𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
前往频道在 Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
显示更多3 822
订阅者
-324 小时
-27 天
+1730 天
帖子存档
Cross promotion 5k @Policesir
लिंक ठीक 5 मिनिट बाद डिलीट होगा जल्दी जुड़े ।
आधारस्तंभ..❤️🥰🤝
जन्म देऊनी आज आईने मला सुंदर हे जग दाखविले....
निरागस , निरपेक्ष प्रेम माझ्यावर केले. उपकार आईचे हे कधी न फिटणारे . अंत नाही लागणार तिच्या त्या प्रेमाचा सुंदर ह्या जगात मला आज आणले. सुख दुःखात माझ्या कायम मला जपणारे बाबा असतात माझे आधारस्तंभ बणून राहणारे..✍N.P.Dhanve.🥰
(✍11 February 2025)
☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀☘🍀
जीवनात सर्वात मोठं दुःखं तेव्हा होतं जेव्हा आपल्या जवळच्या माणसानंकडून आपली चूक नसता ना पण आपल्याला दोषी ठरवल्या जातं ते दुःखं पर्वता एवढं वाटत मात्र त्याला कमी करायचं असेल तर त्या व्यक्तीला एकदा मनापासून माफी मागून समजून सांगायचं असतं शेवटी त्या व्यक्तीने आपल्याशी कसं वागायचं हा निर्णय पूर्णता त्याचं व्यक्तीचा असतो पण का कोणास ठाऊक त्या व्यक्तीनें आपल्याला कळतं नकळतपणे एक तत्वज्ञान शिकवलेलं असते ते म्हणजे तुमचं नातं किती का घट्ट असेना त्याला गैरसमजजाचा जरा जरी स्पर्श झाला तरी ते नाते हळुवारपणे वेगळं व्हायला लागतं!,,✍🏻
बरोबर ना,,,💯
एकमन#लेखक
@Ommshelke
Cross promotion 5k @Policesir
लिंक ठीक 5 मिनिट बाद डिलीट होगा जल्दी जुड़े ।
ऐक ना सखे
मज माझ्या जिंदगीचा
क्षणाचा भरोसा नाही
पण सखे देईल साथ तुला
मी अखेर शेवटचा श्वासापर्यंत
हे प्रॉमिस करतो मी सखे तुझं
एवढच नाही तर सखे
राहील सोबत सदैव तुझ्या
एक क्षण ही तुला एकट कधी
सोडणार नाही
हे प्रॉमिस करतो मी सखे तुला
तुझ्या सर्व इच्छा
अपेक्षा स्वप्ने मी पूर्ण करीन मी
एवढच नाही तर आयुष्यभर
तुझ सर्व हट्ट लाड पुरविणे मी
सखे तुला नेहमी
आनंदात सुखात
खुश ठेवीन सखे मी
हे प्रॉमिस करतो मी सखे तुला
जन्मोजन्मी मी फक्त
तुझाच आहे सखे मी
अखेर शेवटचा श्वासापर्यंत
तुझाच राहील
हे प्रॉमिस करतो मी सखे तुला
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
आपण त्या वेळेसाठी मेहनत करतोय जेव्हा आपण स्वतःला म्हणाल... अवघड होतं पण मी ते करून दाखवलं ...!!✨
माझ्या जिवनात...
तू आलीस ,
पावसाळी नभा परी
गडद निळे ढग जणू
शितल सरीने बरसले |
तू आलीस ,
वर्षाव स्वागताला
मोर पंख-पिसारे फुलविले
शेत बहरले हिरवळ चोहिकडे
शाल पांगरली जणू वसुंधरेने |
तू आलीस ,
या गुलाबी थंडीत
हवेची हलकी झुळूक घेऊनी
या मखमली गवतावर
दवांचे सडे शिंपले |
तू आलीस ,
सर्र समीरा-सह
मोगऱ्याचा गंध घेऊनी
माझा तो छंद घेऊनी |
तू आलीस ,
तेज उन्हाच्या तीव्रते-सह
लिंबाच्या कोवळ्या पानात
आंब्याचा मोहर घेऊनी |
तू आलीस ,
एक नवीन ऋतू घेऊनी
मैत्रीच्या पलीकडे
उन्हाळ्या-नंतर चा जिव्हाळा |Ⓜ️❤️🥰
भ.रा.गडदे
तुमच्या शब्दात व्हॅलेंटाईन week म्हणजे टेडीबिअर च्या देण्याघेण्याच्या जगापासून दूर ठेवत म्हणतात की अरे प्रेमासारख्या अतिसुंदर भावनेला हातातलं बाहुलं, खेळणं बनवलंय आजकालच्या विक्षिप्त दृष्टीकोनांनी.. काही तरी द्यावं, 7 दिवसांचा हा खेळ रंगवावा, हौस भागवावी आणि पुन्हा नवा खेळ, नवा भिडू अशी सर्व हलकट आणि दूषित मानसिकता तरुण-तरुणींमध्ये हल्ली पसरत चाललीये.
