालनाचे फायदे 👉 ससेपालन करून प्रथिनयुक्त मांसाचे उत्‍पादन करता येते. 👉 सशांचा आहार म्हणून सहज उपलब्ध असलेला पाला, टाकून दिलेला भाजीपाला, घरात उपलब्ध असलेले धान्य इत्‍यादिंचा वापर करता येतो. 👉 बॉयलर सशांच्या वाढीचा वेग खूप जास्त आहे. 3 महिन्यांचे सशाचे पिल्‍लू सुमारे 2 किलोग्राम वजनाचे असते. 👉 एका वेळी सशाची मादी किमान 5 ते 10 पिल्लांना जन्म देते. 👉 इतर मांसाशी तुलना करता सशाच्या मटणात जास्त प्रथिने (21%) व कमी चरबी (8%) असते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे मटण खाऊ शकतात. 🎯 सशांच्या प्रजाती 👉 जास्त वजनाच्या जाती (4-6 किग्रॅ) व्हाईट जायंट I ग्रे जायंट I फ्लेमिश जायंट 👉 मध्यम वजनाच्या जाती (3-4 किग्रॅ) न्यूझीलंड व्हाईट I न्यूझीलंड रेड I कॅलिफोर्नियन 👉 कमी वजनाच्या जाती (2-3 किग्रॅ) सोव्हियत चिंचिला I डच 🎯 प्रजोत्पादनासाठी सशांची निवड 👉 सशांनी प्रौढ सशांचे वजन प्राप्त केल्यावर व ते 5-6 महिन्यांचे झाल्यावरच त्यांची प्रजोत्पादनासाठी निवड करावी. 👉 मोठ्या पिल्लावळीत जन्मलेल्या नर व मादी सशांची प्रजोत्पादनासाठी निवड करावी. 👉 फक्त सुदृढ सशांनाच प्रजोत्पादनासाठी निवडावे. सुदृढ ससे चपळ असतात व ते आपले शरीर स्वच्छ ठेवतात. 👉 सुदृढ सशांची त्वचा स्वच्छ, मऊ व चमकदार असते. 👉 प्रजोत्‍पादनासाठी सशांची निवड करतांना ज्‍यांच्‍या अंडाशयात चांगली वाढ झालेले अंडकोष असतील असे ससे निवडावे. 👉 नर सशांची निवड करताना त्यांना मादी सशांबरोबर मिलन करू द्यावे म्हणजे त्यांच्या प्रजनन क्षमतेची कल्पना येते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 तुम्ही स्मार्टफोन जवळ घेऊन झोपता? Let's Up Faide Ki Baat सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईल आपल्यासोबतच असतो. एक क्षण देखील आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. अनेकांना रात्री झोपताना सुद्धा स्मार्टफोन सोबत घेऊन झोपण्याची सवय असते. अनेक संशोधनातून मोबाईल हा घातक असतो असे समोर आले आहेत. असाच एका संशोधकांच्या एका टीमने लिथियम-आयन बॅटरीजमधून निघणा-या 100 हून अधिक विषारी गॅसचं परिक्षण केलं आहे. यामध्ये कार्बन मोनोऑक्साइडचाही समावेश आहे. यामुळे डोळे, त्वचा आणि नाकात जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. हा गॅस शरीराच्या ज्या अवयवाजवळ मोबाईल असतो तेथे हानी पोहोचवतो तसेच आजुबाजुच्या अवयवांनवरही परिणाम होत असतो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 असा करा उष्णतेपासून कारचा बचाव 👉 गाडी कव्हर्ड पार्किंगमध्ये राहणार नसेल तर कार कव्हर खरेदी करा. कव्हर सपोर्टमुळे तुमची कार कुल राहील. 👉 उन्हाळ्याच्या दिवसात सीट अथवा स्टेअरिंगवर कार फ्रेंडली टॉवेल ठेवून तुम्ही उष्णतेपासून कारचा व स्वत:चा बचाव करू शकता. 👉 कार बराच काळ उन्हात उभी असेल तर गाडीच्या खिडक्या लगेच पूर्ण उघडू नका. गाडीत गार हवेचा दबाव उत्पन्न होईल तेव्हाच पूर्ण खिडक्या उघडा. 👉 विंडो टिंटचा वापर केला तर प्रखर उष्णतेतही कारमध्ये थंडावा मिळू शकतो. 🎯 काही घरगुती फायद्याच्या गोष्टी 👉 कांदा कापण्यापूर्वी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास कांदा कापताने डोळ्यात पाणी येणार नाही. 👉 भात शिजवल्यानंतर राहिलेल्या पेजमध्ये लिंबाचा थोडा रस मिसळून अर्धा तास केसांना लावून ठेवा. याने केस चमकदार आणि मुलायम होतील. 👉 दही घट्ट करायचे असेल तर कोमट दुधात एक हिरवी मिरची घालून ठेवा. याने दही घट्ट होईल. 👉 कांदा फ्राय करताना त्यात थोडी साखर घातली तर कांदा लगेच ब्राऊन रंगाचा होतो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे निधन Let's Up Current Affair ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरीताई आमोणकर यांचं काल रात्री निधन झालं. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर एकच शोककळा पसरली आहे. किशोरीतार्इंचा जन्म मुंबईत 10 एप्रिल 1932 मध्ये झाला होता. आई व प्रख्यात गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायनकलेचा समृद्ध वारसा मिळाला होता. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजन गायनात त्यांनी आपल्या शैलीची मुद्रा उमटवली. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. किशोरीताई यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 1987 मध्ये पद्मभूषण व 2002 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर केली. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – रागरससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आता येणार 200 रुपयांची नोट 500 व 2000 रूपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर रिझर्व्ह बँकेने दोनशे रूपये मूल्याची नवी नोट चलनात आणण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. नोटा सुरक्षा फिचर्स बदलण्यासंदर्भात झालेल्या गृह व वित्त मंत्रालयाच्या उच्च स्तरीय बैठकीत नव्या 200 रूपयाच्या नोटा वितरणात आणण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या 200 रूपयांच्या नव्या नोटा हिरव्या रंगाच्या असतील व त्यातील सुरक्षा फिचर्स आणखी खास असतील असेही सांगितले जात असून या नोटांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. मात्र याबबत अर्थमंत्रालयाकडून अधिकृत कोणताही दुजोरा मिळालेला नाही. 🎯 पुणे विद्यापीठ अव्वल दहामध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यावर्षीची देशातील सर्वोत्तम विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली असून अव्वल शंभर विद्यापीठांत बेंगळुरू मधील इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्सने (आयआयएस) पहिलं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली असून देशातील अव्वल 10 विद्यापीठांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान पटकावले आहे. देशातली टॉप टेन विद्यापीठ : 👉 आयआयएस, बेंगळुरू 👉 जेएनयू, दिल्ली 👉 बीएचयू 👉 जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स रिसर्च, बेंगळुरू 👉 जादवपूर विद्यापीठ, कोलकाता 👉 अण्णा विद्यापीठ, चेन्नई 👉 हैदराबाद विद्यापीठ, तेलंगण 👉 दिल्ली विद्यापीठ 👉 अमृत विश्व विद्यापीठ, कोइंबतूर 👉 सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांप्रती दु:ख व्यक्त केले 👉 नवी दिल्ली - आफ्रिकी नागरिकांसह सर्व परदेशी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध - परराष्ट्र मंत्रालय 👉 नवी दिल्ली - VVPAT मशीन परत बोलावण्याची गरज नाही, या मशीन सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत - निवडणूक आयोग 👉 नवी दिल्‍ली - अजमेर दर्गा बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा आणि इंद्रेश कुमार यांना क्‍लीन चिट दिली 👉 नवी दिल्ली - सिंगापूरमध्ये काम करु इच्छिणाऱ्या भारतीयांच्या अडचणींमध्ये वाढ, सिंगापूरकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांना व्हिसा न देण्याचा निर्णय 👉 अजमेर - बीफ खाणे योग्य नाही, गाईला मारण्यावर बंदी घातली पाहिजे - जैनुल आबदीन अली खान, अजमेर शरीफ दर्ग्याचे आध्यात्मिक गुरू (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 रशिया - सेंट पीटर्सबर्ग येथील मेट्रो स्टेशनवर स्फोट, 10 जणांचा मृत्यू तर जखमींचा आकडा 50 वर पोहोचला 