ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक ; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठक; राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा घेतला आढावा ● पुढील आठवड्यात म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सूनची वापसी होणार; वायव्य भारतातून मान्सूनने निरोप घेतला असला तरी अद्याप काही राज्यात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय ● पुण्यातील नवले पुलावर अपघाताची दुर्दैवी घटना; मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक ● राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वाघ आणि अन्य वन्यजीवांसह संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना ● सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ऐतिहासिक शिवकालीन वासोटा गड पर्यटकांसाठी उद्यापासून (दि. २३) सुरु होत आहे. त्यामुळे गिर्यारोहकांसह निसर्गप्रेमीना आता कासनंतर वासोट्याकडे पर्यटनाचा आनंद मिळणार ● प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी व्हावा हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट - उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत ● राज्यात काल दिवसभरात १ हजार ७४४ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार ६३२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर ४० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू ● अहमदनगर जिल्ह्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच हत्येचा गुन्हा दाखल ● जागतिक क्रिकेटचा शिरोमणी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून (शनिवार,दि. २३ ) सुरु होणार; उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका तसेच इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यात सलामीचे सामने होणार ● लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया ही विलंबाचीच भारताची स्वदेशी लस 'कोवॅक्सिन' च्या मंजुरी वरून जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. माईक रेयान यांचा खुलासा अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/nYFmCyPNzkb

*टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या* LetsUpp | Bulletin ● टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा बदलली, आता २१ नोव्हेंबरला परीक्षा होणार; टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला ● राज्यात दिवसभरात २ हजार ९६८ रूग्ण कोरोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.४६ टक्के; आज राज्यात १ हजार ५७३ नवीन करोनाबाधित आढळले ● दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार; पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा निधी लवकरात लवकर जमा करावा; कृषी मंत्री दादा भुसे ● पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा; दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरीला ● हिंदू-मुस्लिम वादासाठी शाहरुखच्या मुलाला अटक; देशात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला ● अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात २ तास चौकशी; उद्या पुन्हा होणार हजर! एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली ● “फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होतं”; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा ● 100 कोटी लसोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडवण्यात आला ● पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या दौऱ्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली; उस्मानाबाद जिल्हा दौऱ्या गोंधळ झाल्याची घटना ● सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेत रोख रक्कम काढण्यावर निर्बंध, खातेधारकांचा संताप अनावर; खातेदारांना यापुढे सात दिवसांत फक्त पाच हजार रुपये रक्कम काढता येणार *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/Xupjpuptxkb

photo content

🤓 *शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे?* 💁‍♂️ मग तुमच्यासाठी सादर आहे भारताचे स्वतःचे अ‍ॅप 'जोश' ✔️ *जोश अ‍ॅप का वापरायचे? एकदा वाचाच!* : ● भारताचे स्वतःचे अ‍ॅप ● शूटिंगमध्ये सहजता ● म्युझिक प्लेलिस्ट ● ड्युएट व्हिडिओ ● तुमच्या स्वतःच्या भाषेत क्युरेटेड फीड ● इतर प्लॅटफॉर्मवर सहज शेअर करा 👍 आता तुमची प्रतिभा जगाला दाखवून द्या! 👉 *त्यासाठी क्लिक करा* : https://click.vcommission.com/t/MTU5Ml8xNTc/?p1=%7byour-transaction-id%7d&source=%7byour-sub-aff-id%7d (ADVT)

*दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; दहावीचा निकाल घसरला* *LetsUpp l Trending* ⚡ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. मंडळाने या निकालांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे. 💁‍♂️ १२ वीच्या नवीन अभ्याक्रमानुसार या परिक्षेला यंदा २ हजार १०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १ हजार ८०९ विद्यार्थी परिक्षेला हजर राहिले त्यापैकी ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 🧐 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही २५.८७ टक्के इतकी आहे. १२ वीच्या जुन्या अभ्याक्रमानुसारच्या परिक्षेसाठी १२ हजार ५३४ जणांनी अर्ज केलेला. त्यापैकी १२ हजार १६० जण परिक्षेला उपस्थित राहिले. 💫 या १२ हजार १६० जणांपैकी ३ हजार ३२२ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाणे २७.३१ टक्के इतकं आहे. १० वीच्या निकालामध्ये १२ हजार ३६३ अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. 👀 १० हजार ४७७ जणांनी १० वीची परिक्षा दिली होती. उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी २९.१४ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा तीन टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. २०२० साली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये ३२.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. 👨🏻‍💻 विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहून त्याची प्रत घेता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय सोडून) कोणत्याही विषयात मिळवलेल्या गुणांची पडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. 📍 दहावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-ssc.ac.in/ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-hsc.ac.in/ या संकेतस्थळाद्वारे स्वत: किंवा शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/tedLoMgqvkb

टॉप 10 हेडलाईन्स! दुपारच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● वाजवा रे वाजवा! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे ● उस्मानाबादमध्ये दगडफेक प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर गुन्हा नोंद ● आता टीव्ही पाहणंही महागणार! 1 डिसेंबरपासून चॅनल्स पाहणं 50 टक्के अधिक खर्चिक ● 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा', नारायण राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर 'प्रहार'! ● नागपुरातील कळमना भागात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला, निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचं आंदोलन ● पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन ● PM Modi to CBI, CVC : केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणाला घाबरवणं नाही, तर मनातून भीती दूर करणं - पंतप्रधान ● वर्षभरापासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन संपणार?; मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमेवर जमण्याचं आवाहन ● उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 46 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर ● व्हॉट्सअप चॅटमधून मोठा खुलासा; ड्रग्जबद्दल एका अभिनेत्रीनंही केलेली आर्यनसोबत चर्चा अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/OwmHuv2fvkb

टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी ● '15 दिवसात आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देतो अन्यथा तुम्ही पदाचा राजीनामा द्या' रवी राणांचे यशोमती ठाकूर यांना आव्हान ● पैगंबरांच्या मानव कल्याणाच्या शिकवणीला अनुसरुया;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘ईद ए मिलाद’च्या शुभेच्छा ● अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही; रामदास आठवलेंचे महत्वाचे विधान ● दिवाळीनंतर कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता, राजेश टोपे यांचा सावधानतेचा इशारा ● “राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करीदेखील करतात,”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य ● मनसेमुळे नुकसान होईल, भाजपानं राज ठाकरेंच्या नादी लागू नये; केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला ● सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक ● भारतीय लष्कराकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा; राजौरी सेक्टरमध्ये चकमक सुरु ● उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून ४० टक्के महिला उमेदवार; प्रियांका गांधींची घोषणा अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/aiJVekTStkb