ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 100
订阅者
无数据24 小时
-57 天
-1430 天
帖子存档
CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या 'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान https://mahasamvad.in/218287/ दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा सुरळीतपणे पुरवठा करण्याचे निर्देश https://mahasamvad.in/218317/ राज्यातील आणखी 18 तालुक्यांत दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी होणार https://mahasamvad.in/218315/ पालघर जिल्ह्यातील पुनर्वसनग्रस्तांचे प्रश्न आणि वनहक्कांचे प्रलंबित दावे निकाली काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/218357/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

CMO Maharashtra Tweets: 'पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने निर्मित ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ या श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकार आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीची भक्तिमार्गातली समृद्ध भक्तिपरंपरा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आणि डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून त्याचे प्रसारण करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पंढरपूर वारी ही भक्तिमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा आहे. जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता ही परंपरा सर्वांना विठुरायाच्या भक्तिरंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ हा सुंदर माहितीपट तयार करून प्रदर्शित करण्यात आला आहे. या माहितीपटाला ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये भारत देशासाठीचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे मी अभिनंदन करतो. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारा हा माहितीपट सर्वांनी पाहावा,” असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

*CMO Maharashtra Tweets:* राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे आयोजित 'पोलीस अलंकरण' सोहळ्यात राज्यातील 103 पोलीस अधिकारी व अंमलदारांना शौर्य आणि उल्लेखनीय सेवेसाठी विविध पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी ✅2 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक (PMG), ✅18 जणांना शौर्य पदक (GM) ✅3 अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) ✅4 अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (PSM) ✅40 अधिकारी व अंमलदारांना पोलीस पदक (PM) ✅ 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) प्रदान करण्यात आले. कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि समर्पणाच्या बळावर समाजाच्या सुरक्षिततेसाठी योगदान देणाऱ्या सर्व पदकप्राप्त सन्मानित अधिकारी व अंमलदार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