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - शशिकला यांच्या गटाने वेबसाइट आणि सोशल मीडियावर दोन पानांचे चिन्ह वापरल्याने निवडणूक आयोगाने बजावली कारणे दाखवा नोटीस 👉 मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 6 एप्रिल रोजी बोलावली बैठक, मंत्री, आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत राबविलेल्या हागणदारीमुक्त गाव योजनेत राज्यात पुणे विभाग अव्वल, कोकण विभाग दुसरा तर औरंगाबाद तिसरा 👉 मुंबई - वडाळ्यापासून सीएसटीपर्यंत मेट्रो धावणार, मेट्रो 4 चा विस्तार करण्याचा सरकारचा निर्णय 👉 पुणे - लष्करातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना 'नाम फाउंडेशन'चा मदतीचा हात, 20 कुटुंबीयांना देणार अडीच लाख रुपये, मकरंद अनासपुरेंची माहिती 👉 अहमदनगर - 1 जूनपासून राज्यातील शेतकरी जाणार संपावर, अन्नधान्य पिकवणार नाही तसेच भाजीपाला सुद्धा विकणार नाही 👉 लोणावळा - INS शिवाजी येथे तरूण-तरूणीचा मृतदेह आढळला, दोघेही सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी, पोलीस तपास सुरु 👉 गोंदिया - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभापती पी.जी.कटरे यांना राष्ट्रवादीच्या सुनिता मडावी यांच्याकडून भरसभेत मारहाण 🎯 खेळ घडामोडी : 👉 मुंबई - 90 च्या दशकापासून WWE च्या चाहत्यांचा फेवरेट असलेल्या अंडरटेकरने अखेर WWE मधून निवृत्ती घेतली 👉 वर्धा - देवळीतल्या नगर परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत अमरावतीचा अब्दुल सोहेब ठरला विदर्भ केसरी किताबाचा मानकरी 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - प्रख्यात शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचे मुंबईतील राहत्या घरी रात्री निधन झाले, त्या 84 वर्षांच्या होत्या 🎯 राशीभविष्य : दि. 04 एप्रिलचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horoapril-4 (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

वादग्रस्त विधानामुळे अडचणीत, पंजाबच्या लुधियानातील स्थानिक न्यायालयाने राखीच्या विरोधात अटक वॉरंट केले जारी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Lets Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 श्रीनगर- येथील पंथा चौकात संशयित दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केला अंदाधुंद गोळीबार, यात सीआरपीएफचे 6 जवान जखमी 👉 नवी दिल्ली - अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) दरामध्ये पुन्हा वाढ, गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रुपये वाढ तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर (एलपीजी) 14.50 रुपयांनी स्वस्त 👉 नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी जाहीर केले देशातील विद्यापीठ व शिक्षण संस्थांचे रँकिंग, विद्यापीठांच्या यादीत बंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अव्वल तर महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या नंबरवर 👉 नवी दिल्ली - अमेरिकेनंतर आता सिंगापूरमध्ये काम करु इच्छिणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांच्या अडचणींमध्ये वाढ, सिंगापूरकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांना व्हिसा न देण्याचा घेतला निर्णय 👉 नवी दिल्ली - अमेरिकेच्या पासपोर्टवर भारतात येत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्याला नेपाळच्या काठमांडू विमानतळावरून अटक, या दहशतवाद्याची अमेरिकन सुरक्षा संस्थांकडून चौकशी सुरू 👉 नवी दिल्ली - सक्तवसुली संचलनयालयाने (ईडी) सोमवारी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या दिल्लीतील