LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरी पार; जाणून घ्या आजचे दर
LetsUpp | Trending
⚡ सात दिवसांच्या दरवाढीनंतर अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला आज लगाम बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना किमान आजपुरता दिलासा मिळाला आहे.
👉 भारतीय तेल कंपन्यांच्यावतीनं आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये आज दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर वाढलेले नाहीत.
📝 माहितीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 104.44 रुपये प्रति लिटर आहे, तर मुंबईत 110.41 रुपये प्रति लिटरच्या सर्वोच्च स्तरांवर आहे.
⛽ तसेच मुंबईत डिझेल आता 101.03 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. तर दिल्लीत आज डिझेल 93.17 रुपयांवर स्थिर आहे.
👀 देशातील सर्व चार प्रमुख शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईबाबत बोलायचं झालं तर, पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर मुंबईत आहेत.
● देशातील प्रमुख शहरातील दर :
● शहरं - पेट्रोल रुपये/लिटर - डिझेल रुपये/लिटर
● दिल्ली : 104.44 - 93.17
● मुंबई : 110.41 - 101.03
● कोलकाता : 105.05 - 96.24
● चेन्नई : 101.76 - 97.56
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Nd2fJ6GJhkb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● केंद्र सरकार उसाच्या एफआरपीमध्ये कोणताही बदल करणार नाही, केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांची माहिती
● मार्डच्या लढ्याला यश, कोरोनाकाळातील रुग्णसेवेची दखल, प्रत्येक निवासी डॉक्टरला 1 लाख 21 हजार रुपये, आदेश जारी
● सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही अद्यापही नाही
● काँग्रेस पक्षामधील दुखणी जुनी असून, वरवरच्या उपायांनी ती दूर होणार नाहीत; निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली टीका
● मुंबईत आजपासून सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या संचारास बंदी. अन्यथा कारवाई होणार
● जमीन दस्त तसेच नोंदणीत उल्लंघन करून दिशाभूल केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह चौदाजणां विरोधात गुन्हा दाखल
● जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडल्या, गाळेधारकाकडून 1 लाखाची लाच मागितली होती
● मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! यंदा बेस्ट बस तिकिट दरात वाढ नाही, अर्थसंकल्प सादर
● अफगाणिस्तानच्या उत्तरी कुंदुंज प्रांतात मशिदीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला व अनेकजण गंभीर जखमी
●आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप पुरवा; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/NMg5zyDyckb
6 624
का साजरा केला जातो नवरात्री उत्सव? जाणून घ्या काय आहे महत्त्व
LetsUpp | Special
🛕 हिंदू दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस, भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते.
💁♂️असे मानले जाते की दुर्गा देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशची (घटाची) स्थापना केली जाते. परंतु तुम्हाला नवरात्र उत्सव का साजरा केला जातो आणि त्याचे महत्व काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
नवरात्रीचे महत्त्व
🔔हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते. परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीपासून मानली जाते. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीचेही वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर अनीतीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
⭐धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्त कलश स्थापन (घटस्थापना) करतात आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास देखील केला जातो.
नवरात्रीची आख्यायिका
⚡नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही.
📌हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली. त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.
📍दुसऱ्या एखा कथेनुसार जेव्हा भगवान श्री राम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली. रामाने रामेश्वरमध्ये नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्री रामाला विजयाचे आशीर्वाद दिले. त्यानंतर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून लंका जिंकली. या दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो.
देवींच्या साडेतीन शक्तिपीठांची माहिती व आख्यायिकापासून ते सर्व काही जाणून घ्या...
https://letsup.app.link/WYxjRjCJckb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● राज्य सरकारी कर्मचार्यांना व इतर पात्र कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार महागाई भत्ता आता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के इतका झाला आहे
● प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे निर्देश
● पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे इतर नातेवाईकही रडारवर
● मुंबईत प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल 5 पटीने वाढ, कोरोना संक्रमण टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
● अजित पवारांच्या बहिणी, निकटवर्तीयांवर गुरुवारी दिवसभर छापे, आयकर विभागाचं दिल्लीतून पहिल्यांदाच स्पष्टीकरण, 1 हजार कोटीच्या व्यवहाराची नोंद
● "दादा तुम्ही करून दाखवलंत", सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या लोकार्पणावरून भाजपची पोस्टरबाजी
● ठाणे पालिकेचा ठेकेदाराला दणका, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे ठोठावला तब्बल 10 लाखांचा दंड
● ब्रिटनने 11 ऑक्टोबरपासून पूर्णपणे लसीकरण केलेल्या भारतीयांसाठी विलगीकरणाचे नियम काढून टाकले आहेत. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त एलिस यांनी ही माहिती दिली
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रा या खेळाडूच्या भाल्यासाठी सर्वाधिक 1 कोटी 50 हजार रुपयांची बोली लावण्यात आली
● ब्लँक चेक तयार आहे, फक्त वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभूत करा; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उद्योगपतीची ऑफर
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/YT8e00TUakb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर; बाधितांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले निर्देश
● राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा तर मुंबई, कोकण, पुणे, सातारा, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
● राज्य सरकारकडून मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा; दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिली धोक्याची सूचना; उद्या 8 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत हे 'मिशन कवच कुंडल' सुरू राहणार
● राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीच्या तोंडावर आनंदाची बातमी; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय
● राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण अहमदनगरला जिल्ह्यातील 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून आदेश जारी; वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक गावे करण्यात आली आहेत लॉकडाऊन
● महाराष्ट्रातील एका जागेसह 16 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूकांसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
● लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची असल्याचा आरोप; येत्या 8 दिवसात त्यांना अटक करण्यात यावी, राकेश टिकैत यांचा योगी आदित्यनाथ सरकारला गंभीर इशारा
● उत्तर प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात; प्रवासी बसमध्ये 70 प्रवाशी होते, अपघातात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर तर २७ जण जखमी तर या दुर्घटनेत डबल डेकर बस झाली चक्काचूर
●दरवर्षी ४ लाख लोकांचा बळी घेणाऱ्या मलेरियावर जगातील पहिल्या लसीला, जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता; यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण राखण्यात यश येणार
● कांदबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना यंदाचा साहित्यातील नोबेल जाहीर; गुरनाह यांनी त्यांच्या लिखाणातून पूर्व आफ्रिकेतील स्थिती, आखाती देशातील स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या आतापर्यंत 10 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Ve0uHEf69jb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● परतीचा पाऊस सुरु झाल्याने कडकडाटासह आज जोरदार सरी कोसळतील; प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होशाळीकर यांचा अंदाज
● दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिली धोक्याची सूचना; उद्या 8 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत हे 'मिशन कवच कुंडल' सुरू राहणार
● उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाची कारवाई; राज्याचा अर्थमंत्री असल्याने व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा हे चांगलं माहिती - अजित पवार
● राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
● लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची असल्याचा आरोप; येत्या 8 दिवसात त्यांना अटक करण्यात यावी, राकेश टिकैत यांचा योगी आदित्यनाथ सरकारला गंभीर इशारा
● राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण अहमदनगरला जिल्ह्यातील 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून आदेश जारी
● अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर
● भाजपकडून 3 लोकसभा आणि 16 विधानसभेच्या जागांसाठी उमेदवारांची घोषणा, 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक
● 2021-22 पासून सुरू होणाऱ्या फॅमिली पेंशनमध्ये दुरुस्तीमुळे अतिरिक्त लायबिलिटीला रिवीजन करण्यास मान्यता; बँक कर्मचाऱ्यांची फॅमिली पेन्शन दरमहा वाढणार
● पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पहाटे 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप 20 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/G2s8zlgL9jb
6 624
*झेडपी, पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल, वाचा प्रत्येक अपडेट*
Letsupp | Trending
● जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा 2 वाजेपर्यंतचा अपडेट निकाल
*पालघर; जिल्हा परिषद गट*
एकूण 15 जागा
शिवसेना - 5
भाजप - 5
राष्ट्रवादी - 4
माकपा - 1
*वाशीम; जिल्हा परिषद गट*
एकुण 14 जागा
राष्ट्रवादी- 5
भाजप- 1
काँग्रेस- 2
शिवसेना- 1
वंचित- 2
इतर-2
*अकोला; जिल्हा परिषद गट*
एकूण जागा : 14
वंचित : 06
अपक्ष : 03
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
*धुळे; जिल्हा परिषद गट*
एकुण 15 जागा
राष्ट्रवादी- 03
भाजप- 08
काँग्रेस- 02
शिवसेना- 01
वंचित- 00
इतर- 00
*नंदुरबार; जिल्हा परिषद गट*
एकुण 11 जागा
राष्ट्रवादी- 01
भाजप- 04
काँग्रेस- 03
शिवसेना- 03
वंचित- 00
इतर- 00
*नागपूर; जिल्हा परिषद गट*
एकुण 16 जागा
राष्ट्रवादी- 02
भाजप- 03
काँग्रेस- 09
शिवसेना- 00
वंचित- 00
इतर- 02
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/coZVM7077jb
