es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 745 suscriptores, ocupando la posición 5 597 en la categoría Educación y el puesto 11 988 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 745 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -76, y en las últimas 24 horas de 9, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 10.19%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.78% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 438 visualizaciones. En el primer día suele acumular 1 275 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 745
Suscriptores
+924 horas
+27 días
-7630 días
Archivo de publicaciones
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम २०२०. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 प्रत्येक नवीन घटक Highlight करुन दिलेला आहे. 👉 Syllabus ची एक प्रत कायम आपल्या सोबत ठेवा. 👉 Syllabus तोंड पाठ असावा. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 एक वेळ आवश्य भेट द्या www.simplifiedcart.com ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

🟪कुठे किती बेडस, प्लाज़्मा ब्लड शिल्लक आहेत हे खालील वेब लिंकवर समजू शकेल, Website दर 15 मिनिटांनी अपडेट होते,आपण तिथं फोन करून देखील बेड राखून ठेऊ शकता,मित्र मंडळींनी ही माहिती सर्वत्र पोहचवावी ही नम्र विनंती. https://covidpune.com/

🟪प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) याच्या पहिल्या टप्प्यात 92 टक्के लक्ष्य साध्य. भारत सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या महत्वाकांक्षी योजनेतील लक्ष्याच्या 92 टक्के उद्दीष्ट योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच आर्थिक वर्ष 2016-17 ते आर्थिक वर्ष 2018-19 या कालावधीत गाठले गेले आहे. 2011 या वर्षाची SECC माहिती वापरून काढलेल्या कायमस्वरूपी प्रतिक्षायादीनुसार 2.14 कोटी लाभार्थी या योजनेला पात्र असल्याचे निश्चित झाले. या यादीत 2.14 कोटी घरे सुरुवातीला निश्चित केली होती. याशिवाय 1.92 कोटी म्हणजे 90 टक्के घरे मंजूर झाली आणि मंजूर घरांपैकी 71 टक्के घरे पूर्ण झाली.योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटी घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यापैकी 92 टक्के लक्ष्य साध्य झाले. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थसंकल्पीय सहाय्य म्हणून 19,269 कोटी रुपयांचा निधी निर्धारित केला होता. याशिवाय 20,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पबाह्य निधीसुद्धा उपलब्ध करून दिला गेला. राज्यांचा वाटा समाविष्ट असलेला राज्यावरील खर्चभारसुद्धा या आर्थिक वर्षात सर्वाधिक म्हणजे 46,661 कोटी रुपये झाला. ▪️पार्श्वभूमी प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारद्वारे संचालित केली जाणारी योजना आहे. या योजनेचा शुभारंभ दिनांक 25 जून 2015 रोजी झाला. नोव्हेंबर 2016 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) याचा प्रारंभ झाला. वर्ष 2022 पर्यंत “सर्वांना घर” हे उदात्त उद्दिष्ट असलेली ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या सामाजिक कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सरकार SECC 2011 च्या माहितीनुसार निश्चित केलेल्या बेघरांना स्वतःसाठी घरे बांधण्यास सहाय्य पुरवते.

🟪ISS कडे ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान पाठविण्यात आले. 9 एप्रिल 2021 रोजी कझाकस्तानमधील स्पेसपोर्ट येथून ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) याकडे पाठविण्यात आले. ▪️ठळक बाबी अंतराळयानाद्वारे 3 जणांना याकडे पाठविण्यात आले आहे. त्यात रशियाचे दोन व्यक्ती आणि अमेरिकेच्या NASA संस्थेचा एक अभियंता यांचा समावेश होता. हे यान आता 180 दिवसांनी म्हणजेच 13 ऑक्टोबर 2021 रोजी पृथ्वीवर परतणार आहे. ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयानाचे संचालन रशियाच्या रोसकॉसमॉस या अंतराळ संस्थेकडून केले जात आहे. व्यक्तींना घेऊन उडणाऱ्या सोयुझ अंतराळयानाचे हे 146 वे उड्डाण आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर दूर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. आज ISS वर अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.

