es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 711 suscriptores, ocupando la posición 5 599 en la categoría Educación y el puesto 11 969 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 711 suscriptores.

Según los últimos datos del 10 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -87, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.98%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.78% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 364 visualizaciones. En el primer día suele acumular 1 275 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 711
Suscriptores
Sin datos24 horas
-177 días
-8730 días
Archivo de publicaciones
🟪रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर नेमणूक हॉलीवूडमधील अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह २०२० सालचे ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्य़ातील परिटेवाडी या खेडय़ात प्राथमिक शिक्षक असलेले डिसले यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस १ अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार जिंकला होता. याच पुरस्काराशी साधम्र्य साधणाऱ्या ५० हजार अमेरिकी डॉलरच्या पुरस्काराच्या निवड समितीवर आता त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे. अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे.

🟪सौदी अरेबियाचे भारत-पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी संवादाचे आवाहन भारत व पाकिस्तान यांनी काश्मीर प्रश्न व इतर प्रलंबित प्रश्नांवर एकमेकांशी संवाद साधावा, असे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले असून ते पाकिस्तान व सौदी अरेबिया यांच्या दरम्यानच्या मतैक्याबाबत आहे. सौदी अरेबियाचे राजे महंमद बिन सलमान यांच्याशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उच्चस्तरीय चर्चा केली असून खान हे ७ ते ९ मे दरम्यान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरसह इतर मुद्दय़ांवर संवाद साधावा असे आवाहन केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये स्थिरता नांदावी अशी अपेक्षा दोन्ही देशांनी व्यक्त केली. राजे सलमान यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार न करण्याबाबत केलेल्या शस्त्रसंधीचे स्वागत केले आहे. २००३ मध्ये ही शस्त्रसंधी पहिल्यांदा करण्यात आली आणि नंतर त्याचे वारंवार उल्लंघन झाले होते. भारत व पाकिस्तान यांच्या लष्करांमध्ये २५ फेब्रुवारी रोजी शस्त्रसंधीचे पालन करण्यावर मतैक्य झाले होते. खान यांनी सौदी अरेबियातील भेटीत द्विपक्षीय प्रश्न, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली. अमली पदार्थांच्या चोरटय़ा व्यापाराला निर्बंध घालण्याचा करार या वेळी करण्यात आला. पाकिस्तानातील ऊर्जा प्रकल्पांना निधी देण्याचे सौदी अरेबियाने मान्य केले आहे. कैद्यांच्या हस्तांतराचाही करार या वेळी करण्यात आला.

🟪अखेर पाकिस्ताननं मान्य केलंच! “कलम ३७० भारताचा अंतर्गत मुद्दा”, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं स्पष्ट ऑगस्ट २०१९मध्ये भारताच्या संसदेनं काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यासंदर्भातलं विधेयक देखील पारित करण्यात आलं. मात्र, तेव्हापासूनच पाकिस्तानकडून या निर्णयावरून आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेश यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर कायमच आगपाखड केलेली दिसून आली आहे. मात्र, आता पहिल्यांदाच कलम ३७० ही भारताची अंतर्गत बाब असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली आहे. मात्र, असं सांगताना त्यांनी कलम ३५अ आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं देखील नमूद केलं आहे. भारतीय संसदेनं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात तीव्र शब्दांत टीका देखील केली होती. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं हे कलम रद्द केल्यानंतर भारत सरकारने जम्मू-काश्मीरची विभागणी लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील केली. त्यावरून पाकिस्तानने भारत सरकारवर टीका करत तीव्र नापसंती दर्शवली होती. काश्मीरच्या मुद्द्यांवर भारत सरकार योग्य भूमिका घेत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतेही व्यापारी संबंध ठेवले जाणार नाहीत, अशी भूमिका नुकतीच शाह महमूद कुरेशी यांनी घेतली होती. मात्र, आता आपल्या या भूमिकेवरून पाकिस्ताननं घुमजाव केलं आहे.

🟪माद्रिद खुली टेनिस स्पर्धा - सबालेंका अजिंक्य. बेलारुसच्या पाचव्या मानांकित आर्यना सबालेंकाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टीला नमवून महिला एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. दोन आठवडय़ांपूर्वी स्नायूंच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करणाऱ्या सबालेंकाने दमदार खेळ करताना मातीच्या कोर्टवरील पहिले जेतेपद मिळवले. तिने बार्टीला ६-०, ३-६, ६-४ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. सबालेकांचे हे कारकीर्दीतील एकूण १०वे जेतेपद ठरले. २५ एप्रिलला झालेल्या स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत बार्टीनेच सबालेंकाला धूळ चारली होती. मात्र या विजयासह तिने त्या पराभवाचा वचपा काढला. आता २३ वर्षीय सबालेंका जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेणार आहे. पुरुष एकेरीच्या सोमवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि इटलीचा मॅटिओ बॅरेट्टिनी आमनेसामने येणार आहेत.

🟪पुडुचेरी: प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा करणारे चौथे राज्य / केंद्रशासित प्रदेश. पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाने जल जीवन अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा देण्याचा संकल्प पूर्ण केला. असे करणारे पुडुचेरी हे गोवा, तेलंगणा आणि अंदमान व निकोबार बेटे यांच्या पाठोपाठ देशातील चौथे राज्य / केंद्रशासित प्रदेश तसेच दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरले आहे. ▪️जल जीवन अभियान जल जीवन अभियानाचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आला. भारत सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे. अभियानाच्या अंमलबजीवणीची जबाबदारी जलशक्ती मंत्रालयाला देण्यात आली आहे. 2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

🟪हेमंत बिस्वा सरमा: आसामचे नवीन मुख्यमंत्री. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत बिस्वा सरमा यांनी 9 मे 2021 रोजी आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 8 मे 2021 रोजी आसाम भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेते म्हणून सरमा यांची निवड झाली. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. राज्यपालांनी सरमा यांचा दावा स्वीकारला व त्यांना सरकार स्थापण करण्यासाठी आमंत्रण दिले. ▪️आसाम राज्य आसाम हे भारताच्या ईशान्य कोपऱ्यातले राज्य आहे. त्याच्या वायव्येस व उत्तरेस भूतान, उत्तरेस व ईशान्येस अरुणाचल प्रदेश व त्यापलीकडे तिबेट, पूर्वेस अरुणाचल प्रदेश, नागालँड व मणिपूर, दक्षिणेस मेघालय व मिझोराम, नैर्ऋत्येस त्रिपुरा आणि पश्चिमेस बांगला देश व पश्चिम बंगाल राज्याचे जलपैगुरी व कुचबिहार जिल्हे आहेत. आसामची राजधानी शिलाँग आहे. भारतीय संघराज्याचे आसाम हे एक घटक राज्य असून राष्ट्रपतीने नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीने मंत्रिमंडळ कारभार पाहते. मंत्रिमंडळ एकसदनी विधानसभेला जबाबदार असून विधानसभेचे 114 सदस्य आहेत. राज्यातून लोकसभेवर 14 व राज्यसभेवर 7 सदस्य निर्वाचित होतात.

🟪भारतातील करोनाचा नवा विषाणू चिंतेचा विषय; WHOने दिला इशारा. करोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची पुन्हा एकदा झोप उडवली आहे. अनेक देशांनी करोनाचा नवे प्रकार आढळून आले आहे. करोनाचा विषाणू स्वरूप बदलत असून, करोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण भारतात मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात आढळून आलेल्या करोनाच्या B.1.617 प्रकारचा विषाणू जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. भारतात आढळून आलेल्या B.1.617 या विषाणूवर सुरूवातीला लक्ष ठेवण्यात आले होते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड -१९ टेक्निकल लीडच्या डॉ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सोमवारी सांगितले. या विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध भागांमध्ये चर्चा सुरू असून भारतात आणि इतर देशांमध्ये या विषाणूचा कसा प्रसार झाला याचा अभ्यास सुरू असल्याचे व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले. या विषाणूमुळे भारतातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हंटले आहे.

🟪राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन: 11 मे दरवर्षी 11 मे या दिवशी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करतात. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंते आणि वैज्ञानिकांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणे हे या दिनामागाचे उद्दीष्ट आहे. 11 मे 2020 रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन "शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान" (Science and Technology for a Sustainable Future) या संकल्पनेखाली पाळण्यात आला. ▪️इतिहास. सन 1998 मध्ये 11 मे या दिवशी भारताने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन शक्ती’ (पोखरण-2) ही दुसरी अणुचाचणी यशस्वी पार पाडली होती. ही चाचणी पोखरण (राजस्थान) या ठिकाणी आयोजित केली गेली होती. तसेच 11 मे 1998 रोजी ‘हंसा-3’ या पहिल्या स्वदेशी विमानाची बेंगळुरुमध्ये चाचणी घेण्यात आली होती. भारतीय विज्ञान क्षेत्रातील अश्या ऐतिहासिक घटनांच्या स्मरणार्थ भारतात 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन पाळला जातो.

