ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
photo content

🎯 *नोकरीची सुवर्णसंधी!* 💁‍♂ नामांकित समृद्धी मल्टी फायनान्स कंपनीसाठी त्वरीत 200 ( पुरुष + महीला) रिप्रेझेन्टिव्ह नियुक्त करणे आहे. 👍 *ठिकाण* : संपूर्ण महाराष्ट्र 💰 *फिक्स पगार* : 20000 + 2% इन्सेन्टिव्ह प्रत्यक्ष मुलाखत सुरू आहे 👉 सर्व प्रकारचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध (नियम व अटी लागू....) 📞 *संपर्क* : 8208986162 । 9146723939 📍 *पत्ता* : विजय नगर, अकोला रोड, अकोट जि. अकोला (महाराष्ट्र) *टीप*:- कॉल करण्याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत (ADVT)

photo content

💁‍♂ लिंग बदलून लग्न करणारा पुरुष परिपक्व LetsUp | Special बीड जिल्ह्यातील ललिता साळवे तब्बल 26 वर्षे महिला म्हणूनच वावरली. विशेष म्हणजे पुढे बीड पोलिस दलात महिला शिपाई म्हणून नोकरीही लागली. पण पुढे ललिताला पुरुष असल्याचे जाणवू लागले. नंतर वैद्यकीय तपासण्याही केल्या. शरीरात पुरुषाची लक्षणे असल्याने लिंग बदलून पुरुष होण्याचा निर्णय घेऊन तशी शस्त्रक्रियाही झाली. स्रीचा पुरुष बनलेल्या ललितचे एका तरुणीशी लग्न झाले. नवदांपत्यासह ग्रामस्थांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा रिसेप्शन सोहळ्यात सत्कार केला. 👉 डॉक्टरांचा सत्कार करताना नवदांपत्य माजलगाव (जि.बीड) -आयुष्याची 26 वर्ष ‘ती‘म्हणून जगल्यानंतर महिला पोलिस शिपाई ललिताला आपण पुरुष असल्याची जाणीव झाली. तीने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर “तो” झालेल्या ललितच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रविवारी (ता.23) राजेगावात पार पडला. पोलिस प्रशासनासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह लिंगबदल शस्त्रक्रिया करून ललीतचे आयुष्य बदलून टाकणारे मुंबई येथील डॉ. रजत कपूर यांचे ग्रामस्थांनी वाजतगाजत स्वागत केले. दरम्यान, लिंगबदल शस्त्रक्रिया करून स्त्रीचा पुरुष झालेला ललित आता परिपक्व पुरुष झाला आहे. यापुढे वैवाहिक आयुष्य जगताना त्याला कोणत्याच अडचणी येणार नसल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉ. रजत कपूर यांनी सांगितले. माजलगाव शहर ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या ललिता साळवे यांना वयाच्या 25 वर्षानंतर स्वतःतील शारीरिक बदल जाणवू लागले. आपण स्त्री नसून पुरुष असल्याची जाणीव ललिताला झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य न जगण्याचा निर्णय तीने घेतला. यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. परंतु महिला म्हणून पोलीस प्रशासनात भरती झालेल्या ललिताला पुरुष झाल्यानंतर नोकरी कायम ठेवण्याचे आवाहन होते. न्यायालयासह शासन स्तरावरील कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर दोन वर्षापूर्वी ललितावर मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉ. रजत कपूर यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. ‘ती’चा ‘तो’ होत पुरुष म्हणून ललित पुन्हा नोकरीवर रुजू झाला. पुरुष म्हणून सर्वसामान्याप्रमाणे परिपूर्ण आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ललितने लिंगबदलानंतर आठ दिवसापूर्वी औरंगाबाद येथील उच्चशिक्षित तरुणीसोबत साध्या पद्धतीने साखरपुड्यात लग्न केले. राजेगाव (ता. माजलगाव) येथे रविवारी (ता.23) लग्नानिमित्त रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्त्रीचा पुरुष होऊन लग्न केल्यानंतर या रिसेप्शनला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यासह सामाजिक, राजकीय, विधी, डॉक्टर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यात ललितावर लिंगबदल शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्याला नवीन वळण देणारे डॉ. रजत कपूरही उपस्थित होते. ग्रामस्थांनी त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून सत्कारही केला. 👀 'ललितमुळे राजेगावला नवीन ओळख' : लिंगबदल शस्त्रक्रियेसारखा धाडशी निर्णय घेणाऱ्या ललितचा ग्रामस्थांना अभिमान आहे. त्याने दाखवलेला आत्मविश्वास, हिंमत यामुळे देशपातळीवर राजेगावला एक नवीन ओळख मिळाली असल्याची प्रतिक्रिया सरपंच रूपाली कचरे यांनी व्यक्त केली. 📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम 💰 SHOWLION मिळवा लाखों जिंकण्याची संधी... ♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦ 🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!* 🤩🤩🤩🤩🤩 👨‍💻 FREE ₹500 ON SIGNUP! 🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀ 🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा! 🎟 तर, मग विचार कसला करता! 🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा : 👉 https://urlzs.com/JqThM (Advt)

