ch
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7
无数据30
帖子存档
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती LetsUpp | Trending 💉 लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कें
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती LetsUpp | Trending 💉 लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. 💁‍♂️ ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस भारतात येईल, अशी माहिती त्यांनी भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत दिली आहे. 🗣️ “सरकार पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचे लसीकरण सुरु करणार आहे. तसेच भारत जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश होत आहे. 👍 अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात येत असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. 📍 सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची २ वर्षांवरील मुलांवर चाचणी सुरु आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात असून त्याबाबत निकाल पुढच्या महिन्यात येणार आहे. To know more click here https://letsup.app.link/Yyls0O7peib

भारतीय संघाला मोठा धक्का! संघातील 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह Letsupp | Trending ● भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ
भारतीय संघाला मोठा धक्का! संघातील 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह Letsupp | Trending ● भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून सध्या टी२० मालिका सुरु आहे. यामालिकेतील दुसरा सामना आज (२७ जुलै) होणार होता. मात्र आता हा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ● भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दुसरा टी२० सामना स्थिगत करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. ● त्यामुळे आता अन्य सर्व खळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यास श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना बुधवारी (२८ जुलै) होईल. अशी माहिती समोर आली आहे. To know more click here https://letsup.app.link/o4gzcX5peib

आसाम मिझोराम सीमेवरील चकमकीत पुण्याचे वैभव निंबाळकर जखमी, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे आहेत भाऊ LetsUpp | Trending ⚡ ईशान्येक
आसाम मिझोराम सीमेवरील चकमकीत पुण्याचे वैभव निंबाळकर जखमी, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे आहेत भाऊ LetsUpp | Trending ⚡ ईशान्येकडील आसाम आणि मिझोरम या राज्यांमधील सीमासंघर्ष अधिकच चिघळला आहे. आसामच्या सीमेवरील कचार जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत आसाम पोलीस दलातील सहा पोलीस हुतात्मा झाले आहेत. 👮🏻 यामध्ये अनेक पोलीस शिपाई आणि मूळचे महाराष्ट्रातील असलेले अधिकारी वैभव निंबाळकर हेदेखील यामध्ये जखमी झाले आहेत. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. वैभव निंबाळकर हे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ आहेत. 💁‍♀️ उर्मिलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वैभव निंबाळकर यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. माझा भाऊ, आयपीएस वैभव निंबाळकर कर्तव्यावर गोळीबार आणि दगडफेकीत जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती स्थीर असून तो सध्या आयसीयूत आहे. 👨🏻‍⚕️ निंबाळकर यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती उर्मिलानं तिच्या पोस्टमधून दिली आहे. तसंच विचारपूस केल्याबद्दल हितचिंतकांचे तिने आभारही मानले आहेत. To know more click here https://letsup.app.link/F6BsTbgoeib

photo content

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी निकालासंदर्भातील महत्त्वाची बातमी Letsupp | Trending ● राज्य माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर आता सीबीएसईतर्फे दहावी आणि बारावीचा निकाल टॅब्युलेशन पॉलिसीनुसार तयार करण्यात आला आहे. आता बोर्डातर्फे लवकरच कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. ● डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टीकलच्या परीक्षांवेळी देण्यात आलेल्या रोल नंबरच्या माध्यमातून हे निकाल पाहता येऊ शकतात. तसेच डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे. ● बोर्डातर्फे शाळांना २२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणांचा रेकॉर्ड भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ही तारीख वाढवून २५ जुलै करण्यात आली. कोणत्याही शाळेने फॉर्मुलेशननुसार गुण अपलोड केले नसतील तर त्यांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली. ● बोर्डातर्फे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली. शाळांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास ते हेल्प डेस्कच्या मदतीने गुण अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील यासाठी हेल्प डेस्क सुरु करण्यात आला. To know more click here https://letsup.app.link/M8NlzNoieib

राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती LetsUpp | Trending 🌧️ राज्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ
राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती LetsUpp | Trending 🌧️ राज्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. 🚨 तर आगामी काही दिवस राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. 📍रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 🗓️ हवामान विभागाने 30 जुलैपर्यंतची पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात पालघर, ठाणे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 🟠 तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. To know more click here https://letsup.app.link/r4tgbeQYdib

भारतीय हॉकी संघाने स्पेनला 3-0 ने हरवले LetsUpp | Sports 🏑 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा 3-0 ने परा
भारतीय हॉकी संघाने स्पेनला 3-0 ने हरवले LetsUpp | Sports 🏑 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा 3-0 ने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. 🤩 सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला आहे. 🇮🇳 या दणदणीत विजयामुळे भारत संघ अ गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 💁🏻‍♂️ भारताकडून रुपिंदर पाल सिंगने 2 गोल केले तर सिमरनजीतने एक गोल वसूल केला. 👍 दरम्यान रुपिंदर पाल सिंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 3 गोल पूर्ण केले आहेत. To know more click here https://letsup.app.link/TDJShDcTdib

विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने केले दिवाळखोर घोषित LetsUpp | Trending ⚡ देशाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याला
विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने केले दिवाळखोर घोषित LetsUpp | Trending ⚡ देशाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर म्हणून घोषित केले. 💰 कोर्टाच्या या निकालामुळे आता त्याची संपत्ती जप्त करण्याचेही मार्ग खुले झाले आहेत. ✈️ विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावं, अशी मागणी बँकांच्या संघटनेने कोर्टात याचिकेतून केली होती. 🏛️ भारतीय बँकांच्या या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. लंडनच्या हायकोर्टाने आपला निर्णय देत विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं. 📍लंडनच्या उच्च न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी देखील या निर्णयाविरोधात मल्ल्या एक अपील करू शकतो. To know more click here https://letsup.app.link/RyCsdDeRdib

photo content

खासदार डॉ.सुजय विखे यांना दणका; वीजबिल न भरल्याने 'या' कारखान्याचा वीज पुरवठा खंडित LetsUpp | Trending ⚡ भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे. 💡 अनेकदा नोटिसा पाठवूनही कारखान्याने थकीत वीजबिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कारखान्याचा परिसर आणि कामगार वसाहत अंधारात बुडाली आहे. 👉 राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना अनेक कारणांनी चर्चेत आहे. या कारखान्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता असून कारखाना आर्थिक अडचणीत आहे. 📝 लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी यामध्ये लक्ष घालून काही काळ कारखाना चालविला. मात्र, अडथळे येत गेले. कामगारांची देणीही थकली होती. तसेच वीजबिलही थकले. यासंबंधी कंपनीने अनेकदा नोटिसा पाठविल्या. 📍 मात्र, कारखान्याने कोट्यवधी रुपयांची ही थकबाकी भरली नाही. सध्या वीज कंपनीने थकबाकी वसुलीची मोहीम कडक केली आहे. त्यामुळे या कारखान्याचीही वीज तोडण्यात आली आहे. To know more click here https://letsup.app.link/OyK76niMdib

🤺 पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये तलवार गाजवणाऱ्या भवानी देवीनं रचला इतिहास LetsUpp | Trending 👑 भारताची तलवारबाज भवानी देवीनं सोमवारी नव्या इतिहासाची नोंद केली. ती ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय बनली आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाला जमली नाही, अशी कामगिरी भवानीनं केली. राष्ट्रीय चॅम्पियन भवानीला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यात अपयश आले, मात्र तिने अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. 🤺 भवानी देवीनं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात 15-3 अशा फरकानं विजय मिळवला. आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता. 🏆 भवानीनं सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज 8-0 अशा फरकानं जिंकला. 27 वर्षीय भवानी देवीनं दुसऱ्या राउंडमध्येही ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. भवानी देवीनं अवघ्या सहा मिनिटांत हा सामना आपल्या खिशात घातला. 📍 भवानी देवीचा दुसरा सामना महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात मात्र भवानी देवीला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे सीए भवानी देवीचं आव्हान संपुष्टात आलं. 🎖️आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपमध्ये भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. भवानी देवीनं 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये तिनं कांस्यपदक जिंकलं होतं. To know more click here https://letsup.app.link/QXB7nyKCcib

झारखंड सरकार पाडण्याच्या कटाचे महाराष्ट्र कनेक्शन? LetsUpp | Trending 🧨 झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या कटात अटक झालेल्या आरोपींनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. चौकशी दरम्यान आरोपींनी झारखंडचे तीन आमदार, दोन पत्रकार आणि मध्यस्थ या कटात सामील असल्याचे सांगितले आहे. दिल्लीत तीन आमदारांशी व्यवहार करार झाला होता. 💰 एक कोटी आगाऊ रक्कम देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते, पण ते दिले नाही तर आमदार रांचीला परतले. या करारात महाराष्ट्रातील दोन नेते सहभागी होते. 🗒️ अटक केलेले अभिषेक, अमित आणि निवरण यांनी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांची नावे तेथील आमदारांच्या यादीत नाहीत. 🛫 अभिषेकने पोलिसांना सांगितले की, या प्रकरणात अमितने 15 जुलै रोजी इंडिगोचे तिकीट पाठवले होते. महाराष्ट्रातील एका नेत्याने ते बुक करून अमित सिंग यांना पाठवले. ✈️ अभिषेकने सांगितले आहे की 15 जुलैला जेव्हा तो दिल्लीला आला तेव्हा विमानतळावर तेथे दोन एसयूव्ही होते. एक ते तीन स्थानिक आमदार हॉटेलमध्ये होते. 🚗 महाराष्ट्रातील नेत्याचे पहारेकरी अभिषेक दुबे अन्य तिघांना हॉटेलमध्ये घेऊन गेले. येथे महाराष्ट्रातील नेते आणि चरणसिंग येथे पोहोचले. त्यांनी येथून तीन स्थानिक आमदारांना गाडीत नेले, तर काहीजण दुसर्‍या कारमधील अनेक बड्या नेत्यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे पंधरा मिनिटे येथे बैठक घेतल्यानंतर झारखंड राज्यातील तीन आमदार झारखंड भवनमध्ये परतले. 💸 अभिषेकने सांगितले आहे की 16 जुलै रोजीही तीन स्थानिक आमदारांनी दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेतली. त्याला एक कोटी आगाऊ रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अ‍ॅडव्हान्स न मिळाल्यामुळे तो रागावला आणि त्याच दिवशी दुपारी अडीचच्या विमानाने रांचीला परतला. 🔗 अटक केलेल्या आरोपींच्या म्हणण्यानुसार, दिल्लीहून परत आल्यानंतरही महाराष्ट्रातील एक नेते हे आमदार आणि त्यांच्याशी सतत संपर्कात होते. 21 जुलै रोजी महाराष्ट्रातील एक नेता मोहित भारतीयाला घेऊन आला. यानंतर हॉटेल ली लैकमधून अनेक स्थानिक आमदारांशी संपर्क साधला. 📌 महाराष्ट्रातील एक नेता, मोहित व्यतिरिक्त वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आशुतोष ठक्कर आणि अमित कुमार यादव नावाच्या व्यक्ती होत्या. हॉटेल रूम 407, 307, 310, 611 बुक केले. रांचीमध्ये कुंदन सिंह आणि संतोष कुमार या दोन पत्रकारांना दोन वेगवेगळ्या आमदारांच्या संपर्कांबद्दल माहिती मिळाली आहे. सभागृहात मतदान करून सरकार पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचे अभिषेक यांनी मान्य केले आहे. 📍 अटक केलेल्या आरोपींसह आमदारांचे चित्र रविवारी व्हायरल होत राहिले. एकामध्ये कॉंग्रेसचे आमदार विकल कोंगडी हे आरोपी अमित सिंग यांच्यासमवेत आहेत. तथापि, विक्सलने अमितचा कुठलाही परिचय नाकारला आणि असा दावा केला की त्यांनाही मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्षांना ही माहिती दिली. To know more click here https://letsup.app.link/eIvcBekvcib

...तर अशी आहे 'कारगिल विजया'ची कहाणी! LetsUpp | Special 26 जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. म्हणूनच भारतीय सैन्यासाठी शौर्याचा हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची वीर कहाणी आज जाणून घेऊयात... ● भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिलचे युद्ध 1999 मध्ये झाले होते. ● या युद्धाची सुरुवात 8 मे 1999 रोजी पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसले आणि झाली होती. ● कारगिलमध्ये घुसखोर घुसल्याची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली. जे कारगिलमधील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते. ● सर्वात प्रथम 3 मे रोजीच भारतीय सैनिकांना पहाराकरत असताना आढळले की, काही लोकं तेथे हालचाल करत असल्याचे दिसले. प्रथमच द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले गेले. ● पुढे भारतीय सैन्याने 9 जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या 2 चौकीचा तर 13 जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला. आपल्या सैन्याने 29 जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या 5060 आणि 5100 आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोवला. ● तब्बल 11 तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्सवर भारतीय सैन्याने ताबा घेतला, मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतले. ● 1999 मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून 2,50,000 गोळे आणि रॉकेट डागले गेले. 300 पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्सने दररोज सुमारे 5,000 बॉम्ब डागण्यात आले होते. ●बरोबर 26 जुलै 1999 या दिवशी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेले 'ऑपरेशन विजय' यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले होते. ● या युद्धात मीराजसाठी अवघ्या 12 दिवसात लेजर गाईडेड बॉम्ब प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली. ● भारतीय वायू सेनेने पाकिस्त विरोधात मिग-27 आणि मिग-29 विमान वापरले होते. ● या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता. तर सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले होते. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/gYei4zX7bib

'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या LetsUpp l Bulletin ● राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी. तर मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला ● रत्नागिरीतील तिवरे भागात भूस्खलन, चार गावांचा चिपळूणशी संपर्क तुटला; रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक दरड कोसळल्याच्या घटना ● तळीयेत 82 जणांचा मृत्यू, 32 जणांचा अखेरपर्यंत शोध नाही, ग्रामस्थांच्या मागणीनंतर शोधमोहीम थांबवली --------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५ ---------------------- ● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी; महापुराने बाधित झालेल्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील ● धक्कादायक घटना; जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद ● संकटकाळात राष्ट्रवादीकडून मदतीचा हात, नुकसानग्रस्त गावांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह 9 ट्रक रवाना ● देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे, द्रासमध्ये राष्ट्रपती शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार ● मुलांसाठी मोबाइलचा अर्थ सोशल मीडिया: संशोधनात दावा - 59% मुले स्मार्टफोनचा वापर मॅसेजिंगसाठी करतात, केवळ 10% अभ्यासासाठी करतात वापर ● टोकियो ऑलिम्पिक : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून 1-7 नं दारुण पराभव ● पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 38 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी; सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार विजयाचे शिल्पकार To know more click here https://letsup.app.link/8a5BALa6bib

खुशखबर! PF मधून एका तासात काढता येतील 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे LetsUpp | Trending 💁‍♂️ EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अकाऊंटमधून पैसे काढू शकतील. कोरोनाच्या संकट काळात लोकांना पैशांची गरज आहे. 👉 अशातच EPFO ने आपल्या खातेधारकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही आपल्या PF मधून 1 लाख रुपये आगाऊ काढू शकता. मेडिकल खर्चसाठी मिळतील पैसे 📌कोरोना काळात जर तुम्हाला मेडिकल खर्चासाठी अचानक पैशांची गरज पडली तर, तुम्ही या सेवेचा फायदा घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला खर्च दाखवावा लागेल. 1 लाख रुपयांपर्यंतचा मेडिकल अ‍ॅडव्हान्स 📌 EPFO ने एक सर्कुलर जारी केले आहे. कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत मेडिकल एडवांस काढण्याची परवानगी असणार आहे. कोरोना विषाणू किंवा अन्य आजारपणामुळे रुग्णालयात दाखल कारवे लागल्यास PF चा पैसा काढता येतो. 👍 पूर्ण प्रक्रिया वाचा 👉 पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्ही सर्वात आधी www.epfindia.in वेबसाईटच्या होमपेजला भेट द्या 👉 आता COVID टॅब अंतर्गत वर डावीकडे ऑनलाईन अ‍ॅडव्हान्स क्लेमवर क्लिक करा. 👉आता आपल्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक नमूद करा. आणि कन्फर्म करा 👉 यानंतर प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा. 👉 आता ड्रॉप डाऊनवरून PF Advance क्लिक करा. (Form 31) 👉 यानंतर तुम्ही तुमच्या कारणाची निवड करा 👉 आता तुम्हाला जेवढी रक्कम काढायची असेल ते नमूद करा. आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि आपला पत्ता नमूद करा 👉 यानंतर Get Aadhar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाइलवर आलेला OTP नमूद करा. 👉 आता आपला क्लेम फाइल होईल To know more click here https://letsup.app.link/iG7YKCkTaib