es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 708 suscriptores, ocupando la posición 5 597 en la categoría Educación y el puesto 11 970 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 708 suscriptores.

Según los últimos datos del 06 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -81, y en las últimas 24 horas de -3, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 9.92%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.17% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 344 visualizaciones. En el primer día suele acumular 1 068 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 07 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 708
Suscriptores
-324 horas
-477 días
-8130 días
Archivo de publicaciones
photo content

🟪चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत - जितेंद्र सिंह. चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. करोना साथीमुळे या मोहिमेची गती मंदावली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अवकाश खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी म्हटले आहे की, चांद्रयान ३ मोहिमेचे वेळापत्रक बदलावे लागत आहे. चांद्रयान ३ मोहिमेत अनेक प्रक्रिया असून त्यात अनेक उपप्रणाली, त्यांची जोडणी व तपासणी असे अनेक मुद्दे आहेत. या प्रकल्पाची प्रक्रिया करोनामुळे लांबली असून घरून जे काम करता येणे शक्य आहे तेवढे टाळेबंदीच्या काळात पूर्ण झाले आहे. चांद्रयान ३ मोहीम अमलात आणण्यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल व ही मोहीम तरीही प्रगतिपथावर आहे. यापूर्वी भारताने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सोडले होते. जिथे कुठल्याही देशाने तोपर्यंत यान पाठवले नव्हते. भारताच्या शक्तिशाली प्रक्षेपकाच्या मदतीने ते यान सोडण्यात आले होते. त्या वेळी ७ सप्टेंबर २०१९ रोजी विक्रम या लँडरचे आघाती अवतरण झाल्याने भारताला चंद्रावर गाडी उतरवण्यात अपयश आले होते. अन्यथा पहिल्याच प्रयत्नात गाडी तेथे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता. चांद्रयान ३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोसाठी महत्त्वाची असून त्यात आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भारताच्या कामगिरीस बळ मिळणार आहे.

🟪धोलावीरा (हडप्पाकालीन शहर): भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ. गुजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा या स्थळाला जुलै 2021 महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त अलीकडेच, तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे. भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे. ▪️धोलावीरा शहराविषयी. हडप्पा संस्कृतीतील हे शहर दक्षिण आशियातील अगदी मोजक्या उत्तम पद्धतीने जतन केलेल्या प्राचीन नागरी वसाहतींपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व काळात, तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या काळात इथे मानवी संस्कृती असल्याच्या खुणा सापडतात. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते. आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ सहाव्या स्थानी असून, या ठिकाणी सुमारे 1500 वर्षे मानवी वस्ती असावी, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मानवी जीवनाच्या या प्राचीन, अत्यंत सुरुवातीच्या काळातील,नागर संस्कृतीचा उदय आणि अस्त या दोन्हीचे धोलावीरा हे साक्षीदार आहे. त्या काळातील नागरी शहररचना, बांधकाम तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, सामाजिक प्रशासन आणि त्याचा विकास, कला, उत्पादन, व्यापार, तसेच श्रद्धा-समजुती अशा त्या संस्कृतीतील सर्व समृद्ध जीवनाची माहिती आपल्याला या स्थळी मिळू शकते. धोलावीरा येथे, या सर्व संस्कृतींच्या खुणा अत्यंत उत्तम पद्धतीने जतन केल्या असून, अतिशय समृद्ध अशा कलात्मक वस्तूंच्या या नागरी वस्तीची सर्व प्रादेशिक वैशिष्ट्येही याठिकाणी आपल्याला आढळतात. ज्यातून, एकूण हडप्पा संस्कृतीविषयीचे समग्र ज्ञान आपल्याला मिळू शकते. धोलावीरा या शहराच्या जन्मापासून त्याची नगररचना, ही नियोजित शहर आणि वर्गीकृत अशा नागरी रहिवासी वस्त्यांचे अप्रतिम उदाहरण आहे. त्या काळातील लोकांच्या विविध व्यावसायिक कामांच्या अनुषंगाने तशी स्तररचना करण्यात आली आहे. जल संवर्धनातील, सांडपाणी व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची प्रगती तसेच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञान दृष्ट्या विकसित वैशिष्ट्ये, या रचनेत आपल्याला जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे त्यात स्थानिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. धोलावीरा हे प्रगैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. या वारसा स्थळी, हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृति आणि अखेरचा काळ, या सर्व खुणा आढळतात. अगदी सुरुवातीच्या काळातील पुरावा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वीचा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडतात. पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली अत्यंत महागडी जलव्यवस्थापन प्रणाली, त्या काळातील लोकांची भू-हवामानात होणाऱ्या बदलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीची साक्ष देणारी आहे. पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळवणे, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध भूजलाचा वापर करणे, मोठमोठ्या दगडी जलाशयांमध्ये त्याची साठवणूक आणि जतन करणे हे आजही आपल्याला पौर्वात्य आणि दक्षिण संस्कृतित आजही आपल्याला दिसते. तसेच, पाणी मिळवण्यासाठी खडकात खोदलेल्या विहिरी या अशाप्रकारचे सर्वात प्राचीन उदाहरण आहे. अशा प्रकारची रचना त्यांच्या किल्यामध्ये आढळते धोलावीरा इथल्या जलसंवर्धनाच्या पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून प्राचीन जगातातील त्या सर्वाधिक प्रभावी उपाययोजना मानल्या जातात.

