ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
'ओमायक्रॉन' व्हेरिएंटबाबत डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली महत्वाची माहिती! LetsUpp | Trending ⚡ 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचे रुग्ण ज्या
'ओमायक्रॉन' व्हेरिएंटबाबत डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली महत्वाची माहिती! LetsUpp | Trending ⚡ 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचे रुग्ण ज्या - ज्या देशात सापडत आहेत. त्या देशातील माहिती घेऊन अभ्यास केला जात आहे. तसेच दुसऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. 👉 त्यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळतील, त्यांचं सॅम्पल हे जिनॉमिक सिक्वेन्सला पाठवण्यात येणार आहेत, असं आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे. 💫 त्या पद्धतीनेच जे निगेटिव्ह येतील त्यांनाही 7 दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा 8 व्या दिवशी सॅम्पल घेतलं जाणार आहे. त्यामध्येही पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचं सॅम्पल जिनॉमिक सिक्वेन्सला पाठवण्यात येणार आहे. 📍 दरम्यान, यामागचे उद्दिष्ट हेच आहे की, या विषाणूचं निदान व्हावं. तसेच ज्या देशात हा व्हायरस नाही त्या देशामधील देखील प्रवाशांचे 5 टक्के सॅम्पल टेस्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/yvmzCtyCBlb

photo content

समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्याबाबत मोठा निर्णय LetsUpp l Trending 🛣️ मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गाचा विस्तार आता नागपूर गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. 👉 त्यानुसार नागपूर ते गोंदियादरम्यानच्या विस्तारीकरणासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे. 📄 या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी एक-दोन दिवसांत निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे. 💁‍♂️ नागपूर ते गोंदिया असा साधारणत: १५० किमी महामार्ग असेल. हे विस्तारीकरण झाल्यास मुंबई ते गोंदिया अंतर काही तासांत पार करणे शक्य होणार आहे. 🧐 मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांत पूर्ण करण्यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. 👍 ५५,३३५.३२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातही नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. 🤔 हा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण महामार्ग सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. 💫 या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून त्याचा फायदा अधिकाधिक नागरिकांना, गावांना आणि जिल्ह्यांना व्हावा या दृष्टीनेही एमएसआरडीसीकडून प्रयत्न सुरू आहेत. 💁‍♀️ त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा जालना ते नांदेड असा अंदाजे २०० किमी विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 📍 या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तर आता समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया असाही विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/Eu8N0Nx2Alb

*टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या* LetsUpp | Bulletin ● मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रियकराने मित्रासोबत केलं दुष्कर्म ● राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये वृद्ध महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या; मारेकरी मात्र अद्याप फरार ● पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठमोळ्या मयूर पाटीलचं कौतुक; गाड्यांचा मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध लावला ● ‘ओमिक्रॉन’चा धोका वाढत असल्याने महाराष्ट्रात कठोर निर्णय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक ● गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार काम करणारे सरकार, द्विवर्षपूर्तीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीं मांडला सरकारचा लेखाजोखा ● भालचंद्र नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचे खडेबोल ● भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी; गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ ● उत्तर प्रदेशात रोज तीन मुली होतात गायब; १२ ते १८ वयोगटातील मुली अधिक; आकडेवारीतून धक्कादायक माहिती ● पश्चिम बंगाल:अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना भीषण अपघात; १८ जण ठार, पाच गंभीर जखमी ● भारत आणि न्यूझीलंड कसोटी; लंचपर्यंत भारताचा अर्धा संघ गारद, भारताने ५ बाद ८४ धावा केल्या, श्रेयस-अश्विन नाबाद! *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/U3jPEd4Xxlb

photo content

टॉप १० हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ▪️ महाराष्ट्राने गाठला ११ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली माहिती ▪️ राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट! मागील २४ तासात ८४८ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५० जणांचा मृत्यू ▪️ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, पुण्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू ▪️ रत्नागिरीतील जयगड समुद्रात एक महिन्यापूर्वी बुडालेली नौका अद्यापही बेपत्ताच; पोलिसांच्या अहवालाची मच्छिमारांना प्रतिक्षा ▪️ देशभरात मागील २४ तासांत ९,११९ नवीन कोविड रुग्ण; तर ३९६ रुग्णांचा मृत्यू ▪️ रायगडमधील माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोटात होऊन एकाचा जागीच मृत्यू; तर तर १० वर्षीय मुलासह महिला किरकोळ जखमी ▪️ उत्तर प्रदेशात महापुरुषांची जयंती आणि महाशिवरात्रीला मांस विक्रीवर बंदी; योगी सरकारने जारी केले आदेश ▪️ भारत-बांगलादेश सीमेवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी ▪️ देशात प्रथमच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक; एक हजार पुरुषांमागे देशात १०२० महिला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर ▪️ भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी भरभराट होणार! डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स 70 हजारांच्या पार जाणार; मॉर्गन स्टॅनलेचा दावा अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/iHEvBiPeulb

photo content

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' कलाकृतीची विश्‍वविक्रम म्हणून नोंद! LetsUpp | Osmanabad ● कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील उजळंब येथे २५००० दिव्यांच्या प्रकाशातून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची जागतिक विक्रमात नोंद झाली आहे. उस्मानाबादचे कलाकार राजकुमार दत्तात्रय कुंभार, यांनी ही कलाकृती साकारली आहे. ● या कलाकृतीसाठी २५००० दिव्यांचे प्रज्वलन केले होते. तिचा आकार ५० फुट × ५० फुट असा 2500 चौरस फूट आहे. ही शिवरायांची जगातील पहिली दीपप्रतिमा असून, दिनांक १३ नोव्हेंबर २०२० रोजी साकारली होती. ● उजळंब गावात शिवप्रताप दिनाचं औचित्य साधत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उजळंब यांच्या आयोजनातून छत्रपती शिवरायांना आणि स्वराज्यासाठी त्यांच्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला या दिपोत्सवातुन त्यांच्या कार्याला एक आगळीवेगळी मानवंदना देण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला होता. ● या प्रतिमेची एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद घेतली गेली आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची दिपप्रज्वलन आतून साकारली जाणारी आत्तापर्यंतची जगातली पहिलीच प्रतिमा ठरली आहे. संकल्पना कलाकार: उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार राजकुमार कुंभार यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. ● त्यासाठी त्यांचे मित्र सहकलाकार आकाश नेटके उस्मानाबाद यांना सोबत घेऊन ही कलाकृती पूर्णत्वास नेली गेली आहे छत्रपती शिवरायांच्या रांगोळी पासून विविध माध्यमातील घटकांचा वापर करत राजकुमार कुंभार यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत आणि अशा आगळ्यावेगळ्या कलाकृती मधील जवळजवळ दहा कलाकृतींची विश्‍वविक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/Q76fDDoMplb