ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 115
订阅者
-124 小时
+37 天
-3430 天
帖子存档
photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल आधारभूत संरचना समिति की बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕑2.10pm | 27-10-2026📍Mantralaya, Mumbai | दु. २.१० वा. | २७-१०-२०२६📍मंत्रालय, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #InfrastructureDevelopment

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕓 4.14pm | 27-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/z_vBjcZ7eUk?si=Z9AOU0EJ1Ve_A043 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2500892380437941 https://x.com/Dev_Fadnavis/status/2115031832479809824?s=20

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जनतेचा कौल मान्य करायचा नाही, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करायचे आणि लोकशाहीच्या नावाखाली अराजक माजवायचे, या काँग्रेसच्या दुटप्पी राजकारणाचा पर्दाफाश झालाच पाहिजे. निवडणूक प्रक्रियेवर आरोप करून घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता धोक्यात आणण्याचे राजकारण किती काळ चालणार? काँग्रेसच्या या लोकशाहीविरोधी राजकारणामागचे वास्तव जाणून घेण्यासाठी मी लिहिलेला लेख नक्की वाचा! #Maharashtra #Mumbai #Politics https://loksatta.com/sampadkiya/columns/devendra-fadnavis-rahul-gandhi-sir-election-commission-allegations-zws-70-6214230/

Today's News_27-10-2026.pdf1.34 MB

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 26 ऑक्टोबर 2026 तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219577/ महा कॅम्पा निधीतून व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219607/ राज्यातील दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा; 14 संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219619/ ‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219624/ ‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन https://mahasamvad.in/219630/ #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Shri Sant Ravidas Maharaj’s 650th Birth Anniversary Year: A Statewide Mission for Unity Chaired a meeting regarding the special campaign ‘Har Ghar Sant Ravidas Vichar- Viksit Maharashtra’ to mark the 650th birth anniversary year of Shri Sant Ravidas Maharaj in Mumbai today. Directed that the special campaign, ‘Har Ghar Sant Ravidas Vichar - Viksit Maharashtra’, to be conducted across Maharashtra from November 2026 to February 2027, marking the 650th birth anniversary year of Shri Sant Ravidas Maharaj, be implemented on a large scale across the State. The campaign will focus on taking Shri Sant Ravidas Maharaj’s timeless teachings of humanity, equality, compassion and a society free from suffering to every section of society. The ‘Hind Ki Chadar’ programme brought diverse sections of society together, reinforcing the message of national unity. Building on this spirit, the initiatives marking the birth anniversary year of Sant Ravidas Maharaj must carry his enduring message of social harmony, equality and unity to every section of society. Directed all concerned departments to establish dedicated implementation mechanisms and ensure that every scheduled programme is completed within the stipulated timelines. A committee will be constituted to closely monitor and review the campaign at every stage, from planning to execution, ensuring coordinated efforts and effective implementation across Maharashtra. DCM Sunetratai Pawar, Minister Girishbhau Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil ji, Minister Sanjay Sawkare, Minister Sanjay Shirsat, MoS Madhuritai Misal, MLA Ravindra Chavan and senior officials were present. #Maharashtra #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2114745512415134026?s=20

