es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 714 suscriptores, ocupando la posición 5 598 en la categoría Educación y el puesto 11 970 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 714 suscriptores.

Según los últimos datos del 05 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -74, y en las últimas 24 horas de -8, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 14.14%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 4.99% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 4 766 visualizaciones. En el primer día suele acumular 1 681 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 06 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 714
Suscriptores
-824 horas
-427 días
-7430 días
Archivo de publicaciones
photo content

photo content
+5

🟪वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच” 👍संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी एक मंच स्थापन करण्यासाठी एका ठरावाला 2 ऑगस्ट 2021 रोजी मान्यता दिली. 👍त्या मंचाचे “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच” (Permanent Forum of People of African Descent) हे नाव असेल. ती 10 सदस्य असलेली एक सल्लागार संस्था असेल, जी जिनेव्हा मानवी हक्क परिषदेसोबत कार्य करेल. एकूण सदस्यांपैकी 5 जणांना सदस्य देशांच्या सरकारांनी नामांकन दिलेल्या व्यक्तींमधून निवडले जाणार तर इतर पाच जणांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क परिषद करणार. 🔴संयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी... 👍आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 👍1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे. 👍संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे. 👍संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे. 👍संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश. संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत - 👍संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (General Assembly) 👍संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (Security Council) 👍संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council / ­ECOSOC) 👍संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) 👍संयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे). 🔴संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत - 👍जागतिक बँक समूह जागतिक आरोग्य संघटना (WHO) जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program) संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization / UNESCO) संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund / UNICEF)

🟪१३५ देशांत डेल्टाचा कहर; जागतिक रुग्णसंख्या २० कोटींवर करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक करोना अपडेटमध्ये म्हटलंय. जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे. जागतिक पातळीवर नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांची एकत्रित संख्या आता जवळपास १९.७ कोटी झाली असून एकूण मृतांची संख्या ४२ लाख झाली आहे. रुग्णांची संख्या याच गतीने वाढत राहिली तर पुढच्या आठवड्यात रुग्णसंख्या २० कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.गेल्या आठवड्यात सर्वात जास्त ५ लाख ४३ हजार ४२० रुग्ण अमेरिकेत आढळले असून त्यापाठोपाठ २ लाख ८३ हजार ९२३ रुग्ण भारतात आढळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया, नंतर ब्राझील आणि इराण आहेत. तर, गेल्या आठवड्यात सर्वाधिक मृत्यू १२ हजार ४४४ इंडोनेशियात झाले असून त्यापाठोपाठ भारतात ३ हजार ८०० मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे.

🟪प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान. 7 ऑगस्ट 2021 रोजी केंद्रीय सरकारने जाहीर केले की 2 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान योजनेच्या अंतर्गत सुमारे 5 कोटी लाभार्थ्यांची नावनोंदणी झाली आणि 4 कोटी लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात 2 कोटींहून अधिक महिला लाभार्थी आहेत. 🟪प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान... देशात डिजिटल व्यवस्थेचा प्रचार करणे आणि त्यांच्या माध्यमाने कामे करण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाची रचना करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गत मार्च 2022 पर्यंत सहा कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे 6 कोटी लोकांना डिजिटल साक्षर करण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ,अल्पसंख्यांक, दारिद्र्य रेषेखालील, महिला, दिव्यांग आणि तरुण अश्या विविध गटांमधील उपेक्षित भागांचा विकास करण्यासाठी कार्य केले जात आहे. ही योजना ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाच्या अंतर्गत अंमलात आणली जात आहे.

🟪जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रा लशीस परवानगी. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या करोना प्रतिबंधक एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी दिली. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लशीला परवानगी देण्यात आल्याने करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला बळ मिळेल, असे मंडाविया यांनी सांगितले. जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकी औषध उत्पादक कंपनी आहे. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रेच्या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून आता आपत्कालीन वापरासाठी भारतात पाच लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या करोनाविरोधी लढाईला चालना मिळेल, असे आरोग्यमंत्री मंडाविया यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. तर लस वापरास परवानगी मिळाल्याने करोनाची साथ संपवण्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे. भारत सरकारने ७ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या एक मात्रेच्या लशीस आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते. ही लस डेल्टासह, करोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून संरक्षण देते. तिची परिणामकारकता ८५ टक्के आहे.

