es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 764 suscriptores, ocupando la posición 5 596 en la categoría Educación y el puesto 11 963 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 764 suscriptores.

Según los últimos datos del 12 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -48, y en las últimas 24 horas de 21, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 11.43%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 4.47% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 856 visualizaciones. En el primer día suele acumular 1 507 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 13 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 764
Suscriptores
+2124 horas
+317 días
-4830 días
Archivo de publicaciones
#Corona_Update ▪️महत्वाची सूचना 👉PUNE CITY खालील लिंक वर पुणे शहरात ऑक्सिजन आणि ICU बेडची उपलब्धता कळते. गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. https://www.divcommpunecovid.com/ccsbeddashboard/hsr

photo content
+8

▪️नमस्कार मित्रांनो » सद्यस्थितीला आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. » सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्या. » गर्दीच्या ठिकाणी जाणे १००% टाळा. » अद्याप अनेकानी कोरोनाला फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. तर त्याला गांभीर्याने घ्या. » आज खूप ठिकाणी संपर्ण कुटुंबाच्या कुटुंब पॉझिटिव्ह येत आहे. "अनेक जण आपला माणूस या कोरोनात गमावत आहेत." त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका. » कोरोनामुळे घाबरून न जाता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. » मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर पाळा, स्वतःची काळजी घ्या. » कोरोनाची परिस्थिती हाताळाताना सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे.आरोग्य व्यवस्था रुग्ण सांभाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपले सहकार्य अपेक्षित आहे.आणि कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांचीच एकजूटही गरजेची आहे. ▪️आरोग्य सेवक, परिचारीका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रय़त्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबुया. 'गर्दी टाळू,' 'मास्क वापरु' आणि 'वारंवार हात धुवू' या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची खरी गुढी उभारणे यंदा आवश्यक आहे. ▪️या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.👍💐 आपला मित्र अजित प्रकाश थोरबोले

ग्रामीण रोजगार योजना योजनेची सुरुवात 25 सप्टेंबर 2001 योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना लक्ष्य रोजगार निर्माण करणे उद्देश ग्रामीण बेरोजगारीची चक्र मोडणे रोजगार बरोबर अन्न सुरक्षा पुरविणे पायाभूत सुविधा पुरविणे या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत रोजगार धारकांना पाच किलो धान्य व एकूण पगाराच्या 25 टक्के पगार रोख स्वरूपात दिला जात असून याची अंमलबजावणी जिल्हा पंचायत व ग्रामपंचायती मार्फत केली जाते योजनेत 1 एप्रिल 2002 रोजी आश्वासित रोजगार योजना व जवाहर ग्रामसमृद्धी योजना समाविष्ट करण्यात आली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार 75:25% प्रमाणात करतात 1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी योजनेत समाविष्ट करण्यात आले

🟪उच्च कार्यक्षमतेच्या सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूलच्या राष्ट्रीय उपक्रमाचा उत्पादन. आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च कार्यक्षमतेचे सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूलच्या राष्ट्रीय उपक्रमाचा उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातून गिगावॅट क्षमतेपर्यंतच्या उच्च कार्यक्षमतेच्या सौर फोटोव्होल्टिक (फोटोव्होल्टिक) मॉड्यूलच्या उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी 4,500 कोटी रुपयाच्या अतिरिक्त खर्चासाठी ही मंजुरी देण्यात आली. 🟪ठळक बाबी. देशांतर्गत उत्पादन क्षेत्र हे आयात केलेल्या सोलर सेल्स आणि मॉड्यूलच्या परिचालन क्षमतेपुरते मर्यादित असल्यामुळे, सौर क्षमता ही मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या सौर फोटोव्होल्टिक सेल्स आणि मॉड्यूल्सवर अवलंबून आहे. उच्च क्षमतेच्या सोलर फोटोव्होल्टिक मॉड्यूलचा राष्ट्रीय उपक्रम हा विद्युतक्षेत्रासारखाच आयातीवरील अवलंबित्व कमी करत आहे, त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत या उपक्रमालाही सहाय्यकारी ठरत आहे. देशांतर्गत सौर फोटोव्होल्टिक उत्पादक हे स्पर्धात्मक लिलाव प्रक्रियेतून निवडले जातील. सौर फोटोव्होल्टिक उत्पादन प्रकल्प सुरू केल्यापासून पाच वर्ष उच्च क्षमतेच्या सौर मॉड्यूल्सच्या विक्रीवर हा उत्पादन आधारित प्रोत्साहन निधी दिला जाईल. उत्पादकांना उच्च क्षमतेच्या सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल्ससाठी गौरवण्यात येईल तसेच त्यांच्या मालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे वाढीव मॉड्यूल क्षमतेबरोबरच स्थानिक बाजारपेठेनुसार उच्च मूल्य देण्याच्या क्षमतेवरही प्रोत्साहन निधी अवलंबून असेल.

🟪शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी ‘सार्थक’ योजनेचा आरंभ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 याच्या अंमलबजावणीसाठी नवी दिल्लीत 8 एप्रिल 2021 रोजी केंद्रीय शैक्षणिक शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे लक्ष्य आणि उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने तसेच या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सहाय्यकारी होईल अशी मार्गदर्शक योजना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने तयार केली आहे. ‘सार्थक’ (‘Students’ and Teachers’ Holistic Advancement through Quality Education - SARTHAQ) अर्थात गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांचा समग्र विकास असे या योजनेचे पूर्ण नाव आहे. धोरणाचा गाभा आणि लक्ष्य यांचा विचार करून ते टप्प्याटप्प्यांनी राबवण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेच्या अंमलबजावणीनंतर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत पुढील बदल अपेक्षित आहेत - शालेय शिक्षणासाठीचा नवीन राष्ट्रीय आणि राज्यमंडळाचे अभ्यासक्रम, शिशूवर्गासाठी जोपासना आणि शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, प्रौढ शिक्षण या सर्वांची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या गाभ्याशी सुसंगत अशी आखणी, आणि अभ्यासक्रमातील सुधारणांसाठी मार्गदर्शन एकूण विद्यार्थ्यांपैकी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्यांच्या गुणोत्तरात (GER) मध्ये वाढ, एकूण शिक्षणप्रवेशामध्ये वाढ, बदलाचा दर आणि शेवटपर्यंत शिक्षणात टिकून राहण्याचे प्रमाण यांच्यात वाढ याप्रमाणेच शिक्षण सोडणाऱ्यांच्या संख्य़ेत तसेच शालाबाह् मुलांच्या संख्येत घट शिशूवर्गातील मुलांसाठी गुणवत्तापुर्ण जोपासना आणि शिक्षण ECCE आणि मूलभूत साक्षरता तसेच आकडेवारी यासंबधी तिसरी इयत्तेपर्यंतचे जागतिक पातळीचे ज्ञान. लहान वयात मातृभाषा, स्थानिक भाषा विभागीय भाषा यांच्यातून शिक्षणाच्या आदान प्रदानावर भर देत सर्व स्तरांवर शैक्षणिक परिणामातील विकास साधणे सर्व स्तरावरील अभ्यासक्रमात व्यावसायिक अभ्यासक्रम, क्रिडा, कला, भारताविषयीचे ज्ञान, 21 व्या शतकातील कौशल्ये, नागरिकत्वाची मूल्ये, पर्यावरणसंरक्षणाबद्दल जागरुकता यांचा समावेश. सर्व स्तरावर प्रयोगात्मक शिक्षणाची ओळख आणि वर्गशिक्षणासाठी नवीन प्रयोगशील अध्यापनशास्त्र शिक्षणमंडळाच्या परिक्षा आणि विविध प्रवेश परिक्षांमधे सुधारणा. उच्च दर्जाचे व विविधांगी अध्यापन-अध्ययन साहित्य विभागीय/स्थानिक/गृह भाषेतून पाठ्यपुस्तकांची उपलब्धता. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या गुणवत्तेत सुधारणा. नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासातून क्षमता विकास विद्यार्थी व शिक्षकांसाठी सुरक्षित, संरक्षित, सर्वसमावेशक आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा, अडथळ्याविना आणि आंतरशालेय सामायिक संसाधनाची उपलब्धता ऑनलाईन आणि पारदर्शक सार्वजनिक प्रकटनाच्या व्यवस्थेद्वारा राज्यांमध्ये SSSA च्या स्थापनेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यवस्थापन यांच्यासाठी सरकारी तसेच खाजगी शाळांमध्ये एकसमान मानके. तंत्रज्ञानाची सांगड घालून शैक्षणिक योजना आणि शासनव्यवस्था, याशिवाय माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, वर्गात गुणवत्तापुर्ण ई-शिक्षणसाहित्य यांची उपलब्धत.