मुख्य कार्यक्रमानंतर 'समाजकुंभ' उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक परंपरांना एकत्र आणून समता, बंधुता, सामाजिक एकात्मता आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संजय सावकारे, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra Tweets: 'हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र' अभियानातून मानवतेचा संदेश घराघरांत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री संत रविदास महाराज यांच्या 650व्या जयंती वर्षानिमित्त 'हर घर संत रविदास विचार - विकसित महाराष्ट्र' हे विशेष अभियान राबविण्याच्या अनुषंगाने बैठक पार पडली. श्री संत रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत 'हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र' हे विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवावे. श्री संत रविदास महाराज यांनी मांडलेले मानवता, समता, करुणा आणि दुःखमुक्त समाजाचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावेत. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा उभारावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्री संत रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक सामाजिक आणि वैचारिक अभिसरण घडवून आणणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. श्री संत रविदास महाराज यांनी समता, मानवता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाची शिकवण दिली. हे विचार केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. श्री संत रविदास महाराज यांच्या विचारांवर आधारित हे अभियान समाजातील सर्व घटकांना जोडणारे आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करणारे ठरेल. विविध सामाजिक परंपरांमधील साम्यस्थळे आणि संतविचारांतील एकात्मतेचा संदेश समाजासमोर आणून सामाजिक सलोखा व बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी या अभियानाचा उपयोग होईल. 'हिंद की चादर' कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. त्याच धर्तीवर श्री संत रविदास महाराज यांच्या जयंती वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतूनही सामाजिक एकतेचा व्यापक संदेश दिला जावा. या अभियानासाठी संबंधित विभागांनी स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा उभारून निर्धारित कार्यक्रम वेळेत पूर्ण करावेत. अभियानाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतच्या कामांचा सातत्याने आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात धार्मिक स्थळे, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि कामगार संघटना, महिला बचतगट, युवक मंडळे, शासकीय क्षेत्रीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महामंडळे आणि आरोग्य संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामस्तरांवरील समित्यांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यातील 1,08,139 शाळा, 5841 महाविद्यालये, 65 विद्यापीठे आणि 11,150 सार्वजनिक ग्रंथालयांना या अभियानाशी जोडण्याचे नियोजन आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संतसाहित्य वाचन, संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. यासोबतच विविध सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता आणि मानवतेच्या मूल्यांची रुजवण केली जाणार आहे. अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, नेत्र व दंत तपासणी, महिला व बाल आरोग्य, पोषण, व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयी जनजागृती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. श्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 'श्रमवीर सन्मान', कारागिरांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, महिला आर्थिक स्वावलंबन आणि युवा सेवा सप्ताह यांचे आयोजन केले जाईल. राज्यातील 650 गावांमध्ये विचारसभा आणि वृक्षारोपणाचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यांत 2 प्रचार वाहनांच्या माध्यमातून श्री संत रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे. चित्रफिती, पॉडकास्ट, मुलाखती आणि संवादात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत अभियानाचा संदेश पोहोचविण्यात येईल. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी 'डिजिटल रविदास 650', ई-ग्रंथालय, डिजिटल प्रश्नमंजुषा आणि 650 प्रेरणादायी व्हिडिओ कथांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून श्री संत रविदास महाराज यांचे विचार, सामाजिक समतेचा संदेश आणि अभियानातील उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. या अभियानाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम 13 व 14 फेब्रुवारी 2027 रोजी नाशिक येथे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमात बेगमपुरा संकल्पना, संत संगम, सांस्कृतिक कार्यक्रम, समता महामंच, संत रविदास वारसा प्रदर्शन, संवाद केंद्र आणि सामुदायिक अन्नसेवा यांचा समावेश असेल.

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Strengthening Wildlife Conservation and Advancing Sustainable Infrastructure in Maharashtra Chaired the 26th meeting of the Maharashtra State Wildlife Board in Mumbai, today. Approved the proposal to declare the Kolamarka Conservation Reserve in Gadchiroli district a Wildlife Sanctuary, recognising its ecological significance as a natural habitat for wild buffaloes. Additionally, approved proposals for 14 new Conservation Reserves across Pune, Raigad, Nashik, Nandurbar, Thane, Palghar and Chandrapur districts. These include Velhe-Mulshi, Bhor Girigad, Dindori, Surgana, Taharabad, Chinchpada, Alibag, Ghera Manikgad, Lonavala, Guntara, Jawhar, Asherigad, Dhamni and Ekara. These decisions mark an important step towards strengthening wildlife conservation and protecting Maharashtra’s rich biodiversity. Approved the proposal to include 588.767 hectares of revenue and private land across six villages, within the expanded Tansa Wildlife Sanctuary, with the objective of making the sanctuary human-free. Also approved the proposals to declare 100.139 sq. km of the Koka Wildlife Sanctuary and 255.79 sq. km of the Jayakwadi Bird Sanctuary as Critical Wildlife Habitats. Directed that routine dam repairs, rehabilitation works and desilting within wildlife sanctuaries be incorporated into their respective management plans. Approved proposals for essential infrastructure in protected areas, Eco-Sensitive Zones and tiger corridors, including irrigation, healthcare, water supply, bridges, roads, underground optical fibre networks and electricity lines. Senior officials were present. #Maharashtra #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2114726197561368638?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Thummidihetti Project: Detailed Assessment, Maharashtra’s Interests First Chaired a meeting with the delegation of Telangana CM Revanth Reddy regarding the Tummidihatti Barrage in Mumbai today. At the request of Telangana CM Revanth Reddy, Maharashtra will independently examine the issues related to increasing the height of the Tummidihatti irrigation project. A joint committee comprising the Chief Secretaries and Secretaries of the Water Resources Departments of both States will study the technical aspects and the potential submergence of areas in Maharashtra. The approach will remain constructive and cooperative, extending support to Telangana while safeguarding the interests of the people of Maharashtra. Maharashtra has always favoured resolving issues with neighbouring States through mutual cooperation. The State remains open to supporting Telangana, provided Maharashtra’s interests are safeguarded. However, since the actual submergence area was found to exceed earlier estimates following the previous approval, a thorough assessment of the new proposal is essential. The study will examine the impact of the proposed site change on submergence, the concerned wildlife sanctuary and additional land requirements. Any concerns raised by Telangana will be discussed jointly, with expert opinions sought if necessary. Matters concerning water allocation and statutory clearances fall under the Central Water Commission. Maharashtra will present its fact-based assessment when sought, and further decisions will follow an independent study and detailed technical discussions. Telangana Minister Uttam Kumar Reddy and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2114716014969770192?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: CAMPA: Advancing Forest Conservation and Community Welfare Chaired a meeting of the Maharashtra Compensatory Afforestation Fund Management and Planning Authority (Maha CAMPA) Governing Body in Mumbai today. CAMPA funds can play a significant role in transforming the lives of people residing in Conservation Reserve areas and bringing lasting improvements to their quality of life. Directed that these funds be utilised to complete the relocation and rehabilitation of villages situated within tiger reserves and other protected areas. Emphasised on bringing greater transparency to CAMPA-funded projects by revising the existing verification process and conducting sample surveys of completed afforestation works. Directed relevant departments to give due attention to soil and water conservation, as well as afforestation activities, and ensure their timely completion. Directed that a proposal be made to the Centre under the National CAMPA Fund for the phased relocation and rehabilitation of villages within the State’s reserved forest areas. Directed the State CAMPA Authority to engage contractual staff to address manpower requirements and complete the process of opening an account with the Reserve Bank of India for the State’s reserve fund. Better investment options should also be explored to maximise interest earnings. The State’s ambitious 300-crore tree plantation campaign should be supported through large-scale afforestation under this fund, with a focus on bringing non-forest land under forest cover. Minister Ganesh Naik ji and senior officials were present. #Maharashtra #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2114714398203973954?s=20

