MPSC Value Addition by Sohel Shaikh
前往频道在 Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
显示更多4 658
订阅者
无数据24 小时
-137 天
-7730 天
帖子存档
वेळ आहे आत्ताच HR Hrd संपवून घ्या...
100+ मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल..
♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा♦️
🔷GS-3 HR-HRD🔷
मानवी हक्क व
मानव संसाधन विकास
टार्गेट 100+ मार्क
🎯मला स्वतःला गेल्या वर्षी 106 मार्क होते..
IP Sir Success Academy चे बुक base म्हणून वापरायचे..
यामध्ये exam oriented अँप्रोच ने value addition करणार आहे.
Previous years Que नुसार Retrospective Analysis चा वापर
✔️या lectures मध्ये कव्हर होईल
2) मानवी हक्क आणि मानव संसाधन-सिन्नर्जी पब्लिकेशन
3)development देसले सर पार्ट -2
4) भूषण अहिरे सर hr hrd नोट्स
5)अध्ययन अकॅडमी -HR Hrd Book
6)मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास -रंजन कोळंबे सर
7)YCMOU ची मानवी हक्काची पुस्तके
8)Govt websites + PIB
9)INDIA YEAR BOOK
10) भारत व महाराष्ट्र आर्थिक पाहणी
रेकॉर्डेड lecture असतील...
🎯कोर्स कालावधी 1 वर्ष असेल त्यामुळे 2021-22 साठी टार्गेट करणार्यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल..
आपला
सोहेल शेख
ऍडमिशन अँप लिंक -
https://nzjit.courses.store/130091?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dstudent-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview
🎥 Course ची माहिती
https://youtu.be/FTzsFk-e3dU
❗️'MPSC' च्या जाहिरातीला नवे वर्ष उजाडणार!
प्रशासकीय विभागाकडून मागणीपत्र देण्यास विलंब.
✔️ STI आणि ASO या दोन्ही post ज्या reference books मधुन उत्तीर्ण झालो त्यांची लिस्ट.
✔️Booklist by The Achievers Mentorship
✔️ASO STI Booklist by
Rohit Kale
ASO Rank 1 (P1-75, P2-77 marks)
STI Rank 5 (P1-75, P2-66 marks.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Credit -TheAchieversMentorship
Join
@mpscvalueaddition
शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget)-
शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.
पीटर पिहर:- यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते.
भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प सर्व प्रथम मांडला होता.(राज्य नुसार विचार केल्यास)
त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते.
वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते.
२००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षापासून देशात राबविण्यात येत आहे
"The accidental prime minister " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
BRICS देशांच्या नवीन विकास बँकेचे पहिले मराठी अध्यक्ष कोण आहेत
जननी सुरक्षा योजना केव्हा पासून अंमलात आणली जात आहे
❗️बारावीत सर्व विषयात नापास,प्रियेसीची प्रमाणिक साथ या जोरावर IAS होणारे मनोजकुमार शर्मा
वरती आपण सहा मुद्द्यांच्या अनुषंगाने संयुक्त मुख्य बाबत जी चर्चा केली त्याचा उत्तरार्ध .....
7) प्रत्येक मुख्य परीक्षेत मागील जुने प्रश्न रिपीट होत असतात त्यामुळे त्याचाही फायदा मिळतो. याचबरोबर यामुळे शेवटच्या टप्प्यात अति महत्वाच्या गोष्टींवर आपला फोकस टिकून राहतो. त्यामुळे मुख्य ची तयारी करताना मागील प्रश्नपत्रिका सतत सोबत असूद्यात.
8) टेस्ट सिरीज लावावी का? ---
मी स्वतः कुठलीच टेस्ट सिरीज लावली नव्हती. याची अनेक कारणे आहेत मुख्य म्हणजे टेस्ट सिरीज चा दर्जा. हा दर्जा जर चांगला नसेल तर विनाकारण तुमचा शेवटच्या टप्प्यातील अमूल्य वेळ वाया जातो. यापेक्षा मी आयोगाच्या 2011 ते 2018 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा 3 वेळेस बारकाईने अभ्यास केला. म्हणजे एखादा पर्याय चुकीचा असेल तर तो का चुकीचा तसेच जरी एखादा पर्याय बरोबर असेल तर तो का बरोबर यावर विचार केला. स्वतः प्रश्नांचे विश्लेषण केले. आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबींचे वाचन व रीव्हीजन केले. आणि त्याचा मला खूपच जास्त फायदा झाला. यामुळे माझा अंतिम टप्प्यातील अभ्यास खूपच प्रॉडक्टिव्ह झाला.
8) शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की टेस्ट सिरीज मध्ये काय विचारतात यापेक्षा आयोग काय विचारतो हे जास्त महत्वाचे आहे. आयोगाचे प्रश्नपत्रिका तयार करणारी माणसेच असतात हे लक्षात घ्या त्यामुळे आयोगाच्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला की त्या माणसांची प्रश्न तयार करण्याची मानसिकता आपल्या लक्षात यायला लागते. आणि पुस्तक वाचता वाचताच आपण मनोमन त्या अनुषंगाने प्रश्न तयार करू लागतो आणि ते प्रश्न कोणत्याही टेस्ट सिरीज पेक्षा नक्कीच जास्त दर्जेदार असतात.
त्यामुळे मी हा सल्ला देईल की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे सर्वप्रथम आयोगाच्याच जुन्या प्रश्नपत्रिका 2 3 वेळेस बारकाईने अभ्यासा आणि त्यानंतर वेळ मिळाला तरच टेस्ट सिरीज मधील प्रश्नपत्रिका सोडवा.
जाता जाता येवढेच सांगू इच्छितो की, आणि कदाचित तुमच्याही लक्षात आले असेल की मी इथे कोणतेच साचेबद्ध नियोजन तुमच्यासाठी करून दिलेले नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येकाची आकलन शक्ती वेगवेगळी असते, कुणाचा एका विषयाचा आधीच जास्त अभ्यास झालेला असतो तर कुणाचा दुसऱ्या विषयाचा, कुणी जॉब करून अभ्यास करतो तर कुणी फुल time, कुणाला एक विषय सोपा वाटतो तर कुणाला दुसरा. कुणाचा पहाटे अभ्यास होतो तर कुणाचा रात्री.
प्रत्येक जण वेगळा आहे हे लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे कुणीतरी आपले नियोजन करून देईल आणि आपण त्याप्रमाणे अभ्यास करू ही मानसिकता सोडा. *आपले नियोजन आपणच केले पाहिजे.*
त्यामुळे मी फक्त तुमचे नियोजन कसे असावे याचा आराखडा दिलाय आणि त्यात काय केले पाहिजे हे सांगितलंय. आता यामध्ये तुम्हाला योग्य वाटतील ते बदल करून तुमचे नियोजन तुम्हीच तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन होईल याची काळजी घ्या.
*लवकरच यानंतरच्या लेखात मी प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी प्रश्नांना कसे सामोरे जावे, योग्य ऍटेंम्प्ट किती असावा, योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे आणि प्रत्यक्ष पेपर सुरु होण्यापूर्वीच्या कळत शेवटच्या तासांत काय वाचावे याविषयी लेख लिहीन.*
शुभेच्छा... 💐💐💐
Credit
Rohit Kale
ASO Rank 1 2019
STI Rank 5 2019
The Achievers Mentorship
➖➖➖➖➖➖➖➖➖
