ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 125
订阅者
-124 小时
-97
-3330
帖子存档
Full_Speech_ज्येष्ठ_नेते_व_माजी_मंत्री_स्व_दत्ताभाऊ_मेघे_यांची_शोकसभा.mp426.46 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕧 12.30pm | 4-4-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/AtzNfjWQXsg?si=h0NmcGayeTCmVTqy https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1277732653689552 https://x.com/Dev_Fadnavis/status/2040323681625461098?s=20

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांची शोकसभा 🕛 दु. १२.१४ वा. | ४-४-२०२६📍नागपूर. #Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe https://www.youtube.com/live/xdYHjU5Q8Qs?si=QDB2JFEldS0ehQQG https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2151103895731305 https://x.com/Dev_Fadnavis/status/2040319682486665464?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, यात 6 विद्यार्थी आहेत. अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मंत्री गिरीष महाजन यांच्याशी मी चर्चा केली असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ते समन्वय साधून आहेत. मृतांच्या वारसांना ₹5 लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Today's_ News_04-04-2026.pdf1.49 MB

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 3 एप्रिल 2026 महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/196225/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जनविश्वास विधेयक 2026 : विश्वासावर आधारित नवे प्रशासनिक युग! संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास (तरतुदींमधील सुधारणा) विधेयक, 2026 मंजूर केल्याने भारतातील ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ वृद्धिंगत करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल उचलले गेले आहे. या महत्त्वपूर्ण सुधारणेत, 79 कायद्यांमधील 1000 हून अधिक तरतुदी, ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व (ब्रिटिश) काळातील अनेक कायदेही समाविष्ट आहेत, एका निर्णयाद्वारे सुलभ व सुटसुटीत करण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक पावलामुळे नियमांचा बोजा कमी होऊन विश्वासावर आधारित व नागरिकाभिमुख शासनव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच, प्राधिकरणांना थेट दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आल्याने दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेवरील अवलंबित्व कमी होणार आहे. अनेक दशकांपासून नागरिकांना ब्रिटिशकालीन कायद्यांच्या प्रभावाखालील अशा व्यवस्थेत काम करावे लागत होते, जिथे कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया ही विश्वास आणि निष्पक्षतेऐवजी दंडात्मक उपायांवर आधारित होती. ही सुधारणा विश्वास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख शासनाला धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या निर्णायक बदलाचे प्रतीक आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील हा उपक्रम व्यक्ती आणि उद्योग दोघांनाही सक्षम करणारा असून, प्रगत आणि भविष्याभिमुख भारताच्या पायाभरणीला अधिक बळकटी देणारा आहे. #JanVishwasBill2026

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Jan Vishwas Bill 2026: Strengthening Trust, Simplifying Laws The passage of the Jan Vishwas (Amendment of Provisions) Bill, 2026 by both Houses of Parliament marks a transformative step in advancing Ease of Doing Business and Ease of Living in India. In an unprecedented reform, over 1,000 provisions across 79 Acts, including several pre-independence laws have been rationalised in a single, decisive move. This landmark legislation significantly reduces the regulatory burden, paving the way for a more trust-based and facilitative governance framework. New frameworks empower authorities to impose penalties directly, reducing reliance on lengthy court proceedings. For decades, citizens navigated a system shaped by colonial-era laws where compliance was often enforced through punitive measures rather than guided by trust and fairness. This reform signals a decisive shift placing trust, transparency, and citizen-centric governance at the core of policymaking. Guided by the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, this initiative reflects a new governance paradigm that empowers individuals and enterprises alike, while strengthening the foundations of a progressive and forward-looking India. #JanVishwasBill2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Timeless Legacy: Honouring MahaManav BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar Chaired a review meeting regarding arrangements of various services and facilities at Chaityabhoomi, Mumbai, on the occasion of the birth anniversary of MahaManav BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar. Commemorating the birth anniversaries of great leaders is not just a formality, but an opportunity to pass on their ideas to future generations. The state government continues to amplify birth anniversary celebrations of the Indian Constitution's architect BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar each year, with the 135th anniversary on 14th April 2026 set to be observed on an even grander scale through coordinated efforts of various departments. Keeping the summer heat in mind, instructed officials to ensure comprehensive arrangements for visitors arriving at Chaityabhoomi from across the country, including Mandaps for shelter, adequate drinking water, and effective traffic management to maintain smooth movement in Dadar and nearby areas. Directed installation of signboards at key locations for public guidance and ensured arrangements for bus services by BEST between Dadar railway station and Chaityabhoomi to ease commuting. Minister Sanjay Shirsat and senior officials were present. #Maharashtra #AmbedkarJayanti https://x.com/Dev_Fadnavis/status/2040049389532819462?s=20

CMO Maharashtra Tweets: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा उत्सव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे करावयाच्या विविध सेवा-सुविधांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा बैठक पार पडली. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार असून या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी घेतला. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क व प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे हा जयंती सोहळा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारे पर्व ठरते. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी, उष्णतेपासून संरक्षण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागरिकांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिद्धी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी मंत्री संजय शिरसाट व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding arrangements of various services and facilities at Chaityabhoomi, Mumbai, on the occasion of the birth anniversary of BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar. Minister Sanjay Shirsat and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे करावयाच्या विविध सेवा-सुविधांसंदर्भात आढावा बैठक. यावेळी मंत्री संजय शिरसाट व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती के अवसर पर चैत्यभूमि, मुंबई में प्रदान की जाने वाली विभिन्न सेवा-सुविधाओं के संदर्भ में समीक्षा बैठक। इस दौरान मंत्री संजय शिरसाट एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕛 12.05pm | 3-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.०५ वा. | ३-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti