ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 098
订阅者
-424 小时
-177 天
-2830 天
帖子存档

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Welcome to Mumbai, AstraZeneca! Congratulations on your new international address. ॲस्ट्राझेनेका, मुंबईत आपले स्वागत! नव्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयाच्या शुभारंभासाठी शुभेच्छा. (Mumbai | 16-10-2026) #Maharashtra #Mumbai

CMO Maharashtra Tweets: संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हस्ते आज मुंबई येथे 'स्मार्ट नागरिक - नागरिकशास्त्र आणि संविधानिक मूल्ये' या शालेय अभ्यासक्रमाचे आणि महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'विद्यार्थी प्रेरणा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुस्तकाचे प्रकाशन केले. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक संवेदनशीलता आणि नागरिक म्हणून आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षित पिढीबरोबरच समाजाप्रती बांधिलकी जपणारे जबाबदार नागरिक घडविणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेला ‘स्मार्ट नागरिक’ अभ्यासक्रम आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे कौतुक मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, आधुनिक तंत्रज्ञानाची जाण आणि संगणक प्रयोगशाळेतील आधुनिक पद्धतीने सुरू असलेले काम उल्लेखनीय आहे. मोठे शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळांपेक्षाही उत्तम दर्जाचे शिक्षण मुंबई पब्लिक स्कूलमध्ये दिले जात असल्याचे पाहून आनंद झाल्याचे नमूद करत ते म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि नागरिक म्हणून जबाबदारीची भावना रुजविणारे उपक्रम सक्षम व मूल्यनिष्ठ समाज घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. शिक्षणासोबत सामाजिक संवेदनशीलताही आवश्यक मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांना विविध समाजमाध्यमांद्वारे जगभरातील माहिती सहज उपलब्ध होत आहे. या माहितीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही प्रभाव पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिक म्हणून आपले अधिकार, कर्तव्ये आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांची संवेदनशीलता निर्माण होणे आवश्यक आहे. समाजाच्या उभारणीत आपलाही सहभाग असला पाहिजे, याचे भान विद्यार्थ्यांना असावे. समाजाने आणि संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शिक्षण घेता आले आणि व्यक्तिमत्त्व घडविता आले, याची जाणीव ठेवणारी पिढी घडविणे महत्त्वाचे आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील मूल्ये ही जबाबदार नागरिकत्वाची पायाभरणी आहेत, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये निर्भयता, एकता आणि समाजाप्रती संवेदनशीलतेची मूल्ये रुजविली. स्वराज्याची ही मूल्ये आणि भारतीय संविधानाने दिलेली मूल्ये विद्यार्थ्यांना समजली, तर ते जीवनात निराश न होता समाज आणि देशासाठी सकारात्मक योगदान देतील. लोकशाही आणि संविधानिक मार्गानेच निर्णय महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे, तोवर निर्णय संसदेतच होतील आणि सत्ताबदल निवडणुकांमधूनच होईल. संविधानाने देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत केली असून, तिला अनेकदा आव्हान देण्याचे प्रयत्न होऊनही भारतीय लोकशाही आणि संविधान टिकून आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळविण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर न्याय मिळविण्यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच, असंविधानिक मार्गाने जाणाऱ्यांविषयीची कायदेशीर चौकटही संविधानाने निश्चित केली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SmartNagrik