*CMO Maharashtra Tweets:* राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांत अन्नधान्य पुरवठा विनाविलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यातील जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत आणि विनाविलंब उपलब्ध करून दिले जाणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह, पात्रतेनुसार नवीन लाभार्थ्यांचा योजनेत समावेश, आधार संलग्नीकरण, स्थलांतरित लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ आणि अन्नधान्य वितरणावर प्रभावी देखरेख ठेवण्याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 9 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, खरीप हंगाम 2026 साठी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची 'ट्रिगर-1' (प्रथम कळ) स्थिती लागू करून विविध सवलती व उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी, शेतमजूर आणि अन्य प्रभावित घटकांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या लाभार्थी मर्यादेत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरित केले जाते. दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा नियमित, सुरळीत आणि विनाविलंब होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पात्र लाभार्थ्यांना एपीएल डीबीटी योजनेचा लाभ नियमितपणे मिळेल, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. पात्र व्यक्तींचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या व्यक्तींनी मोफत अन्नधान्याची मागणी केल्यास, त्यांची सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्रता तपासली जाईल. संबंधित व्यक्तींचे उत्पन्न आणि योजनेसाठी उपलब्ध असलेली लाभार्थी मर्यादा विचारात घेऊन, पात्र व्यक्तींना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटात समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यासाठी संबंधित कुटुंबाच्या शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे निर्धारित निकष पूर्ण करणाऱ्या आणि योजनेत अद्याप समाविष्ट नसलेल्या व्यक्तींनाही योजनेचा लाभ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थलांतरित लाभार्थ्यांना कोणत्याही सोयीच्या रास्तभाव दुकानातून धान्य दुष्काळग्रस्त भागात रोजगार किंवा पाण्याच्या शोधात शेतमजूर आणि नागरिकांना शहरी, निमशहरी अथवा जवळच्या अन्य भागांत स्थलांतर करावे लागू शकते. अशा परिस्थितीत स्थलांतरामुळे पात्र कुटुंबे त्यांच्या हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी 'वन नेशन, वन रेशन कार्ड' अंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. दुष्काळामुळे स्थलांतर करावे लागणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. स्थलांतरामुळे एकही पात्र कुटुंब किंवा लाभार्थी हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची वैयक्तिक दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A New Chapter in Palghar’s Development and Rehabilitation Distributed benefits under various Government welfare schemes to citizens of Palghar district as a part of the ‘Seva Sankalp Abhiyan 2026’ initiative. For decades, residents of Hanuman Nagar and Chandranagar in Palghar faced long-pending land ownership rights issues. The Maharashtra Government addressed these long-pending concerns through unanimous Cabinet decisions, approving the proposal without delay and bringing long-awaited relief to the affected citizens. With the Government Resolution (GR) issued to the beneficiaries, directed that the 7/12 land records be handed over within the next three months. These decisions will also benefit people in Palghar district who lost their land and homes due to development projects in the last five decades. Palghar holds immense potential, and with Vadhavan Port, the upcoming airport and the Bullet Train project, the district is set for significant transformation. The implementation of these projects will place local communities at the centre of planning and development, with a clear focus on proper rehabilitation, employment opportunities, infrastructure development and fair compensation. The process of granting Forest Rights Titles to eligible tribal communities in Palghar will continue. While approximately 52,000 titles have been distributed, another 17,000-18,000 applications remain pending. To address challenges in providing supporting evidence, satellite-based information has enabled the grant of forest rights titles to approximately 1000 additional beneficiaries. Inspired by the ideals of 'Dharti Aaba Bhagwan' Birsa Munda, the aim is to ensure that Palghar’s growth creates new opportunities, strengthens local infrastructure and secures a better future for every affected family, with development rooted in the welfare and dignity of its people. Minister Ganesh Naik ji, MP Dr Hemant Savara, MLA Rajendra Gavit, MLA Harishchandra Bhoye, MLA Rajan Naik ji, MLA Snehatai Dube Pandit, MLA Vilas Tare, Padma Shri Bhiklya Ladakya Dhinda ji and other dignitaries were present. #Maharashtra #Palghar #SevaSankalpAbhiyan https://x.com/Dev_Fadnavis/status/2108620522615615668?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जनता का अटूट विश्वास, भाजपा की लगातार जीत! विपक्ष की नकारात्मक राजनीति, झूठे आरोपों और दुष्प्रचार के बावजूद मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके सशक्त नेतृत्व और भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितिन नबीन जी इनके मार्गदर्शन में भाजपा और एनडीए की विजय यात्रा निरंतर आगे बढ़ रही है। पश्चिम बंगाल, असम और पुडुचेरी के उप चुनावों से लेकर राजस्थान और त्रिपुरा के हालिया निकाय चुनावों तक, एनडीए की जीत जनता के अटूट विश्वास और विपक्ष की नकारात्मक राजनीति को करारा जवाब है। हर हार के बाद संस्थाओं पर सवाल उठाना और जनादेश को नकारना विपक्ष की आदत बन चुकी है। लेकिन जनता अब इनके झूठ और नकारात्मकता की राजनीति को भली-भांति पहचान चुकी है। इस शानदार विजय के लिए भाजपा-एनडीए शासित राज्य के सभी मुख्यमंत्रियों, वरिष्ठ नेताओं, प्रदेश अध्यक्षों और दिन-रात परिश्रम करने वाले समर्पित कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। #BJP #NDA #ElectionVictory #DevelopmentPolitics https://x.com/Dev_Fadnavis/status/2108616915879100841?s=20

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर येथे 'सेवा संकल्प अभियान 2026' अंतर्गत 'लेक लाडकी' योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी ₹5000 च्या धनादेशांचे वितरण केले. लेक लाडकी योजनेचे लाभार्थी ✅ मंजू सापटा (आई) / अवंतिका सापटा (मुलगी) ✅ सुरेखा दळवी (आई) / अंशवी दळवी (मुलगी) #Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #SevaSankalpAbhiyan

हनुमाननगर आणि चंद्रनगरमधील नागरिकांनी अनेक दशकांचा संघर्ष केला असून, अनेक पिढ्यांना जमिनीच्या मालकी हक्कासाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र, आता त्यांच्या जीवनात नव्या पर्वाची सुरुवात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार विलास तरे, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Palghar #SevaSankalpAbhiyan

