428
订阅者
-124 小时
+67 天
+530 天
帖子存档
+1
मार्क टली यांचे निधन
BBC चे दीर्घकाळ नवी दिल्ली ब्युरो चीफ
भारतातील राजकारण व ऐतिहासिक घटनांचे वार्तांकन
सन्मान : पद्मभूषण (२००५), नाइट ब्रिटन सरकारकडून पुरस्कार(२००२)
महत्त्वाची पुस्तके :
Amritsar
No Full Stops in India
India in Slow Motion
The Heart of India
Non-Stop India👆👆
हम दो हमारा एक या धोरणामुळे चीनमध्ये गंभीर आव्हान निर्माण केले आहे वेगाने वृद्ध लोकांची संख्या वाढत जात आहे. भारतामध्ये देखील मागील काही काळात जननदर कमी होत आहे.
याबाबत धोरणात्मक उपाय तयार करणे गरजेचे आहे.
◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जानेवारी 2026 मध्ये उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन केले. (रुरकी)
◆ मोझांबिकच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ज्ञ ग्रासा माशेल यांची 2025 च्या प्रतिष्ठेच्या 'शांती, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी' निवड करण्यात आली आहे.
◆ दक्षिण कोरियाने 1963 मध्ये पहिला व्यापक वायू प्रदूषण प्रतिबंध कायदा लागू केला.
◆ दक्षिण कोरिया देशाने 'कमी कार्बन, हरित वाढ' फ्रेमवर्क कायद्यांतर्गत 2030 पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जनात मोठी कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
◆ दक्षिण कोरियाने जगातील पहिला 'व्यापक AI सुरक्षा कायदा' देखील मंजूर केला आहे.
◆ नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार, क्विंगदाओ (चीन) हे जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
◆ नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 (Numbeo Safety Index 2026) नुसार, कर्नाटकातील मंगळुरू (Mangaluru) हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. [हे शहर जागतिक स्तरावर 46 व्या क्रमांकावर आहे]
❤️❤️ पद्मश्री ❤️❤️
भिकल्या धिंडा हे १० फुटी तारपा वाजवण्यासाठी प्रसिद्ध यांना 2026 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले ❤️
तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे.
वारली चित्रपट्टीतील तारपा नृत्य:
पालघर, महाराष्ट्रतील काही भाग दादरा आणि नगर हवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.
तारपा वाद्य:
तारपा हे वाद्य नारनदेव या देवतेने वारली जनजातीला दिले अशी या जनजातीत समजूत प्रचलित आहे.वाळवलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार करतात.💐💐💐
प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा
महाराष्ट्रातून :
✅अर्मिडा फर्नांडिस - वैद्यकिय क्षेत्र
✅भिकल्या लाडक्या दिंडा - कला (आदिवासी तराफा वादन)
✅रघुवीर खेडकर - कला (तमाशा)
✅श्रीरंग देवबा लाड - शेती
ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये...
टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्यात धडाका कायम ठेवत...
नोव्होक जोकोविच ने ग्रँडस्लॅम मधील 400 वा आणि ऑस्ट्रेलिया ओपन मधील 102 वा विजय मिळवला.
भारत प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे...
🔹 2026
António Costa – President, European Council
Ursula von der Leyen – President, European Commission
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर
जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर
जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केली आहे. [अमेरिकेने WHO ला या निर्णयासाठी 26 कोटी डॉलर एवढी रक्कम द्यावी लागेल.]
78 वर्षे या देशाची WHO शी असलेली कटिबद्धता या निमित्ताने संपुष्टात आली. [WHO संघटनेला एकूण निधीपैकी 18% निधी अमेरिका पुरवत होता.]
डिजिटल सुधारणा गुणांकनात मुंबई विद्यापीठ अव्वल
राज्यातील एकूण 13 विद्यापीठांपैकी डिजिटल व प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. [सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवव्या क्रमांकावर आहे.]
ले. कर्नल सीता शेळके यांना 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार' जाहीर
महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे. [केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बजावलेल्या कामगिरी बद्दल]
अभिनेता रणबीर कपूर 'PNG ज्वेलर्स'चा ब्रँड ॲम्बॅसिडर
PNG ज्वेलर्सने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. [PNG ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ]