🟪प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1 कोटीहून अधिक घरांना मंजूरी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ याच्या आतापर्यंतच्या प्रगतीची माहिती जाहीर केली आहे. योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 12 लाखांहून अधिक घरे मंजूर झाली आहेत. आतापर्यंत लाभार्थी 50 लक्ष घरांमध्ये स्थानांतरीत झाले आहेत. 🔳प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारद्वारे संचालित केली जाणारी योजना आहे. या योजनेचा शुभारंभ दिनांक 25 जून 2015 रोजी झाला. वर्ष 2022 पर्यंत “सर्वांना घर” हे उदात्त उद्दिष्ट असलेली योजना हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. योजनेंतर्गत ऋण आधारित व्याज अनुदान योजना (CLSS) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमजोर, कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना कर्जाची व्‍यवस्‍था करून दिली जाते.

🟪९४ व्या साहित्य संमेलनाआधीच ९५ व्याची लगबग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यावर गेल्या आठवडय़ात शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ९५वे संमेलन घेण्यासाठी स्थळ ठरवण्यावर पदाधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू आहे. पुढील वर्षांच्या मार्चअखेपर्यंत जमा-खर्चाचा ताळेबंद मांडण्यासाठी महामंडळाला सहा महिन्यांत दोन संमेलने घेणे सोयीस्कर व्हावे, या दृष्टीने ९५वे संमेलन घेण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पुढील वर्षी शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाने ९५ वे संमेलन घेण्याविषयीचा प्रस्ताव मागे घेतल्याने महामंडळाची अडचण झाली आहे. विदर्भ साहित्य संघाचा २०२३ मध्ये संमेलन घेण्याचा विचार आहे. औरंगाबादमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत नाशिकमधील संमेलनाचे नियोजन, त्यासंदर्भाने पत्रव्यवहार करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, ९५ वे संमेलनस्थळ निवडण्यासह मार्गदर्शन समिती नियुक्त करण्याचाही विषय बैठकीच्या विषयपत्रिकेत होता. नाशिकचे संमेलन नोव्हेंबरमध्ये घेण्याची चर्चाही महामंडळाच्या बैठकीत झाली. नोव्हेंबरमध्ये ९४ वे संमेलन घेण्यात आले तर पुढीलवर्षी मार्चच्या आत ९५ वे संमेलन घेण्यासाठी महामंडळाची घाई सुरू आहे. त्या अनुषंगाने संमेलनस्थळ निवडण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा विषय बैठकीत होता. मात्र, औरंगाबादबाहेरून आलेल्या महामंडळाच्या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आधी नाशिकचे नियोजित संमेलन करोना साथीच्या काळात निर्विघ्न पार पडू द्या, मग ९५ व्या संमेलनाबाबत ठरवू, अशी भूमिका मांडली.

