LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
Lets Up News Updates
1. बंगळुरु - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या, त्या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या
2. नवी दिल्ली - बालविवाह म्हणजे मॅरेज नव्हे, तर मिराज आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बालविवाहावर चिंता व्यक्त केली
3. नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियामध्ये एका कंपनीने मटनाच्या जाहिरातीत गणपतीला दाखवले, येथील हिंदू समाजात नाराजीचे वातावरण
4. नवी दिल्ली - अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अब्दुल रशीद यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी गौतम गंभीरचा पुढाकार, शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार
5. नवी दिल्ली - भटिंडा येथील मोर मंडीत झालेल्या कार स्फोटात बलात्कारी बाबा रामरहीमचा हात असल्याची धक्कादायक माहिती उघड
6. मुंबई - राष्ट्रीय अथवा राज्य महामार्ग जाणाऱ्या महापालिका, नगर परिषदा व नगरपंचायतीच्या 500 मीटर हद्दीतील दारूविक्रीवरील बंदी राज्य सरकारने मागे घेतली
7. मुंबई - राज्यभरात काही ठिकाणी गणपती विसर्जन सोहळ्याला गालबोट, दिवसभरात झालेल्या अपघातांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
8. सातारा - कोयना धरण परिसरासह कोकण किनारपट्टीला भूकंपाचा सौम्य धक्का, या भूकंपाची क्षमता 3 रिश्टर स्केल नोंदविली गेली
9. औरंगाबाद - गणपती विसर्जनासाठी गेले असताना बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू
10. मुंबई - होंडाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘दी ग्रेट होंडा फेस्ट’ ही स्पेशल ऑफर आणली, 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत असणार ही ऑफर
11. मुंबई - ‘तु माझा सांगाती’ ही मराठी मालिका लवकरच 1000 भाग पूर्ण करत असून मालिकेचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार, भरत जाधव विठ्ठल साकारणार
12. मुंबई - भारताच्या पुढील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक निश्चित, भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्यात प्रथमच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची नावे प्रसिद्ध करण्यात आली, भारताचा राजनैतिक विजय
2. नवी दिल्ली - डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेपासून ते एसटीच्या तिकिटापर्यंत डिजिटल पेमेंट करण्याची सक्ती होण्याची शक्यता
3. नवी दिल्ली - बलात्कारप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा झालेल्या रामरहीमच्या डेरा मुख्यालयावर पोलिसांनी छापा मारला, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त
---------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horosep05
---------------------------------------------
4. नवी दिल्ली - महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण
5. नवी दिल्ली - ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र सरकारने दिले होते आव्हान
6. मुंबई - टीसीएलएल राज्यातील 15 हजार बेरोजगार युवकांना ‘प्रमोद महाजन कौशल्यविकास व उद्योजकता’ अभियानांतर्गत प्रशिक्षण देणार
7. मुंबई - शांतता क्षेत्रं निश्चित करेपर्यंत लाउड स्पीकर्सना बंदी घालता येणार नाही हा राज्य सरकारचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला
8. मुंबई - साईभक्तांसाठी केंद्र सरकारची खुशखबर, शिर्डीला जाण्यासाठी मुंबई, दिल्ली आणि हैदराबादहून दररोज सहा विमाने सुटणार
9. नागपूर - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 8 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर, सकाळी 9.30 वाजता नांदेड येथे विभागीय मेळावा, 1.30 वाजता परभणी येथे सभा
10. वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प डेफर्ड अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल योजना रद्द करण्याच्या तयारीत, 7000 भारतीय वंशाच्या नागरिकांवर टांगती तलवार
11. मुंबई - अनेक सिनेमांना कात्री लावून चर्चेत राहणारे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या ‘जुली-2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज
12. पुणे - महेश काळे दिग्दर्शित 'घुमा' चित्रपटाचा दुसरा टीजर रिलीज, चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. जम्मू-काश्मीर - सोपोरमध्ये सुरक्षादलाच्या गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 दहशतवादी ठार, कोम्बिंग ऑपरेशन चालूच
2. नवी दिल्ली - आयपीएल प्रक्षेपणासाठी स्टार इंडिया कंपनीची 16 हजार 347 कोटींची सर्वाधिक बोली, सोनी पिक्चर्सची मक्तेदारी मोडीत काढली
3. नवी दिल्ली - अरुण जेटली यांची मानहानी केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला
4. नवी दिल्ली - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी जाणार अमेरिकेच्या दौऱ्यावर , सिलिकॉन वॅली येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात होणार सहभागी
5. नवी दिल्ली - देशाच्या पहिल्या फुलटाईम संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केल्यानंतर त्या गुगल इंडियावर सर्वाधिक सर्च केल्या गेल्या
6. उत्तर प्रदेशा - फर्रुखाबाद येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने एका महिन्यात 49 चिमुरड्यांचा मृत्यू
7. मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली
8. सांगली - हिंदू आणि मुस्लिम समाजात दंगल झाल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक शरद रामचंद्र दिंडेला अटक
9. बीजिंग - ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचे आवाहन केले
10. बीजिंग - आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे - चीन राष्ट्राध्यक्ष
11. मुंबई - हायड्रोजन बॉम्बमुळे सोन्याच्या दरात वाढ, सोने 29 हजारावरून 30 हजाराच्या घरात
12. मुंबई - टेनिस स्टार मारिया शारापोव्हा अमेरिकन ओपन मधून बाहेर, अनास्तासिजा सेवास्तोवा हिने मारियाला पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला
13. मुंबई - फिल्मी पुरस्कार सोहळ्यात पक्षपात होत असतो, उद्या मला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला तरी स्वीकारायला जाणार नाही - कंगना राणावत
14. पुणे - ‘मुंबई-पूणे-मुंबई’ सिरीज चा तिसरा पार्ट लवकरच प्रेक्षाकांच्या भेटीला येणार, या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार
15. मुंबई - रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने कंबर कसली असून एअरटेल आता आठ रुपयांपासून सुरू होणारे टॅरिफ प्लॅन आणणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - भारत, बांगलादेश आणि नेपाळ या तीन देशांमध्ये आलेल्या पुरामुळे या तिन्ही देशांतील मिळून एकूण 1.60 कोटी मुले बाधित झाली - युनिसेफ
2. नवी दिल्ली - मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना, दहशतवाद मुद्दा गाजणार
3. नवी दिल्ली - बँक कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वरूपाची आणि जनहिताशी संबंधित नसलेली माहिती ही आरटीआयमध्ये येत नाही - सर्वोच्च न्यायालय
4. नवी दिल्ली - RBIने 200 रुपयांची नोट आठवडाभरापूर्वी चलनात आणली असली तरी ती एटीएमवर उपलब्ध व्हायला आणखी 3 महिने लागणार
5. मुंबई - IPLच्या विविध हक्कांवर पकड मिळविण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या आज होत असलेल्या लिलावात भाग घेणार
6. उत्तर प्रदेश - ‘ब्ल्यू व्हेल’ खेळाने मध्य प्रदेशमध्ये एका मुलाचा जीव घेतला, एका 17 वर्षीय मुलाने धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली
7. मुंबई - अवघ्या एक रुपयात रुग्णांना आरोग्यसेवा देणारा वन रुपी क्लिनिक हा प्रकल्प समाजकंटकांच्या त्रासाला वैतागून बंद करण्याचा निर्णय
8. मुंबई - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्याच्या विस्ताराकडे लक्ष लागले असून नारायण राणेंचा भाजप प्रवेश आणि मंत्रीपद एकाचवेळी होणार
9. लातूर - लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथे लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला
10. चीन - ब्रिक्स देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढा देण्यासाठी समग्र दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले
11. मुंबई - ट्विटर आणि फेसबुकप्रमाणे आता तुमचे अकाऊंट व्हॉट्सअॅपवरही व्हेरिफाईड करता येणार, लवकरच बिझनेससाठी भारतात नवीन अॅप
12. मुंबई - भारत-श्रीलंका यांच्यातील पाचव्या वन-डेत भारताने 6 विकेटने विजय मिळवत श्रीलंकेला व्हाइट वॉश दिला, बुमराह मॅन ऑफ द सीरीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. प्याँगयांग - उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, संपूर्ण जगात एकच खळबळ
2. सिंगापूर - भारतीय वंशाच्या जे. पिल्लई यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती
---------------------------------------------
‘या’ देशात संरक्षणमंत्रीपदी महिला, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/female-defence-minister
---------------------------------------------
3. नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने दिलेल्या इशाऱ्यानंतरही नोटबंदी करण्यात आली. त्यामुळे नोटबंदीची मोठी किंमत देशाला मोजावी लागली : रघुराम राजन, RBI माजी गव्हर्नर