🌺🌺'पोषण ज्ञान': पोषण-विषयक माहितीचा डिजिटल कोष🌺🌺 🔰आरोग्य आणि पोषण विषयक माहिती देणाऱ्या 'पोषण ज्ञान' नामक राष्ट्रीय पातळीवरील डिजिटल कोषाचा नीती आयोगाने प्रारंभ केला. या उपक्रमामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि अशोक विद्यापीठातील सामाजिक व वर्तनात्मक परिवर्तन केंद्र हे भागीदार आहेत. 🔴ठळक बाबी.... 🔰‘पोषण ज्ञान’ या संकेतस्थळाच्या निर्मितीमुळे जे समाजघटक कुपोषणाला बळी पडू शकतात, उदा- गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, आणि सहा वर्षांखालील वयाची बालके, यांच्यावर भर देऊन, वर्तणूकविषयक सखोल माहिती देऊन हा प्रश्न सोडवता येईल. 🔰डॉ. राकेश सरवल यांच्या मार्गदर्शनांतर्गत, पोषण ज्ञान या माहिती कोषाची संकल्पना विकसित झाली. आरोग्य आणि पोषणाशी संबंधित 14 पैलूंविषयी विविध भाषा, विविध माध्यमे आणि विविध जनसमुदायांसाठी तयार केलेल्या संवादात्मक साहित्यातून हवी ती माहिती शोधून घेण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. 🔰पोषण ज्ञान नामक या माहिती कोषात 'क्राऊडसोर्सिंग' प्रकारची एक विशिष्ट सुविधा देण्यात आली आहे. यामुळे संकेतस्थळावरील माहितीत भर घालण्याचे योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीला तसे करता येईल आणि नंतर एका समितीद्वारे त्याचे परीक्षण केले जाईल.

☀️☀️आदिवासी मंत्रालयाची “संकल्प से सिद्धी” – व्हिलेज अँड डिजिटल कनेक्ट मोहीम.☀️☀️ 🎴आदिवासी कार्य मंत्रालयाने “संकल्प से सिद्धी” – व्हिलेज अँड डिजिटल कनेक्ट मोहीम हातात घेतली आहे. 🔴ठळक बाबी... 🎴भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ (TRIFED) हा उपक्रम राबवित आहे.हा उपक्रम 1 एप्रिल 2021 पासून आरंभ करण्यात आला. 🎴उपक्रमाच्या अंतर्गत नेमण्यात आलेली 150 पथके येत्या 100 दिवसांत देशातल्या विविध प्रदेशात प्रत्येकी 100 खेड्यांना भेट देणार आहेत. 🎴एकूण 1500 खेड्यांना भेट दिली जाणार आहे.या खेड्यांमधली वन धन विकास केंद्रे कार्यान्वित करणे हे या मोहिमेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. 🎴या पुढाकाराने संपूर्ण देशभरात आदिवासी समुदयांच्या परिसंस्थेचे संपूर्ण रूपांतर होण्यास मदत होईल.

🛡🛡🛡एस. रामन्न: SIDBI याचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.🛡🛡 🖼एस. रामन्न यांची भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नेमणूक पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. 🎀भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) विषयी.... 🖼भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) ही सूक्ष्मवित्त संस्थांसाठीची सर्वोच्च नियामक संस्था आहे आणि ती भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. 🖼याचा उद्देश उद्योगांना पुनर्वित्त सुविधा आणि अल्प मुदतीसाठी कर्ज देणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था म्हणून काम करणे हा आहे. 🖼SIDBI याची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे आहे.

🎆🎆आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल🎆🎆 💎दरवर्षी 12 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन’ साजरा करतात. शांतीच्या उद्देशाने बाह्य अंतराळाचा वापर करण्याचा संदेश जगाला देण्यासाठी हा दिन साजरा करतात. 💎1961 साली या दिवशी सोव्हियत अंतराळवीर युरी गागारिन यांनी अंतराळात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो. 🧨दिनाचा इतिहास.... 💎युरी गागारिन यांनी 12 एप्रिल 1961 रोजी व्होस्टोक-1 यानाने अंतराळात झेप घेतली. यानाने 108 मिनिटांत पृथ्वीची एकदा प्रदक्षिणा घातली आणि सुखरूप जमिनीवर उतरले. प्रथमच घडलेल्या या ऐतिहासिक घटनेची नोंद होत सर्व मानवजातीच्या फायद्यासाठी अंतराळ संशोधनाचा मार्ग मोकळा झाला. 💎संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या 65 व्या अधिवेशनात एप्रिल 2011 मध्ये एक ठराव मंजूर केला गेला आणि दरवर्षी 12 एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन पाळण्याची घोषणा करण्यात आली