CMO Maharashtra Tweets: राज्यातील 2 राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा, 14 संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 26वी बैठक पार पडली. गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी उपयुक्त क्षेत्र असणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास, तसेच तानसा वन्यजीव अभयारण्यालगतच्या नवीन विस्तारित तानसा क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय, पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांतील 14 संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. यामध्ये पुणे/रायगड जिल्ह्यातील वेल्हे, लोणावळा; पुणे जिल्ह्यातील भोरगिरीगड; नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगना व ताहाराबाद, नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा, रायगड जिल्ह्यातील अलिबाग व घेरा मानिकगड, ठाणे जिल्ह्यातील गुमतारा; पालघर जिल्ह्यातील जव्हार, आशेरीगड व धामणी, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा यांचा समावेश आहे. तानसा वन्यजीव अभयारण्य मानवरहित करण्यासाठी नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्यात मौजे ओगदा, खोडदे, तिरमाळ, पाचघर, फणसाड आणि आमले या 6 गावांतील 588.767 हेक्टर महसुली व खासगी क्षेत्र समाविष्ट करण्याच्या प्रस्तावास मंडळाने मान्यता दिली. कोका वन्यजीव अभयारण्यातील 100.139 चौरस किलोमीटर आणि जायकवाडी पक्षी वन्यजीव अभयारण्यातील 255.79 चौरस किलोमीटर क्षेत्र धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावांनाही मंडळाने मान्यता दिली. अभयारण्यांमधील धरणांची दुरुस्ती, पुनर्वसन आणि गाळ काढण्याची नियमित कामे संबंधित अभयारण्यांच्या व्यवस्थापन आराखड्यात समाविष्ट करावीत. नियमांशी सुसंगत मानक कार्यपद्धती तयार करून 3 महिन्यांत व्यवस्थापन आराखड्यांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात. या कामांसाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र मान्यता घेण्याऐवजी संबंधित वन्यजीव अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. संरक्षित क्षेत्रे, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रे आणि व्याघ्र भ्रमणमार्गांतील सिंचन, आरोग्य, पाणीपुरवठा, पूल, रस्ते, भूमिगत ऑप्टिकल फायबर, वीजवाहिनी आदींसह इतर पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांनाही यावेळी मान्यता देण्यात आली. राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्पांचे गाभा, बफर व अधिसूचित पर्यावरण संवेदनशील क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून अधिसूचित करणे, मानव-वन्यजीव संघर्षाला नैसर्गिक आपत्ती घोषित करणे आणि व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रातील इच्छुक गावांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करणे या प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा झाली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी, विद्यमान नुकसानभरपाई व्यवस्था आणि वन विभागाचे अधिकार यांची सुसंगती तपासून पुढील कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अभयारण्य म्हणून घोषित झालेली, मात्र अद्याप प्रादेशिक वन विभाग किंवा वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाखाली असलेली क्षेत्रे वन्यजीव शाखेकडे देण्याबाबत कर्मचारी समायोजन, प्रतिनियुक्ती आणि रिक्त पदांचा अभ्यास करून एका महिन्यात निर्णयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra Tweets: 'कॅम्पा' निधीतून वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा) नियामक मंडळाची बैठक पार पडली. वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कॅम्पाअंतर्गत असलेल्या निधीचा मोठा हातभार लागू शकतो. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करावीत, तसेच या निधीतून पूर्ण केलेल्या वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची उपग्रह व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कॅम्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या पडताळणीची सध्याची पद्धत बदलून कामकाजात अधिक पारदर्शकता आणावी. पूर्ण झालेल्या वनीकरणाच्या कामांपैकी काही नमुने निवडून त्यांचे सर्वेक्षण करावे. संबंधित यंत्रणांनी मृद व जलसंधारण तसेच वनीकरणाच्या कामांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत. राष्ट्रीय कॅम्पा निधीतून राज्यातील राखीव वनक्षेत्रांतील गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे निधीच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यस्तरीय कॅम्पा प्राधिकरणाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात यावी. राज्याच्या राखीव निधीसाठी रिझर्व्ह बँकेत खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करावी. या निधीवर अधिक व्याज मिळविण्यासाठी गुंतवणुकीचे चांगले पर्याय निवडावेत. राज्याच्या महत्त्वाकांक्षी 300 कोटी वृक्षलागवड मोहिमेसाठी या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वनीकरण करावे आणि वनेतर जमीन वनक्षेत्रांखाली आणावी, अशा सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीत या निधीचा उपयोग करून कुरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. यामधून चाऱ्याची उपलब्धता आणखी सुनिश्चित करता येईल. कॅम्पाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा थोडक्यात आढावा पर्यायी वनीकरणांतर्गत आतापर्यंत 1,07,865 हेक्टरवर रोपवनाची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच, 2019-20 ते 2025-26 या कालावधीत 562 निवासस्थाने आणि 83 कार्यालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे, महिलांकरिता 62 विश्रामगृहे तयार करण्यात आली. कुरण विकास कार्यक्रमांतर्गत 15,724 हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाची कामे पूर्ण करण्यात आली. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांमधील 55 गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra Tweets: तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शिष्टमंडळासमवेत तुम्मिडीहेट्टी बॅरेज संदर्भात बैठक पार पडली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तसेच जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांनी तुम्मिडीहेट्टी प्रकल्पाविषयी माहिती देऊन प्रकल्पाची उंची 148 मीटरवरून 152 मीटरपर्यंत वाढविण्यासाठी महाराष्ट्राने मान्यता द्यावी, अशी विनंती केली. तेलंगणा राज्यातील तुम्मिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढविण्याबाबत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विनंतीनुसार या प्रकल्पविषयक मुद्द्यांचा महाराष्ट्र स्वतंत्रपणे अभ्यास करेल. यासाठी दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागांचे सचिव यांची संयुक्त समिती नेमून तांत्रिक मुद्दे आणि महाराष्ट्रातील संभाव्य बुडीत क्षेत्र यांचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे रक्षण करत तेलंगणाला सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेजारी राज्यांचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडविण्याची भूमिका महाराष्ट्राने नेहमीच घेतली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे नुकसान होत नसेल आणि अन्य राज्याला लाभ होत असेल, तर सकारात्मक निर्णय घेण्यास राज्याची हरकत नाही. यापूर्वीही महाराष्ट्राने तेलंगणाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पूर्वीच्या मान्यतेनंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावामुळे होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रकल्पस्थळ बदलल्यामुळे बुडीत क्षेत्रावर होणारा परिणाम, संबंधित अभयारण्याचा समावेश आणि नदीपात्राबाहेरील आवश्यक जमिनीचे क्षेत्र यांचा अभ्यास केला जाईल. महाराष्ट्राच्या अभ्यासावर तेलंगणाला काही आक्षेप किंवा त्रुटी जाणवल्यास दोन्ही राज्यांचे अधिकारी त्यावर चर्चा करतील. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मतही घेतले जाईल. पाणीवाटप आणि वैधानिक मंजुरीशी संबंधित बाबी केंद्रीय जल आयोगाच्या कार्यक्षेत्रात येतात. आयोगाने राज्याचा अभिप्राय मागितल्यानंतर महाराष्ट्र तथ्यांच्या आधारे आपली भूमिका मांडेल. स्वतंत्र अभ्यास आणि तांत्रिक चर्चेनंतर प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content