7 दिवस 7 तऱ्हेने व्हॅलेंटाईन celebrate करायला प्रेम फक्त 7 दिवसासाठी नसतं.आपल्या पार्टनर चा प्रत्येक दिवस valantine म्हणून celebrate करायचा असतो त्यात वेळ देणं, काळजी करणं, रागावंन हे सगळं आलंच.फक्त गुलाबाच फुलं देऊन प्रेम व्यक्त करता येत नाही त्यासाठी मनातून प्रेमाची भावना असावी लागते.promise day च्या दिवशी promise करून सोडुन जाणं ना ते प्रेम असतं, ना तिथं विश्वास असतो, ना काळजी, जिव्हाळा काहीही नाही,फक्त एकत्र येणं याला सर्वस्व समजणाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ,मोह,वासना हे साध्य करण्याच्या हेतूने सुंदर, निरागस,निर्मळ,नितळ अशा प्रेमभावनेला कलंकित करून टाकलंय .प्रेम ही स्पर्शाची नव्हे,भोगायची नव्हे तर जगण्यातली अत्यंत गोड,सुखद,शितल भावना आहे,एक तेज आहे,निरागसता आहे,पवित्रता आहे...
प्रेम म्हणजे काही व्यवहार नाही, तिचा व त्याचा ठरलेला असा percentage असायला,किंवा त्याचा व तिचा ठरलेला नफा आणि तोटाअसायला,प्रेम हे कोणत्याही दोन व्यक्तीमधील एकमेकांप्रती 100% देणं आहे त्यात अपेक्षा आहेत,गुण आहेत,दोष आहेत,राग आहे,जीव आहे,एकाच प्रकारच्या भावनेने होतो तो व्यवहार आणि सर्वस्पर्शी होतं ते प्रेम.,गुणदोषांसोबत होतं ते प्रेम . तो किंवा ती दिसायला सुंदर आहेत म्हणजे असं सौंदर्यावर फिदा होऊन आयुष्याची नासाडी करवून घेणारी मुलं मुली काही कमी नाहीत...
प्रत्येकाची एक स्वप्न परी असेलही आणि नक्कीच असावीही. प्रत्येकीचा राजकुमार असतो एका साच्यातील आणि असावाही त्याचे मूल्यमापन आपण नुसत्या दिसण्याने, हसण्याने,चालीने करणार आहोत का?आपला पार्टनर आपली ध्येय जपणारा हवा,आपल्यासहीत आपल्या माणसांना जीव लावणारा हवा,आपल्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मनाला जपणारा हवा,आपल्याला एखाद्या जनावऱ्या प्रमाणे भक्षाला ओरबाडून खायला बघावं तशा विक्षिप्त विचारांचा सोबती कोणत्या तर्हेने आपला होईल ??जगण्याला फक्त दिसणं नाही तर असण्याला जास्त महत्व आहे .कारण जो फक्त दिसण्यात आहे तो जास्त काळ तसाच दिसु शकत नाही .पण जो असण्यातला माणूस हा मरेस्तोवर तसाच असतो .त्याचं सारं काही तो गमावेल, सारं काही तो बदलेल पण आपल्या सोबत्यावरचे प्रेम मात्र कमी होऊ देणार नाही.
@rutuja_writes1203
जबाबदारी नावाची शाळा एकदा समजायला लागली की मग कितीही थंडी असु द्या माणसाला पहाटेच जाग येते कारण कोणत्या वयात शिकायचे आणि कोणत्या वयात कमवायचे हे वय नाही तर परिस्थितीच माणसाला शिकवत असते.