CMO Maharashtra Tweets: पुनर्वसनग्रस्तांच्या हक्कांचे संरक्षण आणि पालघरच्या विकासाचा सरकारचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पालघर येथे ‘सेवा संकल्प अभियान 2026’ या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील नागरिकांना विविध जनकल्याणकारी शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. आदिवासी समाजाच्या जल, जमीन आणि जंगलाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा देणारे जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांना नमन करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या पाच दशकांपासून जमिनीच्या मालकी हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या हनुमाननगर आणि चंद्रनगर येथील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने पुनर्वसनग्रस्तांना जमिनीचे मालकी हक्क देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, पुढील 3 महिन्यांत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला 7/12 उतारा देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तसेच, पालघर जिल्ह्यातील अशाच प्रकारच्या अन्य पुनर्वसन प्रकरणांनाही न्याय देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या परिसरातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया 1969 मध्ये सुरू झाली. 1978 पर्यंत अनेक कुटुंबांना पुनर्वसनासाठी हनुमाननगर आणि चंद्रनगर येथे आणून ठेवण्यात आले. 1982 मध्ये पुनर्वसन पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. मात्र, संबंधित कुटुंबांना जमिनीचे 7/12 उतारे आणि मालकी हक्क मिळवण्यासाठी पुढील अनेक दशके संघर्ष करावा लागला. या प्रकरणासंदर्भातील प्रस्तावाला मंत्रिमंडळाने एकमताने मंजुरी दिली. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या निराकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी समन्वयाने काम करून 3 महिन्यांत पात्र लाभार्थ्यांना 7/12 उतारे मिळतील, याची खात्री करावी. काही लाभार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रांची कमतरता असल्यास संबंधित प्रकरणांचा योग्य अभ्यास करून निर्णय घ्यावा. यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक पाठबळ देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयी या दोन्ही वसाहतींमध्येही उपलब्ध झाल्या पाहिजेत. निधी किंवा प्रशासकीय निर्णयांबाबत अडचण आल्यास पालकमंत्री आणि आपण स्वतः लक्ष घालू. तीन महिन्यांनंतर या कामांचा आढावा घेण्यात येईल. तसेच चंद्रनगर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. पालघरमधील वनहक्कांचे प्रलंबित दावे निकाली काढणार पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वनजमिनीवरील हक्क मिळवून देण्याच्या विषयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वनहक्क पट्टे वितरणाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार असून, जिल्ह्यात सुमारे 52,000 वनहक्क पट्टे वितरित करण्यात आले आहेत. आणखी 17,000 ते 18,000 अर्ज विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. वनहक्कांच्या दाव्यांसाठी आवश्यक पुरावे उपलब्ध होत नसल्याच्या अडचणीवर उपाय म्हणून उपग्रहाधारित माहिती आणि संबंधित पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे नव्याने सुमारे 1000 लाभार्थ्यांना वनपट्टे देण्यात आले असून, शेवटच्या पात्र लाभार्थ्यालाही वनहक्क पट्टा मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवण्यात येईल. यापूर्वी पट्टे मिळालेल्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारच्या विविध योजनांचे लाभ पोहोचविण्यावर भर दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. विकासात स्थानिकांना प्राधान्य, पुनर्वसनात सुविधा आणि रोजगार वाढवण बंदर, विमानतळ, बुलेट ट्रेन आणि विविध रस्ते प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मात्र, विकास करताना स्थानिक नागरिकांचे हित केंद्रस्थानी असले पाहिजे. भूमिपुत्रांना भूमिहीन करून आणि विकासप्रक्रियेत त्यांना स्थान न देता होणारा विकास हा विकास नसून विनाश ठरेल म्हणून स्थानिकांना योग्य मोबदला, रोजगार आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेत आवश्यकतेनुसार विशेष निर्णय घेऊन काही प्रकरणांत वाढीव मोबदला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. तसेच, पुनर्वसन करताना संबंधित गावांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा, आवश्यक नागरी सोयी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिल्या पाच विकसित जिल्ह्यांमध्ये आणण्याचा संकल्प व्यक्त करताना आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि गरीब घटकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. ‘तुमचा वनवास संपला’; नव्या पहाटेची ग्वाही

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: इंडी गठबंधन का कोई अस्तित्व नहीं है। ये आपस में झगड़ते हैं और इनमें कोई एकता नहीं है। (पालघर | 9-10-2026) #Maharashtra #Palghar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पुणे येथे सुरू असलेले आंदोलन सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे होते, मात्र आता त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. पुणे में जारी आंदोलन शुरू में एमपीएससी के विद्यार्थियों का था, लेकिन अब इसने राजनीतिक रूप ले लिया है। (पालघर | 9-10-2026) #Maharashtra #Pune

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पालघर येथील हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांना प्राधान्याने 7/12 देण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले आहेत. पालघर के हनुमाननगर और चंद्रनगर के नागरिकों को प्राथमिकता के आधार पर 7/12 देने के संबंध में प्रशासन को आदेश दिए हैं। (सेवा संकल्प अभियान 2026 | पालघर | 9-10-2026) #Maharashtra #Palghar #SevaSankalpAbhiyan