LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
😷 *कोरोना! राज्यात 748 रुग्ण पॉझिटिव्ह*
*LetsUp | Update*
⚡ राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 113 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या 748 झाली आहे.
💁♂️ कोरोनावर नियंत्रणाचे नवे आव्हान सरकारसमोर उभे आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 46 वर जाऊन पोहोचली आहे.
🔬 आजपर्यंत पाठविलेल्या 16,008 नमुन्यांपैकी 14,837 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले, तर 748 पॉझिटिव्ह आले आहेत.
🏥 दरम्यान आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले 56 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे.
🌍 *जगातील परिस्थितीचा आढावा* : जगात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत 70 हजारांनी वाढ झाली असून एकूण रुग्णांचा आकडा 12 लाख, 54 हजार एवढा झाला आहे.
😱 *धक्कादायक* : कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 66 हजार, 500 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 9 लाखांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.
👍 *जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😎 *घरबसल्या ‘या’ शॉर्ट फिल्म पहा!*
*LetsUp I Special*
कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाउन असल्याने लोक घरात बंदिस्त आहेत. अशा परिस्थितीत कोणी ‘वर्क फ्रॉम होम’ तर कोणी आपला वेळ कसा घालवायचा याचा विचार करत आहे.
सर्वात जुने आणि सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म युट्यूबवर कोणत्याही सब्स्क्रिप्शनशिवाय काही दर्जेदार शॉर्ट फिल्मचा आस्वाद घेऊ शकता. अशाच काही शॉर्ट फिल्मची यादी आपल्यासाठी. *त्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/3bRp59J
🎯 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
*नगरमध्ये 10 परदेशी नागरिकांविरुध्द गुन्हा*
*LetsUp | Ahmednagar*
पर्यटन व्हिसामधील अटींचे आणि जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा परदेशी नागरिकांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नेवाशातील भालदार मशिदचे ट्रस्टी पठाण जुम्माखान नवाबखान, सलीम बाबुलाल पठाण (रा. नेवासा) यांच्यासह बाहेरील देशातील १० व्यक्ती होते.
*यांच्याविरुद्ध गुन्हा :*
महम्मद अब्दुलकादर, गुलेद अब्दीलाही अब्दी, अब्दुल रज्जाक युनुस, फरान यासीन बोगोरेह, अब्दुल्ला इसे कमील (सर्व रा. जिबूती देश), अबुदु मामुदु (रा. बेनिन देश), कुआसी कौमी मॅक्सीम (रा. डिकोटे डिवायर देश), फौफाना सुलेमाने (रा. आयव्होरीन देश), बोयासारी अब्दुल गफार (रा. आयव्होरीन देश), मेनसहा इस्माईल युसुफ (रा. घाना देश).
*असा होता परदेशींचा मुक्काम :*
हे १० परदेशी नागरिक ८ मार्चला दिल्ली येथून नगरला आले. ८ आणि ९ रोजी ते मुकुंदनगरमधील जामा मशिद येथे वास्तव्य केले. त्यानंतर १० मार्चला शेवगाव तालुक्यातील अमरापुरच्या मशिदमध्ये मुक्काम केला.
१२ ते १९ मार्चपर्यंत शेवगाव येथील विविध मशिदमध्ये मुक्काम केला. त्यानंतर २० ते ३० मार्चपर्यंत नेवासा गावातील भालदार (मरकस) मशिदीत मुक्काम केला.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *देशात सलग दुसऱ्या दिवशी 'एवढे' रुग्ण!*
*LetsUp l Update*
⚡ देशात शुक्रवारी 16 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एका दिवसातला हा मृतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 हजारच्या आसपास पोहोचली आहे. गुरुवारीही 500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले होते. आजपर्यंत 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
💁♂️ महाराष्ट्रातही कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. शुक्रवारी राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा 26 वर पोहोचला आहे.
📌 राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 490 झाली आहे, मुंबईतच 278 रुग्ण आहेत. 30 मार्चला राज्यात 220 रुग्ण होते, ही संख्या 4 दिवसातच दुप्पट झाला आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
*जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही*
*LetsUp | Nanded*
राज्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मात्र जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविलेल्या प्राप्त यादीतून नांदेड जिल्ह्यातील १४ पैकी आठ जणांचे नमुने हे निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
शासकीय रुग्णालयातुन एकूण 105 रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 86 नमुण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 14 नमुन्याचा अहवाल प्रलंबित आहे.
5 नमुन्यांच्या तपासणीची गरज नाही, असे राष्ट्रीय विषाणु संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
शासकीय रुग्णालयात नोंद झालेल्या 386 रुग्णांपैकी 146 रुग्णांचे विलीगीकरण करण्यात आले आहे. निजामुद्दीन मरकज बाबत प्राप्त यादीतील 14 पैकी 8 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
उर्वरित रुग्णांच्या नमुण्यांचा अहवाल येणे बाकी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *'राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई'*
*LetsUp l Update*
⚡ उत्तर प्रदेशमधील गाझीयाबाद येथील कोरोनाच्या काही संशयित तबलिगींनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन व अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली होती. याची गंभीर दखल घेत या तबलिगींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
💁♂️ “हे ना कायद्याला मानतील, ना प्रशासनाला मानतील. हे सर्व मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत जे वर्तन केले तो एक गंभीर गुन्हा आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करणार त्यांना सोडणार नाही,” असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
👀 “आपण कोरोनाविरोधातही खंबीरपणे लढून ही लढाई जिंकू. आपल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या पुढे येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी तयार राहिले पाहिजे. लॅब आणि पायाभूत सुविधाही योग्यरित्या सुरू ठेवल्या पाहिजेत,” असेही योगी म्हणाले.
🤔 *प्रकरण काय?* : रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना संशयित तबलिगी गैरवर्तन करत असल्याची माहिती रूग्णलालयाचे सीएमएलएस रविंद्र राणा यांनी दिली होती. ते सतत येथे अश्लील कृत्य करत आहेत. रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनही करत आहेत. उपचारासाठी आलेल्या परिचारिंकासमोरही कपडे बदलण्यासारखे प्रकार करत आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂️ *'मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत'*
*LetsUp I Update*
⚡ मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
👉 तर लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला, अशा शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
🗣️ *आव्हाड म्हणाले* :
▪️ आम्हाला वाटले, मोदी काहीतरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या, याची माहिती देतील,
▪️ किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील. पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत.
▪️ लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती. मात्र टाळी-थाळीनंतर पंतप्रधान आता दिवे लावण्याचा इव्हेंट करत आहेत.
▪️ कोव्हीड 19 शी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. हे पब्लिसिटी स्टंट थांबवा आणि काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😍 *TRP मध्ये "रामायण" अव्वल*
*LetsUp | Entertainment*
🛅 कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात 21 दिवसांसाठी, 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.
📺 लॉक डाऊनमुळे मालिकांचे शुटींग रद्द करण्यात आले असल्याने लोकांच्या आग्रहास्तव काही गाजलेल्या जुन्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण सुरु आहे. यामध्ये रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचा समावेश आहे.
🤩 *TRP मध्ये अव्वल* : या मालिकेने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. रामायणने 2015 पासूनचे टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढून या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
📍 रामायणने स्टार प्लस, झी टीव्ही अशा अनेक वाहिन्यांच्या मालिकांना मागे टाकले आहे.
💁♂️ *या मालिकाही सुरु* : रामायण नंतर शक्तिमान, ब्योमकेश बक्शी, फौजी, सर्कस, देख भाई देख, श्रीमान श्रीमती सारखे अनेक लोकप्रिय शो डीडी नॅशनलने प्रसारित करायला सुरुवात केली आहे.
🎬 *बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🗣️ *नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे*
*LetsUp | Update*
😷 देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी यांनी जनतेला काही आवाहन केले आहे,
🧐 *दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे 9 मुद्दे आपण पाहू*
▪️ संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवलं पाहिजे.
▪️ घंटी वाजवून, थाळ्या वाजवून लोकांनी दाखवून दिलं की, कोरोना व्हायरसविरोधात देश एक होऊन लढू शकतो.
▪️ आपण लॉकडाऊनदरम्यान घरात नक्कीच आहोत, मात्र आपल्यातला कुणीच एकटा नाहीय. प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे.
▪️ कोरोनामुळं निर्माण झालेल्या संकटातून गरिबांना पुढे घेऊन जायचंय, प्रकाशाकडे त्यांना न्यायचंय.