फार्महाऊसवर (27 कोटी रूपये) केली जप्तीची कारवाई 👉 नवी दिल्ली - एसबीआय आणि तिच्या सहयोगी बँका तसेच महिला बँक यांचे विलिनीकरण हे जगातले सर्वात मोठे विलिनीकरण - अरुंधती भट्टाचार्य 👉 नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदीबाबतची सुनावणी 10 दिवसांसाठी पुढे ढकलली 👉 चंदीगड - सुप्रीम कोर्टाने हायवेवरील दारू दुकानांवर घातलेल्या बंदीविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकाचे आंदोलन 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 फ्लोरिडा - 'डेडमॅन द अंडरटेकर'ने 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला केले अलविदा, रेसलमेनिया 33 मधील रोमन रेन्ससोबत झालेल्या सामन्यात हार पत्कारावी लागल्यानंतर अंडरटेकरने घेतली निवृत्ती ----------------------------------------------------------- जिओ समर सरप्राइजसाठी 'हा' रिचार्ज करा तर होईल जास्त फायदा... सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/jiorecharge499 ----------------------------------------------------------- (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी मुंबई - राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपात आले तर मी त्यांचं स्वागतच करेन : मंदा म्हात्रे, भाजप आमदार 👉 औरंगाबाद - उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत काँग्रेस प्रणीत लोकनेते चंद्रशेखर भोसले शेतकरी विकास पॅनलचे 18 पैकी 17 उमेदवार विक्रमी मतांनी विजयी, एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी 👉 परभणी - महापालिका निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन एका शिवसैनिकाचा (सुरेश भिसे) जोरदार गोंधळ, उमेदवारी डावलल्याने शिवसैनिकाने आत्महत्या करण्याची दिली धमकी 👉 लातूर - उदगीर बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 10 जागांवर काँग्रेसचा विजय 👉 पुणे - जिल्हा परिषदेच्या सभापतीपदांची निवड जाहीर, प्रवीण माने (बांधकाम व आरोग्य), सुजाता पवार (कृषी), राणी शेळके (महिला व बाल कल्याण), सुरेखा चौरे (समाज कल्याण) 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - विमानतळावर महिलेकडून 2.85 किलो कोकेन जप्त, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई 👉 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास येत्या 28 एप्रिलपासून आंदोलन करण्याचा दिला इशारा 👉 पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवडमध्ये एका विद्यार्थ्याने भाजप आमदाराच्या मुलीवर केला प्राणघातक हल्ला, या हल्ल्यात अश्विनी संजीवरेड्डी बोदकुरवारच्या हाताची बोटं कापली, तिच्यावर उपचार सुरु 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 29910.22, निफ्टी : 9237.85, सोने भाव : 28,540 (प्रतितोळा), चांदी : 42,225 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर रिलायन्स जिओ IPTV सेट टॉप बॉक्सचे फोटो लीक, मोठमोठ्या टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले, इतर कंपन्यांच्या डीटीएच सेवांवर याचा मोठा परिणाम होण्याची कंपन्यांना भिती 👉 मुंबई - शाओमी येत्या बुधवारी 6 एप्रिलला भारतात Mi Fan Festival आयोजित करणार, हा सेल बुधवारी स. 10 ते दु. 2 वाजेपर्यंत असणार 🎯 खेळ घडामोडी : 👉 रोहतक - कुस्तीमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पैलवान साक्षी मलिक अडकली लग्नाच्या बेडीत, साक्षीने मित्र आणि कुस्तीपटू सत्यव्रत कादियानसोबत संसार थाटला 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 लुधियाना - अभिनेत्री राखी सावंत महर्षी वाल्मीकी यांच्यावर केलेल्या