LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
*मालेगावमध्ये बंदोबस्तात वाढ, एसआरपीएफ च्या चार तुकड्या दाखल*
*LetsUp | Nashik*
मालेगाव मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मालेगाव शहराच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम 144 अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यांवर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली असतांनाही शहरातील मध्यवर्ती भागात काही नागरिकांचा अजुनही संचार दिसून येत आहे.
अशा नागरिकांना दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी विनाकारण घराबाहे पडू नये असे आवाहन घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेश सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी केले होते
प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शहरात 502 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून राज्य राखील पोलिस दलाच्या 4 तुकड्या दाखल झाल्या आहेत.
तसेच जळगाव येथून 100 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आली आहे.
मालेगाव शहरात कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट तयार होऊ नये यासाठी शासनाने विशेष दखल घेत मोठा फौजफाटा मालेगाव शहरात पाठविला असून दंडात्मक कारवाई टाळण्यासह आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पंकज आशियानी यांनी केले आहे
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
*अमेरिकेच्या नागरिकाविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल*
*LetsUp | Solapur*
एका अमेरिकन व त्याचबरोबर असलेल्या तीन भारतीय नागरिकांनी तोंडाला मास्क न लावल्याने त्याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरिक कोअजारनूर वय ५५, रा. न्यूयार्क, अमेरिका, जोसेफ डायस वय ३५, रा. बेळगाव, राज्य कर्नाटक, अमित रवींद्र पवनीकर वय २७, रा. नंदनवन, नागपूर व लोकनाथ स्वामी वय ७१, रा. आरेवाडी, ता. तासगाव, जिल्हा. सांगली हे चौघेजण अत्यावश्यक सेवा देण्याबाबतचा पास घेऊन थेऊर (पुणे) येथून पंढरपुरातील इस्कॉन मंदिरात आले होते.
त्यांची पंढरपूर जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली होती त्या सर्वांना होम कॉरंटाईन केल्ल्याबाबतचा शिक्के मारण्यात आले होते.
हे चौघेजण वाहनांबरोबर परत जाणे अपेक्षित असताना ते परत न जाता इस्कॉन मंदिर पंढरपूर येथे थांबले. तसेच अमेरिकन नागरिक मंदिर परिसरात फिरताना आढळून आले. या सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला.
त्याचबरोबर संसर्गजन्य आजारांचा संसर्गाचे उपाययोजना म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधला नव्हता. संसर्गजन्य रोगाचे बाबतीत जीवितास धोका होईल असे निष्काळजीपणा व हायगयीचे कृत्य केले.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
*आमदारांनी हाती कात्री घेत पतीराजाची कटींग केली...*
*LetsUp | Beed*
सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांची दाढी-कटींग वाढली आहे. पण बाहेर सलूनची दुकानेच उघडी नाहीत.
पतीराजांची हीच अडचण ओळखून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी स्वतः हातात कात्री घेत आपल्या पतीराजांची कटींग केली.
स्वतः अक्षय मुंदडा यांनी आपल्या फेसबूक पेजवर याचा फोटो देखील पोस्ट केला आहे. लॉकडाऊन झाला त्या दिवसापासून आ.नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा हे मुंबईतच अडकून पडलेले आहेत.
इकडे मतदारसंघाची सारी मदार नंदकिशोर मुंदडा यांच्यावर येऊन पडली आहे. लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडता येत नाही
त्यामुळे वेळ कसा घालवायचा याचा विचार सर्वजण करीत आहेत. अनेकजण आपल्यातील लपलेली कौशल्य तपासून पाहताना दिसत आहेत.
आमदार नमिता मुंदडा यांनीही हाती कात्री घेत आपल्या पतीराजांची कटींग करून आपण एक उत्तम ब्युटीशियन असल्याचे दाखवून दिले आहे.