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

#simplified_story 🔳शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं फार पूर्वीची गोष्ट आहे. आइसलँडच्या उत्तरेकडील भागात एक शेतकरी राहत होता. त्याला त्यांच्या शेतात काम करण्यासाठी Worker पाहिजे होता. परंतु अश्या धोकादायक ठिकाणी जेथे नेहमी वादळे आणि जोरदार हवा सुटते. अश्या ठिकाणी कोणी मजूर काम करण्यास तयार होत नव्हते. शेतकऱ्याला मजुराची अत्यंत गरज असल्यामुळे त्याने शहरातील Newspaper मध्ये Advertisement दिली. यामध्ये शेतकऱ्याने लिहले एक शेत मजूर पाहिजे आहे. नोकरीची जाहिरात पाहून अनेक लोक Interview देण्यासाठी आले परंतु प्रत्येक व्यक्ती कोठे काम करायचे आहे हे ऐकून काम करण्यासाठी नकार देत असे. अखेरीस एक सडपातळ आणि अशक्त व्यक्ती शेतकऱ्याकडे आला. शेतकऱ्याने त्याला विचारले, "तू यापरिस्थितीत काम करू शकतोस का?" "ह्म्म्म, फक्त हवा वाहते तेव्हा मी झोपतो." त्याव्यक्तीने उत्तर दिले. शेतकऱ्याला हे उत्तर थोडे उद्धट वाटले पण शेतकऱ्याला मजूर पाहिजे होता आणि त्याच्या कडे कोणीही काम करण्यास तयार होत नव्हता म्हणून शेतकऱ्याने त्याला कामावर ठेवले. worker मेहनती निघाला. तो दिवसभर शेतात काम करत असे. शेतकरी त्याच्या कामावर अत्यंत खुष होता. काही दिवसांनी एक दिवस अचानक खूप जोरदार वारा सुटला. हे पाहून शेतकरी समजला थोडयाच वेळात वादळ येण्याची शक्यता आहे म्हणून तो शेतात मजुराच्या झोपडीत गेला. "अरे लवकर उठ बघतो आहेस ना वारा सुटला आहे. लवकरच वादळ येईल. त्याआधी शेतात काढून ठेवलेले पिक बांधून ठेव गेट दोरखंडाने कसून बाधून ठेव....." शेतकरी ओरडला. मजूर हळूच वळला आणि बोलला, "मालक, मी तुम्हाला पहिलेच सांगितले होते की जेव्हा वारा वाहतो मी झोपतो..." हे ऐकून शेतकरी अत्यंत रागावला. वादळ आले तर प्रचंड नुकसान होईल पाऊस पडून सर्व काढलेल पिक भिजेल फार मोठ नुकसान होईल. शेतात केलेली सर्व मेहनत वाया जाईल. अश्या मजुराला तर गोळी घातली पाहिजे असे त्याचं मन करत होते . परंतु वेळ कमी होता म्हणून शेतकरी स्वताच शेतात पिक झाकण्यासाठी गेला. तेथे त्याने पाहिले पिक व्यवस्थित बांधून झाकून ठेवले होते. शेताचे मेन गेट दोरखंडाने कसून बांधले होते. कोंबड्यांना झाकून ठेवले होते आणि सर्व कामे व्यवस्थित करून ठेवली होती. नुकसान होण्याचा काही प्रश्नच नव्हता.  आता शेतकरी ही समजला की मजूर "जेव्हा वारा वाहतो मी झोपतो." का म्हणाला होता, आणि मग शेतकरी ही  कोणतीही काळजी न करता झोपला. तात्पर्य : जीवनात सुध्दा अशी अनेक संकटे येतात. पण गरज आहे ती मजूरा प्रमाणे पहिलेच सर्व तयारी करून ठेवण्याची मग तुम्ही आम्ही पण संकट समयी आरामात झोपू शकतो. स्पर्धा परीक्षा तयारी करणारी उमेदवारांनो आता तुमच्याकडे वेळ आहे त्याचा चांगला सदुपयोग करा..तुम्ही अभ्यासाला सुरवात करा..जो विषय अवघड जातो त्यावर कष्ट करा..त्यावर आता कष्ट करून आताच घाम निघायला हवा जेणेकरून परीक्षेच्या वेळी रक्त संडावे लागणार नाही डाॅ. अजित प्रकाश थोरबोले

photo content

photo content

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ONLINE BOOKING www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्य
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही एम कानडे यांची महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती सिम्प्लिफाईड करण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र जवळजवळ एक वर्ष पूर्णवेळ लोकायुक्ताशिवाय होता. मागील लोकायुक्त, (निवृत्त) न्यायमूर्ती एमएल ताहलियानी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

👉 MPSC आयोग सध्या मुख्य परीक्षा फॉर्म भरताना वरील कागदपत्रे अपलोड करण्यास सांगत आहे तरी उमेदवारांनी त्याची तयारी ठेवावी ( NE
👉 MPSC आयोग सध्या मुख्य परीक्षा फॉर्म भरताना वरील कागदपत्रे अपलोड करण्यास सांगत आहे तरी उमेदवारांनी त्याची तयारी ठेवावी ( NEW Website ) ( परीक्षा नुसार कागदपत्रे वेगवेगळी असू शकतात ) 👉 आता इथून पुढे नव्याने कागदपत्रे uploaded केल्याशिवाय अर्ज दाखल करता येणार नाही.. त्यामुळे कागदपत्रे पुढील जाहिरात येण्याच्या आधीच काढून घ्या. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪जम्मू काश्मीर UT मध्ये पुढील 20 जिल्ह्यांचा समावेश होतो. 1)अनंतनाग 2)बंदिपोरा 3)बारामुल्ला 4),बडगाम 5)दोडा 6)गांदरबल 7)जम्मू. 8)कठुआ 9)किश्तवाड 10)कुलगाम, 11)कुपवाडा. 12)पुंछ, 13)पुलवामा. 14)रामबन 15)रेयासी 16)राजौरी 17)सांबा 18)शोपिया, 19)श्रीनगर 20)उधमपूर www.simplifiedcart.com

photo content