LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
🌧 यंदा चांगला पाऊस पडणार!
Letsup I Update
भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल.
यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असे स्कायमेटने नमूद केले आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ भाजपची ऑफर स्वीकरणार नाही : संजय राऊत
Letsup I Update
सत्तेत असूनही सातत्याने नाराज असलेल्या शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपच्या गोटातून सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापतीपदाची ऑफर देण्याची तयारी भाजपमधून सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मात्र, अशी ऑफर स्वीकारणार नसल्याचे स्पष्टीकरण एका न्यूज चॅनेल्सशी बोलताना दिले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 UNची दहशतवाद्यांची यादी जाहीर
Letsup I Update
अमेरिकेनंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची यादी जारी केली आहे. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदसह 139 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे.
यादीत पहिले नाव लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी अयमान अल-जवाहिरीचे आहे. जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ वास्तव्यास आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. तसेच जवाहिरीच्या साथीदारांची नावंही या यादीत आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🌧 सावधान; राज्यात गारपीट होण्याची शक्यता
Letsup I Update
राज्यात येत्या शुक्रवार व शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने याठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान याच काळात जालना, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही गारपीट होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी
🔅 नवी दिल्ली - इराकमध्ये मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर
🔅 नवी दिल्ली - अॅमेझॉनने कर्मचारी संख्येत कपात केली असून आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले
🔅 नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला असून यामागे भाजपाचे षडयंत्र असल्याचा काँग्रेसने आरोप केला
🔅 नवी दिल्ली - मोबाईल क्षेत्रात आघाडीची रिलायन्स जिओ कंपनी आता पेमेंट बँकिंग क्षेत्रात उतरली, कालपासून पेमेंट बँक सुरू
🔅 मध्य प्रदेश - नर्मदा नदीसाठी जनजागृती समिती स्थापन करून यात पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला
🔅 मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासंबंधी विचार सुरू असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले
🔅 मुंबई - महाराष्ट्रात रस्ते बांधणी आणि डांबरीकरणात 23 हजार कोटींचा रस्ते घोटाळा, एका बड्या कॉन्ट्रॅक्टरचा आरोप
🔅 पुणे - बालभारतीच्या राज्यातील सर्व भांडारांमधून राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या पुस्तकांचे वितरण सुरू
🔅 पुणे - देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी जाहीर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात नववे स्थान पटकावले
🔅 मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' येत्या 25 मे रोजी प्रदर्शित होणार
🔅 दक्षिण आफ्रिका - जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेचा मोठा विजय, ऑस्ट्रेलियावर तब्बल 492 धावांनी मात
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 अॅट्रॉसिटीबाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला कायम!
Letsup I Update
सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाच्या बाबतीत सरकारकडून पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी केली. कोर्टाने अॅट्रॉसिटीमध्ये बदलाच्या बाबतीत दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. सर्व पक्षकारांनी तीन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून,10 दिवसांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत केला नसून, अटक आणि सीआरपीसीच्या तरतुदीमध्ये सुधारणा केली आहे. निर्दोष लोकांच्या मुलभूत अधिकारांचा संरक्षण व्हावे आणि त्यांना त्रास होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे. तसेच, अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 फेक न्यूज बाबतचा निर्णय अखेर रद्द
Letsup I Update
'फेक न्यूज' संदर्भात काढण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक मागे घेण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. 'प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया'च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
👉 काय निर्णय होता?
पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा फेक न्यूज दिल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द!
Letsup I Update
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे फेक न्यूजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मात्र आता फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता कायमस्वरुपी रद्द होणार आहे. फेक बातम्यांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी अधिस्वीकृतीच रद्द करण्यात येणार आहे. मात्र 'फेक न्यूज'ची नेमकी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी कायद्याच्या बदलांविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, 6 मृत्यूमुखी तर अनेक ठिकाणी जाळपोळ
🔅 नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली
🔅 पणजी - प्रेमातून शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, गोवा खंडपीठाचा निकाल
🔅 मुंबई - राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीला प्लास्टिक उत्पादक आणि विक्रेता संघटनांकडून आव्हान
🔅 मुंबई - 'महामित्र’ अॅपवरुन डेटा चोरी होत असल्याचा आरोप झाल्याने राज्य सरकारने अॅप गुगल स्टोअरवरुन काढले
🔅 मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा वेतननिश्चितीचा करार 1 मे पूर्वी करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा
🔅 मुंबई - अनाथ, निराधारांना शिक्षण आणि शासकीय नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा शासन निर्णय
🔅 पुणे - ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन, पूना हॉस्पिटलमध्ये वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
🔅 मुंबई - तीन दिवसांमध्ये एकूण 73.10 कोटी रुपयांची कमाई करत 'बागी 2' ने अनेक विक्रम मोडीत काढले
🔅 नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्सच्या संघात स्टीव्ह स्मिथच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिच क्लासेनचा समावेश
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🎯 Letsup I General Knowledge
1) मानवी शरीरात नव्यानेच आढळून आलेला ‘इटाकोनेट’ रेणू कशापासून मिळतो?