🔲आयात-निर्यातदारांना त्वरित संपर्कासाठी ‘DGFT ट्रेड फॅसिलिटेशन’ नामक व्यापार सुलभ अॅपचा शुभारंभ केंद्रीय वाणिज्य व उदयोग मंत्री पियुष गोयल यांनी विदेश व्यापार महासंचालनालयाचे व्यापार सुलभ ‘DGFT ट्रेड फॅसिलिटेशन’ मोबाईल अॅपचा शुभारंभ केला. व्यापारसुलभता तसेच आयात-निर्यातदारांना त्वरित माहिती मिळावी या उद्देशाने हे अॅप तयार केले आहे. ▪️ठळक बाबी. टाटा कन्सल्टन्सि सर्विसेस (TCS) या कंपनीने हे अॅप विदेश व्यापार महासंचालनालयच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तयार केले आहे. अनेकदा व्यापारासंबधीच्या प्रक्रिया विनाकारण किचकट होतात आणि जेव्हा त्या मोबाईल अॅपसारख्या माध्यमातून एका बटणाच्या स्पर्शावर अवलंबून असतात तेव्हा व्यापारसुलभतेची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान विकासाची हमी आपल्याला देता येते. एका बटनावर व्यापारसंबधी विविध प्रक्रिया आणि शंकांना उत्तरे देणारे ते ओम्नी चॅनेल अॅप आहे. यामुळे आयात-निर्यात यासंबधीच्या वेळेत बचत होईल तसेच पारदर्शकतेची हमी मिळेल. DGFT चे नवीन मोबाईल अॅप आयात-निर्यातदारांसाठी खालील सुविधा पुरवते - वेळोवेळी (रिअल टाईम) व्यावार धोरण अदययावतता, व कार्यक्रम सूचना कोठेही केव्हाही उपलब्ध डॅशबोर्ड DGFTच्या सर्व सेवांकडे अॅपद्वारे प्रवेश व्यापारमालाप्रमाणे आयातनिर्यात धोरण व आकडेवारी उपलब्ध.व्यापारसंबधी शंकांसाठी सर्वकाळ आभासी सहाय्य.आपला IEV पोर्टफोलिओ ट्रॅकिंग – IEC अर्ज व प्रमाणीकरण. अर्जाच्या स्थितीबद्द्ल वेळोवेळी सूचना वेळोवेळी सहाय्यासाठीच्या विनंतीला प्रतिसाद व शोध व्यवस्था उपलब्ध व्यापारसंबधी सूचना व सार्वजनिक नोटिस सहजपणे सामायिक करता येतील

🎓सीबीआयचे माजी संचालक रंजीत सिन्हा यांचं निधन 🗣 केंद्रीय अन्वेषण ब्युरो, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस, रेल्वे सुरक्षा दल अशा अनेक टीम्सचं नेतृत्व करणाऱ्या रंजीत सिन्हा यांचं दिल्लीत निधन झालंय. 🚶‍♂भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रंजीत सिन्हा वादातही अडकले होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे माजी अध्यक्ष रंजीत सिन्हा यांचं निधन झालंय. १९७४ च्या बॅचचे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी रंजीत सिन्हा यांनी आज पहाटे ४.३० वाजल्याच्या सुमारास दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते. रंजित सिन्हा यांनी सीबीआय तसंच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) चे महासंचालक म्हणूनही जबाबदारी हाताळली होती. २२ नोव्हेंबर २०१२ रोजी पुढच्या दोन वर्षांसाठी त्यांना सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाचं नेतृत्वही केलं होतं तसंच पाटणा, दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदांची जबाबदारीही हाताळली होती.

🎓ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे निधन 🌞 राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे करोना संसर्गाने गुरुवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. विषाणू विज्ञान, लसीकरण आणि साथरोग या विषयांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ अशी डॉ. बॅनर्जी यांची ख्याती होती. 🌞१९८८ ते १९९७ या काळात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. डॉ. बॅनर्जी मूळचे कोलकाता येथील होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून १९६१ मध्ये एमबीबीएस आणि १९६८ मध्ये पी. एचडी. पूर्ण के ले. १९७३ पासून ते राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कार्यरत होते. मोलाचे संशोधनकार्य विषाणूंचा उगम आणि प्रसार हा डॉ. बॅनर्जी यांच्या अभ्यासाचा भाग होता. डास गटातील डेंग्यू विषाणूचे जनुकीय मार्क र सर्वप्रथमबॅनर्जी यांनी निश्चित केले. टिश्यू कल्चर प्रकारात कायसनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) वरील लस सर्वप्रथम त्यांनी तयार केली. डेंग्यू, केएफडी आणि चिकुनगुनिया तसेच जपानी एन्सेफलायटीस विषाणू महामारीचा त्यांचा समग्र अभ्यास होता.

🎓आहार क्रांती’ नामक एका चळवळीला प्रारंभ.... 🌞 12 एप्रिल 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘आहार क्रांती’ नामक एका चळवळीला प्रारंभ करण्यात आला. 🌞 पौष्टिकदृष्ट्या संतुलित आहाराची आवश्यकता आणि सर्व स्थानिक फळ आणि भाजीपाला यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी हे अभियान आखण्यात आले आहे. 🌞 हे विज्ञान भारती (विभा) आणि ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स फोरम (GIST) यांनी सुरू केलेले अभियान आहे.अभियानाचे “उत्तम आहार उत्तम विचार” (‘Good Diet-Good Cognition’) हे ध्येय आहे. 🌞 या कार्यक्रमात शिक्षकांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, जे पुढे त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोषक आहाराविषयी संदेश पोहचवतील. 🌞 उपासमार आणि त्यासंबंधी मुबलक रोगांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

🟪चिमुकलीची उत्तुंग भरारी! अडीच वर्षांच्या वैदिशाच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. एवढ्या लहान वयात मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे तिचे सर्वंत्र कौतुक होत आहे. चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडिया पद्यापूर शाखेमध्ये सहायक रोखपाल पदावर कार्यरत असलेले वैभव शेरेकर हे मुळचे अकोला येथील आहे. नोकरीनिमित्त ते चंद्रपूर येथे स्थिरावले. त्यांना वैदिशा ही एकुलती एक मुलगी आहे. अवघ्या एक वर्षांची असताना तिला एक गोष्ट सांगितली की तिच्या लक्षात रहायची. तिच्या असाधारण कुशाग्र बुद्धीचा कसा सदुपयोग करता येईल यावर विचार करून, शेरेकर कुटुंबीय तिला नवनवीन पाठ्यपुस्तके आणत होते. वैदिशा जवळपास अडीच वर्षांची झाल्यानंतर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व राष्ट्रध्वजाची माहिती असलेले चार्ट आणून त्या माध्यमातून तिला तिची आई दिपाली शेरेकर यांनी माहिती देण्यास सुरूवात केली. तिने अवघ्या पंधरा वीस दिवसांत २०० पेक्षा अधिक देशांची राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्याइतपत तयारी केली. वैदिशाला २०० देशाहून अधिक देशाची राजधानी मुखपाठ असून या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वज ती अचूक ओळखते. तिच्या या कामगिरीची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. शिवाय तिचे नावाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.

🟪आशियाई कुस्ती स्पर्धा - सरिताला सुवर्णपदक भारताची कुस्तीपटू सरिता मोर हिने जोमाने पुनरागमन करत मोंगोलियाच्या शूवदोर बातारजाव हिचे आव्हान परतवून लावत सलग दुुसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सीमा बिस्ला (५० किलो) आणि पूजा (७६ किलो) यांना कांस्यपदक मिळाले. अंतिम फेरीची लढत संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना सरिता १-७ अशी पिछाडीवर पडली होती. पण ५९ किलो वजनी गटात पंचांकडे दाद मागण्याचा भारताचा निर्णय फसल्यानंतर बातारजावला चार गुणांची बढत मिळाली. त्यातच सरिताने स्वत:वरील नियंत्रण सुटल्यामुळे बातारजावला आणखी एक गुण मिळवता आला. बातारजावने ७-१ अशी आघाडी घेतल्यानंतर सरिताने पुनरागमन केले. बातारजावविरुद्ध चाल रचत सरिताने चार गुणांची कमाई केली. त्यानंतर बातारजावला रिंगणाच्या बाहेर ढकलत सरिताने ७-७ अशी बरोबरी साधली. अवघ्या २० सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सरिताने आणखी एक डावपेच आखत गुण वसूल केले. अखेरीस १०-७ अशा फरकाच्या आधारे सरिताने या स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले. प्रतिस्पर्धी २०१८ सालची जागतिक कांस्यपदक विजेती असल्याने हा सामना माझ्यासाठी खडतर होता. पण मी माझ्यापरीने सामन्याची तयारी केली होती. पहिल्याच सामन्यात तिच्याकडून हरल्यानंतर अंतिम फेरीत मी रणनीतीची योग्य अंमलबजावणी केली.