▪️ येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला महाशक्तीचं जागरण करायचंय. त्यासाठी रात्री 9 वाजता 9 मिनिट घरातल्या सर्व वीज बंद करा आणि घराच्या दारात किंवा बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती किंवा मोबाईलची लाईट लावा. आपण एकजुटीनं लढतोय, हे त्यातून दिसेल.
▪️ आपण एकटे नाही, कुणीच एकटा नाहीय, हा संकल्प आपल्याला करायचाय.
▪️ कुणीही कुठेही एकत्र जमा व्हायचं नाही. तुमच्या घराच्या बाल्कनीतूनच हे करायचंय.
▪️ सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मणरेषेला कधीच पार करायचं नाही. कोरोनाला पराभूत करण्याचा हाच रामबाण उपाय आहे.
▪️ 5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता भारतमातेची आठवण काढा आणि 130 कोटी जनतेच्या ताकदीचा अनुभव घ्या.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
📆 *प्राप्तिकर रिटर्न, 'पॅन-आधार' जोडणीची नवी मुदत 30 जूनपर्यंत*
*LetsUp | National*
⚡ प्राप्तिकराचे रिटर्न भरणे, प्राप्तिकर वजावटीसाठी गुंतवणूक करणे, पॅन कार्ड व 'आधार'ची जोडणी 31 मार्चपर्यंत करणे अपेक्षित असलेल्या अनेक बाबींना केंद्र सरकारने सध्याचे कोरोना संकट लक्षात घेऊन, येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
👍 *दंडाची रक्कम माफ* : मुदतीत कर न भरल्यास आकारल्या जाणाऱ्या व्याजाच्या दरातही कपात करण्यात आली असून, विलंबासाठी लावण्यात येणारा दंडही माफ करण्यात आला आहे.
📍 यापूर्वी 31 मार्च ही अंतिम मुदत होती. मात्र, लॉक डाऊनमुळे या मुदतीत काम होणार नसल्याची शक्यता लक्षात घेत मुदतवाढ देण्यात आली आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😱 *तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे 400 जण पॉझिटिव्ह*
*LetsUp | Corona Live*
⚡ तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभाशी संबंधित असलेले सुमारे 400 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
🗣️ बुधवारपासून एकूण 328 जण कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
🌎 आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झाल्याची 1,965 प्रकरणे उघड झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
📍 तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांशी तातडीने संपर्क साधण्यात यावा आणि युद्धपातळीवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
😷 दरम्यान; आतापर्यंत शोधून काढलेल्या सदस्यांच्या चाचण्यांद्वारे सुमारे 400 'पॉझिटिव्ह' रुग्ण सापडले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂️ *राज्यात दिवसभरात 81 नवे कोरोना रुग्ण*
*LetsUp I Update*
⚡ राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 81 नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे.
👉 त्यामुळं कोरोना रुग्णांचा आकडा 416 वर गेला आहे. एकट्या मुंबईत आज दिवसभरात 57 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
💫 तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.
🏥 आज दिवसभरात राज्यात 81 नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकट्या मुंबईत 57 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.
🧐 तर पुण्यात सहा, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन, अहमदनगरमध्ये नऊ, ठाण्यात पाच आणि बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
📍 राज्यात आज दिवसभरात 81 रुग्णांची भर पडली असून, आता एकूण रुग्णांची संख्या 416 झाली आहे. तर आतापर्यंत 19 जणांचा कोरोनानं मृत्यू झाल्याची राज्याच्या आरोग्य विभागानं दिली.
📝 तसंच आतापर्यंत 42 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😱 *तृप्ती देसाईंच्या 'त्या' व्हिडिओचा खुलासा*
*LetsUp I Update*
💁♂️ लॉकडाउनच्या काळात दारू घेताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अटक करण्यात आले, असा एक व्हिडीओ सोशल सध्या मीडियावर झाला आहे.
👉 मात्र याबाबत तृप्ती देसाई यांनी अशी कोणतीही घटना झालेली नसून जुने व्हिडिओ काढून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे, असे त्यांनी सांगितले.