CMO Maharashtra Tweets: औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन आणि नावीन्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लि. च्या नवीन मुख्यालयाचे उदघाटन करण्यात आले. ॲस्ट्राझेनेकाचे अत्याधुनिक मुख्यालय मुंबईत सुरू झाल्यामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन, नावीन्य आणि जागतिक सहकार्याला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोविड-19 महामारीच्या काळात भारताने ‘कोविड मैत्री’ उपक्रमातून 99 देशांना लसींचा पुरवठा करून ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना जगासमोर मांडली. या प्रयत्नांमध्ये ॲस्ट्राझेनेकाचे योगदानही मोलाचे आहे. तसेच कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू अत्यंत दुर्मीळ करण्याच्या दिशेने ॲस्ट्राझेनेकाचे प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. औषधनिर्मिती क्षेत्रात नावीन्याला प्राधान्य मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी करत आहेत. यावरून भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक दर्जाची क्षमता स्पष्ट होते. देशात बल्क ड्रग पार्क विकसित करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न महत्त्वपूर्ण असून, हे पार्क कार्यान्वित झाल्यानंतर औषधनिर्मिती क्षेत्रात मोठे परिवर्तन घडेल. औषधनिर्मिती, वैद्यकीय सेवा आणि मेडटेक क्षेत्रात नावीन्यामुळे मोठे बदल होत आहेत. आरोग्यसेवा अधिक सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन आवश्यक असल्याचे ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. नावीन्यपूर्ण संशोधनातून आरोग्यसेवेत सुधारणा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यादरम्यान स्वित्झर्लंडच्या आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोग्यसेवेतील प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. नावीन्यपूर्ण संशोधनातून अचूक निदान, प्रभावी उपचार आणि उत्तम औषधे उपलब्ध होऊन नागरिकांचे आरोग्य व जीवनमान सुधारण्यास मदत होईल. ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील उपस्थितीमुळे नवीन औषधांचे संशोधन आणि उत्पादन यांना चालना मिळेल. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांशी कंपनीने भागीदारी करावी. यामुळे संशोधनाला गती मिळेल आणि तरुण संशोधकांच्या प्रतिभेचा उपयोग करून नावीन्याला प्रोत्साहन देता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. उद्योगवाढीसाठी महाराष्ट्र सरकारचे सहकार्य महाराष्ट्र सरकार उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास आणि कंपन्यांसोबत भागीदारीत काम करण्यास कटिबद्ध आहे. उद्योगांची वाढ झाली, तर राज्याचीही प्रगती होते, या भूमिकेतून महाराष्ट्र सरकार व्यवसायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, ॲस्ट्राझेनेकाचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ॲस्ट्राझेनेका इंडियाचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content
+3

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of AstraZeneca Pharma India Ltd.'s new headquarters at the hands of CM Devendra Fadnavis. MLA Atul Bhatkhalkar, Asia Area Vice President of AstraZeneca, Arun Krishna, Country President & MD of AstraZeneca India, Praveen Rao Akkinepally and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लि. च्या नवीन मुख्यालयाचे उदघाटन यावेळी आमदार अतुल भातखळकर, ॲस्ट्राझेनेकाचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ॲस्ट्राझेनेका इंडियाचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से एस्ट्राजेनेका फार्मा इंडिया लि. के नए मुख्यालय का उदघाटन। इस अवसर पर विधायक अतुल भातखलकर, ॲस्ट्राझेनेका के एशिया क्षेत्र के उपाध्यक्ष अरुण कृष्णा, एस्ट्राजेनेका के भारत अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक प्रवीण राव अक्किनेपल्ली एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕔5.10pm | 16-10-2026📍Mumbai | संध्या. ५.१० वा. | १६-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Is your name on the voter list? Visit a special camp on Oct 17, 18, 24 & 25 Check. Register. Be Ready. 🔗https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx #Maharashtra #SIR #ElectionCommission

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संविधानिक मूल्ये अंगीकारली तरच स्मार्ट नागरिक बनू आणि विकसित भारताचे सारथी म्हणून काम करू शकू! महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके द्वारा दिए गए संवैधानिक मूल्यों को आत्मसात करके ही हम स्मार्ट नागरिक बन सकते हैं और विकसित भारत के सारथी के रूप में अपनी भूमिका निभा सकते हैं! (स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा या पुस्तकांचे प्रकाशन | मुंबई | 16-10-2026) #Maharashtra #Mumbai #SmartNagrik

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: संविधानाने प्रत्येकाला न्यायाचा अधिकार दिला आहे, पण कोणी असंवैधानिक मार्गाने गेल्यास, त्याचे काय करायचे हे सुद्धा याच संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहे. संविधान ने प्रत्येक व्यक्ति को न्याय का अधिकार दिया है। लेकिन अगर कोई असंवैधानिक रास्ते पर चलता है, तो उसके साथ क्या करना है, यह भी इसी संविधान में लिखा हुआ है। (स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा या पुस्तकांचे प्रकाशन | मुंबई | 16-10-2026) #Maharashtra #Mumbai #SmartNagrik

Full_Speech_Inauguration_of_AstraZeneca's_New_Headquarters,_Mumbai.mp426.78 MB