LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक विंदा करंदीकर यांची आज जयंती...
Let'sUpp l Special
मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर आज (२३ ऑगस्ट) जयंती. देशाच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कारासारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले. चला तर मग त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यसंपदेबद्दल अधिक जाणून घेऊयात...
*काव्यसंग्रह* :
- स्वेदगंगा इ.स. १९४९
- मृद्गंध इ.स. १९५४
- धृपद इ.स. १९५९
- जातक इ.स. १९६८
- विरूपिका इ.स. १९८१
- अष्टदर्शने इ.स. २००३) (या साहित्य कृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)
संकलित काव्यसंग्रह :
- संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
- आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)
बालकविता संग्रह :
- राणीची बाग
- एकदा काय झाले
- सशाचे कान
- एटू लोकांचा देश
- परी ग परी
- अजबखाना
- सर्कसवाला
- पिशीमावशी आणि तिची भुतावळ
- अडम् तडम्
- टॉप
- सात एके सात
- बागुलबोवा
ललित निबंध :
- स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
- आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
- करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)
समीक्षा :
- परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
- उद्गार (इ.स. १९९६)
इंग्लिश समीक्षा :
- लिटरेचर अॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
- अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)
अनुवाद :
- अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
- फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
- राजा लिअर (इ.स. १९७४)
पुरस्कार आणि पदवी :
- सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
- सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
- कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
- महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
- कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
- कबीर सन्मान १९९१
- जनस्थान पुरस्कार १९९३
- कोणार्क सन्मान १९९३
- साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
- महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
- भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
- डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
- ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या - विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) (इ.स. २००३)
- केशवसुत पुरस्कार विद्यापीठांच्या डी.लिट्स
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :
महाराष्ट्र सरकार २०११ सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/pVmcKHYGWib
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी लेटर बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली; क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर बँकेचे १५० कोटी रुपये बुडवल्याचा गंभीर आरोप केला
● पुढील महिन्यात दहीहंडी उत्सव असून त्यावर निर्बंध कायम ठेवण्याचा सरकारचा विचार; मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे आश्वासन
● पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या; महसूल कर्मचाऱ्यांनीच दिला आंदोलनाचा इशारा; देवरे यांची बदली करा, महसूल कर्मचाऱ्यांची मागणी
● करतारपूर गुरुद्वारा उघडण्याचा निर्णय एनसीओसीने शनिवारी घेतला. 22 सप्टेंबर ही शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक देव यांची पुण्यतिथी आहे.
● 'तिरंगा मोठा की भाजपचा ध्वज', कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज टाकल्यानं नेटकऱ्यांचा सवाल
● कोविडचा बूस्टर डोस देण्याचा केंद्र सरकारचा अद्याप विचार नाही, निती आयोग सदस्यांचं मोठं वक्तव्य
● जम्मू काश्मीरवर चर्चा करा अन्यथा गंभीर परिणाम होतील; मेहबूबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारला थेट इशारा
● दिग्गज फुटबॉलपटू सय्यद शाहिद हकीम यांचं निधन; द्रोणाचार्य, ध्यानचंद पुरस्कारांवर कोरलं होतं नाव
● २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शैली सिंहने लांब उडीत रौप्यपदक पटकावले; केवळ १ सेंटिमीटरने सुवर्ण हुकले!
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/csDfPqWAWib
6 624
आज रक्षाबंधन : काय आहे राखी बांधण्याची योग्य वेळ?; जाणून घ्या!
LetsUpp l Special
⚡ रक्षाबंधन म्हणजे बहीण भावातील प्रेम साजरा करण्याचा दिवस. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या सणाला बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याला बळकट किंवा दृढ करतो. चला तर मग जाणून घेऊयात या राखीचा सण हा कसा साजरा करावा आणि राखी बांधण्याची योग्य वेळ काय आहे याबाबत.
👉 रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. तर यावर्षी आज 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात येत आहे.
💫 रक्षाबंधन हा सण भारताच्या विविध भागात साजरा केला जातो. प्राचीन काळापासून रक्षाबंधन सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्याची कामना करते.
🕰️ *राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त काय?* :
● शुभ वेळ : 22 ऑगस्ट, रविवारी सकाळी 5 वाजून 50 मिनिटांपासून संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांपर्यंत.
● राखी बांधण्यासाठी दुपारची वेळ उत्तम : दुपारी 1 वाजून 44 मिनिटांपासून ते 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत.
✅ *अशी बांधा राखी* : आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी औक्षणाचं ताट सजवा. पाट ठेवून पाटाभोवती रांगोळी काढा. भावाला पाटावर बसवून त्याचं औक्षण करा. त्याच्या उजव्या हातात राखी बांधून त्याला मिठाई भरवा. तसेच त्याच्याकडून रक्षा करण्याचं वचन घ्या. राखी बांधणं म्हणजे, वैदिक पद्धतीत याला मणीबंधनाचे प्रतिक म्हणतात. त्यानंतर भाऊ स्वइच्छेने बहिणीला भेटवस्तू देतो.
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/Pz9oXSH6Uib
6 624
जागतिक किंमतीत ९७ टक्के प्रति कापूस गाठची तेजी आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर मिळवला ऐतिहासिक विजय
भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला दिला आहे. पहिल्या डावातील भारताच्या ३६४ धावांच्या बदल्यात इंग्लंडने ३९१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या २७ धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर २९८ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला ६० षटकांमध्ये २७२ धावांचं लक्ष्य दिलं. परंतु भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/GP5NEQvlVib
6 624
जाणून घ्या आठवडाभरातील पॉझिटीव्ह न्यूज
Letsupp | Positive Bullatine
नगरची आयुषी खेडकर होणार 'फायटर पायलट'
आयुषी नितीन खेडकर हिने फायटर पायलट होण्याचा बहुमान पटकावत पाथर्डीचा झेंडा अटकेपार फडकविला आहे. देशभरातून निवडल्या गेलेल्या ६१ जणांमध्ये तिचा समावेश असून ती जिल्ह्यातील पहिलीच महिला फायटर पायलट ठरली आहे. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे. डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची आयुषी ही कन्या आहे. सध्या ती बेंगलोर येथे एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहे. ऑगस्ट २०२० मध्ये तिने फायटर पायलटची परीक्षा दिली. त्याचा निकाल गुरूवारी जाहीर झाला.
औरंगाबादेतील १४ वर्षीय मुलीची नासासाठी निवड
औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या १४ वर्षीय मुलीची नासासाठी पॅनेलिस्ट आणि संशोधक म्हणून निवड झाली आहे. दीक्षा शिंदे असे या नासासाठी निवड झालेल्या या मुलीचे नाव आहे. दीक्षा शिंदे या मुलीने 'ब्लॅक होल और गॉड', या विषयावर लेख लिहिला होता. तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर तिची नासा या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. अत्यंत कमी वयात तिने हे यश संपादन केले आहे.
अमरावतीच्या कन्येची कमाल; अफगाणिस्तानमधून १२९ भारतीयांना मायदेशी आणलं
तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या चढाईनंतर तेथील नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याच्या कारवायांमध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका कन्येने आपले कर्तृत्व व राष्ट्रप्रेम सिद्ध केले आहे. या कन्येने १२९ भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणले आहे. दर्यापूरची रहिवासी असलेल्या श्वेता चंद्रकांत शंके ही कन्या २०१७-१८ मध्ये इंडियन एअरलाईन्समध्ये एअरहोस्टेसपदी रुजू झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! देशातील मुलींनाही एनडीए परीक्षा देण्याची दिली परवानगी
देशातील मुलींनाही एनडीए परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुलीही एनडीएची परीक्षा देऊ शकतात असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे आता पुण्यातील एनडीए ही लष्कर भरतीसाठी देशातील आघाडीची संस्था आहे. पण मुलींना आतापर्यंत एनडीएची परीक्षा देता येत नव्हती. पण न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलींसाठी परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
भारत सरकारच्यावतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२१' साठी यंदा महाराष्ट्रातील दोन उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तालुका शिरोंचा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासराळीचे शिक्षक खुर्शिद कुतुबुद्दीन शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर कदोराचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना जाहीर झाला आहे.
१२ वर्षांवरील मुलांना आता मिळणार कोरोनावरील लस
जगातील पहिल्या आणि भारतात विकसित करण्यात आलेल्या डीएनएवर आधारीत कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने झायडस कॅडिलाच्या लसीला आत्पकालीन वापरास मंजुरी दिली आहे. ही लस १२ वर्षांवरील मुलांना देण्यात येईल. यामुळे देशात लवकरच १२ वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे.
‘स्पुतनिक लाइट’ ही सिंगल डोस लस लवकरच उपलब्ध होणार
पुढील महिन्यात ‘स्पुतनिक लाइट’ ही सिंगल डोस लस देशात उपलब्ध होणार आहे. स्पुतनिक व्ही ही दोन मात्रांची लस आहे. स्पुतनिक लाइटच्या निर्मितीसाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी भारतातील पॅनेशिया बायोटेक या कंपनीशी करार केला आहे. स्पुतनिक लाइट या सिंगल डोस लसीची किंमत ७५० रुपये असेल. दीर्घकाळपर्यंत ही लस विषाणूला प्रतिकार करणाऱ्या अँटिजन्सची निर्मिती करू शकत असल्याने ती अधिक उपयुक्त ठरते.
मध्य रेल्वेकडून माथेरानच्या मिनी ट्रेनचा युनेस्कोच्या बक्षिसासाठी प्रस्ताव
पर्यटकांचे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंद ठरणारी माथेरानची मिनी ट्रेन युनेस्कोच्या यादीत येण्यास सज्ज झाली आहे. युनेस्कोतर्फे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या श्रेणींसाठी आंतरराष्ट्रीय बक्षिस आयोजित केले आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडून 'नेरळ माथेरान लाइट रेल्वे' ची शिफारस केली असून युनेस्कोनेही त्यासंदर्भात काही माहीती मागविली आहे. ती देण्याचे काम सध्या मध्य रेल्वेकडून जोमाने सुरू आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मिनी ट्रेनचे आकर्षणही असते.
कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी!
यंदा भारतीय शेतकर्यांसाठी कापसाची शेती फायदेशीर ठरणार आहे. जागतिक बाजारात कापसाचे दर ७ वर्षाच्या उच्चस्तरावर पोहचले आहेत. त्यामुळे भारतीय कापसाचे दर जुलै २०२१ मध्ये नोंदलेल्या उच्चस्तराजवळ पोहचले आहेत. या आठवड्यात कापसाच्या किमतीत ३ टक्क्यांची उसळी नोंदवली तर, जुलै २०२१ मध्ये याचा दर १० टक्के वाढला होता.
6 624
‘झायडस’च्या लशीस महिन्याची प्रतीक्षा
LetsUpp l Trending
💁♂️ झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव्ह डी’ लशीला मान्यता मिळाली असली तरी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही लस बाजारात उपलब्ध केली जाईल, अशी माहिती झायडस समूहाने शनिवारी आयोजित केलेल्या वेबसंवादात दिली. त्यामुळे मुलांच्या लसीकरणासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.
💁♀️ लशीला केंद्रीय आरोग्य विभागाने मान्यता दिल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ४५ दिवसांमध्ये सुमारे ३० ते ४० लाख मात्रांचे उत्पादन केले जाईल. ऑक्टोबरपासून सुमारे एक कोटी मात्रांचे उत्पादन करण्यात येणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत सुमारे चार ते पाच कोटी मात्रांचा साठा उपलब्ध असेल.
📌 लशीचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतातील आणखी काही कंपन्यांसोबत बोलणी सुरू असून परदेशातील काही कंपन्याही यासाठी तयार आहेत. भारतात लस वितरण साखळी निर्माण करणे, कोविनमध्ये जोडून घेणे यावर सध्या भर देण्यात येत आहे, असे झायडस समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. शार्विल पटेल यांनी सांगितले.
*कच्च्या मालाचा पुरेसा साठा*
💉 लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक साठा उपलब्ध करताना सुरुवातीला काही अडचणी आल्या; परंतु आता पुढील सहा महिने पुरेल इतका साठा आयात करून ठेवलेला आहे. त्यामुळे कच्च्या मालाची कमतरता भासणार नाही, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.
*खासगी रुग्णालयांची मागणी*
🦠 लस बाजारात उपलब्ध होण्याआधीच अनेक खासगी कंपन्यांनी झायडसकडे लस खरेदीसाठी प्रस्ताव दिले आहेत. परंतु अद्याप लशीची किंमत, केंद्र सरकारची लशीची मागणी या बाबी स्पष्ट झाल्याशिवाय खासगी कंपन्यांना किती साठा द्यावा याबाबत निर्णय झालेला नाही, येत्या पाच ते सहा दिवसांत याबाबत निर्णय होईल, असे झायडसने स्पष्ट केले.
*तिसऱ्या टप्प्यासाठी सहा महिने*
⭐ लस चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे अंतरिम विश्लेषण सादर केले असून यात ६६ टक्के परिणामकता दिसून आली आहे. या चाचण्यांमध्ये एकालाही घातक दुष्परिणाम आढळलेले नाहीत. मात्र तिसऱ्या टप्प्याचा अभ्यास पूर्णपणे हाती येण्यास चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे डॉ. पटेल यांनी सांगितले.
*५०० कोटींची तरतूद*
💫 लशीच्या निर्मितीसह संशोधनासाठी आत्तापर्यंत समूहाने सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील काळात आणखी निधीची गरज लागेल, असे झायडसने या वेळी नमूद केले.
*डेल्टावर परिणामकारक*
💁♀️ भारतात सर्वाधिक आढळणाऱ्या डेल्टा विषाणूच्या काळात लशीच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे ही लस करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारांवर परिणामकारक असल्याचा दावा झायडसने केला आहे.
👉 आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या लशींमुळे संसर्गाची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. यापुढील संशोधनही सुरू असून पुढील टप्प्यात संसर्ग होऊ नये अशी डीएनएआधारित लस तयार केली जाणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
*भीती घालविण्यास उपयुक्त*
💁♂️ ही लस इंजेक्शनविरहित असून पेनसारख्या यंत्रातून दाब देऊन दिली जाणार आहे. तेव्हा इंजेक्शनमुळे असलेली लशीची भीती घालविण्यासाठी ही लस उपयुक्त आहे, असे मत डॉ. पटेल यांनी व्यक्त केले.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/vaAmGEzeVib
6 624
पुणे विद्यापीठाच्या 'पेट' परीक्षेबाबत महत्वाची बातमी
LetsUpp l Trending
⚡ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज मागविले आहेत.
💁♂️ पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची 'पेट परीक्षा' आता पाच सप्टेंबरला घेणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
👉 विद्यापीठाने यापुर्वी जाहीर केल्यानुसार ही परीक्षा २२ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा पाच सप्टेंबरला होणार आहे.
👀 विद्यापीठात पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून काही विद्यार्थ्यांना आपल्या विषयासाठी गाईड उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पीएच.डी. प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.
👨🏻💻 पुणे विद्यापीठातील विविध विभागातील आणि पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
📍 हजारो विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली, त्यामुळे पेट परीक्षेची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/0Ao48QsYUib
6 624
टॉप १० हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● लसीकरणात महाराष्ट्राचा नवा विक्रम; दिवसभरात जवळपास ११ लाख नागरिकांचे लसीकरण
● राज्यात दिवसभरात १४५ रूग्णांचा मृत्यू ; ५ हजार ९१४ जण कोरोनामुक्त; राज्यात ४ हजार ५७५ नवीन बाधित आढळले
● अहमदनगर : तहसीलदार देवरे यांच्या ध्वनिफीत प्रकरणाला वेगळे वळण; गैरव्यवहार केल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल समोर
----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● सांगलीत बैलगाडा शर्यतीप्रकरणी पडळकरांसह ४९ जणांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
● सातारा : शिरवळ बसस्थानकात सुलभ शौचालयालय चालकाचा खून; एक संशयित ताब्यात; परिसरात खळबळ
● म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत; ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून
● लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत ८९ व्या वर्षी निधन
● तालिबानसह जम्मू काश्मीरमधील कोणतीही सुरक्षा आव्हाने पेलण्यास सज्ज; काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार
● जागतिक युवा अॅथलेटिक्स स्पर्धा : भारताच्या अमित खत्रीने १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले
● सुशांत सिंह राजपूतचं फेसबुक अकाउंट झालं अॅक्टिव्ह; प्रोफाईल फोटो बदललेला पाहून फॅन्स भावूक
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/LhN7S74TUib
6 624
टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● देशात गेल्या 24 तासांत आढळले 34,457 नवे करोनाबाधित; 375 मृत्यूंची नोंद!
● राज्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला, रुग्णसंख्या 7 हजारांवर
● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद प्रशासन सज्ज! मेल्ट्रॉनमध्ये तिसऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी मंजुरी
● चाकणकरांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं जागरण-गोंधळ आंदोलन
● राष्ट्रवादीचा भाजपावर आजपासून हल्लाबोल; जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्याचा दावा!
● जगातल्या सर्वात मोठ्या 500 कंपन्यांमध्ये 12 भारतीय कंपन्यांचा समावेश, रिलायन्स 57 व्या स्थानी
● काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून 150 हून अधिक नागरिकांचं अपहरण ,अपहरण झालेल्यांमध्ये सर्वाधिक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहित
● पालघरमध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर फक्त महिलांसाठी लसीकरण
● मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल, वसूलीसंदर्भात गोरेगाव पोलिसात गुन्हा
● सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/TszjJkXETib
6 624
नगरची आयुषी खेडकर होणार 'फायटर पायलट'
LetsUpp l Ahmednagar
💫 आयुषी नितीन खेडकर हिने फायटर पायलट होण्याचा बहुमान पटकावत पाथर्डीचा झेंडा अटकेपार फडकविला आहे. देशभरातून निवडल्या गेलेल्या ६१ जणांमध्ये तिचा समावेश असून ती जिल्ह्यातील पहिलीच महिला फायटर पायलट ठरली आहे. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे.
💁♀️ डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची आयुषी ही कन्या आहे. सध्या ती बेंगलोर येथे एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहे. ऑगस्ट २०२० मध्ये तिने फायटर पायलटची परीक्षा दिली. त्याचा निकाल गुरूवारी जाहीर झाला.
⚡ आयुषीचे प्राथमिक शिक्षण पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. नंतर बीटेक करण्यासाठी ती चेन्नई येथे गेली होती.
📍 याच काळात तिने गुवाहाटी येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. तिची एकाच वेळी नौसेना व वायू सेनेत निवड झाली. येत्या १ सप्टेंबरला ती हैदराबाद येथे प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/bg6fRLMtTib
6 624
शाळांची घंटा दिवाळी नंतरच वाजणार
LetsUpp l Trending
● शाळा सुरू करण्यासाठी काही संस्थाचालक व पालक आग्रह करत आहेत; परंतु दिवाळीपूर्वी शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध आहे.
● १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे, त्यांना शिकविणारे प्राध्यापक, काॅलेजमधील इतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर सर्व नियमांचे काटेकोर पालन करून काॅलेज सुरू करण्यास हरकत नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले.
● पुणे शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, बहुतेक सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत, मग राज्यातील शाळा सुरू होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
● यावर पवार म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत ही वस्तुस्थिती असली तरी सरसकट शाळा सुरू करणे कठीण आहे.
● पहिल्या टप्प्यात राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशा जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा विचार होऊ शकतो. टास्क फोर्स व तज्ज्ञांच्या मते राज्यात अद्यापही लसीकरणाचा मोठा टप्पा गाठायचा आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/QR8Oz7XrTib
6 624
टॉप 10 हेडलाईन्स! सकाळच्या 10 महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● राज्यातील शाळा सुरू झालेल्या ठिकाणचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर; आतापर्यत 8 वी ते 12 वी वर्गाच्या 17 हजार 701 शाळा सुरू तर 14.27 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
● पुण्यातील आंबील ओढा परिसरातील बांधकामे हटवण्यास पुणे सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली; महापालिकेने कारवाई करायची ठरवल्यास अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येऊ शकते
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● बैलगाडी शर्यत प्रकरण कोर्टात आहे, सरकारकडे असतं तर तात्काळ निर्णय झाला असता; उपमुख्यमंत्री अजित पवार
● भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञानाकडून जगातील पहिली DNA लस,12 वर्षांवरील मुलांसाठी ZyCoV-D लस; देशात वापरासाठी सहावी अधिकृत लस
● भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वाशिम दौऱ्यावर रिसोड तालुक्यातील शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला
● स्वखर्चातून 2 महिन्यात बाळासाहेबांचं स्मारक बांधेन, CM ने परवानगी द्यावी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी
● राज्यातील 150 नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या 23 ऑगस्टपासून निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरुवात होणार; राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले
● 2024 च्या निवडणुकांचे लक्ष्य ठेऊन रणनिती ठरवावी लागेल; विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं आवाहन
● राज्यात शुक्रवारी 105 रुग्णांच्या मृत्यूची नोंद; राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला, तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यूची नोंद नाही
● पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून आर्मी स्टेडियमला सुवर्णपदक विजेता खेळाडू निरज चोप्राच नाव
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/5UOuz0TgTib
6 624
हेडलाईन्स : दुपारच्या टॉप 10 घडामोडी
20 ऑगस्ट 2021
● "ही संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सुचना", उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यातील पत्रकार परिषदेत इशारा
● पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर; दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार
● मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले, जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली!
● पुणे मेट्रोच्या प्राधान्य मार्गांचं काम पूर्ण, फुगेवाडीत उभारली ऑपरेशनल कंट्रोल रुम, वर्षाअखेरीस प्रवासी सेवा सुरू होणार
● समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी, दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू
● वाशिममध्ये शिवसैनिकांकडून किरीट सौमय्यांच्या गाडीवर शाईफेक आणि दगडफेक, भावना गवळींच्या कारखाण्याला किरीट सौमय्या देणार होते भेट.
● नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात आंदोलन, हजारोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते आंदोलनासाठी नांदेडमध्ये दाखल
● इंग्रजीमध्ये पत्र मिळाल्यावर केंद्र सरकारचे कर्तव्य आहे की त्याला केवळ इंग्रजीत उत्तर द्याव; मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!
● मराठा आरक्षणः संसदेत बोलू दिलं नसतं तर खासदारकी सोडली असती – खासदार छत्रपती संभाजीराजे
●अफगाणिस्तानातील परिस्थिती आणखी चिघळली, भारतीय वाणिज्य दूतावासामध्ये टाळं तालिबान्यांची घुसखोरी
देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/mgvFwqT2Rib
6 624
पुढील महिन्यात देशात उपलब्ध होणार ‘स्पुतनिक लाइट’ ही सिंगल डोस लस
पुढील महिन्यात देशात उपलब्ध होणार ‘स्पुतनिक लाइट’ ही सिंगल डोस लस
Letsupp | Trending
● देशात लसीकरणाचा विक्रमी टप्पा पूर्ण होत असताना. त्यांनतर आता पुढील महिन्यात ‘स्पुतनिक लाइट’ ही सिंगल डोस लस देशात उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात ही लस उपलब्ध असेल.
● स्पुतनिक लाइट ही कोणतीही नवीन लस नसून स्पुतनिक व्ही या रशियन बनावटीच्या लसीची पहिली मात्रा आहे. स्पुतनिक व्ही ही दोन मात्रांची लस आहे. ही लस वेगवेगळ्या व्हायरल व्हेक्टरचा वापर करून तिची निर्मिती करण्यात आली आहे.
● स्पुतनिक लाइटच्या निर्मितीसाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी भारतातील पॅनेशिया बायोटेक या कंपनीशी करार केला आहे. पॅनेशिया बायोटेक व रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी स्पुतनिक लाइटच्या वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानी मागितली आहे.
● स्पुतनिक लाइट या सिंगल डोस लसीची किंमत ७५० रुपये असेल. तिचा वापर मर्यादित स्वरूपाचा असेल. सिंगल डोस लसीमुळे लसीकरण झटपट होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत ही लस विषाणूला प्रतिकार करणाऱ्या अँटिजन्सची निर्मिती करू शकत असल्याने ती अधिक उपयुक्त ठरते.
● परिणामकारकता चांगली असेल तर सिंगल डोस लस पुरेशी ठरते. त्यामुळे या प्रकारच्या लसीच्या मंजुरीला वेळ लागू नये, असे मत ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी मांडले आहे.
● ७९.४% स्पुतनिक लाइट लसीची परिणामकारकता आहे. स्पुतनिक लाइट लस टोचल्यानंतर दहा दिवसांत ४० पट अँटिबॉडीज वाढत असल्याचे चाचण्यांमध्ये निदर्शनास आले.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/ThTOTdUMRib