उत्तर : ग्लुकोज
2) कोणत्या टेनिस खेळाडूने ‘मियामी ओपन’ 2018 स्पर्धा जिंकली?
उत्तर : स्लोएन स्टीफन्स
3) ललित कला अकादमीचे अस्थायी अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : एम.एल. श्रीवास्तव
4) कोणत्या भारतीय शहरात प्रथमच युरो-6 ग्रेड पेट्रोल आणि डिझेल सादर करण्यात आले आहे?
उत्तर : दिल्ली
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📱 मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानी
Letsup I Update
मोबाईल हँडसेटचे उत्पादन करण्याच्या बाबतीत भारताने व्हिएतनामला मागे टाकले असून जगात दुसरे स्थान मिळविले आहे. चीननंतर आता भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे.
इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आईसीए) माहिती प्रसारणमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे ही माहिती सादर केली आहे. आकडेवारीनुसार, देशातील मोबाईल फोनचे वार्षिक उत्पादन 2014मध्ये 30 लाख एवढे होते, तर ते 2017 मध्ये वाढून 1.1 कोटी एवढे झाले आहे.
भारतात मोबाईल फोनची आयातही 2017-18 मध्ये कमी होऊन अर्ध्यावर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फास्ट ट्रॅक टास्क फोर्सने (एफटीटीएफ) ने 2019 पर्यंत मोबाईल फोनचे उत्पादन 50 कोटींपर्यंत पोचविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🚘 नंबर प्लेटसह मिळणार नवीन गाड्या!
Letsup I Update
नव्या गाड्या घेणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. वाहन कंपन्यांकडून लवकरच नंबर प्लेट असलेल्या कार बाजारात आणल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या वाहनांच्या किंमतीत नंबर प्लेटसाठीच्या खर्चाचाही समावेश असणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
💥 चीनची अवकाश प्रयोगशाळा पॅसिफिक महासागरात कोसळली
चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘तियाँगगाँग' अखेर 'ताहिती' देशाजवळ कोसळली. यामुळे संपूर्ण भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण हि अवकाश प्रयोगशाळा भारताच्या भूमीवर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
भारतीय वेळेनुसार पहाटे 6:43 वाजता ‘तियाँगगाँग'ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला व पुढील 3-4 मिनीटांमध्ये आकाशात मोठ्या प्रमाणात उल्का सदृश्य आगीचा लोळ निर्माण करीत 06:46 वाजता दक्षिण पॅसिफीक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या छोट्याशा 'ताहिती' देशाजवळ कोसळली.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - लवकरच नंबर प्लेट असलेल्या कार बाजारात येणार, किंमतीत नंबर प्लेटसाठीचा खर्च समाविष्ट असणार
🔅 नवी दिल्ली - 'आयसिस'च्या दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या 39 भारतीयांचे मृतदेह आज भारतात आणले जाणार
🔅 नवी दिल्ली - सर्वाधिक मोबाईल उत्पादन देशांच्या यादीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे स्थान
🔅 नवी दिल्ली - शहीद राजगुरु हे तर संघ स्वयंसेवक, संघाचे माजी प्रचारक नरेंद्र सहगल यांचा दावा
🔅 नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांचा भारत बंद
🔅 श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून 13 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचे तीन जवान शहीद
🔅 कुवेत - बुर्गान तेलक्षेत्राजवळ दोन बसची समोरासमोर टक्कर होऊन सात भारतीयांसह पंधरा तेल कर्मचारी ठार
🔅 मुंबई - राज्यासह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला, मुंबईत पेट्रोल 81 रुपयांवर
🔅 मुंबई - शिवसेना कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात, महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा, 50 ते 55 जागा लढवणार
🔅 मुंबई - सचिन तेंडुलकरचा कौतुकास्पद निर्णय, खासदारकीचे 90 लाख वेतन पंतप्रधान मदतनिधीला दान
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ 1 एप्रिलपासून काय बदलणार?
Letsup I Update
1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. त्यावर एक नजर टाकुयात...
👉 नव्या आर्थिक वर्षातील नवे बदल काय?