4. पाटणा - भाजपसोबत हातमिळवणी करुन नितीशकुमार यांनी स्वतःचे नुकसानच केले : लालूप्रसाद यादव
5. मुंबई - एनडीएची हत्या झाली आहे; एनडीए फक्त बैठकीपुरतंच, शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया
6. मुंबई - लोकलची मागणी आणि त्याप्रमाणातील पुरवठ्यावर लोकलचे प्रवासभाडे बदलणार, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार
7. मालवण - किनारपट्टीवर दक्षिण दिशेकडुन वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प
8. एयरटेलचा नवीन प्लॅन; 399 रूपयांत 84 दिवसांसाठी 84 जीबी डाटा
9. सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची (तारा) प्राप्ती
10. कोलंबो - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा नवा विश्वविक्रम केला
11. मुंबई - बॅालिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा 'इजंट इट रोमॅंटिक' या हॉलिवूडपटात 'सिक्स पॅक अॅब्स'मध्ये दिसणार, यात ती योगगुरुची भूमिका साकारणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👉 केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; जाणून घ्या फेरबदल काय?
Lets Up Special Update
अखेर आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 13 जणांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मागील 3 वर्षांच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणाऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली तर, एकूण 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, त्याबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवक-कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे.
👉 कॅबिनेट मंत्रिपदी 4 जणांना बढती
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, ऊर्जामंत्री पियूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👉 9 नवे चेहरे
मंत्रिमंडळात नवीन 9 चेहऱ्यांचा समावेश केला आहे. यात 4 निवृत्त सनदी अधिकारी आहेत. पैकी 2 आयएएस, 1 आयपीएस, 1 आयएफएस अधिकारी राहिलेले आहेत.
👉 घटकपक्षांना स्थान नाही!
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या घटकपक्षांनाही सामावून घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. नव्या विस्तारात एकाही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.
👉 सीतारामन देशाच्या नव्या संरक्षणमंत्री
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला ठरणार आहेत. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या राजकारणात परतल्यापासून संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे होता. आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याला पुन्हा एकदा पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे.
👉 पीयूष गोयल नवे रेल्वे मंत्री
ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या खांद्यावर रेल्वे खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी राज्यमंत्री असलेल्या गोयल यांच्याकडं ऊर्जा व कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार होता. या खात्यात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. कोळखा खाणींच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणली. त्यांच्या कामावर पंतप्रधान मोदीही समाधानी होते. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना बढतीच्या रूपात रेल्वेची जबाबदारी देण्यात आली आहे.
👉 जाणून घ्या कोणाला कोणतं खातं?
कॅबिनेट मंत्री
1) धर्मेंद्र प्रधान : कौशल्य व उद्योजकता विकास, पेट्रोलियम मंत्रालय
2) पीयुष गोयल : रेल्वे मंत्रालय
3) नर्मला सीतारमन : संरक्षण मंत्री
4) मुख्तार अब्बास नकवी : अल्पसंख्याक मंत्रालय
5) सुरेश प्रभू : वाणिज्य मंत्रालय
6) स्मृती इराणी : माहिती आणि प्रसारण मंत्रालय, वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
7) नितीन गडकरी : जल संसाधन मंत्री
8) उमा भारती : पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय
राज्यमंत्री
1) शिव प्रताप शुकला (राज्यसभा खासदार, यूपी सरकारमध्ये 8 वर्षे मंत्रिपदाचा अनुभव)
खातं : अर्थ राज्यमंत्री.
2) अश्विनी कुमार चौबे (बिहारमधून 5 वेळा लोकसभा खासदार. बिहार सरकारमध्ये मंत्रिपदाचा अनुभव)
खातं : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय.
3) वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेशातून 6 वेळा लोकसभा खासदार. दलित समाजाचे नेते)
खातं : बालविकास मंत्रायल आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय.
4) अनंत कुमार हेगडे (खासदार - उत्तर कर्नाटक)
खातं : कौशल्य व उद्योजकता विकास
5) राजकुमार सिंह (खासदार - बिहार. माजी सनदी अधिकारी. गृहसचिवपदाचा अनुभव)
खातं : ऊर्जा आणि नूतनीकरण आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
6) हरदीप सिंह पुरी (1974 च्या बॅचचे माजी आयएफएस, सुरक्षा व परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक)
खातं : गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
7) गजेंद्र सिंह शेखावत (खासदार - राजस्थान)
खातं : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय.
8) सत्यपाल सिंह (खासदार - यूपी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त)
खातं : मनुष्यबळ व विकास मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय .
9) अल्फोंस कन्नननाथम (1979 च्या बॅचचे माजी आयपीएस अधिकारी)
खातं : पर्यटन मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार, नऊ नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता
2. नवी दिल्ली - जम्मू काश्मीर भागात जिहाद आणखी तीव्र करणार, जमात-उद-दावाचा म्होरक्या अब्दुल रहमान मक्की याने गरळ ओकली
3. नवी दिल्ली - लॉकी रॅन्समवेअरबद्दल सरकारने अलर्ट जारी केला, हा एक नवा मालवेअर असून तो कॉम्प्युटर लॉक करतो
4. नवी दिल्ली - एक टन वजन जास्त झाल्याने इस्रोच्या आयआरएनएसएस-1 एच या उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरल्याची माहिती समोर
5. नवी दिल्ली - अपुऱ्या सुविधा आणि विद्यार्थ्यांची अपुरी संख्या यामुळे देशातले 800 इंजिनीअरिंग कॉलेज बंद करण्यात येणार
6. बेंगळुरू - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने विद्यार्थिनींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
7. मुंबई - महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीसाठी चक्क महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या शेतकऱ्यांनीही अर्ज केल्याचे उघड
8. मुंबई - मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्याशी संपर्क साधलेला नसून आम्ही सत्तेचे भुकेले नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
9. पुणे - कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
10. वॉशिंग्टन - आर्थिक विषयातील सहकारी आणि भारत विषयाचे तज्ज्ञ केनेथ आय. जस्टर हे अमेरिकेचे भारतातील राजदूत असतील
11. मुंबई - हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाल्यानंतर मी हृतिकबरोबर लग्नही करणार होते, पण त्यावेळी त्याने झिडकारले, कंगना राणावतचा खुलासा
12. मुंबई - शिखर धवन आजचा शेवटचा एकदिवसीय आणि टी 20 सामना खेळणार नाही, आजारी आईला भेटण्यासाठी भारतात परतणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👉 बिल गेट्स यांचे 11 प्रेरणादायी नियम
Lets Up Inspire Katta
एकदा बिल गेट्स एका शाळेत गेले होते. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर 'आपल्या आयुष्यात येणार्या चांगल्या संधी' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना 11 नियम सांगितले आणि त्याचे महत्त्वदेखील पटवून दिले. कोणते आहेत ते प्रेरणादायी नियम त्याबद्दल जाणून घेऊयात...
1) आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या.
2) जग तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3) कॉलेजमधून बाहेर पडल्या-पडल्या 5 आकडी पगाराची अपेक्षा करू नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडेंट होत नाही. त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.
4) तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील. कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
5) तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका. झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
6) तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आत्ता वाटतात. तुमचेच संगोपन करण्यासाठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
7) उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार शाळेतच पहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खर्या जगात हरणार्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
8) आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नाही. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
9) सतत अभ्यास करणार्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की, तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.
10) टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सीरियल नसते. खर्या आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.
11) आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरे लगेच आपल्यासमोर उभी राहते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - येथील पंथाचौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला असून यामध्ये एक जवान शहीद झाला तर सहा पोलीस जखमी झाले
2. नवी दिल्ली - घरगुती वापरासाठीचा अनुदानित गॅस सिलिंडर सात रुपयांनी महाग, ही वाढ कालपासूनच लागू झाली
3. नवी दिल्ली - नदीजोड प्रकल्पाला 15 वर्षांनंतर अखेर हिरवा कंदील मिळाला असून काही महिन्यांतच देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा प्रकल्प सुरू होणार
---------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horosep02
---------------------------------------------
4. नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल रविवारी सकाळी दहा वाजता होणार असून नव्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो
5. मुंबई - वीज महामंडळाने सुमारे दोन लाख वीज ग्राहकांकडून नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या 800 कोटींच्या रकमा आता महावितरणला परत कराव्या लागणार
6. मुंबई - केंद्र सरकारतर्फे आदर्श राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, राज्यातील 25 शिक्षक तर मुंबईतील 2 शिक्षकांचा समावेश
7. मुंबई - राहुल गांधी राजकीयदृष्ट्या जिवंत असेपर्यंत भारतीय जनता पक्षदेखील राजकीयदृष्ट्या जिवंत राहील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे
8. पुणे - राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलबरोबर आता खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भवतींना मोफत सोनोग्राफी देण्याचा राज्याच्या आरोग्य खात्याचा निर्णय
9. पुणे - राज्यातील शंभरच्यावर पटसंख्या असणाऱ्या सहावी ते आठवीच्या शाळांमध्ये कला, क्रीडा विषयांसाठी यापुढे तासिका तत्वावर शिक्षकांची नियुक्ती होणार
10. मॉस्को - रशिया आता सहाव्या ‘पिढी’चे विमान आणणार, या विमानाचे उड्डाण करण्यासाठी पायलटची गरज भासणार नाही
11. मुंबई - सैफ अली खानच्या आगमी ‘शेफ’ चा ट्रेलर रिलीज, बाप-मुलाच्या नात्याची फोडणी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार
12. मुंबई - धोनी अजून निम्म क्रिकेटही खेळलेला नाही, तो निश्चितच 2019 चा विश्वचषक खेळणार - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - भारतातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंच्या गो पूजा राज्यातून लवकरच मुक्त करु : झाकीर मुसा, अल- कायदा काश्मीर प्रमुख
2. नवी दिल्ली - अनुदानित LPG सिलिंडर 8 रुपयांनी महाग, विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 74 रुपये वाढ, नवे दर लागू
3. नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी 3 सप्टेंबरला, शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद, नितीन गडकरींना रेल्वेमंत्रीपद दिली जाण्याची चर्चा
4. नवी दिल्ली - बहुचर्चित बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणी सुप्रीम कोर्टात ऑक्टोबरपासून सुनावणी, काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची चिन्हे
5. नवी दिल्ली - आता गायींच्या संरक्षणासाठी अभयारण्य बनवण्याचा केंद्र सरकारचा विचार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची माहिती
6. भारत आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश, भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण 69 टक्के; चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतापेक्षा कमी : फोर्ब्स
7. बाबा राम रहिमला पळवून नेण्याचा कट आखल्याप्रकरणी बाबाची मानलेली मुलगी हनीप्रितविरोधात लूक आऊट नोटीस, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
8. गोरखपूर - बीआरडी रुग्णालयात 31 ऑगस्टला 16 मुले दगावली, त्यापैकी एकाचा मृत्यू मेंदुज्वरामुळे, यावर्षी ऑगस्टपर्यंत 415 मृत्यू
9. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31892.23, निफ्टी : 9974.40, सोने भाव : 29,768 (प्रतितोळा), चांदी : 39,760 (प्रतिकिलो)
10. मुंबई - देशभरातील पोलिसांची खाकी वर्दी आता इतिहासजमा होणार, पोलिसांच्या गणवेशात लवकरच बदल करण्यात येणार
11. मुंबई - डॉ. दीपक अमरापूरकर मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आणि अन्य प्रतिवादींना बजावली नोटीस, 2 आठवड्यांच्या आत मागितले उत्तर
12. मुंबई - मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी 20 दिवसांत आरोपपत्र दाखल करणार, तपास अधिकाऱ्यांची हायकोर्टात माहिती
13. वेस्टर्न डिजीटल कंपनीने तब्बल 400 जीबी साठवण क्षमता असणारे सॅनडिस्क मायक्रो-एसडी कार्ड केले तयार
14. दुबई : इंग्लंडमध्ये 2019 मध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्डकपसाठी थेट निवड होण्याच्या श्रीलंका टीमच्या आशेवर पाणी, क्वालिफाय राऊंड खेळावा लागणार
15. मुंबई - प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘साहो’ चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री मंदिरा बेदीची निवड
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
लेट्स अप ब्रेकिंग न्यूज
👉 ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली!
मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे. रशियन पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
ही मुलगी नेमकी कोण आहे? याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची. जर टास्क पूर्ण केला नाही, तर गेम खेळणाऱ्याला त्याच्या परिवाराची हत्या करण्याची धमकी देत असे, असा आरोप तिच्यावर आहे.
---------------------------------------------
‘ब्ल्यू व्हेल’ गेम काय आहे? मास्टरमाईंड सापडली!, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/bluewhalemastermind
---------------------------------------------
👉 तीन वर्षांची शिक्षा!
पोलिसांनी आरोपी तरुणीला तिच्या घरातून अटक केली. आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तिने आपला गुन्हा कबूल केल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी मुलीला न्यायालयात हजर केलं असता, तिला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
रशियाच्या गृह मंत्रालयानुसार, ही मुलगी पीडित मुलाला 50 टक्के टास्क देते, ज्याचा उद्देश मुलांना मानसिक त्रास देण्याचा असायचा आणि खेळाच्या शेवटच्या टास्कमध्ये त्यांना आत्महत्या करायला लावण्याचा असायचा. ही मुलगी ‘डेथ ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटर’ अशीच ओळखली जात आहे, असे रशियाच्या चौकशी यंत्रणेने म्हटले आहे. तिने स्वत: ब्लू व्हेल चॅलेंज खेळण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं पण ती आव्हान पूर्ण करू शकली नाही म्हणून ती खेळाची अॅडमिन बनली. मग ती ग्रुपवरील कित्येक डझन सदस्यांना ही मुलगी बहुतेक वेळा जीव जाण्याचीच शक्यता असलेली आव्हाने पाठवायची, अशी माहिती समोर आली आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीहरीकोटा - नेव्हिगेशन सॅटेलाइट 'आयआरएनएसएस-1एच'चे प्रक्षेपण अयशस्वी, इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी दिली माहिती
2. नवी दिल्ली - चूलमुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत अवघ्या दीड वर्षातच 2 कोटी 70 लाख स्वयंपाक गॅस जोड वितरित करण्यात आले
3. नवी दिल्ली - एप्रिल-जून 2017 या काळात देशाच्या विकास दरात 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली, गेल्या वर्षी याच काळात देशाचा विकास दर 7.9 टक्के एवढा होता
---------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horosep1
---------------------------------------------
4. नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना पुन्हा वेग आला असून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह दहा मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले
5. नवी दिल्ली - माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकपदी तर सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती
6. नवी दिल्ली - देशातील एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या सुमारे 14 हजार मालमत्तांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून
7. मुंबई - भेंडीबाजार परिसरातील हुसैनी ही पाच मजली इमारत कोसळली, या दुर्घटनेत 24 रहिवाशांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी
8. ठाणे - 100 रुपयात नावनोंदणी करून मोफत वायफाय सेवेचा लाभ ठाणेकरांना लवकरच मिळणार, ठाणे महापालिका या योजनेवर काम करत आहे
9. पुणे - राज्यात 'स्वाइन फ्लू'चा संसर्ग वाढत असला तरी भीती बाळगण्याऐवजी नागरिकांनी काळजी घेण्याचे राज्याच्या आरोग्य खात्याचे आवाहन
10. नवी दिल्ली - रद्द करण्यात आलेल्या 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही नवी खिडकी उघडणार नाही - अर्थ मंत्रालय
11. मुंबई - आसाम मधील नागरिकांच्या मदतीला अभिनेता आमिर खान धावला, येथील पुरग्रस्तांसाठी आमिरने 25 लाख रुपयांची मदत केली
12. कोलंबो - भारताने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेतही दणदणीत विजय मिळवला, श्रीलंकेवर 168 धावांनी मात करुन मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - अखेर पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने 3 महिन्यांनी वाढवली
2. तूम्ही इंस्टाग्राम वापरता का? होय. तर लेट्सअपच्या निवडक पोस्ट आता मिळवा इंस्टाग्रामवर. फॉलो करण्यासाठी क्लिक करा instagram.com/letsup.in
