LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
Tokyo Olympics 2020 : भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राची जबरदस्त कामगिरी!
LetsUpp | Trending
⚡ टोकियोमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने जबरदस्त कामगिरी करत दिमाखात अंतिम फेरी गाठली.
👉 अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.
💫 मात्र, भालाफेकीच्या पात्रता फेरीत ब गटात समावेश असलेल्या भारताच्या शिवपाल सिंह याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
📝 त्याची सर्वोत्तम भालाफेक ७६.४० मीटर राहिली, जी अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याच्या निकषापेक्षा खूप कमी होती.
✅ दरम्यान, पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्राचाच बोलबाला राहिला. नीरज चोप्रा ८६.६५ मीटर भालाफेकीसह अव्वलस्थानी राहिला. अ आणि ब गटातील कुठल्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीची बरोबरी करता आली नाही.
📍 पात्रता फेरीत ८५.६४ मीटर अंतरासह जर्मनीचा वेटर जॉन्सन दुसऱ्या स्थानी राहिला. तर पाकिस्तानचा नदीम अर्शद ८५.१६ मीटर भालाफेकीसह तिसऱ्या स्थानी राहिला.
To know more click here
https://letsup.app.link/AHIOQL8crib
6 624
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद; लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल
● जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पुनर्नियुक्तीचे परभणीकरांकडून स्वागत, जिल्हाभरात केलेल्या संघर्षाला यश
● NDRF चे निकष बदलण्यासाठी शरद पवार यांनी घेतली अमित शाह यांची भेट : खासदार सुनील तटकरे यांची माहिती
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● फाईल पाठवूनही निर्णय घेत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप, फाईल उशीरा मिळाल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं एमपीएससी सदस्य नियुक्तींच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण
● सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात करणार काम
● अहमदनगर जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली; तब्बल 5 लाख 1 हजार 960 रूपायांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला; या प्रकरणी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल
● राज्यात मंगळवारी 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त; सहा जिल्ह्यात मंगळवारी एकही रुग्ण नाही
● सोलापूर; 43 दिवसांपासून अकलूज-माळेवाडी व नातेपुते नागरीकांच्या सुरु असलेल्या लढ्याला यश; अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपालिका आणि नगरपंचायतीत रूपांतर
● भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर, आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत
● कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचे दुसरे पर्व सुरु; इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला आजपासून सुरूवात
To know more click here
https://letsup.app.link/beADzLy3qib
6 624
...आणि अभिनेते मिलिंद शिंदे बालंबाल बचावले!
LetsUpp | Trending
⚡ लॉकडाऊनमुळे चित्रपटांच्या चित्रीकरणाची कामं अर्धवट थांबली होती. मात्र अनलॉकनंतर काही प्रमाणात ती कामे चालू झाली आहेत.
👉 या पार्श्वभूमीवरच एका आगामी मराठी चित्रपटाच्या उर्वरीत भागाच्या चित्रीकरणाचे काम चालू असताना जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे हे थोडक्यात बचावले आहेत.
काय आहे घटना? :
● अभिनेते मिलिंद शिंदे आपल्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र "जयंती" या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली आहे.
● मोठ्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याने सर्वजण अगदी उत्साहित होते. चित्रपटाच्या व्याप्तीनुसार मोठमोठाले लाईट्स, जिमी जीब क्रेन्स, मल्टिकॅमेरा सेटअप अशा अनेक अवजड उपकरणांच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु होणार होते.
● नेहमीप्रमाणे मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सराव करत होते, सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉट च्या चित्रीकरणाचा सराव करत होती.
● कथित सीनसाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती.
● या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती नेमके तिथेचं उभे होते हे समजलं नाही.
● परंतु जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली.
● नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें फ्रॅक्शन ऑफ सेकंदातचं खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला.
To know more click here
https://letsup.app.link/QoEO9KFPpib
6 624
भारतीय तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून धमकी
LetsUpp | Trending
⚡ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकार समोर आला आहे.
🏠 प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साराडे गावचा आहे. जाधव कुटुंबातील चार जण एका झोपडी वजा घरात राहतात. जाधव लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले.
💁🏻♂️ यासंदर्भात जाधवने सांगितले की, सकाळी पाच सहा जण आले आणि माझ्या वडीलांना आणि काकांना धमकी देऊन गेले. आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, यासाठी त्यांचा विरोध आहे.