कटींग झाल्यानंतर अक्षय मुंदडा यांनी एक कमेंट केली असून त्यात ते म्हणतात ‘लॉकडाऊनचा असाही एक फायदा जो माझ्या कायम आठवणीत राहील ! बायको ने आज माझा परफेक्ट हेअरकट केला.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
*टास्क फोर्सची स्थापना*
*LetsUp | Pune*
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील कोराना-१९ विषाणूच्या संसर्गाने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण राज्य आणि राष्ट्रीय पातळीच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे.
वाढत जाणाऱ्या मृत्यूदरांचे प्रमाण कमी करण्याबरोबर कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी पुण्यातील दहा नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स (कार्य बल गट) स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला पुण्यातील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे हे डॉक्टर पुण्यातील कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
*जिल्ह्यातील सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश*
*LetsUp | Sangali*
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रावर विविध दाखले व इतर कामकाजासाठी मोठ्याप्रमाणावर लोकांची गर्दी होते.
कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना या विषाणूचे संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होते.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सेतू, ई-सेतू व महा ई केंद्रे दिनांक 15 एप्रिल 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते पुढील आदेश होई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
*सातारा व कराड येथील मिलिटरी कॅन्टीन दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीत पुर्णत: बंद*
*LetsUp | Satara*
सातारा व कराड येथील मिलिटरी कॅन्टीन दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीत पुर्णत: बंद राहणार असून याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी.
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत दि. 3 मे पर्यंत पुन्हा वाढविण्यात आली आहे.
त्यामुळे मुख्यालयाकडून आलेल्या आदेशानुसात दि. 20 एप्रिलपर्यंत मिलिटरी कॅन्टीन बंद राहणार असून पुढील आदेश येईल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल,
अशी माहिती मिलिटरी कॅन्टीनचे व्यवस्थापक विंग कमांडर राजेंद्र शिंदे यांनी दिली.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *शरद पवारांचं भाकित; राज्यावर अर्थसंकट!*
*LetsUp l Update*
⚡ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनसंवाद साधला. शरद पवार म्हणाले, ‘देशात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशात कोरोनाचे संकट आहे.
💸 *अर्थसंकट* : लॉकडाउनमुळे उद्योग बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढणारे कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट आले आहे.
💁♂️ *भाकीत* : शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे हे परिणाम एक ते वर्ष जाणवतील,’ असे भाकित शरद पवार यांनी केले आहे.
🗣️ *संवाद* : जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना शरद पवार म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापूर्वी 21 दिवसांचा लॉकडाउन होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.
📌 देशात वाढलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या चिंताजनक आहे. जगातील स्थितीशी याची तुलना करणार नाही. पण, आपण नियमाचे पालन करायला हवे असेही पवार म्हणाले.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🎞️ *बॉलिवूडचे सेलिब्रिटी अडकले लॉकडाऊनमध्ये*
*LetsUp | Entertainment*
🔐 देशभर लॉकडाऊन लागू झाल्यावर कित्येक लोक आपल्या घरी परत येऊ शकले नाहीत.
👉 *मनोज वाजपेयी*: मनोज वाजपेयी उत्तराखंडमध्ये शुटिंग करत होते. मात्र त्यांना परत येता आले नाही. ते अशा ठिकाणी अडकला आहे जिथे टिव्ही आणि मोबाईलची रेंजही नाही.
👉 *जॅकी श्रॉफ* : जॅकी श्रॉफ देखील पुण्याजवळच्या फार्महाऊसवर अडकले आहेत आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आपल्या बद्दल सांगितले.
👉 *जया बच्चन* : जया बच्चनही आपल्या कुटुंबीयांपासून दूर दिल्लीत अडकल्या आहेत.
👉 *जुनैद खान* : आमिर खानचा मुलगा जुनैददेखील पाचगणीतील आपल्या बंगल्यात अडकून पडला आहे.
📆 आता लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या सर्वांना आहे तिथेच राहावे लागणार आहे.
🎬 *बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😍 *मार्च-एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ*
*LetsUp | Update*
🗣️ राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या घरगुती, व्यावसायिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.
📝 सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन केल्यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीजबिल प्राप्त होईल.