🟪बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी. “बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे “बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. ▪️विधेयकातील दुरुस्ती. प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि जबाबदारी वृद्धिंगत करण्यासाठी या सुधारणांमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्याना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यास अधिकृत मान्यता समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत मुलांच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कायद्याअंतर्गत अधिक अधिकार देण्यात आले आहेत. कायद्याच्या सुधारित तरतुदींनुसार कोणत्याही बाल-देखभाल संस्थेची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शिफारसींचा विचार करून केली जाईल. जिल्हा दंडाधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा बाल संरक्षण विभाग, बालकल्याण समित्या, बाल न्याय मंडळे, विशेष बालकांसाठी पोलिस विभाग, बाल देखभाल संस्था इत्यादींच्या कार्याचे मूल्यांकन करतील.

🟪राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. अस्थाना हे येथील जयसिंह मार्गावरील दिल्ली पोलीस मुख्यालयात पोहोचले, त्या वेळी त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. ‘दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून मी आज पदभार स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे रोखणे या पोलीस सेवेच्या प्राथमिक संकल्पनांवर माझा विश्वास असून आम्ही त्याच करणे अपेक्षित आहे. या गोष्टी योग्य रीतीने करण्यात आल्यास समाजात शांतता नांदेल’, असे अस्थाना यांनी पत्रकारांना सांगितले. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहणारे राकेश अस्थाना हे तत्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले. अस्थाना हे ३१ जुलैला निवृत्त होणार असताना काही दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ वर्षांचा राहणार आहे.

🟪कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोम्मई यांचा शपथविधी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांचा शपथविधी बुधवारी येथे झाला असून तेथील राजकीय अस्थिरतेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. येडियुरप्पा पक्षाच्या आदेशानुसार पायउतार झाल्यानंतर बोम्मई यांच्या नावाची घोषणा भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यानुसार बोम्मई यांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोम्मई यांची नेतेपदी निवड केली होती. बोम्मई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते असून येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे यापुढेही कर्नाटकच्या राजकारणावर येडियुरप्पा यांचा प्रभाव राहील असे सांगण्यात येते. बोम्मई हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.आर बोम्मई यांचे पुत्र असून येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते गृह कामकाज, कायदा, विधिमंडळ कामकाज या खात्याचे मंत्री होते. आता येडियुरप्पा यांचे मंत्रिमंडळ विसर्जित झाले असून बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ सत्तारुढ होत आहे. कर्नाटकात पिता-पुत्र जोडीने मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एच.डी. देवेगौडा तसेच एच.डी. कुमार स्वामी या पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री पद सांभाळले होते. बोम्मई हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हावेरी जिल्ह्य़ातील शिगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात.

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

photo content
+5

photo content
+9

🟪आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचे यश. नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धे’त भारताला १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य पदके मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताला ३ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थिनीने रौप्य पदक मिळवले आहे. पुण्याचा १८ वर्षीय अनिष कुलकर्णी गेली ५ वर्षे गणित ऑलिम्पियाडची तयारी करत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम ६ विजेते आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जातात. यंदाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी अनीशला मिळाली. त्याने रौप्य पदक पटकावले. पुण्याचीच १६ वर्षीय अनन्या रानडे हिने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्य पदक पटकावले तर ‘युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड’ स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई के ली आहे. २०२१च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा बंगळूरुचा प्रांजल श्रीवास्तव याने २०१८ मध्ये रौप्य पदक व २०१९ मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. या स्पर्धेत आतापर्यंत २ सुवर्ण पदके मिळवणारा प्रांजल हा पहिला भारतीय विद्यार्थी ठरला आहे. नवी दिल्लीचा रोहन गोयल, गाझियाबादचा सुचिर कौस्तव यांनी कांस्य पदके मिळवली आहेत. डॉ. एस. मुरलीधरन, साहील म्हसकर, प्रा. एस. आर. कृष्णन, अनंत मुदगल यांनी भारतीय समूहाला मार्गदर्शन केले. अन्शुल सिवच, धिरेन भारद्वाज, नमन सिंग यांनी जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये रौप्य पदक मिळवले आहे तर स्वराज नंदी याने कांस्य पदक पटकावले आहे.

🟪NMCG संस्थेचा ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ उपक्रम. विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने (NMCG) ‘गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरे तयार करणे’ या विषयावर आधारित एक नवीन क्षमता निर्मितीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गंगा नदीच्या खोऱ्यातील शहरांमध्ये नदीचे आरोग्य सुधारण्यात मदत होणाऱ्या शस्वत शहरी जल व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी क्षमता निर्मिती आणि कृती संशोधनाला चालना देणे, हा या उपक्रमाचा हेतु आहे. ▪️कार्यक्रम पुढील घटकांवर केंद्रीत असणार, जल संवेदनशील नागरी संरचना आणि नियोजन शहरी भूजल व्यवस्थापन शहरी जल कार्यक्षमता आणि संवर्धन विकेंद्रित सांडपाण्यावरील प्रक्रिया आणि स्थानिक पुनर्वापर शहरी पाणी संस्था / तलाव व्यवस्थापन या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या भागधारकांमध्ये महानगरपालिका, तांत्रिक आणि संशोधन घटक, राज्य कार्यक्रम व्यवस्थापन गट, नमामि गंगे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक तळागाळातील समुदाय यांचा समावेश आहे. ▪️राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) विषयी. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या “गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016” अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.

🟪अमेरिकेतील लस घेतलेल्या नागरिकांनाही पुन्हा घालावा लागणार मास्क; आरोग्य प्रशासनाचे निर्देश. अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. करोना विषाणूंमध्ये सतत बदल होत असल्याने आणि डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (Centers for Disease Control and Prevention) संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. “संसर्गाचं प्रमाण जास्त तसंच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत आहे,” असं त्यांनी सांगितलं. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील दक्षिण भागात संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील लसीकरण झालेल्या भागांमध्ये संक्रमणाचा मध्यम स्तरावर आहे.

🟪लोटिस्मा’ संग्रहालयातील साहित्यठेव्याला जलसमाधी चिपळूणच्या साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळातील अग्रगण्य लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) संग्रहालयातील अमूल्य साहित्यठेव्याला महापुरात जलसमाधी मिळाली. मात्र, या आघाताने खचून न जाता संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी या प्रकल्पाचे प्रवर्तक आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ‘लोटिस्मा’ या लघुनामाने प्रसिद्ध असलेल्या या वाचनालयातर्फे २०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याच वेळी देशपांडे यांनी अशा स्वरूपाच्या संग्रहालय आणि संशोधन केंद्राचा संकल्प सोडला होता. त्यानंतर विविध पातळ्यांवर सतत पाठपुरावा करत गेल्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. ख्यातनाम पुरातत्त्व संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. या संदर्भात ‘लोकसत्ता’ला माहिती देताना देशपांडे यांनी सांगितले की, यापूर्वी चिपळुणात जुलै २००५ रोजी महापूर आला होता. त्या वेळची धोक्याची पातळी आधारभूत मानून सुरक्षित अंतरावर वाचनालयाच्या आवारात संग्रहालय साकारले. पण यंदाच्या महापुराने तो अंदाज चुकीचा ठरवल्याने येथील जुने दस्तावेज आणि वस्तूंचा मोठा ठेवा पुराच्या पाण्यात बुडाला किंवा वाहून गेला. कोकणातील लोकांचे संदर्भ असलेले झाशीच्या राणीच्या काळापूर्वीही सुमारे शंभर वर्षे जुने (१७५०-६०) जमाखर्चाचे कागद, १८५५ साली छापलेले पुस्तक, एकेकाळी चिपळूण हे बंदर होते, असा पुरावा देणारे पत्ते असलेली पोस्ट कार्ड, व्हिक्टोरिया राणीच्या काळापासूनचे (१९ वे शतक) निरनिराळ्या संस्थानांचे बॉन्ड पेपर, दुर्मीळ हस्तलिखिते, सुमारे ५० फूट लांबीची जन्मपत्रिका इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे.