3. नवी दिल्ली - देशातील बँकांचे कर्ज थकवणाऱ्या खासगी कंपन्यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा इशारा, कर्ज फेडा किंवा कंपनी विका असे त्यांनी म्हटले
---------------------------------------------
नोटा छपाईचा खर्च वाढला!, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/currencyprintingcost
---------------------------------------------
4. नवी दिल्ली - दहशतवादाला कोणता धर्म नसतो, एखाद्या भाषेला विशिष्ट धर्माची भाषा म्हणून जोडणे चुकीचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
5. नवी दिल्ली - बाबा राम रहिमच्या संपत्तीचा अहवाल तयार, बाबाकडे 18 जिल्ह्यांमध्ये 1093 एकर जमीन, या जमिनीची एकूण किंमत 1151 कोटी रूपये
6. नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील 20 वर्षीय महिलेला 24 आठवड्याचा गर्भपात करण्याची दिली परवानगी
7. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो हत्या प्रकरणात परवेझ मुशर्रफ फरार घोषित, तर दोघे दोषी आणि 5 निर्दोष; पाकिस्तानी कोर्टाचा निकाल
8. वॉशिंग्टन - दहशतवादी संघटनांवर कारवाई केलीत तरच मिळेल 255 दशलक्ष डॉलर्सची मदत, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
9. इस्लामाबाद - दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान कधीच भारताला मदत करणार नाही : परवेझ मुशर्रफ, माजी राष्ट्राध्यक्ष पाक
10. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31730.49, निफ्टी : 9917.90, सोने भाव : 29,471 (प्रतितोळा), चांदी : 39,550 (प्रतिकिलो)
11. मुंबई - भेंडीबाजारमधील चार मजली इमारत कोसळली, सुमारे 16 जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
12. मुंबई विद्यापीठाची नवी डेडलाईन 6 सप्टेंबर, रखडलेले सर्व निकाल पूर्ण करणार; विद्यापीठाची हायकोर्टात कबुली
13. बीएसएनएलने देशभरातील व्यावसायिकांसाठी जीएसटी सेवा पोर्टल (http://bsnlgst.mastersindia.co) केले सुरू, यात अगदी प्राथमिक पातळीपासून ते जीएसटी करयुक्त बिलींगची सुविधा उपलब्ध
14. मुंबई - अभिनेता प्रभासच्या आगामी चित्रपट ‘साहो’मध्ये मराठमोळे अभिनेते महेश मांजरेकरही झळकणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👉 पॅन कार्ड 'आधार'शी लिंक करण्याची शेवटची संधी!
Lets Up Current Affair
पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सरकारने यासाठी 31 ऑगस्टची अंतिम मुदत दिल्याने यापुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे.
लिंक नाही केले तर काय होईल?
1) जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते.
2) रद्द झालेल्या पॅन कार्ड नंबरने तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला, तर तोही मान्य होणार नाही.
3) तुम्हाला अनेक आर्थिक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. तसेच पॅनकार्ड रद्द झाल्यास तुम्हाला पुन्हा नव्याने पॅनकार्ड काढावे लागेल.
4) तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. कंपन्या करमर्यादेवर असलेल्या पगारावरील टीडीएस कापून घेतात. मात्र तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास कंपनीला तसे करता येणार नाही.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
लिंक केले तर काय होईल?
1) तर तुम्हाला नवीन बँक खाते सहज उघडता येईल. तुम्हाला ITR भरतानाही कोणती अडचण येणार नाही.
2) तुम्ही जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डीमॅट अकाऊंट ओपन करणे सोपे जाईल.
3) नवीन डेबिट अथवा क्रेडिट कार्ड घेणेही सोयीचे ठरणार आहे.
आधार नसेल तर काळजी करू नका!
ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही, त्यांचे पॅनकार्ड रद्द करु नये, असे आदेश नुकतेच सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला दिले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार नाही त्यांना काहीसा दिलासा आहे.
आधार कार्ड पॅनसोबत लिंक करायचंय?
1) एसएमएस पद्धत :
UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.
2) ऑनलाईन पद्धत :
i) आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल.
ii) त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेले नाव टाकावे लागेल.
iiI) यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर लगेच तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड (OTP) येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
👉 ओबीसी आरक्षण ; 'या' मुलांना लाभ मिळणार नाही!
