ch
Feedback
📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

前往频道在 Telegram
1 334
订阅者
无数据24 小时
-67 天
-1730 天
帖子存档
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 महाज्योती | वनार्टी सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल
♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 महाज्योती | वनार्टी सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित करण्यात आलेली कमाल ३० वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. १. संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा) - २१ ते ३३ २. महाराष्ट्र लोकसेवा आयोग - १९ ते ४१ ३. लष्करी सैनिक प्रशिक्षण - १७ ते २० शेवटची तारीख - 04 SEP 2026 👉 वयोमर्यादा 19 ते 41 वर्ष खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/ https://t.me/mahajyotiinfo

♦️Mahajyoti & Vanarti notification - 2026-27 🔥✅Last date 26 ऑगस्ट 2026 👉 वयोमर्यादा 30 वर्ष खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन/अर्ज करावे.👇👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/ https://t.me/mahajyotiinfo

📍 नवी दिल्ली आज दिनांक १८ ऑगस्ट ला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यालयात (इंदिरा भवन, नवी दिल्ली ) उपस्थित आहे. ओबीसींच्या स्वतं
📍 नवी दिल्ली आज दिनांक १८ ऑगस्ट ला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यालयात (इंदिरा भवन, नवी दिल्ली ) उपस्थित आहे. ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना व्हावी यासाठी आज महत्वाची बैठक आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. खा. राहुल गांधीजी उत्तर भारतातील ८ राज्यांतील 'ओबीसी काँग्रेस'चे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्व ओबीसी संघटनासोबत ओबीसींच्या स्वतंत्र देशव्यापी जातनिहाय जनगणनेसाठी अत्यंत ठाम आणि आक्रमक भूमिका घेत आहेत. बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा अधिक तीव्र होत आहे! ✊ — उमेश कोर्राम मुख्य संयोजक, सकल ओबीसी महामोर्चा Rahul GandhiVijay Wadettiwarसकल ओबीसी महामोर्चाObc Yuva Adhikar ManchSunil Chattrapal KedarAbhijit Wanjarri, MLCPrafulla GudadheUmesh KorramIndian National Congress - MaharashtraABP MajhaLokmatTV9 MarathiZee 24 TaasSaam TV NewsStudents Rights Association of IndiaAnil JaiHind@

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देवेश 🎉🎂🎂👑👑🌺
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देवेश 🎉🎂🎂👑👑🌺

MPSC UPSC Combine Group B & C अभियांत्रिकी सेवा इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे.
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
🔥✅ARTI LINK👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 🔥✅BARTI Link 👇👇 https://baricet2026.cbtexam.in/ 🔥✅TRTI LINK👇👇 https://trticet2026.cbtexam.in/
🔥✅SARTHI LINK👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 🔥✅AMRUT LINK 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/
🔥✅MahaJyoti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ 🔥✅Vanarti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/
✌️जॉईन https://t.me/mahajyotiinfo

वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login https://t
वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login https://t.me/mahajyotiinfo

🔥🔥🔥✅🔥🔥🔥🔥✅🔥🔥🔥 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत विद्यार्थांना सूचना ✅🔥🔥🔥महाज्योती Hall Ticket उपलब्ध. 👇 https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login Join https://t.me/mahajyotiinfo

देशातील ओबीसी समाजासाठी सामाजिक न्यायाची सुवर्णपहाट ! मंडल दिन- ७ ऑगस्ट १९९० मंडल आयोग लागू करण्याची घोषणा ओबीसी एकता जिंदाबा
देशातील ओबीसी समाजासाठी सामाजिक न्यायाची सुवर्णपहाट ! मंडल दिन- ७ ऑगस्ट १९९० मंडल आयोग लागू करण्याची घोषणा ओबीसी एकता जिंदाबाद