शेअर विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा, प्राप्तीकरावर अतिरिक्त एक टक्के उपकर भरावा लागणार, ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारापर्यंत व्याजावर प्राप्तीकरात सूट, ई-वे बिल प्रणालीला प्रारंभ.
👉 खालील वस्तू महागणार :
मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस, परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज, टूथपेस्ट, टूथ पावडर, सौंदर्यप्रसाधने, कार आणि टू व्हीलर, अॅक्सेसरीज, ट्रक आणि बसचे टायर, चप्पल आणि बूट, सिल्क कपडा, इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड, फर्निचर, घड्याळं, एलसीडी, एलईडी टिव्ही, दिवे, खेळणी, व्हीडीओ गेम, क्रीडा साहित्य, मासेमारी जाळं, मेणबत्त्या, गॉगल, खाद्यतेल, टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू, शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📎 व्हॉट्सअॅपने अपडेट केले ‘चेंज नंबर’ फीचर
Letsup I Update
व्हॉट्सअॅपने ‘चेंज नंबर’ फीचरमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. यामुळे नवा नंबर कॉन्टॅक्टमधील सर्व व्यक्तींना, ग्रुपला कळवणे आता अधिक सोपे होणार आहे. या बरोबरच बदललेला नंबर तुमच्या कॉन्टॅक्टमधील ठराविक व्यक्तीलाच कळवायचा असल्यास, तशी सोयदेखील नव्या फिचरमध्ये देण्यात आली आहे. या नवीन फीचरची बिटा व्हर्जनवर चाचणी सुरु असून, लवकरच हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥
6 624
💥 ‘जिओ’ची मोठी घोषणा; एका वर्षांसाठी मोफत मेंबरशीप
Letsup I Update
जिओच्या प्राइम मेंबर्सची मुदत 31 मार्च रोजी संपणार असल्याने पुढे काय? अशी चर्चा जिओच्या ग्राहकांमध्ये होती. मात्र, आता जिओने त्यांना मोठा दिलासा दिला असून, प्राईम ग्राहकांना पुढील एका वर्षांसाठी मोफत मेंबरशीप दिली जाणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही जिओचे प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला 31 मार्च 2019 पर्यंत नव्याने ही मेंबरशीप घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर ज्या लोकांनी आजवर जिओची प्राइम मेंबरशीप घेतलेली नाही त्यांना 1 एप्रिलपासून 99 रुपये देऊन प्राइम मेंबरशीप घेता येणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - सीबीएसईच्या फुटलेल्या पेपरची परीक्षा दिल्ली व हरियाणा राज्यात पुन्हा होणार, महाराष्ट्राला दिलासा
🔅 नवी दिल्ली - सर्व प्रकारच्या उत्पन्नावरील आयकरावर एक टक्का अतिरिक्त उपकर 1 एप्रिलपासून भरावा लागणार
🔅 नवी दिल्ली - छत्तीसगडमधील नारायणपूर येथील जंगलात पोलिसांची कारवाई, स्फोटकांसह नऊ नक्षलवाद्यांना अटक
🔅 नवी दिल्ली - रिलायन्स ‘जिओ’ची मोठी घोषणा; एका वर्षांसाठी प्राईम मेंबरशीप मोफत, सर्व फायदे मिळणार
🔅 आंध्र प्रदेश - रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये मांडव कोसळला, चंद्राबाबू नायडू थोडक्यात बचावले, 4 ठार तर 30 जखमी
🔅 मुंबई - महाराष्ट्रात पाण्याची समस्या तीव्र, 26,341 खेडी व 12,956 वस्त्या-वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई
🔅 मुंबई - जे अधिकारी उत्कृष्ट काम करतील त्यांना मुख्यमंत्री सुकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
🔅 मुंबई - अभिनेता अनिकेत विश्वासरावला लाखोंचा गंडा, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सांगितली हकीगत
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 एप्रिलमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
Letsup I Update
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार एप्रिल महिन्यात होणार आहे, अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे कोणा-कोणाला काय मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.
कदाचित निवडणुकीपूर्वीचा राज्य सरकारचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. यावेळी मंत्रिमंडळात आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. जागावाटपानुसार भाजपकडे 30 तर शिवसेनेकडे 12 मंत्रीपदे येतात. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे. त्यामुळे हा विस्तार फक्त भाजपचाच असेल. त्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची अफवा
Letsup I Update
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अनेक नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. मात्र या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. तसेच खात्री केल्याशिवाय असे मेसेज पाठवू नका फॉरवर्ड करू नका असेही भाजपाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