🟪तिसर्‍या आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठकीत भारत सहभागी. आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक व्यासपीठ असलेल्या आर्क्टिक परिषदेची तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक 8 मे आणि 9 मे 2021 रोजी पार पडली. या बैठकीय भारताच्यावतीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य व कुटुंब कल्याण, आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आर्क्टिक क्षेत्रात संशोधन, कार्य आणि सहकार्यासाठी भारताची दृष्टी आणि दीर्घकालीन योजना हितधारकांसोबत सामायिक केल्या. आर्क्टिकमध्ये निरिक्षण यंत्रणेत अव्याहत आणि रिमोट सेन्सिंगद्वारे योगदान देण्याची आपली योजना भारताने सामायिक केली. त्यासाठी अमेरिकेच्या सहकार्याने NISER (NASA-ISRO सिंथेटिक अपेर्चर रडार) उपग्रह अभियानाचे प्रक्षेपण होणार आहे. ▪️ठळक बाबी. तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय (ASM 3) ही आशिया खंडातील पहिली मंत्रीस्तरीय बैठक आहे. आइसलँड आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित केली होती. ‘शाश्वत आर्क्टिकसाठी ज्ञान’ (Knowledge for a Sustainable Arctic) ही ASM 3 बैठकीची संकल्पना होती. आर्क्टिक क्षेत्राविषयी सामूहिक समज वाढविण्यासाठी, निरंतर देखरेखीवर भर देण्यासाठी आणि निरिक्षणांना बळकटी देण्यासाठी विविध हितधारकांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून ही बैठक आयोजित केली गेली.आर्क्टिक परिषदेच्या पहिल्या दोन बैठका अनुक्रमे 2016 साली अमेरिकेत आणि 2018 साली जर्मनी येथे झाल्या. ▪️आर्क्टिक परिषद. आर्क्टिक परिषद हा शाश्वत विकास आणि आर्क्टिकमधील पर्यावरणीय संरक्षणाकडे सहकार्य, समन्वय आणि संवाद वाढविण्यासाठी एक उच्चस्तरीय आंतर-सरकारी मंच आहे. परिषदेची स्थापना 19 सप्टेंबर 1996 रोजी झाली.आर्क्टिक क्षेत्रावर सार्वभौमत्व असणारे आठ देश या परिषदेचे सदस्य आहेत; ते पुढीलप्रमाणे आहेत - कॅनडा, डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड, नॉर्वे, रशिया, स्वीडन आणि अमेरिका. इतर देश ‘निरीक्षक’ म्हणून आहेत. 2013 सालापासून आर्क्टिक परिषदेत इतर बारा देशांसह भारताला ‘निरीक्षक’ दर्जा प्राप्त आहे. ▪️आर्क्टिक प्रदेश. हा पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश आहे. उत्तर ध्रुवाभोवतीच्या प्रदेशाला ‘आर्क्टिक’ हे नाव पडले. प्रदेशाच्या आत ग्रीनलंड, स्पिट्स्‌बर्गेन व इतर ध्रुवीय बेटे, अलास्का, कॅनडा व सायबीरियाचा उत्तर भाग, लॅब्रॅडॉरचा किनारा आणि आईसलँड, नॉर्व, स्वीडन, फिनलंड व यूरोपीय रशिया यांचे उत्तर भाग हे प्रदेश येतात. आर्क्टिक प्रदेश तापमानवाढ आणि बर्फ वितळणे ही जागतिक चिंता आहे कारण ते हवामान, समुद्राची पातळी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शिवाय, आर्क्टिक आणि हिंद महासागर (जे भारतीय मान्सूनचे नियमन करतात) यांच्यात दुवा असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

🟪ICCच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर बाबर आझमने कोरले नाव. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेच्या सर्व स्वरूपात बाबरने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ९४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला १३ रेंटिग गुण मिळाले. या गुणांसह त्याने भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २७४ धावांचा पाठलाग करताना २६ वर्षीय बाबरने १०३ धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले. एप्रिल महिन्यात बाबरने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ७६च्या प्रभावी सरासरीने २२८ धावा केल्या. तर, ७ टी-२० सामन्यांत बाबरने ३०५ धावा केल्या. टी-२० मालिकेत पाकिस्तानने झिम्बाब्वेला २-१ असे पराभूत केले, या संघाआधी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून आला होता.

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

MEGABHARTI BOOK SAMPLE COPY.pdf2.73 MB

▪️OMR Sheet & Self Analysis Chart. ▪️आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी उपयुक्त OMR Sheet आणि स्व:मूल्यमापन तक्ता

Final Simplified 14th Edition.pdf93.59 MB

Sample Copy 👆👆👆👆 🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा » १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI) » मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध ..... Buy Online Publication Online store 👇 www.simplifiedcart.com Buy Online Amazon https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM

5th Edition CSAT Simplified Sample Copy(1)(1).pdf4.83 MB

◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook (Pdf) स्वरूपात सर्वत्र मोफत उपलब्ध 📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच. 📍GS+CSAT च्या Comprehensive प्रश्नपत्रिका. 📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. 📍अल्पावधी तयारीसाठी व Revision साठी उपयुक्त. ✍डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ✍नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ◼️Buy Simplified Publication Online Book Store👇 www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com Contact - 8788639688 ◼️Join करा Simplified Discussion Group👇 @simplified_publication

photo content

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