🟪श्रीनगर येथे नौकानयनासाठी खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राचे उद्घाटन. जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाच्या श्रीनगर या शहरात नौकानयन (रोइंग) या खेळासाठी खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राचे उद्घाटन झाले. केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जम्मू व काश्मिर क्रिडा परिषद जल क्रिडा प्रबोधिनी येथे या सुविधेचे 10 एप्रिल 2021 रोजी उद्घाटन झाले. ▪️‘खेलो इंडिया’ विषयी. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘खेलो इंडिया’ या नवीन योजनेचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे. भारतीय क्रिडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत तरुण खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. ही स्पर्धा अगदी तळागळातील उत्कृष्ट खेळाडूंना समोर आणण्याच्या उद्देशाने आहे. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

🟪कॉपीराइट (दुरुस्ती) नियम, 2021 8 एप्रिल 2021 रोजी केंद्रीय सरकारने ‘कॉपीराइट (दुरुस्ती) नियम 2021’ अधिसूचित केले. विद्यमान नियम इतर संबंधित कायद्यांच्या बरोबरीने आणण्याच्या उद्देशाने या सुधारणा केल्या आहेत. कॉपीराइट कार्यालयात दळणवळणाचे प्राथमिक साधन म्हणून डिजिटल युगातील तांत्रिक प्रगतीच्या अनुषंगाने सहज आणि निर्दोष अनुपालन सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. ▪️ठळक बाबी कॉपीराइट जर्नलच्या प्रकाशनासंदर्भात एक नवीन तरतूद समाविष्ट केली गेली आहे, ज्यायोगे अधिकृत राजपत्रातील प्रकाशनाची आवश्यकता दूर होईल. उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेला प्रोत्साहित करण्यासाठी रॉयल्टीचे संकलन आणि वितरण करताना रॉयल्टी रकमेची वितरित न केलेली रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक व शोधण्यायोग्य पेमेंट पद्धतींचा वापर करण्यासाठी नवीन तरतुदी आणल्या आहेत. कॉपीराइट सोसायटींच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे, त्याद्वारे कॉपीराइट संस्थांना प्रत्येक आर्थिक वर्षासाठी वार्षिक पारदर्शकता अहवाल तयार करणे आणि सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

🟪ISS कडे ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान पाठविण्यात आले 9 एप्रिल 2021 रोजी कझाकस्तानमधील स्पेसपोर्ट येथून ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) याकडे पाठविण्यात आले. ▪️ठळक बाबी अंतराळयानाद्वारे 3 जणांना याकडे पाठविण्यात आले आहे. त्यात रशियाचे दोन व्यक्ती आणि अमेरिकेच्या NASA संस्थेचा एक अभियंता यांचा समावेश होता.हे यान आता 180 दिवसांनी म्हणजेच 13 ऑक्टोबर 2021 रोजी पृथ्वीवर परतणार आहे. ‘सोयुझ एमएस-18’ अंतराळयानाचे संचालन रशियाच्या रोसकॉसमॉस या अंतराळ संस्थेकडून केले जात आहे. व्यक्तींना घेऊन उडणाऱ्या सोयुझ अंतराळयानाचे हे 146 वे उड्डाण आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर दूर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. आज ISS वर अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.

🟪जागतिक होमिओ पॅथी दिन: 10 एप्रिल. दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे क्रिस्टिआन फ्रीड्रिक झामूएल हानेमान यांचा जन्‍मदिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हानेमान यांची 266 वी जयंती साजरी केली जात आहे. या दिनानिमित्त, केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) यांच्यावतीने नवी दिल्लीत 10 एप्रिल आणि 11 एप्रिल 2021 रोजी ‘होमिओपॅथी - एकीकृत उपचार पद्धतीचा मार्ग’ या विषयावरील अधिवेशन भरविण्यात आले. ▪️होमिओपॅथी या उपचारपद्धतीचा शोध ‘क्रिस्टिआन फ्रीड्रिक झामूएल हानेमान’ (1755–1843) या जर्मन शरीरक्रिया वैज्ञानिकाने लावला, म्हणून तिला ‘हानेमानिझम’ असेही म्हणतात. हानेमान यांनी परंपरागत वैद्यकीय पद्धतीला ‘ॲलोपॅथी’ व स्वतःच्या पद्धतीला ‘होमिओपॅथी’ हे नाव दिले. त्यांनी 1969 साली होमिओपॅथी ही समचिकित्सा पद्धती विकसित केली. ‘होमिओपॅथी’ हे निसर्गनियमांवर आधारित शास्त्र किंवा एक वैद्यकीय शाखा आहे. हे शास्त्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ म्हणजेच ‘सम: समं शमयति’ (काट्याने काटा काढणे) या नियमावर आधारित आहे. होमिओपॅथीमधील औषधे असा आजार बरा करतात की, जी औषधे निरोगी मनुष्यास सौम्यमात्रेत दिली असता, ती त्या आजाराचा ठराविक लक्षणसमूह त्याच्यात निर्माण करतात.