📆 राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेप्रमाणे मार्च महिन्याचे बिल भरण्यास महावितरणने 15 मे 2020 तर एप्रिल-2020 चे वीजबिल भरण्यासाठी 31 मे 2020 ची अंतिम तारीख दिली आहे.
🤩 लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
📍 लॉकडाऊनमुळे महावितरणकडून 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
*सात मंत्र्यांची उपसमिती स्थापन*
*LetsUp | Update*
राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला संपवणं, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणां युद्धस्तरावर काम करत आहेत. त्यांच्या लढाईला बळ देण्याचं कामही ही समिती करणार आहे. राज्यात २४ मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्र ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी अकरा तज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🛅 *देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन कायम*
*LetsUp | Breaking*
⚡ कोरोनाचा अधिकचा संसर्ग लक्षात घेता देशभरातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
🧐 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य भाषणातील महत्वाचे मुद्दे*
● करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन 3 मे पर्यंत कायम राहणार
● 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्यातील स्थितीचे मुल्यांकन करणार
● आता कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणे हि सर्वांची जबाबदारी आहे
● लॉकडाउन वाढवा ही नागरिकांची मागणी आहे
● सरकारकडून उद्या नवीन नियमावली जारी करणार
● 20 एप्रिलपर्यंत ज्या राज्यात नियंत्रण आणले जाईल, तेथील नियम शिथील केले जातील- मोदी.
● लॉकडाउमुळे आर्थिक नुकसान होतेच, मात्र ते जनतेच्या जीवापेक्षा मोठे मानता येणार नाही
● समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरू केले
● अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नसले तरी देखील तुलनेने भारतातील करोनाबाधितांची संख्या ३० टक्क्यांनी कमी- मोदी.
● एखाद्या सैनिकाप्रमाणे देशातील जनता कर्तव्य पार पाडत आहे
● देशव्यापी लॉकडाउनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले
*या सात गोष्टी जरूर लक्षात ठेवा*
1️⃣ घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या
2️⃣ लक्ष्मण रेखा ओलांडू नका; सोशल डिस्टनसिंग, घरात बनवलेले मास्क वापरा
3️⃣ शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
4️⃣ आरोग्य सेतू अँप डाउनलोड करा व इतरांनाही याबाबत जागरूक करा
5️⃣ कोणालाही कामावरून काढू नका
6️⃣ गरीब परिवाराची काळजी घ्या त्यांना मदत करा
7️⃣ अत्यावश्यक सेवेतील लोकांचा सन्मान करा
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *राज्यात कोरोना पॉझिटिव्ह वाढले!*
*LetsUp l Update*
⚡ राज्यात आणखी 82 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 64 इतकी झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
💁♂️ 82 रुग्णांपैकी 59 रुग्ण मुंबईमधील आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनही 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही तयार केले आहेत.
👀 *येथील रुग्ण* :
● मुंबई : 59
● ठाणे : 05
● मालेगाव : 12
● पुणे : 03
● वसई-विरार : 01
● पालघर : 02
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🎯 *कोरोनो अलर्ट! वस्तू खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा*
*LetsUp l Special*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. परंतु एखाद्याला घराच्या आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाजार किंवा किराणा दुकानात जावे लागतच आहे.
तसे, लोक सोशल डिस्टनसिंगचे पालन करताना दिसत आहेत. तरीही तज्ञांच्या मते, कुठीलीही खरेदी करताना खालील काही गोष्टींचे अनुसरण करूनच आपण कोरोनापासून संसर्ग टाळू शकतो. *त्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/3c9gizW
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
*८१ कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
*LetsUp | Nashik*
नाशिक जिल्ह्यातील काही संशयितरुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यात ८१ रुग्ण निगेटिव्ह आढळले आहे. त्यामुळे जिल्हा वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे
रात्री उशिरा आलेल्या प्रलंबित रिपोर्टपैकी सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. यात नाशिक ४९, तर मालेगावमधील ३२ असे एकूण ८१ रिपोर्ट जिल्हा प्रशासनाला निगेटिव्ह आले आहे
- मालेगाव मधील जे कोरोनाबाधित रुग्ण आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे हे संशयित रिपोर्ट होते. मात्र ते निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनासह जिल्हा वासीयांना दिलासादायक बातमी मिळाली आहे
जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्ण संख्या ३१ असून त्यात नाशक शहर ३, चांदवड १, पिंपळगाव नजीक १ ( कोरोनामुक्त) , मालेगाव २७ ( एकाच्या मृत्यूसह ) यांचा समावेश आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *कोरोनावरील लस तयार करण्याचा दावा!*
*LetsUp l International*
⚡ चीनमधून चार महिन्यांपूर्वी कोरोनाने जगात प्रवेश केला. या व्हायरसमुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. जगभरातील 18 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
💁♂️ *दावा* : अद्याप व्हायरसवर कोणत्याही देशाला लस शोधता आली नाही. 50 देशांमध्ये लस तयार करण्यासाठी संशोधन सुरु आहे. दरम्यान, कोरोनाची प्रतिबंधित लस इस्रायलने तयार केली असून त्यांचे वैज्ञानिक येत्या 90 दिवसांत कोरोनाशी लढा देण्यासाठी लस पूर्णपणे तयार करतील असा दावा त्यांनी केला आहे.
👍 *अभिनंदन* : विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचे म्हणण्यानुसार ओफिर अकुनिस यांनी दावा केला आहे की, कोरोना दूर करण्यासाठी 90 दिवसांच्या आत लस तयार करेल. त्यांच्या मते ही एक अतिशय अनोखी व प्रभावी लस आहे. मिगेल गॅलेली रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांचेही मंत्री यांनी अभिनंदन केले.
📌 सदर लस लवकरच वापरत आणली जाईल आणि नंतर ती इतर देशांना दिली जाईल, असेही ते म्हणाले.
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂️ *शहरात अनेकांना अन्नदान*
*Letsup | Pimpri chinchwad*
पिंपरी चिंचवड शहरात भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत. या संघटनांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समन्वयातून शहरात विविध ठिकाणी सुमारे 39,127 व्यक्तींना अन्न वाटप करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये, यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र बेघर, अनाथ, हातमजूर, दिव्यांग, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे उपासमार होणाऱ्या लोकांचा प्रश्न देखिल मार्गी लागावा, यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशुर व्यक्ती यांनी या कार्यात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनेक संस्थानी प्रतिसाद देत गरजूंच्या मदतीसाठी धावून येत आहे.
आपातकालीन परिस्थितीत आपलेही योगदान असावे, यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. शहरातील विविध भागांत जाऊन फुड पॅकेट आणि अन्न वाटप करण्याचा कार्यक्रम या संस्थेतील कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *दोन कामगारांचा मृत्यू!*
*LetsUp l Palghar*
⚡ तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या कंपनीमध्ये आज दुपारी बाराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.
👀 तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एम-3 मध्ये गॅलेक्सी सरफॅक्टटंट ही कंपनी आहे. दुपारी बाराच्या सुमारास येथे भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत आला.
📌 तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेले आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🇺🇸 *अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू*
*LetsUp | Corona Live*
⚡ अमेरिकेच्या इतिहासात देशभरातील 50 राज्यांमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे.
😷 अमेरिकेत कोरोनामुळे आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला असतानाच कोरोनाचे अमेरिका जणू नवे केंद्र बनले आहे.
💁♂️ काही लाखांमध्ये अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या असून या आजाराने आतापर्यंत 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
🗣️ *अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विट द्वारे माहिती* :
👉 इतिहासात पहिल्यांदाच देशातील 50 राज्यांमध्ये संपूर्णपणे आपत्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कधीच न पाहिलेल्या शुत्रूशी युद्ध सुरू आहे आणि विजय नक्कीच आपला होणार, असे म्हटले आहे.
👍 *जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