👉 याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे. ज्यावर आम्ही होकार दिला होता. पण आता त्यांनी मर्यादा सोडली आहे.
🗣️ आम्ही घराची दुरुस्ती करणार आहोत. त्याला विरोध करत आहे. या घरात आम्ही अनेक वर्षापासून राहत आहोत, सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत, असे जाधवने सांगितले.
To know more click here
https://letsup.app.link/ic0zgMXQpib
6 624
VIDEO : फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या कोल्हापूरच्या महिलेला प्रियांका चोप्रा म्हणाली, यू रॉक!
LetsUpp | Kolhapur
💁🏻♂️ सोशल माध्यमांवर काही गोष्टी व्हायरल झाल्या तर कधी त्या ट्रोलही करतात तर काही प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचवतात.
👱🏻♀️ नुकतेच कोल्हापूर येथील मेहंदी आर्टिस्ट सोनाली यांच्या खडाखड इंग्रजीची बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस व प्रियांका चोप्राला चांगलीच भूरळ पडली आहे.
😍 मेहंदी आर्टिस्ट सोनाली वाघारिया या अस्खलित इंग्रजी बोलतात. त्यांच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून याचीच दखल सिनेकलाकारांनी घेतली आहे.
🧐 कोण आहेत सोनाली वाघारिया?
▪️ जेमतेम परिस्थितीमुळे सोनाली वाघारिया यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. मुंबईतील सांताक्रूझ येथे सोनाली यांनी जुहू परिसरात परेदशी पर्यटकांच्या हातावर मेहंदी काढण्याचे काम केले.
🗣️ परदेशी नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची इंग्रजी भाषा त्यांनी अवगत केली. एके दिवशी इंग्रजी बोलण्याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला.
👩🏻🦰 अभिनेत्रींनी घेतली दखल
या व्हिडिओची दखल अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी घेतली. ‘स्ट्राँग वुमन’ म्हणून त्यांनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी त्यांना मुंबईला येऊन रिल्स बनविण्याचे व मेहंदी काढण्याचे आमंत्रण दिले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/Hry0miiVpib
6 624
*‘मिमी’ आवर्जून पाहावी अशी कलाकृती*
LetsUpp | Entertainment
🎬 इंग्लिश विंग्लिश’, ‘डिअर जिंदगी’, ‘हिंदी मिडीयम’, ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटांमधून लक्ष्मण उतेकर यांनी कॅमेराच्या मागून उत्कृत्ष्ट कलाकृती प्रेक्षकांना दाखवली आहे. यासोबत त्यांनी मराठीत ‘टपाल’, ‘लालबागची राणी’ आणि हिंदीतील ‘लुकाछुपी’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची वेगळी छाप पाडली आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिमी’ चित्रपट नेटफ्लिक्स रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
🎞️ सुरुवातीपासून शेवटापर्यंत हा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो. उत्कृष्ट कथा, कलाकारांची मेहनत, दिग्दर्शकाची पकड आणि कॉमेडीचा तडका यामुळे ‘मिमी’ चित्रपट प्रभावी वाटतो. या चित्रपटात भावभावनांचे विविध कंगोरे उलगडून दाखवले आहेत.
🇮🇳 एकेकाळी भारतामध्ये सरोगसीचा मोठा व्यवसाय केला जात होता. यामुळे पाश्चात्त्य देशांसाठी भारत सरोगसीचं केंद्रस्थान बनला होता. या सरोगसी व्यवसायातून अनेक महिलांचे आणि तरुणींचे बळी गेले आहेत. इच्छा नसतानाही कुटुंबाच्या दबावामुळे किंवा परिस्थितीमुळे अनेक तरुण मुलींना हा व्यवसाय करावा लागला. यातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. ‘मिमी’मध्ये हीच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे.
👩🍼 २०११ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर ‘मिमी’ बेतलेला आहे. त्याची मूळ कथा समृद्धी पोरे यांची आहे. मराठी चित्रपटाचं हिंदी रूपांतर लक्ष्मण आणि रोहन शंकर यांनी केलं आहे.