प्रेस नोट जातीनिहाय जनगणना न झाल्याने ओबीसींचे दरवर्षी ९५ हजार कोटींचे नुकसान; विदर्भातील ११ जिल्ह्यात मंडल जनगणना यात्रा. शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास महामोर्चाचा देशभर तीव्र आंदोलनाचा इशारा. * *विदर्भातील ११ जिल्ह्यांत ०३ ते ०९ ऑगस्ट दरम्यान ५ वी 'मंडल जनगणना यात्रा'* * *केंद्र व राज्य सरकारला चेतावणी: स्वतंत्र रकाना आणि मागण्या मान्य न झाल्यास संघर्षाचा एल्गार!* * *नागपूर शहरात १५ ठिकाणी होणार जनगणनेच्या जनजागरण यात्रेचे स्वागत* "जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे आणि योग्य घटनात्मक हक्क व निधी न मिळाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी (VJNT) आणि एसबीसी (SBC) समुदायाचे दरवर्षी तब्बल *९५,००० कोटींचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक नुकसान* होत आहे. सरकारने या अन्यायाची तातडीने दखल घेतली नाही आणि ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना सुरू केली नाही, तर आगामी काळात संपूर्ण देशभर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल," मागील ५ वर्षांपासून, 'सकल ओबीसी महामोर्चा' आणि विदर्भातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने *सोमवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ ते रविवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२६* या कालावधीत विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये भव्य *'मंडल जनगणना यात्रेचे* आयोजन करण्यात आले आहे. --- *यात्रेचे नियोजन व मार्ग:* * *प्रारंभ:* सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ | सकाळी १०:०० वाजता | *त्रिमूर्ती चौक, भंडारा* * *समारोप:* रविवार, ०९ ऑगस्ट २०२६ | दुपारी ०३:०० वाजता | *प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर* * *प्रवासाचा मार्ग:* भंडारा ➔ नागपूर ➔ वर्धा ➔ यवतमाळ ➔ वाशीम ➔ बुलढाणा ➔ अकोला ➔ अमरावती ➔ नागपूर ग्रामीण ➔ गोंदिया ➔ गडचिरोली ➔ चंद्रपूर. --- *नागपूर शहरात १५ ठिकाणी होणार जंगी स्वागत:* मौदा मार्गे ही यात्रा नागपूर शहरात प्रवेश करेल. शहरातील प्रमुख मार्गांवरून जात १५ ठिकाणी यात्रेचे स्वागत केले जाईल: १. यशोदा फरसाण चौक (पारडी) | २. सुनील हॉटेल चौक (सुभाष पुतळा) | ३. गांधी पुतळा (टाओरी चौक) | ४. गांधी गेट (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) | ५. झेंडा चौक | ६. संत जगनाडे चौक | ७. एरंडेल तेली समाज (एस. डी. हॉस्पिटल चौक) | ८. तिरंगा चौक (संजय समोसा जवळ) | ९. केशव द्वार (रेशीमबाग) | १०. प्रिया बार चौक (रेशीमबाग) | ११. मेडिकल चौक | १२. कॉटन मार्केट चौक (महात्मा फुले पुतळा) | १३. गांधी पुतळा (वैरायटी चौक) | १४. संविधान चौक | १५. छत्रपती चौक (वर्धा रोड — येथून यात्रा वर्धेकडे प्रयाण करेल). --- *केंद्र व राज्य सरकारकडे मुख्य मागण्या १. जातीनिहाय जनगणना: केंद्र सरकारने अनुसूचित जाती/जमातींप्रमाणे ओबीसी (OBC) समुदायासाठी स्वतंत्र कॉलम देऊन तातडीने जातीनिहाय जनगणना करावी. २. *स्वतंत्र मंत्रालय:* केंद्र सरकारमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र केंद्र सरकारच्या पातळीवर मंत्रालय स्थापन करावे. ३. *'महाज्योती'स भरीव निधी:* 'महाज्योती' (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) या संस्थेला *₹१,००० कोटींचा* निधी त्वरित मंजूर करावा. ४. *बॅकलॉग भरती:* सरकारी सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांचा *१ लाख पदांचा बॅकलॉग* तात्काळ भरण्यात यावा. ५. *शिक्षणासाठी १००% शिष्यवृत्ती व वसतिगृहे:* सर्व व्यावसायिक व बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांतील ओबीसी विद्यार्थ्यांना *१००% शिष्यवृत्ती*द्यावी आणि प्रत्येक तालुक्यात *७२० स्वतंत्र वसतिगृहे* सुरू करावीत. ६. *इतर प्रमुख मागण्या:*'महात्मा फुले ओबीसी भवन', घरकुल योजनेची मदत ₹५ लाख करणे, 'इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला' ₹१,००० कोटींचा निधी, ५०० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आणि शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करून हमीभाव देणे. > *"शासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि जातीनिहाय जनगणनेअभावी ओबीसी समाजाचे दरवर्षी ९५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी व घटनात्मक हक्कांचे नुकसान होत आहे. केवळ पोकळ आश्वासनांवर आता समाज गप्प बसणार नाही. ही मंडल जनगणना यात्रा हा ओबीसींच्या हक्कांचा एल्गार आहे. शासनाने आमच्या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यास या यात्रेचे रूपांतर महाआंदोलनात होईल."* > — *उमेश कोर्राम* *(मुख्य संयोजक, सकल ओबीसी महामोर्चा)* या जनजागरण यात्रेत विदर्भातील सर्व ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी, महिलांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन *'सकल ओबीसी महामोर्चा'* च्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत कृतल आकरे, डॉ रमेश पिसे, अशोक काकडे, राजेश काकडे,आकाश वैद्य, मुकुंद अडेवार, विनीत गजभिये आणि विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आपला उमेश कोर्राम मुख्य संयोजक सकल ओबीसी महामोर्चा

प्रेस नोट विषय:२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित युवा संवाद कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना 'स्टुडंट्स राईट्स फा
प्रेस नोट विषय:२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित युवा संवाद कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना 'स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन' यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'युवा संवाद'हा कार्यक्रम अपरिहार्य कारणांमुळे तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे हा कार्यक्रम रविवार,२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजता,कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा.तुकाराम मुंढे (IAS)आयुक्त-अन्न व औषध प्रशासन,हे मार्गदर्शन करणार होते. सध्या देश पातळीवर व राज्य पातळीवर निर्माण झालेली विविध आंदोलनांची स्थिती,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि विद्यार्थी-युवकांची आंदोलने लक्षात घेता;सुरक्षेच्या दृष्टीने आणि सर्वांच्या सोयीसाठी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे > टीप > या कार्यक्रमाची नवी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल कार्यक्रमाच्या या बदलामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल संस्था दिलगिरी व्यक्त करत असून सर्व विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे आपला नम्र, उमेश कोर्राम अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया

मा.तुकाराम मुंडे साहेबांचा पुढील कार्यक्रम नागपूर येथे दोन आगस्ट रोजी होईल.