💁‍♂ भारत अमेरिकेचा महत्वाचा मित्र : डोनाल्ड ट्रम्प LetsUp | Update ⚡ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील मोटेरा स्टेडियममधून संबोधित करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. 👉 शिवाय भारत-अमेरिका मैत्री दृढ होईल, असा विश्वासही व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नमस्ते म्हणत भाषणाला सुरुवात केली. 👀 “भारतात येणे अभिमानास्पद आहे. नरेंद्र मोदी हे चॅम्पियन आहेत, जे भारताला विकासाच्या दिशेने पुढे नेत आहेत. अमेरिका हा भारताचा मित्र आहे," असे ट्रम्प म्हणाले. 🧑 तसेच गेल्या वर्षी 60 कोटीहून अधिक लोकांनी मोदी यांना मतदान केले, आणि त्यांनी भारतातील सर्वात मोठा निवडणूक विजय मिळवला, असे ट्रम्प म्हणाले. 🗣 डोनाल्ड ट्रम्प म्हणाले : ▪ पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेने तुमच्या महान पंतप्रधानांचे टेक्सासमधील भव्य फुटबॉल स्टेडियमवर स्वागत केले होते. ▪ आज अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आमचे स्वागत होत आहे. ▪ अमेरिका नेहमीच भारताचा विश्वासू आणि प्रामाणिक मित्र राहील, नेत्रदीपक स्वागताबद्दल धन्यवाद. ▪ आम्ही हा भारावून टाकणारा पाहुणचार नेहमी लक्षात ठेवू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रवास मन हेलावणारा आहे. ▪ जुलमाने उदयास येणारे राष्ट्र आणि जनतेला मोकळीक देऊन उभे राहिलेले राष्ट्र यामध्ये फरक आहे. ▪ कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाच्या धोक्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी दोन्ही देश एकत्रित आहेत. ▪ माझ्या प्रशासनात आम्ही आयसिसच्या रक्तरंजित मारेकऱ्यांचा पूर्ण खात्मा केला. अल बगदादीला कंठस्नान केले. ▪ अमेरिका भारताला सर्वात शक्तिशाली लष्करी शस्त्र उपलब्ध करुन देणार आहे. ▪ आम्ही उद्या (मंगळवारी) 3 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारांवर स्वाक्षरी करु. 📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

photo content

photo content

🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम 💰 *SHOWLION वर मिळवा लाखों जिंकण्याची संधी... ♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦ 🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम! 🤩🤩🤩🤩🤩 👨‍💻 FREE ₹500 ON SIGNUP! 🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀ 🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा! 🎟 तर, मग विचार कसला करता! 🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा :👉 https://urlzs.com/JqThM (Advt)

photo content

💥 *'निर्भया'च्या दोषीची याचिका फेटाळली* *LetsUp I Update* 💁‍♂ दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी विनय शर्मा याची याचिका दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने फेटाळली आहे. 👉 मानसिक तणावाखाली असल्याने आपल्याला तात्काळ उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी याचिका विनय शर्माने केली होती जी कोर्टाने फेटाळली. 🧐 *प्रकरण काय? :* ▪ काही दिवसांपूर्वी दोषी विनय शर्मान तुरुंगात भिंतीवर डोकं आपटलं होतं. यानंतर विनयच्या वकिलाने कोर्टात याचिका दाखल केली. ▪ विनय प्रचंड तणावाखाली आहे आणि त्याला उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारांची गरज आहे, अशी मागणी विनयच्या वकिलाने याचिकेतून केली. 🧐 *कोर्टाचे स्पष्टीकरण :* फाशीच्या शिक्षेमुळे दोषींची मानसिक स्थिती बदलू शकते. हे साहजिक आहे. दोषी विनयला आवश्यक आणि पुरेसे वैद्यकीय उपचार देण्यात आले असल्याने ही याचिका फेटाळण्यात येत आहे. 📍 दरम्यान, विनयची याचिका म्हणजे शिक्षेतून पळवाट काढण्याचा मार्ग आहे, असा आरोप निर्भयाच्या आईने केला आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

photo content

💃 प्रियांकाचा असाही कारनामा LetsUp I Entertainment 💁‍♀ लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राने अभिनेत्री आलिया भट आणि दीपिका पादुकोणला धोबीपछाड देत इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड सेलिब्रिटी होण्याचा मान मिळवला आहे. 👉 इन्स्टाग्रामवर प्रियंकाचे 4.99 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. जे इतर कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रेटीपेक्षा अधिक आहे. 📍 यादीत प्रियंकाने दीपिका पादुकोणला मागे टाकले आहे. दीपिकाचे 4.42 फॉलोअर्स आहेत. पाठोपाठ आलिया भटचे 4.32 कोटी तर अक्षय कुमारचे 3.68 कोटी फॉलोअर्स आहेत. 😱 एका पोस्टचे 1.86 कोटी : प्रियंका सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. विशेषत: इन्स्टाग्रामवर ती सतत स्वत:चे नवनवे फोटो, सेल्फी पोस्ट करत असते. ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रियंका एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये घेते. 🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🗞 आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी ▪ सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं; केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य ▪ 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणारी आरोपी अमूल्या लियोनी हिला कोर्टाने ठोठावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ▪ मध्य प्रदेश सरकारचं अधिकाऱ्यांना फर्मान, किमान एक नसबंदी करा, अन्यथा नोकरीवर गदा येणार ---------------------- Advertisment On LetsUp Contact : 7875190190 ---------------------- ▪ काँग्रेसच्या सोनिया गांधी व राहूल गांधी यांची नागरिकता धोक्यात: भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा दावा ▪ मी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी भारतीय जमणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा ▪ उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूक 22 मार्चला, आजपासून आचारसंहिता लागू ▪ भीम आर्मीच्या रेशीम बागेतील मेळाव्यास न्यायालयाकडून 'सशर्त' ग्रीन सिग्नल ▪ सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिपची प्री बुकिंग आजपासून सुरु; 26 फेब्रुवारीपासून विक्रीस उपलब्ध होणार ▪ भारताची स्टार बॅटमिंटनपटू साईना नेहवालने युक्रेनच्या मारिया युलिटिनाचा पराभव करीत बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला ▪ अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा '83′ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीस 👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

photo content

😎 RUMMY खेळा आणि पैसे जिंका 💰 Rummy Circle अ‍ॅपवर ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम 💷 डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस 🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार... 💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे 🤩 अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : http://bit.ly/35pHUho (ADVT)

🏏 पाकिस्तानी खेळाडू अकमल निलंबित LetsUp I Sport पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडून उमर अकमलवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)ने कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बोर्डाने त्यांना निलंबित केले आहे. उमर अकमल हा माजी कर्णधार कामरान अकमल यांचा बंधू आहे. उमरहा पाकिस्तानकडून मधल्या फळीसाठी खेळत होता. 👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

📣 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा LetsUp | Update 🤼‍♂ राज्य सरकारकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या, क्रीडा विश्वातील महत्वाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा झाली आहे. 🏵 22 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभासह, खेलो इंडिया युथ गेम्स 2020 मधील पदक विजेत्या खेळाडूंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. 💁‍♂ जाहीर झालेले पुरस्कार : ▪ शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार - पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे -पुणे ▪ उत्कृष्ट मार्गदर्शक - युवराज खटके (अ‍ॅथेलेटिक्स, सांगली), बाळासाहेब आवारे (कुस्ती, बीड - थेट पुरस्कार), नितीन खत्री (तायक्वांडो, पुणे), जगदीश नानजकर (खो-खो, पुणे), अनिल पोवार (पॅरा अ‍ॅथलेटीक्स, कोल्हापूर) 📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp