ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 264
订阅者
-124 小时
-67
-3930
帖子存档

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A committee comprising of ACS Agriculture, ACS Finance, and Marketing Department secretary will be constituted to support onion farmers. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांची एक समिती स्थापन करण्यात येणार. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CMO Maharashtra Tweets: राज्याच्या विकासाला गती देणारी 27 विधेयके संमत राज्याच्या विकासाला गती देणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 29 विधेयकांपैकी 27 विधेयके दोन्ही सभागृहात संमत करण्यात आली असून 1 विधेयक मागे घेण्यात आले आहे. विधानसभेत एकही विधेयक प्रलंबित नसून केवळ 1 विधेयक विधानपरिषदेत प्रलंबित आहे. नगरविकास, ग्रामविकास, शिक्षण, महसूल, वित्त, कायदा व सुव्यवस्था, उद्योग व सहकार अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण सुधारणा या विधेयकांद्वारे करण्यात आल्या आहेत. 📄 संमत विधेयकांची संपूर्ण यादी ✅ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, 2026 (सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 14 याचे रूपांतरित विधेयक) ✅ महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, 2025 ✅ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2026 (सन 2026 चा अध्यादेश क्रमांक 1 याचे रूपांतरित विधेयक) ✅ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र उद्वाहक व सरकते जिने (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ भागीदारी (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026 ✅ वन्य जीव (संरक्षण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र निरसन विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2026 ✅ मुंबई महानगरपालिका (भूतलक्षी प्रभावाने सुधारणा, भांडवली मूल्य विषयक नियमांचे पुनर अधिनियम आणि विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2026 ▪️मागे घेण्यात आलेले विधेयक ✅ महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (सुधारणा) विधेयक, 2025 ▪️ प्रलंबित विधेयक ✅ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026 #Maharashtra #Mumbai #DevendraFadnavis

CMO Maharashtra Tweets: कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. कांदा प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीने शेतकऱ्यांना तातडीने करता येणाऱ्या उपायोजना सुचवाव्यात तसेच कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी यंत्रणांनी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कांदा व्यापारातील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि कांद्याची निर्यात वाढवून दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वय साधला जाणार आहे. यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर व सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांत 'क्रॉप डायव्हर्सिफिकेशन'ची शक्यता पडताळण्याचे निर्देश समितीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. येणाऱ्या खरीप हंगामातच या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यावर भर देत, कांद्यामध्येही विविध वाणांची निवड, उत्पादन क्षमता आणि बाजारपेठेच्या गरजा यांचा अभ्यास करून ‘क्रॉप डायव्हर्सिफिकेशन’ करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना कांदा पिकापेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळविणे आवश्यक आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये अशी कार्यपद्धती राबविल्यास कांद्याचे उत्पादन आणि पुरवठा अधिक संतुलित होऊन शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. या समितीने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अल्पकालीन उपायोजना सुचवाव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार रावल, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #OnionFarmers

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Strategic Shift for Sustainable Onion Farming Chaired a meeting regarding issues related to onion-producing farmers. Directed the formation of a committee comprising senior officials from the Agriculture, Finance, and Marketing Departments to recommend swift and effective measures for farmer relief. Also directed the committee to examine crop diversification in key onion-producing districts like Nashik, Pune, Ahilyanagar, and Solapur, starting from the upcoming Kharif season. Emphasised the need to promote diversification within onion cultivation and encourage a gradual shift towards higher-value crops over the next 2–3 years to ensure stability and better returns for farmers. DCM Sunetratai Pawar, Minister Girish Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil ji, Minister Jaykumar Rawal, Minister Dattatray Bharne, Minister Narhari Zirwal, Minister Dadaji Bhuse, Minister Chhagan Bhujbal and senior officials were present. #Maharashtra #OnionFarmers https://x.com/Dev_Fadnavis/status/2036840482622599676?s=20

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: ☕️CM Devendra Fadnavis at the 'Chahapan' held after the conclusion of 'Maharashtra Legislature’s Budget Session 2026'. Legislative Council Chairman Prof Ram Shinde, Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar and other members of the Legislature were present. ☕️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026' च्या समाप्तीनंतर 'चहापान' कार्यक्रम. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि विधिमंडळातील सहकारी यांची उपस्थिती. ☕️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में ‘महाराष्ट्र विधानमंडल बजट सत्र 2026’ के समापन के बाद 'चहापान' कार्यक्रम। इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार और विधानमंडल के सहयोगियों की उपस्थिति। 🕣 8.15pm | 25-3-2026📍Vidhan Bhavan, Mumbai | रा. ८.१५ वा. | २५-३-२०२६📍विधान भवन, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #LegislativeSession

CM Shri Devendra Fadnavis Tweets: The information presented in the House by MLA Gopichand Padalkar will be investigated by a senior officer of the rank of Joint Commissioner of Police. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीची, सह पोलीस आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A proposal for a 'Vaidhanik Vikas Mahamandal' has been submitted to the Central Government, and discussions are currently underway with the Centre regarding the same. वैधानिक विकास महामंडळासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Seven accused have been arrested in connection with the IVF case in Badlapur. बदलापूरमधील आयव्हीएफ प्रकरणी सात आरोपींना अटक... (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: On the ‘Mahavistar AI’ platform, farmers in the state receive comprehensive information on all aspects of agriculture. महाविस्तार AI या प्लॅटफॉर्मवर राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व गोष्टींची माहिती मिळते. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai #AI4Agri

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Nearly 79% of the works under the 'Jalyukt Shivar Yojana' have been completed. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जवळपास 79% कामे पूर्ण (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: BMC has floated a ₹2440 crore biomining tender, which includes excavation, transportation, and scientific disposal. बहन्मुंबई महानगरपालिकेकडून ₹2440 कोटींची बायोमायनिंग निविदा, उत्खनन, वाहतूक व शास्त्रीय विल्हेवाटीचा यात समावेश आहे. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai