ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
🎬 'मोगली'चा ट्रेलर रिलीज LetsUp I Video वॉर्नर ब्रदर्सने आपला चित्रपट मोगलीचा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटाची कहाणी ही जंगल बुकच्या पुढची असून यात मोगलीच्या जिवंत राहण्याची संघर्ष कहाणी आहे. मागील चित्रपटासारखाच बघीरा, आणि बल्लू मोगलीला साथ देताना दिसणार आहे, या शिवाय चित्रपटात शेरखान देखील दिसणार आहे. ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/PLznGn For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 चेन्नई फायनलमध्ये, हैदराबादचा पराभव Letsup I IPL Special फॅफ ड्यू प्लेसीच्या निर्णायक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करून आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईच्या या विजयात फॅफ ड्यू प्लेसीची नाबाद 67 धावांची (42 चेंडूं) खेळी निर्णायक ठरली. त्याआधी, या सामन्यात चेन्नईने हैदराबादला सात बाद 139 असे रोखून धरले. सलामीच्या शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतरही हैदराबादची घसरगुंडी सुरू राहिली आणि त्यांची अवस्था सहा बाद 88 अशी झाली. त्या कठीण परिस्थितीत कार्लोस ब्रॅथवेटने 29 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी उभारली. त्यामुळे हैदराबादला चेन्नईला 140 धावांचे लक्ष्य देता आले. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - आता बुकिंगनंतर 24 तासाच्या आत विमानाचे तिकीट रद्द केल्यास शुल्क लागणार नाही ● नवी दिल्ली - राज्यसभेच्या माजी खासदार रजनी पाटील यांची हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी म्हणून नियुक्ती ● बोस्टन - एमआयटीच्या वैज्ञानिकांनी पोलिओसाठी नवीन लस केली तयार, यामुळे पोलिओच्या व्हायरसचा प्रभाव संपुष्टात येणार ● बंगळुरू - कर्नाटकात जेडीएस व काँग्रेस आघाडीचे सरकार आज बुधवारी सत्तारूढ होणार, दुपारी जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार ● मुंबई - जे.जे रुग्णालयातील संपकर्त्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य, मागण्या मान्य झाल्यानंतर चार दिवसांनी संप मागे ● मुंबई - माहिती अधिकाराखाली मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईतून बेपत्ता होणाऱ्यांमध्ये 16 ते 25 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक ● फ्लिपकार्टवर अॅपल वीक अंतर्गत सेल सुरू, सेल 27 मे पर्यंत चालू राहणार, विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती देण्यात येत आहेत ● चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली, फॅफ ड्यू प्लेसीस ठरला सामनावीर ● कोलकाता - राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान आज बुधवारी सायंकाळी 7 वाजता एलिमिनेटर सामना रंगणार ● मुंबई - अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत 'बिग बॉस मराठी’ या शोमध्ये सहभागी होणार, वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे लवकरच ती बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 आज हैदराबाद-चेन्नई आमने-सामने! LetsUp I IPL Special आयपीएलच्या अकराव्या मोसमातील प्ले-ऑफ फेरीच्या लढतींना आज सुरुवात होणार आहे. या फेरीतील पहिला क्वालिफायर-1 सामना आज (मंगळवार) 7 वाजता सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे. यात जो संघ जिंकणार आहे तो थेट अंतिम सामन्याला पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाला क्वालिफायर-2 मध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळणार आहे. या दोन्ही संघांच्या मजबूत आणि कमकुवत दुव्यांवर नजर टाकुयात... 👉 हैदराबादचे मजबूत दुवे : फलंदाजीत शिखर धवन,केन विल्यमस तर मधल्या फळीत युसूफ पठाण, मनीष पांडे, दीपक हूडा, वृद्धिमान साहा यांसारखे खेळाडू आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, रशीद खान व शकिब अल हसन यांच्या सारखे टी-20 मधील उत्कृष्ट गोलंदाज आहेत. 👉 हैदराबादचे कमकुवत दुवे : अखेरच्या तीन सामन्यांत फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतरही हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. कारण त्यांच्या गोलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 👉 चेन्नईचे मजबूत दुवे : यंदाच्या मोसमात चेन्नईच्याच्या संघातील सर्व फलंदाज आणि सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. चेन्नईच्या तब्बल तीन फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर गोलंदाजांमध्ये शार्दूल ठाकूरने 14 बळी मिळवले असून लुंगिसानी एन्गिडीने केवळ पाच सामन्यांत 9 फलंदाजांना बाद केले आहे. 👉 चेन्नईचे कमकुवत दुवे : फिरकीपटूंची कामगिरी म्हणावी तशी होत नाही. सोबत कमकुवत क्षेत्ररक्षण एक समस्या आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 धोनी-झिवाचा 'हा' व्हिडिओ व्हायरल! LetsUp I Video महेंद्रसिंह धोनीच्या कुटुंबवत्सलतेची साक्ष देणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनी हा त्याची मुलगी झिवासोबत खेळत असल्याचा हा व्हिडिओ आहे. बापलेकीच्या खेळाचा हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने ट्विट केला आहे. तो लाखो युजर्सनी शेअर केला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/RrAiS1 For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 IPL च्या अंतिम सामन्याची मज्जा मराठीत! LetsUp I Update ▫ मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना (27 मे) मराठी समालोचनासह पाहता येणार ▪ स्टार प्रवाह वाहिनीवर VIVO IPLचा 27 मे रोजी होणारा अंतिम सामना पाहता येणार ▫ विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार ▪ तसेच संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - परदेशी पर्यटकांना देऊ केलेल्या ई व्हिसा सुविधेमुळे सरकारच्या तिजोरीत चौदाशे कोटी रुपयांची भर, केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती ● नवी दिल्ली - चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि बलात्कार व्हिडीओ प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाने गुगल, फेसुबक आणि व्हॉट्सअॅपला ठोठावला 1 लाखाचा दंड ● नवी दिल्ली - जस्टिस लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्यावतीने पुनर्विचार याचिका दाखल ● मुंबई - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) हिरे व्यापारी नीरव मोदीची 170 कोटींची संपत्ती घेतली ताब्यात ● मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांसाठी साेमवारी सरासरी 99.81 टक्के झाले मतदान ● मुंबई - ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचे 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन ● मुंबई - भारतात OnePlus-6 स्मार्टफोन लॉन्च, या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 34 हजार 999 रूपये ● मुंबई - आयपीएल-11 च्या पात्रता फेरीतील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्जदरम्यान आज मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रंगणार ● पॅरिस - स्पेनचा राफेल नदाल हा एका आठवड्यातच पुन्हा एकदा जगातील नंबर-1 पुरुष टेनिस खेळाडू बनला ● मुंबई - प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'मुंबई- पुणे- मुंबई' या चित्रपटाचा तिसरा भाग 28 सप्टेंबरपासून आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 'निपाह' व्हायरस; हाय अलर्ट घोषित LetsUp I Update सध्या केरळ राज्यामध्ये 'निपाह' व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डबल्यूएचओ) च्या मते, निपाह व्हायरस हा वटवाघळांमधून फळांमध्ये आणि फळांतून प्राणी तसेच माणसांत पसरतो. 1998 मध्ये सर्वात आधी मलेशियाच्या कांपुंग सुंगई निपाहमध्ये अशा प्रकारच्या केसेस पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याला निपाह व्हायरस असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळाले होते. 2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळाला होता. 👉 लक्षणं काय आहेत? ▫ हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो. ▫ हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात. ▫ लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. ▫ अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले. ▫ ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे 7-10 दिवस आढळतात. ▫ सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे. 👉 काय काळजी घ्याल? ▪ सध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही. ▪ पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो. ▪ संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा. ▪ वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे. ▪ मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा. तुम्हाला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ UPSCचे नियम बदलण्याची शक्यता! LetsUp I Update देशभरात होणाऱ्या लोकसेवा परीक्षांच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून अमूलाग्र बदल केला जाण्याची शक्यता आहे. याअंतर्गत नोकरी आणि केडर निवडण्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे पुस्तकी ज्ञानासह व्यवहारिक ज्ञानही तपासले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर हे नवे बदल याच वर्षी लागू होतील, असे म्हटले जात आहे. या नव्या सिस्टमनुसार अशी शक्यताही आहे की, ट्रेनिंगमधील सुमार कामगिरीमुळे परीक्षेतील टॉपरला आयएएस केडर मिळू शकणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो. पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार, कर्मचारी प्रशिक्षण विभागाने ही नवी यंत्रणा लागू करण्यासंदर्भात अनेकांकडून सल्ले मागितले आहेत. या प्रस्तावानुसार, उत्तीर्ण उमेदवारांना फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर आणि त्यात मिळालेल्या गुणांवरच केडर आणि नोकरीचे ठिकाण दिले जाईल. जर नवे नियम लागू झाले तर ट्रेनिंगनंतरच कोणाला कोणती सेवा आणि कोणत्या राज्याचे केडर मिळणार हे ठरणार आहे. ट्रेनिंगमध्ये मिळालेले गुण यूपीएससीच्या अंतिम निकालात जमा होतील, त्यानंतर त्यांचा रँक ठरणार आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 प्ले ऑफच्या चारही टीम नक्की! LetsUp I Sports Update आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत. हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान या टीमचा प्ले ऑफमध्ये प्रवेश झाला आहे. ▫ 22 मे : पहिला क्वालिफायर : हैदराबाद vs चेन्नई, वानखेडे स्टेडियम, मुंबई. ▫ 23 मे : एलिमिनेटर सामना : कोलकाता vs राजस्थान, ईडन गार्डन. 23 मे चा सामना जो हरेल त्याचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. तर दोघांपैकी जो जिंकेल तो चेन्नई-हैदराबादपैकी जी टीम हरेल त्याच्याविरुद्ध 25 मे रोजी क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल. ही मॅच जिंकलेली टीम क्वालिफायर-1 जिंकलेल्या टीमशी 27 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर फायनल खेळेल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - एका महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याचे काम केले सुरु ● नवी दिल्ली - डिझेलनंतर पेट्रोलचा दर आता विक्रमी पातळीवर, तेल कंपन्यांनी पेट्रोल 33 पैसे, डिझेल 26 पैशांनी वाढवले ● नवी दिल्ली - ओपेकने उत्पादन घटवल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ : धर्मेंद्र प्रधान ● नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी रशियाच्या दौऱ्यावर, दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्वपूर्ण भेट, लष्करी सहकार्यावर होणार चर्चा ● जगलपूर - नक्षल्यांनी भूसुरुंगाने वाहन उडवले, 7 जवान शहीद, छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात भीषण हल्ला, शस्त्रेही लुटून नेली ● मुंबई - छगन भुजबळ ट्विटरवर; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मानले आभार ● सोलापूर - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'म्होरक्या' या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण राममोगली पडाल (38) यांनी घरात टॉवेलने गळफास घेऊन केली आत्महत्या ● कार्बन कंपनीने फ्रेम्स एस 9 हा स्मार्टफोन केला लाँच, यासोबत एयरटेल कंपनीची कॅशबॅक ऑफर देखील मिळणार ● मुंबई इंडियन्सचा दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 11 धावांनी पराभव, चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला 5 विकेट व 5 चेंडू राखून हरवले ● मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन हिचा वीरमहादेवी या दाक्षिणात्य चित्रपटातील पहिला लूक आला समोर For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रूपयांचा चून लाऊन विदेशात फरारी झालेला नीरव मोदी सध्या लंडनमध्ये, ईडीच्या सूत्रांची माहिती ● नवी दिल्ली - हॉकी इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजिंदर सिंह पुढील दोन वर्षांसाठी नवीन अध्यक्ष बनले ● अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये स्फोट, 