🗣️ *देसाई म्हणाल्या..:* 'महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस महाजनादेश यात्रेवेळी पुण्यात आले असता दारूबंदी कायदा करावा या मागणीसाठी मी दारूच्या रिकाम्या बाटलीचा हार त्यांच्या गळ्यात घालणार होते. मात्र पोलिसांनी या प्रकाराआधीच मला घरातून ताब्यात घेतले', असे देसाई यांनी यावेळी सांगितले.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *धक्कादायक! यामध्ये तिचा काय गुन्हा...*
*LetsUp | Solapur*
💫 न्यू बुधवार पेठ परिसरांत राहणाऱ्या आशा स्वयंसेविकेला होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यासोबत अमानवी वागणूक होत असल्याचे समोर आले आहे.
👉 मिळालेल्या माहितीनुसार, सदरील आशा स्वयंसेविका घशात त्रास होत असल्याने 30 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय येथे औषधोपचारासाठी गेल्या होत्या.
✨ तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस घरी राहण्यासाठी होम क्वारंटाईनचा हातावर शिक्का मारला.
✨ परंतु रुग्णालयातून घरी आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या हातावरील शिक्का पाहिला आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली.
👉 तसेच त्यांना घर सोडून जाण्यास बळजबरी केली असून लोकांच्या त्रासाला कंटाळून त्या विजापूर रोड येथे माहेरी गेल्या मात्र तेथेही लोकांनी हेटाळणी केली.
📍 शेवटी कंटाळून त्या तुळजापूर रोडवर राहणाऱ्या मावशीच्या घरी गेल्या. मात्र तेथील लोकांनी देखील अमानवी वागणूक देत त्यांना हाकलून लावले.
📌 दरम्यान, लोकांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी जोडभावी पोलीस चौकीला तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😎 *RUMMY खेळा आणि पैसे जिंका*
💰 *Rummy Circle अॅपवर* ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम
💷 *डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस*
🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार...
💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे
🤩 *अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा* : http://bit.ly/35pHUho
(ADVT)
6 624
💥 *भाजी मंडईतील गाड्यांवर कारवाई...*
*LetsUp | Pune*
पिंपरीत असणाऱ्या अधिकृत भाजी मंडईतील गाड्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली आहे.
आज पिंपरीत शासनाच्या सोशल मीडिया डिस्टन्सिंगचे नागरिकांनी तीन तेरा वाजवले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लोक डाऊन करण्यात आले आहे. तरी देखील या परिसरात कोणतेही नियम न पाळता भाजीपाला खरेदी करत होते.
त्यामुळे सरकारी नियमांचे उल्लंघन नागरिक करत आहेत. त्याला आळा बसावा म्हणून पालिका प्रशासनाने या अनधिकृत गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यामुळे आता नागरिकांची गर्दी होण्याला आळा बसण्यास मदत होईल. अशी माहिती देण्यात येत आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *माहिती उघड करणाऱ्यावर जमावाचा हल्ला...*
*LetsUp | Solapur*
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर एका माणसाने तबलिगी जमातीची माहिती दिल्याने त्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे.
*प्रकरण काय :*
सोलापुरातील एका गावात तबलिगी जमात दिल्लीत मरकजसाठी जमणार असल्याची माहिती माहिती एका व्यक्तीने 56 वर्षीय व्यक्तीने ग्रामसेवकाला दिली.
त्या व्यक्तीने ग्रामसेवकाला माहिती दिल्याच्या कारणाने जमावाने त्या व्यक्तीवर हल्ला चढविला.
त्यासोबतच त्याने पिंपरी गावातल्या सात लोकांनी तबलिगी मरकजला हजेरी लावली असून त्यांची करोनाची टेस्टही झाल्याचे सांगितले.
दरम्यान, वैराग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
बुलढाणाकऱ्यांच्या चिंतेत अजून भर...!
Let'sUp | Buldhana*
💁♂ आज गुरुवार 2 एप्रिल रोजी आणखी एक रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह, 2 निगेटिव्ह आले आहेत. व 3 रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.
💉 बुलडाणा शहरात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता 5 त्यातील एक जण आधीच मृत झालेला आहे.
🧐 विशेष म्हणजे काल बुधवार १-एप्रिल रोजी सायंकाळी हायरिक्स मधील प्रलंबित 8 ही रिपोर्टस निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता.
📌 धक्कादायक म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या या मुलाचं वय फक्त 10 वर्ष आहे व हा मुलगा मृत व्यक्तीच्या संपर्कातीलच असल्याचे कळते.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप अँप डाउनलोड करा: http://bit.ly/Letsupapp