🟪भारत कोणत्याही दबावापुढे झुकत नाही हे सिद्ध देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, असे संरक्षण दलांचे प्रमुख जन. बिपीन रावत यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते त्या संदर्भाने रावत बोलत होते. रायसिन चर्चासत्रामध्ये सहभागी होताना रावत पुढे म्हणाले की, चीनकडे वरच्या दर्जाचे सशस्त्र दल आहे त्यामुळे आपण अनेक देशांना झुकवू शकतो असा त्यांचा समज होता, परंतु भारताने खंबीर भूमिका घेत देश कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही हे सिद्ध केले, असे रावत म्हणाले. भारताने खंबीर भूमिका घेतली आणि त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळाला, भारत दबावापुढे झुकेल असे त्यांना वाटले, मात्र तसे घडले नाही, असेही ते म्हणाले. भारत आणि चीनचे सैनिक पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आणि दोन्ही देशांनी फेब्रुवारी महिन्यात पांगॉँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील तीरांवरून आपले सैनिक आणि शस्त्रे मागे घेतली. आता संघर्षाची जी ठिकाणे राहिली आहेत तेथूनही सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले.

🟪अमेरिकेचे रशियावर निर्बंध रशियाच्या १० राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा अमेरिकेने गुरुवारी केली, तसेच तीसहून अधिक व्यक्ती व महत्त्वाच्या वित्त संस्थांवर निर्बंध लागू केले. गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याबद्दल, तसेच अमेरिकी संघराज्यात्मक यंत्रणांमध्ये हॅकिंग केल्याबद्दल रशियाला जबाबदार मानून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. रशियाने सात वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये घुसखोरी करून त्यातील क्रिमियाचा भाग आपल्या ताब्यात घेतला, तो अद्यापही आपल्याकडेच राखला आहे. त्याचप्रमाणे युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या व आघाडीच्या सैनिकांविरुद्ध हल्ले चढवण्यासाठी रशिया आर्थिक मदत देत असल्याचाही अमेरिकेचा आरोप आहे. याबद्दल रशियाला दंड आकारणे हाही या निर्बंधांचा उद्देश आहे. अमेरिकेतील निवडणुकांशी आपला संबंध असल्याचा किंवा अफगाणिस्तानात इनाम देत असल्याचा आरोप रशियाने नाकारला आहे. सोलरविंड्स संगणक हल्ल्याशी काही देणेघेणे नसल्याचेही रशियाने म्हटले आहे.

🟪‘मरकझ’ला परवानगी नाही रमझानच्या काळात निझामुद्दीन मरकझमध्ये भाविकांना प्रवेश देण्याबाबत सहमती दर्शवणाऱ्या केंद्र सरकारने दुसऱ्याच दिवशी घूमजाव करीत मशिदीमध्ये कोणालाही कोणत्याही कार्यक्रमास मुभा दिली जाऊ शकत नाही, असे मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयापुढे स्पष्ट केले. नमाज अदा करण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करून भाविकांना ‘मरकझ’मध्ये प्रवेश मिळावा, अशी मागणी करणाऱ्या दिल्ली वक्फ मंडळाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राजधानीत ‘दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (डीडीएमए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व धार्मिक कार्यक्रमांवर १० एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने रमझान महिन्यात निझामुद्दीन मरकझमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही, असे केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयास सांगितले. त्यावर न्यायालयाने तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी केंद्र सरकारच्या वकिलांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार गेल्या वर्षापासून मशिदीत नमाज अदा करणाऱ्या पाच जणांना पुढील सुनावणीपर्यंत तसे करण्यास परवानगी असेल.

🏆 पुरस्कार : सिओल शांतता पुरस्कार ⏳ सुरुवात : १९९० पासून ✅ केव्हा दिला जातो : दर २ वर्षांनी 💰 पुरस्काराचे स्वरूप : २ लाख डॉलर्स 👤 पहिले विजेते : जुआन अँटोनियो (स्पेन) ✅ सिओल शांतता पुरस्काराचे महत्वाचे विजेते 👩‍🦰 २०१४ : अँजेला मर्केल (जर्मनी) 👤 २०१६ : डेनिस मुकवेगे (काॅंगो) 🇮🇳 २०१८ : नरेंद्र मोदी (भारत) 👤 २०२० : थॉमस बाच (जर्मनी)

photo content
+1