8 ठार आणि 45 जण जखमी, या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू ● कर्नाटक - कुमारस्वामी बुधवारी (दि.23 मे) घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी केले पाचारण ● कुपवाडा - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान ● मुंबई - राज्यातील शिक्षण सेवकांचा कालावधी हा तीन वर्षांचाच असेल, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले स्पष्ट ● मुंबई - राज्यभरात 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या दरम्यान 1 हजार 327 जणांना एड्सची लागण, एड्समुळे दगावणाऱ्यांत पुणे प्रथम, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर ● एयरटेल आणि अमेझॉन इंडियामध्ये सहकार्याचा झाला करार, या शॉपिंग पोर्टलवरून विविध स्मार्टफोन्सवर तब्बल 2600 रूपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याचे जाहीर ● राजस्थानने रॉयलने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा केला 30 धावांनी पराभव, कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून केला पराभव ● मुंबई - सलमान खान, जॅकलिन फर्नांडीस स्टारर सिनेमा रेस 3 चे पहिले गाणे 'हिरिये' झाले प्रदर्शित, हा सिनेमा 15 जूनला प्रदर्शित होणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ ’जलसाठ्यांमधील घट चिंताजनक’ LetsUp I Update भारतासहित अमेरिकतील कॅलिफोर्निया, मध्य पूर्वेतील देश व आॅस्ट्रेलियाच्या काही भागांत उपलब्ध पाण्याचे प्रमाण चिंता वाटावी इतक्या प्रमाणात घटले आहे. या स्थितीचा नासाने उपग्रहांद्वारे प्रथमच अभ्यास केला. यासंदर्भात नासाच्या गोदार्द स्पेस फ्लाईट सेंटरने उपग्रहांची मदत घेऊन केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, उत्तर भारतामध्ये गहू व तांदळाच्या पिकासाठी पाण्याचा अतिवापर केला जातो. त्यामुळे त्या भागातील जलसाठ्यांच्या प्रमाणात खूप घट झाली आहे. हा लेख 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 _*प्रियाचा नवा व्हिडिओ पहिला का?*_ _*LetsUp I Video*_ मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रियाच्या ‘उरू अदार लव्ह’ या गाण्याचा आणखी एक टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, सध्या तो सर्वत्र व्हायरल होत आहे. यू-ट्यूबवर सध्या प्रियाचा हा व्हिडीओ ट्रेंड करीत आहे आणि तो मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. यात प्रियासोबत तिचा को-स्टार रोशन अब्दुलही खूपच छान दिसत आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/8bh48s For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ 98 रूपयात 39 जीबी डाटा! LetsUp I Update ▪ बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी 'डाटा सुनामी' या नावाने 98 रूपये मूल्य असणारा नवीन प्लॅन केला सादर ▪ यात ग्राहकांना दररोज 1.5 जीबी फोर-जी डाटा मिळणार, याची वैधता 26 दिवसांची आहे ▪ यात ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे कॉल अथवा एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - यंदा मान्सूनचे वेळेआधीच भारतात आगमन होणार, केरळात मान्सून 29 मे रोजी धडकणार, भारतीय हवामान विभागाने केली अधिकृत घोषणा ● नवी दिल्ली - रेल्वेने refund.indianrail.gov.in वेबसाईट केली तयार, यावर काऊंटरवरून घेतलेल्या तिकिटाच्या परताव्याचे लाईव्ह स्टेटस पाहता येईल ● नवी दिल्ली - हरियाणातील हिसारची 16 वर्षीय शिवांगी पाठकने एव्हरेस्ट शिखर केले सर, शिवांगी हे शिखर सर करणारी सर्वात कमी वयाची महिला ठरली ● सर्वोच्च न्यायालयाची कार्ती चिदंबरम यांना 19 ते 27 मे दरम्यान इंग्लंड, जर्मनी आणि स्पेनमध्ये प्रवासास सशर्त परवानगी ● हवाना - क्युबामधील सरकारी विमान कंपनीचे बोइंग 737 हे प्रवासी विमान कोसळले, 100 हून अधिक प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू ● मुंबई - येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न, तसे झाले तर डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते ● मुंबई - पालघर लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सात अभ्यासक्रमांच्या परीक्षा लांबणीवर; 28 मे रोजी होणाऱ्या परीक्षा आता 2 जूनला होणार ● जीमेलमध्ये एक नवं 'नज' फिचर सादर, याद्वारे जीमेल वापरकर्त्यांना त्यांनी सांगितलेल्या वेळेत जीमेल त्यांना करायच्या ईमेलबद्दली आठवण करून देईल ● दिल्ली डेअरडेव्हिल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर 34 धावांनी विजय, हर्षल पटेल ठरला सामनावीर ● ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत 'झिपऱ्या' या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 यंदा रमजानचे रोजे 14 तास 4 मिनिट LetsUp I Special Update इस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृट्या अतिशय महत्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खानपान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी बाबी धर्मबाह्य मान्यता जातात. एका अर्थाने आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लिम बांधव व्रतबंधन पाळतात. सात वर्षाच्या बालकांपासून तर वयोवृद्धापर्यंत रोजा केला जातो. यंदा रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, 15 जूनला हा उपवास संपणार आहे. रोज 14 तास 4 मिनिटे एवढा कालावधी हा उपवास केला जाणार आहे. पहाटे 4.43 ला सुरु होणारा उपवास संध्याकाळी 7.09 मिनिटांनी संपणार आहे. रमजान पर्वाच्या उपवासाचा दिवसभरातील काळ गेली कित्येक वर्ष 12 ते 13 तास इतकाच होता. गेल्या वर्षी तो 14 तासांपर्यंत पोहोचला होता. मात्र यंदा त्यात आणखी 4 मिनिटांची वाढ झाली आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ पेट्रोल-डिझेलच्या किंमती 4 रुपयांनी वाढणार! LetsUp I Update पेट्रोल आणि डिझेलच्या दरात येत्या काही आठवड्यात तब्बल चार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केली आहे. कर्नाटकातील निवडणुकांसाठी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करू नये, अशा सूचना केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दिल्या होत्या, त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना सुमारे 500 कोटी रुपयांचा तोटा झाला असून, हा तोटा भरून काढण्यासाठी चार रुपयांपर्यंत दरवाढ करावी लागेल, असे कोटकने म्हटले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भवितव्याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार, पाठींबा देणाऱ्या आमदारांची यादी येडीयुरप्पा यांना कोर्टात सादर करावी लागणार ● नवी दिल्ली - कोचिंग क्लासच्या शुल्कावर आता 18% जीएसटी लागणार, महाराष्ट्रातील अॅडव्हान्स रूलींग अॅथॉरिटीच्या पीठाचा निर्णय ● नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जैवइंधनविषयक राष्ट्रीय धोरण 2018 ला मंजुरी, यानुसार, जैवइंधनाचे, त्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण होणार ● काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; बीएसएफ जवान शहीद, एएनआयने दिले वृत्त ● मुंबई - शहिदांच्या वारसांना 25 लाखांची मदत, अपंगत्व आलेल्या जवानांच्या मदतीतही वाढ, राज्य सरकारचा निर्णय ● मुंबई - राज्यात शुक्रवार-शनिवार मेघगर्जनेसह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला, तर विदर्भात 18 ते 19 मे या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता ● मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु ● इन्स्टाग्रामवर एका नवीन फिचरची भर पडणार, याच्या अंतर्गत युजरला तो इन्स्टाग्रामवर नेमका किती वेळ व्यतीत करत आहे याची अचूक माहिती मिळणार ● रॉयल चॅलेजर्स बेंगळुरूचा सनरायझर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय, एबी डिव्हिलियर्स ठरला सामनावीर ● मुंबई - बिग बॉसच्या घरात छोट्या पडद्यावरच्या आक्कासाहेबांनी म्हणजेच हर्षदा खानविलकरने केली वाईल्ड कार्ड एन्ट्री For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏠 म्हाडाच्या तीन हजार घरांसाठी सोडत LetsUp I Update महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील तीन हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेला दि. 19 मे पासून सुरुवात होणार आहे, तर 30 जून रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. 18 जून रोजी रात्री 12 नंतर अर्जासाठी नोंदणी बंद करण्यात येणार आहे. अत्यल्प गटासाठी पाच हजार रुपये, अल्प गटासाठी दहा हजार, मध्यम गटासाठी 15 हजार आणि उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज 'लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन'या संकेतस्थळावरून स्वीकारले जाणार आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUpp Marathi - Telegram 频道 @letsup 的统计与分析