👀 या चित्रपटाची गोष्ट सुरू होते, उत्तर प्रदेशातल्या एका गावात. इथं ‘सरोगसी’साठी तयार असणाऱ्यांची कमी नाही. जॉन (एडन व्हायटॉक) आणि समर (एवलीन एडवर्ड्स) हे अमेरिकी जोडपं त्यांच्या बाळासाठी सरोगेट आईच्या शोधात भारतात आलं आहे. त्यांचा चालक भानू (पंकज त्रिपाठी) याला हे कळल्यावर तो त्या जोडप्याला मिमीपर्यंत (क्रिती सेनन) घेऊन जातो.
💃 उत्तम नर्तिका असलेल्या मिमीला अभिनेत्री व्हायचं आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सरोगेट आई होण्याचं स्वीकारते; पण जॉन आणि समर सगळं अर्ध्यावरच सोडून अमेरिकेला निघून जातात. पुढं मिमी बाळाला कसा जन्म देते आणि स्वतःसह, कुटुंब आणि समाजाशी कशी झगडते, हे सर्व समजण्यासाठी आपल्याला ‘मिमी’ चित्रपट बघावा लागलं.
📌 या चित्रपटात क्रिती सेननने उत्कृष्ट अभिनय केला आहे. तिच्या सोबतीला असणाऱ्या सई ताम्हणकरची भूमिका देखील चांगला भाव खाऊन जाते. या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे ते पंकज त्रिपाठींनी. त्यांचा अभिनय नेहमीसारखाच दाद मिळवणारा आहे. आवर्जून पाहावी अशी ही कलाकृती आहे.
*मिमी*
● दिग्दर्शक: लक्ष्मण उतेकर
● कथा-पटकथा: लक्ष्मण उतेकर, रोहन शंकर
● कलाकार: क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक
● छायांकन: आकाश अग्रवाल
● संकलन; मनीष प्रधान
● संगीत; ए. आर. रेहमान
● ओटीटी; नेटफ्लिक्स
👉 चित्रपट समीक्षा - प्रशांत शिंदे
*बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप*
https://letsup.app.link/vwIBPr2aoib
6 624
मुंबई लोकलमध्ये प्रवासासाठी 'या' कर्मचाऱ्यांना मुभा
LetsUpp | Trending
🚊 वकिलांचाही फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता वकील आणि कोर्टातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र वकील संघटनेकडे देणं अनिवार्य आहे.
🚇 त्यानंतर संघटना वकिलांना पासच्या मंजुरीसाठी प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवून तिकीट विंडोवर केवळ पास दिला जाईल, दैनंदिन तिकीट मिळणार नाही, अशी माहिती महाधिवक्त्यांनी हायकोर्टात दिली आहे.
🚇 यावेळी मात्र सर्वसामान्य जनतेचं काय? असा सवाल हायकोर्टानं केला. लस घेतल्यांना जर घरात बसावं लागतं असेल तर लसीकरणाचा उपयोग काय? असंही हायकोर्टानं म्हटलं आहे.
📍लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा मानस आहे, असंही महाधिवक्ता म्हणाले.
👉 सध्या चर्चगेट ते दहीसर प्रवास करायला किमान 3 तास लागत आहेत. सर्वसामान्यांचाही गांभीर्यानं विचार करा, असं हायकोर्टानं म्हटलं. गुरूवारपर्यंत यावर भूमिका स्पष्ट करू, असं आश्वासन महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं.
To know more click here
https://letsup.app.link/32h1RNr9nib
6 624
'त्या' जिल्हाधिकाऱ्यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच बदली झाली रद्द
LetsUpp | Parbhani
⚡ परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर नुकतेच निवृत्त झाले व त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती देखील झाली.
👨🏻💼 मात्र, गोयल यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या आणि मुंगळीकर यांच्या जागी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवला गेला.
👩🏻💼 दरम्यान पदभार स्वीकारण्यासाठी आंचल गोयल या परभणी जिल्ह्यात दोन दिवस आधीच दाखल झाल्या होत्या.
💁🏻♂️ आंचल गोयल या डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या.
🗣️ त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या दबावापोटी सरकारने त्यांची परभणीतील नियुक्ती रद्द केली असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सध्या रंगली आहे.
👍 मुंगळीकरांच्या निवृत्तीनंतर आता अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर हे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
📍 मात्र आंचल गोयल यांच्या जागी परभणी जिल्हाधिकारी म्हणून कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/8rI5qiRVnib