🟧 21 मार्च 2021 रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षेत" आपल्या सिम्प्लिफाईड COMBINE सरावप्रश्नसंच या पुस्तकातून 20+ प्रश्नांचा समावेश आहे. ▪️आगामी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आपली प्रत राखून ठेवा. ▪️कमी कालावधीत जास्त सराव आणि Revision साठी महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ▪️महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्वरा करा आजच आपली प्रत राखून ठेवा. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

🟪परीक्षा पे चर्चा’तील सल्ल्याचे ट्विट संदेश अखेर मागे ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्याना अवघड प्रश्न आधी सोडवण्याच्या दिलेल्या सल्ल्याची समाजमाध्यमावर विरोधी पक्ष व इतरांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्या हवाल्याने दिलेले ट्विट संदेश केंद्र सरकारच्या प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोने काढून टाकले आहेत. ‘अल्ट न्यूज’ने याबाबत खातरजमा करून हे ट्विट काढल्यात आल्याचे म्हटले आहे. शालान्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याशी पंतप्रधान दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधत असतात. या वेळी त्यांनी आभासी पातळीवर हा कार्यक्रम घेतला. मोदी यांच्या या संवादाची चित्रफीत प्रसारित करण्यात आली असून त्यात त्यांनी अवघड प्रश्न आधी सोडवून त्याला जास्त वेळ देण्याचे स्पष्ट म्हटले आहे. सुरूवातीला मन ताजेतवाने असते, त्यामुळे तुम्ही अवघड प्रश्न प्रथम सोडवा. नंतर सोप्या प्रश्नांची उत्तरे लिहा असे त्यांनी म्हटले होते. नेहमी परीक्षेत शिक्षक व पालक ‘सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा’ असे सांगत असतात पण मोदी यांनी नेमका उलटा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटली. मोदी यांनी सांगितले, की आपण पंतप्रधान म्हणून आधी अवघड विषयांना हात घातला. मी सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी सदैव तयार असतो.

🟪प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन झालं आहे. बकिंगहम पॅलेसकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलीप यांचा १९४७ साली विवाह झाला होता. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ सोबत व्यतीत केलेले पती-पत्नी होते. अवघ्या आठवड्याभरापूर्वीच प्रिन्स फिलीप अर्थात ड्यूक ऑफ एडिनबर्ग रुग्णालयातून उपचारांनंतर पॅलेसमध्ये परतले होते. त्यांच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. “अतिशय दु:खाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करते की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये निधन झालं”, असं बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. “अतिशय दु:खाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करते की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं आज सकाळी विंडसर कासलमध्ये निधन झालं”, असं बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांना चार मुलं, आठ नातू आणि १० पणतू आहेत. प्रिन्स फिलीप यांचा जन्म ग्रीकमधल्या कोर्फू या बेटावर १० जून १९२१ रोजी झाला. राणी एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी व्हायच्या ५ वर्ष आधी त्यांचा विवाह झाला

🟪ऑलिम्पिकसाठी जपानच्या नव्या उपाययोजना टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर करोना विषाणू संसर्गाचा धोका रोखण्यासाठी आता जपान सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. जपानची राष्ट्रीय लसीकरण मोहीम मागे पडली असून राजधानी टोक्योमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांनी असमर्थता दर्शवली आहे. रात्रजीवनाचा तसेच खाण्यापिण्याचा आस्वाद घेत असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा संसर्ग नंतर कार्यालये, शाळा येथे होत आहे. हे लक्षात घेता बार आणि रेस्टॉरंट्स थोड्या कालावधीसाठी सुरू ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिल्या आहेत. नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ११ मेपर्यंत या नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन जनतेला करावे लागणार आहे. पश्चिम जपानमधील क्योटो आणि ओकिनावा येथे करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे सुगा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओसाका, ह््योगो आणि मियागी या शहरांमध्येही सावधगिरीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

🟪भारतीय सागरी अधिकारक्षेत्रात परवानगीविना अमेरिकेची क्षेपणास्त्र चाचणी अमेरिकी नौदलाने हिंदी महासागरात भारताची परवानगी न घेता लक्षद्वीपनगरच्या भागात सागरी प्रवास दिशादर्शन निश्चिातीची चाचणी घेतली. भारताच्या या भागातील सागरी अधिकारांवर त्यामुळे अतिक्रमण झाले आहे. अमेरिकेच्या सातव्या आरमाराने म्हटले आहे, की यूएसएस जॉन पॉल जोन्स जहाजावरून ७ एप्रिल रोजी आम्ही दिशादर्शक क्षेपणास्त्र सोडले होते. ७ एप्रिल २०२१ रोजी सागरी मोहिमेअंतर्गत लक्षद्वीपपासून पश्चिामेला १३० नाविक मैल अंतरावर क्षेपणास्त्र सोडण्यात आले. प्रत्यक्षात या भागात भारताचा अधिकार असून भारतातील सागरी आर्थिक विभागातील ते क्षेत्र आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही भारताची परवानगी घेतली नसली तरी आंतरराष्ट्रीय नियमांना धरून आम्ही ही दिशादर्शन चाचणी केली आहे. आर्थिक क्षेत्रात किंवा खंडीय प्रदेशात कुठल्याही चाचण्या, सागरी कसरती करताना परवानगी घेणे गरजेचे आहे, अशी भारताची अपेक्षा असली तरी ते आंतरराष्ट्रीय कायद्याशी सुसंगत नाही. सागरी क्षेत्र स्वातंत्र्याबाबतची ही मोहीम आंतरराष्ट्रीय कायद्याला धरूनच घेण्यात आली, त्यात कुणाचे हक्क व स्वातंत्र्य यावर गदा आणण्याचा प्रश्नच येत नाही,असे अमेरिकेने म्हटले असून भारताच्या या भागातील सागरी हक्क दाव्यास एक प्रकारे आव्हान दिले आहे, असे मानले जात आहे.

🟪११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिलला आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. त्यानिमित्त लसीकरण महोत्सवाची घोषणा पंतप्रधानांनी केली. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशाजवळ पूर्वीपेक्षा अधिक संसाधने असून, आता ‘मायक्रो- कंटेनमेंट झोन्स’वर लक्ष केंद्रित करायला हवे यावर त्यांनी भर दिला. करोना महासाथीला आळा घालण्यासाठी ‘चाचणी करा, शोध घ्या, उपचार करा’ या पद्धतीवर मोदी यांनी भर दिला. जनतेच्या सहभागासह आपले कठोर परिश्रम करणारे डॉक्टर्र्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळण्यात फार मोठा हातभार लावला असून अजूनही लावत आहेत, असे ते म्हणाले. ‘अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

🧩लिंग विकास निर्देशांक (GDI)🧩 महिला HDI किंमत : 0.574 पुरुष HDI किंमत : 0.692 ●जन्माच्या वेळी आयुर्मान : महिला (70.7 वर्ष), पुरुष (68.2 वर्ष) ●अपेक्षित शालेय वर्ष : महिला (12.9 वर्ष), पुरुष (11.9 वर्ष) सरासर शालेय वर्ष : महिला (4.7 वर्ष), पुरुष (8.2 वर्ष) ●दरडोई अंदाजित स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (2011 PPP डॉलर्स) महिला (2,625), पुरुष (10,712)

✔️ २०१९-२० मधील महत्त्वाचे जीआय टॅग 🔶 कधंमाल हळद : ओडिशा 🔶 ओडिशा रसगुल्ला : ओडिशा 🔶 काश्मीरी केसर : जम्मू व काश्मीर 🔶 मणिपुरी ब्लॅक राईस : मणिपूर 🔶 चाक-हाओ : मणिपूर 🔶 कडाईकनल मलाई : तमिळनाडू 🔶 पलानी पंचमीर्थम : तमिळनाडू 🔶 दिडींगुल कुलुप : तमिळनाडू 🔶 कनडांगी साडी : तमिळनाडू 🔶 कडलाई मिठाई : तमिळनाडू 🔶 अरंबवुर वुड कार्विंग्स : तमिळनाडू 🔶 हमारम : मिझोरम 🔶 तावल्होपुआन : मिझोरम 🔶 मिझो पुआनचेई : मिझोरम 🔶 तिरुर विड्याची पाने : केरळ 🔶 गुलबर्गा तूर डाळ : कर्नाटक 🔶 खोला मिर्ची : गोवा 🔶 इडु मिश्मी टेक्सटाइल : अरुणाचल 🔶 काजी नेमु : आसाम 🔶 चोकुआ राईस : आसाम 🔶 तेलिया रुमाल : तेलंगणा 🔶 आयरीश व्हिस्की : आयर्लंड .

MPSC SIMPLIFIED(official) - Estadísticas y analítica del canal de Telegram @mpscsimplified