🟪भारतात प्रवास करणाऱ्या नागरिकांवर ‘हा’ देश घालणार तीन वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून महत्वाची पावलं उचलली जात असून काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. या देशांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे. या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांवर तीन वर्षांसाठी प्रवासाची बंदी घालण्यात येणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. परराष्ट मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही सौदी नागरिक ज्यांना मे महिन्यात प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली होती त्यांनी प्रवासी नियमांचं उल्लंघन केलं आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच ही परवानगी देण्यात आली होती. “जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसंच मोठा दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांच्यावर तीन वर्षांसाठी प्रवासबंदी घालण्यात येईल,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सौदी अरेबियाने ज्या देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. सौदी अरेबियाने अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त. इथोपिया, भारत. इंडोनेशिया, लेबॅनन, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करु नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिला आहे. “नागरिकांना ज्या देशांनी अद्याप करोनावर नियंत्रण मिळवलेलं नाही किंवा क्या देशांमध्ये नवे विषाणू फैलावत आहेत तिथे थेट किंवा दुसऱ्या देशांमधून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे”.

🟪धोलावीरा (हडप्पाकालीन शहर): भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ. गुजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा या स्थळाला जुलै 2021 महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त अलीकडेच, तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे. भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे. ▪️धोलावीरा शहराविषयी. हडप्पा संस्कृतीतील हे शहर दक्षिण आशियातील अगदी मोजक्या उत्तम पद्धतीने जतन केलेल्या प्राचीन नागरी वसाहतींपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व काळात, तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या काळात इथे मानवी संस्कृती असल्याच्या खुणा सापडतात. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते. आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ सहाव्या स्थानी असून, या ठिकाणी सुमारे 1500 वर्षे मानवी वस्ती असावी, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मानवी जीवनाच्या या प्राचीन, अत्यंत सुरुवातीच्या काळातील,नागर संस्कृतीचा उदय आणि अस्त या दोन्हीचे धोलावीरा हे साक्षीदार आहे. त्या काळातील नागरी शहररचना, बांधकाम तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, सामाजिक प्रशासन आणि त्याचा विकास, कला, उत्पादन, व्यापार, तसेच श्रद्धा-समजुती अशा त्या संस्कृतीतील सर्व समृद्ध जीवनाची माहिती आपल्याला या स्थळी मिळू शकते. धोलावीरा येथे, या सर्व संस्कृतींच्या खुणा अत्यंत उत्तम पद्धतीने जतन केल्या असून, अतिशय समृद्ध अशा कलात्मक वस्तूंच्या या नागरी वस्तीची सर्व प्रादेशिक वैशिष्ट्येही याठिकाणी आपल्याला आढळतात. ज्यातून, एकूण हडप्पा संस्कृतीविषयीचे समग्र ज्ञान आपल्याला मिळू शकते. धोलावीरा या शहराच्या जन्मापासून त्याची नगररचना, ही नियोजित शहर आणि वर्गीकृत अशा नागरी रहिवासी वस्त्यांचे अप्रतिम उदाहरण आहे. त्या काळातील लोकांच्या विविध व्यावसायिक कामांच्या अनुषंगाने तशी स्तररचना करण्यात आली आहे. जल संवर्धनातील, सांडपाणी व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची प्रगती तसेच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञान दृष्ट्या विकसित वैशिष्ट्ये, या रचनेत आपल्याला जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे त्यात स्थानिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. धोलावीरा हे प्रगैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. या वारसा स्थळी, हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृति आणि अखेरचा काळ, या सर्व खुणा आढळतात. अगदी सुरुवातीच्या काळातील पुरावा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वीचा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडतात. पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली अत्यंत महागडी जलव्यवस्थापन प्रणाली, त्या काळातील लोकांची भू-हवामानात होणाऱ्या बदलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीची साक्ष देणारी आहे. पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळवणे, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध भूजलाचा वापर करणे, मोठमोठ्या दगडी जलाशयांमध्ये त्याची साठवणूक आणि जतन करणे हे आजही आपल्याला पौर्वात्य आणि दक्षिण संस्कृतित आजही आपल्याला दिसते. तसेच, पाणी मिळवण्यासाठी खडकात खोदलेल्या विहिरी या अशाप्रकारचे सर्वात प्राचीन उदाहरण आहे. अशा प्रकारची रचना त्यांच्या किल्यामध्ये आढळते धोलावीरा इथल्या जलसंवर्धनाच्या पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून प्राचीन जगातातील त्या सर्वाधिक प्रभावी उपाययोजना मानल्या जातात.

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ONLINE BOOKING www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

✌️ SCBC उमेदवारांना EWS दाखले देणार
✌️ SCBC उमेदवारांना EWS दाखले देणार

🟪 सन 2010 पासून 29 जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो. ▪️याच दिवशी 2010 मध्ये रशियातील पीटर्सबर
🟪 सन 2010 पासून 29 जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो. ▪️याच दिवशी 2010 मध्ये रशियातील पीटर्सबर्ग शहरात एक संमेलन झाले होते. या संमेलनात वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प करण्यात आला होता. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो.

photo content