केंद्र सरकारने आरक्षणासाठी क्रिमी लेअरच्या कक्षेत सार्वजनिक उपक्रम (पीएसयू), विमा कंपन्या व सरकारी बँकांचाही समावेश केला आहे. त्यामुळे आता या संस्थांमधील अधिकारी व त्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. या संस्थांमध्ये काम करत असलेल्या कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा, या हेतूने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ‘ग्रुप ए’ व ‘ग्रुप बी’च्या पदांसाठी लावलेले निकष पीएसयू, बँका आणि वित्तीय संस्थांत समान पदांवर लागू होतील. दोन्ही ग्रुपचे कर्मचारी क्रिमी लेअरमध्ये येतात. नव्या पद्धतीनुसार पीएसयू व बँकांतील ‘ग्रुप ए’ व ‘ग्रुप बी’च्या समकक्ष पदेही क्रिमी लेअरच्या कक्षेत येतील. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांच्या मुलांना आता आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील अ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ दिला जात नाही. मात्र 24 वर्षांनंतरही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत अ श्रेणी समान दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. ज्यामुळे गरज नसतानाही या अधिकाऱ्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत होता.
देशात जवळपास 300 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. ज्यामध्ये एनटीपीसी, ओएनजीसी, सेल (SAIL), भेल (BHEL), ओआयसी(OIC) आणि कोल इंडिया (COAL INDIA) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. तर सरकारी आर्थिक संस्थांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक यांचा समावेश आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची आज (दि. 31 ऑगस्ट) शेवटची मुदत
2. तूम्ही टेलिग्राम वापरता का? होय. तर लेट्सअपच्या निवडक पोस्ट आता मिळवा टेलिग्राम चॅनलवर. जॉईन करण्यासाठी क्लिक करा t.me/letsup
3. नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी केली जाहीर, बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे 99 टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा
4. नवी दिल्ली - चलनातून रद्द केलेल्या 99 टक्के नोटा बदलण्यात आल्या; नोटाबंदी ही काळा पैसा पांढरा करण्यासाठी केली होती का?; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
--------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horo31Aug
---------------------------------------------
5. नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाला विमाने पुरविण्याची मोठी ऑर्डर दिल्यास एफ-16 जातीची लढाऊ विमाने भारतात बनवून निर्यात करण्याचा अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टिनचा प्रस्ताव
6. नवी दिल्ली - एअर इंडिया हीं सरकारी विमान कंपनी खासगी क्षेत्राला विकण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल : अर्थमंत्री अरूण जेटली
7. नवी दिल्ली - प्रियांका गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज, डेंग्यू झाल्याने रुग्णालयात केलं होतं दाखल
8. बीजिंग - दोन महाशक्तींमध्ये मतभेद होणे सामान्य बाब आहे. आशिया खंडातील दोन मोठे देश भारत आणि चीन हे एकमेकांना सहकार्य करु शकतात : चीन
9. ह्युस्टन - अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ, हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात 30 जणांचा मृत्यू, हजारो लोक बेघर
10. गोरखपूर (उत्तर प्रदेश) - बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात आॅगस्ट महिन्यात एकूण 296 बालकांचा मृत्यू, महाविद्यालयाचे प्राचार्य पी.के. सिंह यांची माहिती
11. मुंबई - मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसाने 300 कोटी रुपयांचे नुकसान; व्यापारी संघटना, पावसात 19 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी
12. मुंबई - आरोप करणा-यांना बांधील नाही, कालच्या घटनेचे राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही : उद्धव ठाकरे
13. पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर, खा. राजू शेट्टी यांची कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा
14. फेसबुक मॅसेंजरच्या लाईट आवृत्तीचे तब्बल 5 कोटी डाऊनलोड, अधिकृतपणे माहिती जाहीर
15. कोलंबो - भारतविरुद्ध श्रीलंकेत आज चौथा वनडे सामना, हा धोनीचा 300 वा सामना आहे
16. कराची - स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तानी फलंदाज शरजील खानवर पीसीबीने 5 वर्षांची घातली बंदी
17. मुंबई - झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना..' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, त्याजागी 'तुझं-माझं ब्रेकअप' ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
